Skip to main content

चहा घेणार?

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी शुक्रवार, 21/05/2021 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज जागतिक चहा दिनानिमित्त हे स्फुरले. गोड मानून घ्या. आवडले/न आवडले तरी कळवा. जुना विषय काढण्यासाठी, विचारले मी चहा घेणार? तोच विषय टाळण्यासाठी, विचारते ती चहा घेणार? नको वाटले छप्पर आणि नको वाटले काही काही, खरे छान वाटले जेव्हा म्हणालास तू, चहा घेणार? फिके पडावे अत्तर ऐसा गंध हे पेय धारण करते, उकळीन ह्याला आले घालूनी, तू थोडा चहा घेणार? कारण नसता भेटीसाठी, कशास उगाचच भेटायाचे , तरी कुठूनसा येईन मी बघ, विचार फक्त चहा घेणार? चर्चांसाठी, वादासाठी किंवा आणखी कशाहीसाठी, निमित्तमात्र एक बुलावा, ऐक ना रे चहा घेणार? कामामध्ये व्यग्र असू दे हरेक माणूस घरातला, कान तरी आतुर ऐकण्या एक पुकारा, चहा घेणार? महत्त्व आता ह्या प्रश्नाचे तुम्हास आहे कळले म्हणता?, मित्र बनूया, हसून पाहूया, या बसा, चहा घेणार? -आगाऊ म्हाद्या जागतिक चहा दिवस २१ मे २१
लेखनविषय:

वाचने 7223
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मी चहा घेणार ? द्या की, का नाही घेणार ?


In reply to by आगाऊ म्हादया......

आम्हा साहेब, फर्मास तरतरीत कविता! आता तुम्ही आगाऊ म्हटल्यावर थोडा आगाऊपणा करावा ! - आगाऊ चौको

पुरूषांनी चहाला नाही म्हणू नये

k

In reply to by प्राची अश्विनी

आपले प्रतिसाद पाहून परत काहीतरी लिहावसं वाटू लागलंय, शिवाय काहीतरी वाचण्याजोगं लिहितोय असंही वाटू लागलं आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो पाहिलाय मी हा, आणि उसाचा रस वाला सुद्धा.