Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 02/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

वाचने 70291
प्रतिक्रिया 301

प्रतिक्रिया

In reply to by चौकस२१२

रोखठोक होऊन जाऊद्या म्हणजे?
आणि धर्मावर आणि जातवार राजकारण करतो म्हणतात तर काँग्रेस ने एवढे वर्षे काय केला? आणि राष्ट्रवादी काय करतात ?
जेथून हि चर्चा सुरु झाली त्यात मुक्त विहारी ह्यांनी भाजपात लोक येत आहे हे हिंदू एकीकरण होते आहे असे ते म्हणाले त्यावर माझ्या प्रतिक्रिया होत्या.. आता मला सांगा.. तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय.. तर bjp हिंदू वर राजकारण करते म्हणतात वगैरे प्रश्न तुम्ही मला का विचारताय? मी म्हणालोय का? दुसरे काँग्रेस ने राष्ट्रवादी ने काय केले.. अहो त्यांनी शेण खाल्ले म्हणुन bjp ने पण खाल्ले पाहिजे का? हा साधा प्रश्न आहे.. मानवता वाद सगळेच मानतात असे तुम्ही म्हणता.. मग सर्व धर्म जाती मधील लोक मानव नाहीयेत का? आहेत ना? मग हिंदू एकीकरण.. मुस्लिम धार्जिणे.. दलित पँथर हे काय आहे.. मूर्ख पक्ष आणि मूर्ख जनता.. एका विरोधात बोलले कि तुम्ही दुसऱ्याला समर्थन देणारेच असले समज का? रोखठोक बोलता येणे आणि ते उग्र भाषेत सोशल मांडणे यात फरक असतोच.. असो... बाकी हलाल पद्धत चुकीची कि बरोबर हा विषय येथे का? त्यावरून जातीय राजकारण योग्य कि अयोग्य ठरते का? असे वेगळे मुद्दे मांडल्याने मुळ मुद्द्यात काही बदल होतो का? आणि सर्वात महत्वाचे.. माझे हिंदू मित्र आहेत, तितकेच जिगरी मुस्लिम मित्र सुद्धा आहेत आणि इतर धर्मीय सुद्धा.. त्यामुळे मी वयक्तिक कुठलीही जात पात धर्म मध्ये आणत नाही.. काँग्रेस चुकीची मानली म्हणुन लाथाडली.. मग bjp पण तेच करत असेल तर फक्त तो आपला धर्म आहे म्हणुन बरोबर म्हणायचे? आणि याला रोखठोक म्हणायचे? कसे आहे ना.. मानवता वाद दाखवायला सोप्पा असतो.. पण तो आचरणात आणायला तितकाच अवघड असतो.. असो

In reply to by गणेशा

कसे आहे ना.. मानवता वाद दाखवायला सोप्पा असतो.. पण तो आचरणात आणायला तितकाच अवघड असतो.. मानवतावादी असल्याचा दावा आपण केला होता .. जणू काही इतर जण पण तसे विचार करत नसतील... भाजपाला पाठिंबा दिला कि लगेच तो माणूस धर्मांध झालाच असे होत नाही हो ...

In reply to by चौकस२१२

मला एक कळत नाही, तुम्ही मला का हे सांगताय.. मी म्हणालो आहे का कि bjp ला वोट दिले म्हणजे धर्मांध? तुम्हाला वरती धर्मावर कोणी कमेंट केली ते हि सांगितले.. त्यांच्याशी मी बोलताना त्यांना मी काय बोललो त्यातील काही वाक्य तुम्ही घेऊन मला प्रतिसाद दिला.. ठीक आहे.. अहो तुम्ही जातीय वादी नाही आणि प्रगतीसाठी bjp ला वोट देताय मान्य आहे.. पण मग मी कुठे म्हंटले आहे bjp ला वोट देणारे सगळे जातीय वादि आहेत.. ज्या माणसाने वरती हिंदू एकीकरण लिहिले त्याला बोलत होतो ना मी? इतरजण मानवता विरोधात आहे मी म्हणत नाही.. पण जातीय कमेंट bjp म्हणजे आता हिंदू एकीकरण असले बोलणाऱ्याला फक्त तो bjp बद्दल बोलतोय म्हणुन काहीच बोलायचे नाही काय? तुमचे जे म्हणताय ना.. Bjp ला वोट देणारे सगळे धर्मांध नसतात.. ते माहिती आहे, आणि त्याबद्दल तसे मी कधी म्हणालोय ते सांगा.. तुम्ही इतर कोणी तसे बोलत असेल तर मला का सांगताय? आणि हेच मी पण म्हणतोय bjp ला वोट न देणारा पण काही लगेच चमचा.. नोकर.. व्यक्तीपूजक.. मुस्लिम धार्जिणा.. भ्रष्टाचार पुरस्कारता असला नसतो.. असे दोन्ही हि बाजूने जो विचार करतो तो महामूर्ख.. नालायक माणुस असेल.. त्यामुळे.. तुम्ही मी काय बोललोय त्यावरच मला बोला किंवा जबाबदार धरा.. नाही तर राहूद्या..

