Skip to main content

सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 18/05/2021 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात. त्यांची कुमारिकांच्या हातात दिवे घेउन स्वामीये अय्य्प्पा च्या जय घोषात निघणारी मिरवणुक मला मनापासुन आवडते यात त्यांच्या वाद्यांचा सुंदर लय अगदी मनात साठवुन ठेवावा असाच असतो... ज्या आवडीने मी गुजराती गरब्याला जात होतो त्याच आवडीने मी बंगाल्यांच्या काली पुजन [सरस्वती पुजन ] ला देखील गेलो आहे आणि आजही अय्यपांच्या कार्यक्रमात मी आवडीने जातो. हरिवरासनम हे बहुतेक कधी तरी माझ्या कानावर पडले असावे पण हल्लीच ते वीणा वादनात मी ऐकले. अधिक शोध आणि इकडे तिकडे पाहताना हेच गीत के. जे. येसुदास यांनी गायन केले असल्याचे समजले आणि ते लोकप्रिय असल्याचे देखील कळले. अजुन शोध घेतल्यावर श्रीलथा हीने गायलेले हरिवरासनम ऐकले आणि या धाग्याची सुरुवात त्याने करावीशी वाटली. या धाग्यात भक्तीमय गाणी देण्यावर भर देण्याची इच्छा असुन प्रतिसाद देणार्‍यांनी देखील अश्याच प्रकारची [ भक्ती गीत,अभंग, गाणी, स्तोत्र इ.इ.इ. ] त्यांना आवडलेली किंवा त्यांनी ऐकलेले अश्या प्रकारचे संगीत / गायन या धाग्यात देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करत आहे. :)

मदनबाण.....

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 49059
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

***********************************************************************************

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobs

In reply to by बांवरे

घनपाठाच्या धाटणीने गायलेले गणानां त्वा गणपतिं स्तोत्र अतिशय उत्तम ! कोणीतरी अधोरेखीत केलेला शब्द वापरुन या धाग्यावर काही तरी प्रतिसाद देइल, अशी माझी मनोमन धारणा होती. हे स्तोत्र इथे देताना मुख्य हेतु तोच होता. या अधोरेखीत शब्दावर पुढचा नविन धागा काढला तर चालेल काय ? असा प्रश्न मी हा धागा वाचणार्‍या सर्व मंडळींना करत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “If you tell the truth, you don't have to remember anything.” :- Mark Twain

अवांतर-तान्हाजी-अनसंग वारियर मधली गाणी मी फिरायला जाताना आवर्जून ऐकते.पण सिनेमा पहिल्यांदा मागच्या महिन्यात पाहिला.तिनक तिनक गाणं पाहून खुपचं भरून येत.सुंदर वेगळ्या प्रकारचा आवाज भावपूर्ण गाण्याला वापरला आहे. https://youtu.be/IUPUWcN2YWY

ला ला लँड हा माझा खुप आवडता सिनेमा आहे.त्याचे सुरुवातीचे गाणे इतके जबरदस्त आणि एका सलग शॉट मध्ये चित्रीत केले आहे की डायरेक्टर आणि नर्तकांच्या कौशल्याने थक्क व्हायला होते. गाण्याचे बोल सुद्धा छान आहेत. LA म्हणजे लॉस अ‍ॅन्जेलिस मध्ये मुंबई सारखेच तरुण कलाकार कामासाठी येतात. आणि सर्व अपयशांचा सामना करत सुद्धा ते कसे प्रयत्न करतात असे गाणे आहे. (Hence the name La La Land.) ला ला लँड आणि पर्वा पाहिलेल्या द डिसायपल मध्ये एक स्मान धागा आहे असे अचानक वाटले. ला ला... मध्येसुद्धा जॅझ या संगीत प्रकाराची साधना आणि वैयक्तीक यश अश्या दोन गोष्टींमध्ये नायकाला निवडायचे असते. अर्थात, ला ला.. बर्‍याच पैलूंमध्ये बॉलिवूड सिनेमांसारखा आहे. नायक, नायिका, सरतशेवटी यश इत्यादी. द डिसायपल हा कोठेही जरासुद्धा नाटकी आणि क्लिशे होत नाही.

