Skip to main content

ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

लेखक मनो यांनी मंगळवार, 18/05/2021 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी. तांत्रिक बाबी - ०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est) १) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे. २) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz… कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल - १) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल. २) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. ३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील. ४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति. ५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल ६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल. इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे. ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे. *ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे सुरुवातीला परिचय चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात मनो - पानिपत पुस्तकाबद्दल श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 50551
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

ऑनलाइन कट्ट्याच्या आयोजनासाठी मनःपूर्वक धन्यवाद. या कट्ट्याला मी नक्की येणार. या माध्मयातून मिपाकरांशी संवाद साधण्यास उत्सूक आहे.

हो. जमेल यायला. चांगली कल्पना आहे. अशा पद्धतीने अनेक लोक भेटण्याचा योग नक्की येईल व स्नेह वृद्धींगत होईल.

उत्तम उपक्रम. सर्वानी मिसळ पाव खात हा ऑन्लाईन कट्टा केला तर धमाल येईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आपले प्रतिसाद नेहमीच आवडतात. आपण ऑनलाइन का होईना आल्यास गप्पा मारता येतील. मिसळपाव खात खात आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेत घेत मजा येईल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॉफ्टड्रिंक्सची आयडिया भारी आहे, फक्त त्यावेळी वीजांचा कडकडट, धो धो पाऊस पायाजेल, त्यावेळी माईसाहेबांचा आवाज काय जबरदस्त वाटेल.

शनिवार सकाळ ऑलरेडि बूक्ड आहे त्यामुळे कट्ट्याला येणे अवघड आहे. माझ्याकडुन शुभेच्छा!

मिसळपावच्या ऑनलाइन कट्यास ९८. १२ % उपस्थित राहण्याचा प्रयत्न करीन. ऑनलाइन कट्टा आयड्या आवडली. ट्राय टू बेष्ट फ्रॉम माय साइड. संयोजकांचे मन:पूर्वक आभार. उपक्रमास शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by कॉमी

उगाच आनंदावर विरजन घालू नका प्लीज. त्यांच्या चपला बाहेरच दिसल्या तर बाहेरच्या बाहेर कट मारावा लागेल. ;) उगाच आमचा उस भारी, द्रांक्षे भारी. ऐकावे लागेल. -दिलीप बिरुटे

योगायोगाने पाचसहा ज्येष्ठ नागरिक आल्याने 'हा ज्येष्ठ नागरिक कट्टा' असा शिक्क बसला. त्यामुळे मी कट्ट्याला बाद. आणि झुम कट्ट्याला दोघेच बोललो श्रीरंग फ्यामली आणि मी. तरी या कट्ट्याला बरीच उपस्थिती करून solidarity का काय म्हणतात ती दाखवावी.

शनीवारी संध्याकाळी साडेसातला दुसरा झूम कॉल आहे. तो वेळेत संपेल ही अपेक्षा. उशीर झाल्यास तो कॉल संपल्यावर उशीरा का होईना जॉईन व्हायचा प्रयत्न करेन.

मला जरा तांत्रिक बाबी माहीत करून घ्यायच्या आहेत. . मुख्य म्हणजे लप्तोप, मोबैल किंवा इपद वरून त्व वर चस्त करता येईल का ? म्हणजे जरा नीट दिसेल. इपद = ipad त्व= TV चस्त = cast लप्तोप = Laptop मोबैल = mobile. सावरकरांच्या काळात केय्बोअर्द (keyboard) नसल्याने त्यांना मराठी प्रतिशब्द हुडकायला बरेच कष्ट पडले असणार. आता कित्ती सोपे झालेले आहे बघा. इंग्रजी शब्द मिपावर जसाच्या तसा त्य्पे (type) केला की झाला मराठी शब्द तयार. (चोप्य्पस्ते आहेच पूर्वीपासून).

In reply to by चित्रगुप्त

इथे काही उपाय दिलेले आहेत, पहा जमतंय का https://www.pocket-lint.com/apps/news/151726-how-to-get-zoom-on-your-tv

मोजक्याच मिपाकरांशी प्रत्यक्षात भेट झालेली आहे. तेही एक-दोन वेळाच. किमान ऑनलाईन तरी बर्‍याच जणांना भेटणे होईल त्यामुळे या कट्ट्याला नक्की येणार. सं - दी - प

मी येणार, नक्की येणार, म्हणजे यायलाच हवं, न येण्याचा प्रश्नच नाही, नाही येऊन कुणाला सांगणार, किंबहुना मी तर म्हणतो की मी म्हणजे शंभर टक्के येणारच... --- पुढाकार घेतल्याबद्धल धन्यवाद! - कट्टोक्सुक वामन

मिपा ऑलरेडी ऑनलाइन कट्टाच आहे हा समज असल्याने आता ऑनलाइन कट्टा म्हणजे काय ते समजुन घ्यायला हवे म्हणून मी नक्किच हजेरी लावेन.

हीच कल्पना माझ्या मनात गेले काही दिवस घोळत होती. असा कट्टा आम्ही चुलत भावंडं गेले दीड वर्षे करत आलो आहोत परंतु आळशीपणा मुळे पुढे काहीच झालं नाही. असो. श्री मनो यांचे अभिनंदन. आणि कट्ट्याला नक्कीच येणार. सर्वाना एकच विनंती आहे. शक्य असल्यास करोना आणि त्यामुळे होणारा त्रास हा विषय टाळता आल्यास बरे होईल. जिकडे तिकडे हाच विषय आहे आणि त्यातून कट्ट्यावर पण हाच विषय आल्यास लोकांचा विरस होईल.