In reply to by चौकस२१२

हा घ्या जेथून मी बोलायला लागलो त्या हिंदू जातीय प्रतिसादावरील माझा पहिला प्रतिसाद यात काय चुकीचे लिहिले आहे, आणि हिंदू हा येथील प्रश्न नाही सरळ बोललो होतो ना? मग जे हिंदू जातीय लिहितात त्यांना सोडून तुम्ही मला का विचारताय? मी बोललो का ते..? मुवि, हिंदू हा प्रश्नच नाहीये.. तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही.. हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का? आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का? सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही.. बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले.. यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..

In reply to by चौकस२१२

एक मुस्लिम दाखवा जो हलाल...
मी स्वतः शाकाहारी आहे, पण अनेक मांसाहारी जेवणावळींमध्ये सर्व प्रकारच्या आणि सर्व धर्माच्या मित्रांसोबत कित्येकदा गेलो आहे, आणि तिथे हलाल आणि झटका शब्द उच्चारले गेले नव्हते. एक मुस्लिम दाखवा जो झटका खाईल हे इतक्या आत्मविश्वासाने म्हणताय यावरून तुमचे मुस्लिम लोकांसोबत जेवण्याचे प्रसंग कमी आले आहेत किंवा तुम्ही आऊटलायर्स बद्दल बोलताय, असा निष्कर्ष निघतो. आऊटलायर्स बद्दल बोलायचे तर असेही असते- ऑफिस मध्ये कधीही अंडे किंवा मांस डब्यात आणणाऱ्या (कोणत्याही धर्माच्या) व्यक्तीला आपल्या सर्कल मधून शक्य तेव्हडे बाहेर टाकणे. ह्याच्यावरून सर्व शाकाहारी लोकांबद्दल मत प्रदर्शन करणे योग्य आहे काय ? वरील प्रकार खूप वेळा पहिला आहे.

In reply to by कॉमी

मी अनुभवावरून बोलतोय दुबई, मराठी भाषिक मुस्लिम ऑस्ट्रेलियात : अफगाणी कामगार मित्र , लेबनीज अनि इरनि , भारतीय हैद्राबादी मुस्लिम लगेच ते "आऊटलायर्स " वा ! शब्धशा अर्थ घेताय असलतील काही मुस्लिम ज्यांना फरक पडत नसेल किंवा बाहेर काही पर्याय नसेल .. पण जगभर " हलाल इकॉनॉमी आणि त्याचा इतरांवर दबाव " यावर पहा आणि मग विचार करा बहुसंख्यान्का "हालचालच " लागते .. तेवढे संकुचित हिंदू मांसाहारी नसतात, किंवा आपल्यास्तही लागेचच तो "धार्मिक प्रश्न सहसा होत नाही " एवढेच माझे म्हणणे होते एक उदाहरण आपण हिंदूंवर एवढा धार्मिक पगडा नसतो ... आपण सहिष्णू आहोत याचे अजून काय उदाहरण द्यायचे ? येथे शाकाहारी मांसाहारी याचा काही संबंध नाही २ मांसाहारी लोकांबद्दलच चाललंय

In reply to by गणेशा

एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार..
ग वि बेहरेंच्या सोबत या साप्ताहिकात, "Hindus are most gullible people" अशा अर्थाचे लिखाण कुणीतरी करायचे त्याचा प्रत्यय हे शहामृगी वाक्य वाचून आला. तथापि, सत्य परिस्थिती अनेक वेळा वेगळीच असते - श्रीलंकेतील एका शांतीप्रिय डॉक्टराचे प्रकरण माहित असेलच. शांतीप्रिय नसलेल्या सुमारे चार हजार स्त्रियांना वंध्य करण्याचा तो प्रकार होता.