In reply to by कॉमी

बर्‍याच पैलूंमध्ये बॉलिवूड सिनेमांसारखा आहे. नायक, नायिका, सरतशेवटी यश इत्यादी.
नेमका इथेच तर फरक आहे... नायक नायिका त्यांचे सुत जमणे इथं पर्यंत सर्व व्यवस्थित. पण खरे वळण तिथे येते जेंव्हा नायक नायिकेला करीअर साठी रिलेशनशीप तोडावी लागेल हे सुचवतो व त्यासाठी पुढाकारही घेतो आणी दोघे विभक्त होतात व आपली स्वपे पुर्ण करतात... अर्थातच रिलेशनशीपचा बळी देउन... ये बात बिलकुल अन-बॉलीवूड आहे.

In reply to by कॉमी

मला ला ला लँडला जॅझ ची उपमा दिलेली खुप आवडली, इथे प्रत्येक जण स्वतंत्र आहे, आपापल्या क्रुतीत दंग आहे तरीही या सर्वांचा मिळुन एक रिदम तयार होतो, जॅझमधेही वरुन सर्व एका लयीत वाटले तरी आतुन प्रत्येक जण स्वतःचे संगीत तयार करत आहे वगैरे वगैरे वगैरे... फिलॉस्फी. आणी हो चितरपट पाहुन झाल्यावर र्‍हीथीक रायन गोस्लींगला ढापतो की गोस्लींग रितीकची स्टाइल मारतो यावादाचा निर्णय मी त्यांच्या त्यांच्या फॅन वर सोपवतो.

In reply to by गॉडजिला

पण शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आहे. अर्थात ह्याचाने सिनेमाच्या दर्जात काही फरक पडत नाही, सिनेमा भारीच आहे.

In reply to by कॉमी

हे एकदम समांतर प्रकरण आहे... यश मिळवण्यासाठी कित्येक प्रिय गोश्टींवर पाणी सोडावे लागते असा संदेश आहे...

In reply to by गॉडजिला

मला ला ला लँड मध्ये "पाणी सोडल्यामुळे यश मिळाले" असे को-रिलेशन दिसले नाही. ते आधीच वेगळे झाले असतात, आणि आता जर तिला संधी मिळाली तर त्यांचे पुन्हा एकत्र येणे शक्य सुद्धा नसते. बॉलिवुडी म्हणणे अयोग्य आहे असे मला पण वाटले आता. कारण हे हॉलिवुड मध्ये पण असतेच. (आणि बॉलिवुड हे माझ्यामते अपमानकारक विशेषण नाही, हे स्पष्ट करतो.) बॉलिवूड असो वा हॉलिवुड, अश्या टाईपचा सिनेमा आपल्याला बर्‍याचदा दिसतोच की, अतीव कष्ट, मोठे बलिदान केल्यामुळे तेव्हढेच दिव्य यश मिळते. ही कल्पना इतक्या सिनेमातून पाहीली आहे म्हणुन क्लिशे वाटले. पण द डीसायपल म्हणजे त्याच्या संपूर्ण विरुद्ध जाणारी गोष्ट आहे. स्वतःच्या कष्टांना आणि बलिदानांना रोमॅन्टिसाईझ करणार्‍या तरुणाची गोष्ट आहे. तो ज्या साधनेत असतो ते कधीच फळाला येत नाही, त्याचे बलिदान किंवा कष्ट कमी पडलेत असे दर्शक म्हणुन मला तरी म्हणावे वाटले नाही. ला ला.. मध्ये जॅझची फिलॉसॉफी मस्त सांगितली आहे असे मला पण वाटले.

In reply to by कॉमी

मला ला ला लँड मध्ये "पाणी सोडल्यामुळे यश मिळाले" असे को-रिलेशन दिसले नाही.
ब्रेकप वाज फाउंडेशन ऑफ सक्सेस... वॉच द सिन...