In reply to by सुबोध खरे

करोना नकोच हे अगदी आवश्यक. तसेच अमूक आला, तमूक दिसत नाहीये वगैरेत बराच वेळ जाण्याचा कौटुंबिक झूमट्ट्यात अनुभव आला होता तेही टाळणे बरे. सर्वांनी आपापली ओळख करून द्यावी. शिवाय विशेष नवीन काही उद्योग करत असल्यास त्याविषयी थोडक्यात सांगता येईल. या निमित्ताने सुचलेला नवीन शब्दः झूमट्टा.

सगळ्या मान्यवरांना भेटायची इच्छा आहे. शक्य झाल्यास नक्की जॉइन करणार.

उत्तम कल्पना! जरूर प्रयत्न करेन. उगाच शंका - ४० मिनिट आणि १०० लोक हि मर्यादा असेल का? या दोन्ही बाबतीत आपण पुढे जाऊ अशी आशा आहे मला :-)

आयल्ला, कट्टा हौसफुल्ल होणार दिसतंय ! म्हंजे आमी ऐनवेळी यायचं ठरवलं तर जागा मिळणार नाही की काय ?

जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?

In reply to by चौथा कोनाडा

चकटफू झूम कमाल १०० जणांना मिटिंगमधे प्रवेश करु देते. बिझनेस प्लॅन वाले सबस्क्रीप्शन असल्यास हीच मर्यादा ३०० वा अधिकही असू शकते. संदर्भः झूम प्रायसिंग.

जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?
संख्या बरीच असल्यास तंत्रज्ञांनी नियोजन सुचवावे ही वि.

३०० लोक एका वेळी येऊ शकतील अशी सोय आहे, त्यामुळं जागा हाऊसफुल होणार नाही, जरूर या. इतक्या सर्वांना एकदम बोलताना आयोजन कठीण होणार आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढू.

> इतक्या सर्वांना एकदम बोलताना आयोजन कठीण होणार आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढू. आमच्या ऑफिसमधे मोठ्या मीटिंग्समधे ५-६ जणांच्या Breakout rooms तयार करतात. झूममधे meeting organizer ला करता येतात तयार बहुतेक.

In reply to by लंबूटांग

झूम मिटिन्ग्जमधे ब्रेक आउट रुमद्वारे सहभागी झालेल्यांची दोन किंवा अधिक गटांत विभागणी झालेली पाहिली आहे

In reply to by कंजूस

किंवा झूमचे पार्टिसिपंट नेम प्रत्येकाने स्वतःचा मिपा आयडीचे ठेवावे.

भारतीय रात्र ९. म्हणजे फारच रात्र इकडे त्यामुळे नाही जमणार याचे रेकार्डिंग असेल काय नंतर बघायला ?

In reply to by चौकस२१२

हो रेकॉर्डिंग करून ठेवतो. अमेरिकेचे दोन्ही किनारे आणि भारत जमवायचं म्हणजे ही वेळ साधायला हवी.

कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल - १) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल. २) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. ३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील. ४) इतर कुणाला काही विषय मांडता येईल ५) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल. इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे. जर कुणाकडे मूळ पोस्ट एडिट करण्याचे हक्क असतील, तर हा मजकूर मूळ धाग्यात ऍडवावा ही विनंती.

सुन्दर कल्पना. मी येणार. दुबईमधून. दुबईचे कोणी मिपाकर भेटले तर आनंद द्विगुणित होईल

झूम व गुगल मीट मध्ये काय फरक आहे? मी गुगल मीट वापरले आहे. झूम हे चीनी अॅप आहे का? ते प्रथम इन्टॉल करायला लागते का?

In reply to by शाम भागवत

झूम आणि गूगल मीट दोन्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी बनवलेले सॉफ्टवेअर आहेत. अमेरिकन नागरिकत्व असलेल्या मूळच्या चिनी व्यक्तीने बनवले आहे. इन्स्टॉल न करताही थेट ब्राउझरमध्येही जाऊन बघू शकता.

In reply to by प्रचेतस

इन्स्टॉल न करताही थेट ब्राउझरमध्येही जाऊन बघू शकता.
याची नोंद घेतली आहे. हे फारच छान झालं

झूम हे चीनी अॅप आहे का? ते प्रथम इन्टॉल करायला लागते का? >>> होय

२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. याचा स्लाइडशो ओडिओ सह यूटूबवर टाकावा. म्हणजे तो पाहून आल्यावर झूमवरचा वेळ वाया जाणार नाही. शिवाय चित्राची माहितीवाला चानेल म्हणून इतर लोकही पाहतीलच.

In reply to by कंजूस

मी बरेच वर्षांपासून यूट्यूबवर चित्रांचा स्लाईड शो (काही पार्श्वसंगीत आणि काही माझ्या आवाजातील कथन यांसह) करावा या विचारात आहे परंतु ते कसे करावे याबद्दल कहीच ठाऊक नसल्याने ते राहून गेले. या निमित्ताने ते जमले तर छानच होईल. कृपया हे कळवले तर खूप मदत होईल. बाकी कट्ट्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना फारशी रूचि नसल्यास त्याऐवजी नंतर सावकाशीने एक लेख लिहीन किंवा खास चित्रकलेत रूचि असणारांचा एक स्वतंत्र झूमट्टा पुढे कधीतरी करता येईल.

In reply to by चित्रगुप्त

आता ठरल्याप्रमाणे तुमचे सादरीकरण होऊ द्याच. ऐन वेळी बदल केल्याने गोंधळ होईल. फक्त हे मी सुचवले की मराठीत असा चानेल असावा. पिकासोबद्दलचे माधुरी पुरंदरे यांचे पुस्तक वाचले होते तेव्हा मराठीत असल्याने फारच आनंद झाला होता.