'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. तर काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.
मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील, तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात.
वैयक्तिक म्हणा अथवा समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो लहानमोठा असू शकतो. अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच.
तसंही आपलं माणूस म्हणून वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तन व्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तन व्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! पण चांगुलपणालाही काही कंगोरे असतात. ते कोण कोणत्या कोनात त्याकडे पाहतो आहे यावर अवलंबून असतं नाही का?
सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. डोळ्यांचे विकार बरे करता येतात, पण विचारांची वानवा असल्याने दृष्टीत आलेल्या दोषाचं काय? माणसांच्या असण्यात आदिम अवस्थेपासून तो सोबत करतो आहे. तो दूर करणारं औषध अद्याप सापडलं नाही. खरतर ते शोधायची आवश्यकता नाही. ते ज्याचं त्याने आणायचं असतं. ते कुणाला कुठे मिळेल सांगणं अवघड आहे. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात. कदाचित डोळसांच्या ललाटी नियतीने वंचनेचा शाप कोरलेला असतो. कुणी अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा विचार, संस्कार वगैरे पोरके होतात.
संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे. असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये विश्वात नांदताना दिसली असती का? प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोधच्या वावटळी येतील. समर्थनाचे सूर सजत राहतील. त्यामागे कुणाचे स्वार्थ, कुणाचे अहं उभे असतील. त्यातून कुणी समर्थन करेल कुणी विरोध. पण वास्तव हेही आहे की, विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
वाचने
7380
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषय खुपच रोचक आहे.
औषध म्हणजे मार्ग उपलब्ध आहे,
In reply to विषय खुपच रोचक आहे. by सोत्रि
औषध म्हणजे मार्ग उपलब्ध आहे, ध्यानमार्ग!आरे वा, फार कुतुहलजनक प्रकार आहे हा म्हणजे. याबाबत आजुन जाणून घ्यायला आवडेल की. नुस्त्या एकोळीने काय होणार ? अजुन दोन चार ओळी अवश्य द्याव्यात.नक्कीच, कुतूहलजनक तर आहेच पण
In reply to औषध म्हणजे मार्ग उपलब्ध आहे, by गॉडजिला
आपण सांगितलेला लेख पावर ऑफ
In reply to नक्कीच, कुतूहलजनक तर आहेच पण by सोत्रि
एक शंका...
In reply to आपण सांगितलेला लेख पावर ऑफ by गॉडजिला
कृत्रिम वातावरनाचा बेस आहे
In reply to एक शंका... by ज्ञानोबाचे पैजार
कृत्रिम वातावरनाचा बेस आहे
In reply to कृत्रिम वातावरनाचा बेस आहे by गॉडजिला
धन्यवाद...
In reply to कृत्रिम वातावरनाचा बेस आहे by गॉडजिला
एकदा का बालवाडीत प्रवेश घेतला
In reply to धन्यवाद... by ज्ञानोबाचे पैजार
कृष्णाने अंमके बोलले, बुद्ध
In reply to आपण सांगितलेला लेख पावर ऑफ by गॉडजिला
:)
In reply to कृष्णाने अंमके बोलले, बुद्ध by सोत्रि
ह्म्म...
In reply to :) by गॉडजिला
नाही सांगु शकणार
In reply to ह्म्म... by सोत्रि
कुबड्या न घेता स्वानुभवाच्या कलेने ही अवस्था तुम्ही कशी समजावून सांगाल?नाही सांगु शकणार कसे सामजावायचे ते. पण प्रत्यक्ष सामजावु मात्र शकेन इतरांच्या कुबड्या न घेता. आणी हे करु शकणारा न मी पहीला आहे ना शेवटचा असेन ही सुध्दा माझी खात्री आहे.पब्जी आणी कर्मयोग आणी अहं विसरणे
उत्तराच्या स्वरूपात मत न
अहं स्वतःसाठी कमी व्हावा की
In reply to उत्तराच्या स्वरूपात मत न by राघव
हे डिस्क्लेमर टाकायला विसरलो
मोठी मजेची गोष्ट आहे ही.
In reply to हे डिस्क्लेमर टाकायला विसरलो by राघव
आता तुमचे पहिले पाउल पडलयं
माझं पाऊल कोणतं आणि कुठे ते
In reply to आता तुमचे पहिले पाउल पडलयं by राघव
बरं, तुम्ही म्हणता तर तसं. :-
In reply to माझं पाऊल कोणतं आणि कुठे ते by गॉडजिला
मी काय म्हणत होतो ?
In reply to बरं, तुम्ही म्हणता तर तसं. :- by राघव