In reply to by गॉडजिला

movie is all about dream, and not supposed to be romance. because at the beginning it shows how much both of 'em really obsessed by their dreams that they hope gonna happened soon, they dating because they both shared same goals, but to achieved that they realize they both must go in separate ways actually kinda love the ending tho' especially at the epilogue bc both of 'em could change their dream to be together. but in reality it's different

In reply to by गॉडजिला

तो सीन बघूनच प्रतिसाद दिला होता. शेवटचे "what could have been" गाणे आहे ना, ज्यात जर त्यांचे आधी भांडण झाले नसते तर त्यांचे आयुष्य कसे असले असते असा सिनॅरिओ त्यात चित्रीत केला आहे. त्यात ते एकत्रित आणि यशस्वी दाखवले आहेत. त्यांचे सॅक्रिफाइज हे त्यांच्या यषाचे कारण असा अर्थ मी काढला नाही बुवा. ते आधीच वेगळे झाले असतात आणि आता परत येणे त्यांना करियरच्या आड येणारे वाटते. जर ते आधी वेगळे झाले नसते, तर एकत्रित राहून सुद्धा तीने ती ऑडिशन दिलीच असती, आणि ती जिंकलीच असती. त्याने त्याचा क्लब पॅरिस मध्ये काढला असता. एनीवे, ज्याच्या त्याचा नजरिया !

In reply to by कॉमी

आणि त्यांनी सेपरेट व्हायचा निर्णय घेतल्याने मिळालेले यश हे वास्तव आहे. दोन्ही गोश्टी आपण मिळवु शकत नाही हा संदेश आहे. टायटॅनिकमधेही शेवटी रोज जॅकला मिळते असा प्रसंग आहे पण ते बोट बुडली नसती तर या नंतरचे स्वप्नरंजन आहे इथेहि तोच मामला आहे

In reply to by गॉडजिला

मला हा संदेश वाटला नाही. तसे झाले हे खरे, पण ते काही एकुलते एक आउटकम होते असे मला वाटत नाही. करिअर च्या असलेल्या स्थितीमुळे पुन्हा एकत्र न येणे ते इष्ट मानतात हे तर आहेच, पण ते बलिदान दिल्याशिवाय यश मिळाले असते असे नाही वाटले मला. जॅक आणि रोज ची स्थिती खूप वेगळी असते हा गॉजिरा. तुलना बरोबर नाही. तिथे दोघे किंवा दोघांपैकी एकजण मरणारच असतो. फक्त मरणार कोण हा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांचे स्वप्नरंजन खरोखर स्वप्नरंजनच आहे. इथे तसे नाही. असो, पिंडे पिंडे मत:भिन्नता.

In reply to by कॉमी

पण ते बलिदान दिल्याशिवाय यश मिळाले असते असे नाही वाटले मला.
दॅट्स ओके, पण सांगितलेले असे आहे की जर तुमच्या अँबिशन मोठ्या असतील तर त्यसाठी प्रसंगी तुम्हाला तुमच्या इतर सर्वगोश्टींचा बळी द्यावा लागु शकतो. आणी ला ला लँडचे वेगळेपणच हे आहे की आपल्या महत्वाकांक्षांसाठी नात्याचा बळी ते समजुतदारपणे व म्युचुअली देउन ते मार्गस्थ होतात... किंबहुना नायक त्यासाठी पुढाकार घेतो... इथं बॉलीवुड असते तर एकाचे सॅक्रीफिकेशन व दुसर्‍याने यशाच्या पायर्‍या चढत जाताना त्यांच्या (भोवतालच्या लोकांनी मुद्दम पेरलेल्यागैरसमजुतीमधुन )नात्याचा बळी पोराबाळंची हेळसांड व शेवटी म्या चुकलं म्हणत मिलन असा शेवट दिसला असता.. पण लाला लँडमधे मिलन हे एक स्वप्न उरते आणी समजुतदार्पणे नात्याचा दिलेला बळी हा त्यासाठीचा त्याग ठरतो...हा त्याग हा बॉलीवुडी हमखास यशाचा मार्ग आजिबात नाही.. ति फक्त एक वास्तव किंमत आहे जी महत्वाकांक्षेपायी चुकवावी लागते, इतकचं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-

The two most important things to do for self-defense are not to take a martial arts class or get a gun, but to think like the opposition and know where you're most at risk. :-

Barry Eisler

खूप दिवसांनी काही भारी पाहायला आणि ऐकायला मिळालं https://youtu.be/czky74Y1lpI मनोज मुंतशीर यांचे मनापासून आभार.