In reply to by वामन देशमुख

या उदाहरणावरून तुम्ही समस्त जातीला दोष देणार आहात काय? त्या डॉ ला अटक झाली..मग न्यायालयाने पुर्ण जातीला नष्ट केले पाहिजे असे म्हंटले आहे का? आणि तसे करणे आणि मानणे योग्य आहे का? उद्या एखादा हिंदू गुन्हेगार असेल तर समस्त हिंदू.. तुम्ही आणि आम्ही गुन्हेगार असता का? आणि तुम्ही जे वाक्य ठळक केले आहे ना, ते म्हणजे मला म्हणायचे आहे, माणुस कर्तव्य पार पाडताना जात पात बघत नाही.. आणि राजकारण करताना असे फुट का? असो.. ७७ मध्ये किती मुळ भाजपा चे लोक आहेत ह्या साध्या प्रश्ना नंतर इतके ऊत्तरे देत बसावे लागतेय.. पार हिंदू.. मुस्लिम.. कुराण फलाना.. म्हणजे येथिल लोक भाजपा विरोधात बोलले तर कसे स्वैर बोलून मुद्दा भरकटावतात हे नविन नाही.. असो..

In reply to by गणेशा

या उदाहरणावरून तुम्ही समस्त जातीला दोष देणार आहात काय? आपण हे जरी देशमुख यांना विचारले असले तरी मी प्रतिसाद देतो आपण हे जरी देशमुख यांना विचारले असले तरी मी प्रतिसाद देतो १) असे सरसकट सगळ्या धर्माला १०० % दोषी ठरवायचे नसते एवढे मला वाटते सगळ्यांनाच कळते ... ( परत तुम्ही जातीला असे का म्हनता कोण जाणे ?मुस्लिम / ख्रिस्ती = धर्म , क्षत्रिय = जात ... असो ) लोक जेव्हा उदाहरण देतात तेव्हा पॅटर्न दाखवणे ( कल दाखवणे ) हा असतो ते समजून घ्या जरा २) "सर्व मुस्लिम काही आतंकवादी नाहीत पण संख्येने बघितले तर आतंकवाद्यात मुस्लिम खूप आहेत " हे आपण वाचले असेल ३) जगातील अनेक धार्मिक भांडणे घ्या .. त्यात साधी संख्या मोजा, कि हिंदूंची किंवा बौद्ध किंवा शीख लोकांची अशी किती देशात आणि किती जणांशी भांडणे आहेत आणि त्याच्या तुलनेने मुस्लिम धर्मियांची किती देशात आणि किती जणांशी भांडणे आहेत ... ? साधे उदाहरण घ्या - ख्रिस्ती ब्रिटिशांनी हिंदू आणि इतर भारतीयांवर जुलुमी राज्य केले म्हणून आजमितीला किती हिंदू आणि किती शीख आज जगभर ब्रिटनच्या किंवा जगातील एकूणच क्रिस्टी लोकांची कत्तल करीत सुटलेत ? - जपानी ( बुद्ध / शिन्तो) लोकांचे अमेरिकेशी ( ख्रिस्ती ) एवढे भांडण झाले आज किती जपानी लोक अमेरिकेत जाऊन ९/११ करतात ? - आता हाच तर्क मुस्लिमांचे इतर सेकुलर देशातील वागणे / भांडणे आणि सतत चा जिहाद याची संख्या बघा ... "मजहब नही सिखाता आपस में बैर रखना" ... हे अगदी नागपूरच्या हेड क्वार्टर ला पण हे माहित आहे .. पण सतत " हमारा मजहब खतरे मी है " हि आरोळी ऐकण्याचा आणि त्याचा पाठपुरावा ऐकण्याचा अगदी कंटाळा आला आहे आणि खास करून डोळे झाकलेल्या हिंदूंकडून ! बर हे काही फक्त बहुधर्मीय भारतातातच नाही तर इतर बहू धर्मीय आणि बहू वर्णीय देशात पहिले आहे ... उगाचच कोणाला शेंड्या लावताय ... "जेथे जातो तेथे तू माझा संगती" या वाक्यप्रमाणे "प्रेमळ धर्माच्या " लोकाची संख्या जमली कि ... आधी हलाल + देश आधी कि धर्म आधी असे विचारले कि एक तर गुळमुळीत उत्तर नाही तर धर्मच हे उत्तर ( मग लेको बहुधार्मिक देशात जाता कशाला राह्यला ??? सौदी आणि मलेशियात आहेत चांगले जीवन ... बोटी भरून का येता "ख्रिस्ती बहुधार्मिक ऑस्ट्रेल्यात " जिथे एक देश एक कायदा आहे ... मग त्यात ख्रिस्ती धर्माचा पगडा असला तरी माझ्या सारख्या अल्पसकनख्यांक हिंदूला फार त्रास वाटत नाही .. कारण माझ्यसाठी देश आधी मग धर्म ... माफ करा कोणाला हा प्रतिसाद विखारी वाटला तरी चालेले किंवा त्यामुळे कोणी मला मिपावरून उडवणार असले तरी चालेल... कंटाळा आलाय या बोटचेप्या गांधीगिरी, गोल गोल जिलंबाय पडणाऱ्यांचा... एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...

