आज जागतिक चहा दिनानिमित्त हे स्फुरले. गोड मानून घ्या. आवडले/न आवडले तरी कळवा.
जुना विषय काढण्यासाठी, विचारले मी चहा घेणार?
तोच विषय टाळण्यासाठी, विचारते ती चहा घेणार?
नको वाटले छप्पर आणि नको वाटले काही काही,
खरे छान वाटले जेव्हा म्हणालास तू, चहा घेणार?
फिके पडावे अत्तर ऐसा गंध हे पेय धारण करते,
उकळीन ह्याला आले घालूनी, तू थोडा चहा घेणार?
कारण नसता भेटीसाठी, कशास उगाचच भेटायाचे ,
तरी कुठूनसा येईन मी बघ, विचार फक्त चहा घेणार?
चर्चांसाठी, वादासाठी किंवा आणखी कशाहीसाठी,
निमित्तमात्र एक बुलावा, ऐक ना रे चहा घेणार?
कामामध्ये व्यग्र असू दे हरेक माणूस घरातला,
कान तरी आतुर ऐकण्या एक पुकारा, चहा घेणार?
महत्त्व आता ह्या प्रश्नाचे तुम्हास आहे कळले म्हणता?,
मित्र बनूया, हसून पाहूया, या बसा, चहा घेणार?
-आगाऊ म्हाद्या
जागतिक चहा दिवस २१ मे २१
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7223
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी चहा घेणार?
☕
धन्यवाद
In reply to मी चहा घेणार? by चौथा कोनाडा
आम्हा साहेब,फर्मास तरतरीत
In reply to धन्यवाद by आगाऊ म्हादया......
हाहा
In reply to आम्हा साहेब,फर्मास तरतरीत by चौथा कोनाडा
छानच. चहा आवडतोच केंव्हाही.
धन्स
In reply to छानच. चहा आवडतोच केंव्हाही. by सुरिया
नक्कीच ...
चहा घेत नाही म्हणणाऱ्यासाठी
In reply to नक्कीच ... by मुक्त विहारि
ऑ ?
In reply to नक्कीच ... by मुक्त विहारि
चहाला वेळ नसते
खरंय
मस्त कविता
धन्यवाद
In reply to मस्त कविता by कॉमी
कडक ताजी तरतरीत कविता!
धन्यवाद
In reply to कडक ताजी तरतरीत कविता! by प्राची अश्विनी
चहा प्या
हाहाहा
In reply to चहा प्या by प्रसाद गोडबोले