उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे.
दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे.
हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत.
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही.
भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत.
शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे.
एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.
वाचने
49851
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमर्त्य सेन
केंद्रात सत्तेवर
https://www.loksatta.com
संपूर्ण एकांगी आणि
डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या
In reply to संपूर्ण एकांगी आणि by सुबोध खरे
प्रचंड सहमत.
In reply to डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या by आग्या१९९०
सध्या ज्यांचं वय 45 पेक्षा
In reply to प्रचंड सहमत. by कॉमी
माझे पत्नीचे आणि माझ्या आई
In reply to सध्या ज्यांचं वय 45 पेक्षा by रात्रीचे चांदणे
ही आकडेवारी द्या, ती आकडेवारी
In reply to डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या by आग्या१९९०
सरकारकडे प्रत्येक कामासाठी
In reply to ही आकडेवारी द्या, ती आकडेवारी by श्रीगुरुजी
देतील की आकडेवारी. वेळ झाला
In reply to सरकारकडे प्रत्येक कामासाठी by आग्या१९९०
क्षमस्व गुरुजी
In reply to देतील की आकडेवारी. वेळ झाला by श्रीगुरुजी
इथे लाट कशी कमी करायची,
In reply to देतील की आकडेवारी. वेळ झाला by श्रीगुरुजी
असली निर्रथक आकडेवारी, ज्याचा
In reply to इथे लाट कशी कमी करायची, by आग्या१९९०
+१
In reply to ही आकडेवारी द्या, ती आकडेवारी by श्रीगुरुजी
हेच म्हणतोय. या आणीबाणीच्या
In reply to +१ by प्रदीप
इथे थोडा असहमत
In reply to हेच म्हणतोय. या आणीबाणीच्या by श्रीगुरुजी
जनतेच्या पैशातून पगार खाणाऱ्या
In reply to इथे थोडा असहमत by प्रदीप
कोर्टाला आकडेवारी कशासाठी हवी
In reply to जनतेच्या पैशातून पगार खाणाऱ्या by गॉडजिला
हरकत नाही
In reply to कोर्टाला आकडेवारी कशासाठी हवी by श्रीगुरुजी
अवमान कोणीही केलेला नाही. जी
In reply to हरकत नाही by गॉडजिला
निश्चितच न्यायालयाच्या मनात
In reply to अवमान कोणीही केलेला नाही. जी by श्रीगुरुजी
लहान मुलांना बसविण्यासाठी मटा
In reply to संपूर्ण एकांगी आणि by सुबोध खरे
" हर घर शौचालय " असताना
In reply to लहान मुलांना बसविण्यासाठी मटा by श्रीगुरुजी
मोदींच्या योजना हाणून पाडून
In reply to " हर घर शौचालय " असताना by आग्या१९९०
त्यात काय?
In reply to " हर घर शौचालय " असताना by आग्या१९९०
हो, हीच लोकं कोणत्या
In reply to त्यात काय? by सॅगी
त्या तथाकथित वृत्तपत्रातून ते
In reply to हो, हीच लोकं कोणत्या by आग्या१९९०
अच्छा! तुम्हाला जी घाण वाटते
In reply to त्या तथाकथित वृत्तपत्रातून ते by श्रीगुरुजी
घाण वाटते नाही, घाण आहेच.
In reply to अच्छा! तुम्हाला जी घाण वाटते by आग्या१९९०
हो, हीच लोकं कोणत्या
In reply to हो, हीच लोकं कोणत्या by आग्या१९९०