In reply to by गुल्लू दादा

गुल्लू तुमचे ही लिंक इथे दिल्या बद्धल अनेक आभार. पहिला अंक ऐकला, आता दुसरा ऐकतो आहे. https://www.youtube.com/watch?v=SzhQNJeZlrI

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

रुक सका ना गान सुनकर महाराणा के प्रताप का सुन कर अभिमान हुवा प्रबल मेरे मन के सागर का हे भारत के हिंदू जनजन अब तो प्रबल करलो अधर्म के विरोध मे अपना मन... सगळे ६ भाग पाहिले / ऐकले , ७ वा भाग अजुन यायचा आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

दत्त संप्रदयाचा प्रसार महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटक आणि थोड्या फार प्रमाणात मध्य प्रदेशात झालेला आहे. रंग अवधूत महाराज / स्वामी यांनी दत्त बावनी ची रचना केली ती गुजराती भाषेत आहे. मी लहानपणा पासुन ती ऐकली आणि म्हंटली देखील आहे. काही काळा पूर्वी ही दत्त बावनी विविध रागात माझ्या ऐकण्यात आली होती. त्यातील मला आवडलेल्या रागात असलेली खाली देत आहे. P1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

मी रुद्र अनेक वेळा ऐकले आहे, पण Naan Kadavul चित्रपटातले ओम शिवोहम ऐकल्यावर माझी रुद्रात रुची फारच अधिक वाढली कारण या गाण्यात रुद्रातील नमकाच्या काही ओळी आहेत.इलैयाराजा यांच्या संगीताचा प्रभाव मला अधिक उत्तम स्वरुपाच्या रुद्र शोधाकडे नेण्यास कारणीभूत ठरला.त्यानंतर मी अनेक रुद्र ऐकली... विविध रुद्र ऐकुन शेवटी मी द घनपाठी या युट्यूब चॅनलवर शोध घेत घेत पोहचलो. हा चॅनल म्हणजे जणु अमोघ रत्नांचा खजीनाच आहे. यात मला रुद्र घनपाठात देखील ऐकावयास मिळाले ! :) आज पहिला श्रावण सोमवार आहे, या निमित्त्याने रुद्र पाठ इथे देत आहे. [ Om Shiva Hom ] ============================================================================================ ============================================================================================ रुद्र घन पाठात :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Mahanubhavudu Full Video Song HD | Mahanubhavudu Video Songs | Sharwanand | Mehreen | Mango Music

आज गणेश चतुर्थी निमित्त्याने अमृतराय रचित कटाव इथे देत आहे. या कटाव बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :- अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती : एक सुखद प्रवास !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover

कालच दाक्षिणात्य हिंदी डब साई पल्लवी अभिनीत 'गार्गी' हा सिनेमा पाहिला. क्राईम-सस्पेन्स -कोर्ट ड्रामा प्रकारचा हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. चित्रपटाचा शेवट अनपेक्षित व धक्कादायक. प्रत्येक पालकाने अवश्य पहावा असा चित्रपट. यू ट्यूबवर आहे.

इरफान खान नंतर सहजसुंदर अभिनय पाहायला मिळेल का याची चुटपुट होती पण तो आला तो लढला,तो जिंकला-पंकज त्रिपाठी याने ती पोकळी भरून काढली.पंकज त्रिपाठी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! सध्या त्यांची क्रिमिनल जस्टीन -एक अधुरा सच ही वेब सिरीज hotstar वर पाहत आहे.दर शुक्रवारी पुढील भाग प्रदर्शित होते.तीन भाग प्रदर्शित आहेत.