Skip to main content

रंजन आणि कल्पनाविस्तार (२)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 24/05/2021 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ इथे ...... पहिल्या भागाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद बघून आणि तिथल्या सूचना विचारात घेऊन हा भाग सादर करीत आहे. कल्पना लढवा ! खाली एका मराठी वृत्तपत्रातील लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे. ok तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा. प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. शक्यतो प्रश्न विचारू नका. आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा. मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही. धन्यवाद !

वाचने 9987
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा लक्षात घ्यावे : यावेळेस ओळखायचे असे काहीच नाही. तुमची कल्पना आहे तीच लिहायची आहे. त्यामुळे कोणीही चूक असणार नाही.

समस्या _____ अलीकडे कशाचा कशाला मागमोस उरला नाहीये...समस्या वेगळी आणि ते सोडवताना मात्र भलत्याच गोष्टी केल्या जात आहेत... समस्या एक आणि त्याचे उत्तर म्हणुन पुन्हा नविन समस्याच पुढे येत आहे.. तरीही माणुस त्याच्यात धुंद आहे...

अपेक्षेप्रमाणे उत्तरात विविधता आहे. छान !
पेप्रातली चित्रं
>>> संबंधितांची परवानगी घेतलेली आहे

मुदत चार तासांनी वाढवली आहे.

मला वाटते समाजात माजलेली अनागोंदी, अंदाधुंदी चित्रात दाखवली असावी. एक माणूस विजेच्या सॉकेट मध्ये प्लग घुसवतोय तर टी व्ही मधून पिचकारी येताना दाखवली आहे. कार हॉल्ट वर आहे म्हणजे देशाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. सलाईनचा स्टँड घेऊन माणूस (डॉक्टर?) नाचतोय म्हणजे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. माणसं एकमेकांत भांडताहेत . चित्र पाहून माझे कल्पनाचित्र रंगवले आहे.

४० मिनिटांनी समारोप

सर्वप्रथम सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार ! आपल्या सर्वांचीच कल्पनाचित्रे उत्तम आहेत. मजा आली. मूळ लेखाचे नाव “आपण असेच आहोत” हे होते. त्या लेखात भारतीयांच्या वर्तनासंबंधी खालील मुद्यांना स्पर्श केलेला होता : • सार्वजनिक अस्वच्छता • वाहतुकीतील बेशिस्त • बेपर्वाई, बेफिकिरी आणि • गर्दी करण्याची प्रवृत्ती .

समर्पक विषय आणी चित्रे . गंभीर विषय व्यंगचित्रांच्या स्वरुपात मांडल्यामुळे "फिरभी दिल है हिन्दुस्तानी" आठवले .

"फिरभी दिल है हिन्दुस्तानी"
>> अगदी ! खूप सुंदर मालिका ... लेखन, दिग्दर्शन , अभिनय या सर्व बाबतीत.

चित्र बघितले होते पण खूप काही सुचेना त्यामुळे प्रतिसाद नव्हता दिला आणि नंतर कामाच्या घाईत बघायचे राहून गेले. सगळ्याच चित्रांचा संदर्भ लागेना नीट. लेख वाचल्यावर कदाचित कल्पना येईल

ल भा +१ सोत्रि, धन्यवाद. .. ज्यांना हा उपक्रम आवडला आहे त्यांनी पुढच्या भागात उकल होण्यापूर्वी सहभागी झाल्यास अधिक मजा येईल. उत्तर देण्याची मुदत 24 ऐवजी 48 तास ठेवावी का, यावर जरूर मत द्यावे. अन्य सूचनांचेही स्वागत आहे.

In reply to by हेमंतकुमार

२४ ऐवजी ४८ तास मुदत नसावी असे मला वाटते. हा आपण एक करू शकता.. नविन प्रश्न हा ठराविक वाराला विचारू शकता.. म्हणजे सोमवार, बुधवार शुक्रवार असा.. त्यामुळे आजकाल कधीतरी मिपा वर यायला जमत असल्याने, ह्या दिवशी तुमचा प्रश्न बघायचा म्हणुन येता येईल.. २४ तास ठीक आहेत, मला तर तेचजास्त वाटतात..

In reply to by गणेशा

२४ तासच योग्य आहे.पण वार वगैरे नका ठरवू, अचानक कोडे बघायला छान वाटत. अवांतर: चित्राबाबतीत लिहायचं होतं,पण विशेष सुचलच नाही.

In reply to by हेमंतकुमार

खेळ रंगायला व लोकांना गोडी लागायला पुरेसा वेळ द्यावा. उत्तर देण्याची मुदत 24 ऐवजी 48 तास अवश्य ठेवावी

विविध उपयुक्त सूचना केल्याबद्दल वरील सर्वांचे आभार ! नुकत्याच झालेल्या मिपाकट्यामुळे हे समजून आले की भारताबरोबरच जगाच्या पश्चिम आणि पूर्व टोकांनाही आपले बांधव राहत आहेत. या उपक्रमात वेळ किमान चोवीस तास ठेवण्याचा हेतू हाच आहे, की जगभर विखुरलेल्या मिपाकरांना त्यात भाग घेण्याची संधी मिळावी. 24 व 48 चा मध्य म्हणून 36 तास असा एक सुवर्णमध्य काढता येईल ! किंवा, मूळ मुदत २४ तास ठेवून लोकांच्या सहभागानुसार ती आयत्या वेळेस वाढवता येईल.

"रंजन आणि कल्पनाविस्तार" ही कल्पना आवडली. २४ तासांची मुदत सध्या ठीक वाटते, गरजेनुसार त्यात case to case basis वर बदल करता येईल.

मजा आली. धन्यवाद.