ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी.
तांत्रिक बाबी -
०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est)
१) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे.
२) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा
https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz09
कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल -
१) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल.
२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल.
३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील.
४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति.
५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल
६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल.
इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे.
ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे.
*ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे
सुरुवातीला परिचय
चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात
मनो - पानिपत पुस्तकाबद्दल
श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति
राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी येणार
+१
+1
यायचा प्रयत्न नक्की करेन.
यायचा प्रयत्न नक्की करतो
उत्तम कल्पना ... नक्की
हो. जमेल यायला. चांगली कल्पना
वा
आपण येणार का ?
सॉफ्टड्रिंक्सची आयडिया भारी
सहभागी होणार.
हिला विचारून सांगतो =))
यावं म्हणतोय.....
मी पण
उत्तम कल्पना
मन:पूर्वक शुभेच्छा...!
प्रा.डॉ.
सहभागी होणार...
येणार !
=))
मग तर हमखास उपस्थिती असणार
येणार नक्की...
मागच्या पाताळेश्वर कट्ट्याला
ऑनलाईन कट्टा
छान कल्पना. 'त्व' वर 'चस्त' करता येते का ?
इथे काही उपाय दिलेले आहेत,
नक्की येणार
नक्कीच
मी पण हजेरी लावणार कट्टयाला
नक्की प्रयत्न करतो
मी येणार
मिपा ऑलरेडी ऑनलाइन कट्टाच आहे
हीच कल्पना माझ्या मनात गेले
@सुबोध खरे: अगदी खरे. करोना नकोच झूमट्ट्यात.
छान
+१
लोक-मर्यादा ३०० आणि वेळेवर
नक्की प्रयत्न करतो!
छान उपक्रम
मी पण येणार !
☝
आयल्ला, कट्टा हौसफुल्ल होणार दिसतंय ! म्हंजे आमी ऐनवेळी यायचं ठरवलं तर जागा मिळणार नाही की काय ?❓
जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?१०० नक्कीच
+१
३०० लोक एका वेळी येऊ शकतील
व्हर्च्युअली जरूर डोकावण्यात येईल.
> इतक्या सर्वांना एकदम
हो
यात सूत्रधार महत्त्वाचा असतो.
किंवा झूमचे पार्टिसिपंट नेम
मी तेच केलंय.
भारतीय रात्र ९. म्हणजे फारच