In reply to by चौकस२१२

एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...
पवित्र पुस्तकाचा सारांश!

In reply to by चौकस२१२

एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ... मिपावरचा "त्यांच्या" बाजुने लिहीलेला प्रतिसाद दाखवुन स्वतःला वाचवता येईल काय?

In reply to by वामन देशमुख

वरील बातमी ज्या वृत्तपत्रात आली आहे, त्यांनी कोणत्याही आधाराशिवाय आरोप केला आहे. पोलीस आणि हॉस्पिटल मधून मिळालेल्या महितीवरून, इतकेच आधार आहेत, कोणते हॉस्पिटल आणि पोलीस सांगितले नाही. सदर डॉक्टर आणि परिवाराने गुन्हा अमान्य केला आहे. कोर्टाने इसमास बेल दिली आहे. त्यापुढे, श्रीलंका CID ला कोणताही पुरावा सापडला नाही आणि कोर्टात दिलेल्या रिपोर्ट नुसार CID म्हणते-
"There is no justification for the arrest of Dr. Shafi," the CID concluded in a 210-page report.
विखारी लोकं असल्या बातम्यांनी उत्फुल्लीत होऊन follow up ना घेता तेच तेच उगाळत राहतात. https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/world-news/doctor-arrested-fo… https://www.google.com/amp/s/mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1T71… https://mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1UK2SN

In reply to by वामन देशमुख

Agra: ANM Niha Khan found not injecting Covid-19 vaccine after inserting needle, FIR to be filed for throwing away loaded syringes ही शांतीप्रिय महिला कर्मचारी, रुग्णांना कोविडची लस देताना केवळ सुई टोचायची आणि लसीचे औषध तसेच डस्टबिन मध्ये टाकून द्यायची असा आरोप आहे. असे करण्यामागची प्रेरणा भारतभूमीवर शांतता पसरवणे हीच आहे नाही का? अर्थात, भारतीय प्रजासत्ताकात, प्रत्येकाला स्वतःची प्रार्थनापद्धती (religion) पाळण्याचे स्वातंत्र्य आहे! उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by मुक्त विहारि

मी सत्यनारायण कधी वाचला नाही.. तेथे कुराण वाचला का किंवा वाच हा काय प्रश्न किंवा सल्ला आहे? आणि न वाचता हि मी सांगतो.. बायबल, कुराण, गीता.. कुठलेही ग्रंथ असुद्या माणुसकी हाच धर्म श्रेष्ठ मानला असणार..आणि जर त्या ग्रंथाचे माणुस आणि माणुसकी हा गाभा नसेल तर धर्म आणि जात इतकेच त्याचे मुळ असेल तर असल्या सर्व ग्रंथाना वाचण्यात वेळ घालावण्यात काय अर्थ आहे? असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत.. वाईट माणसे हि माणुसकी ला काळिमा असतात.. मग ती कुठल्याही जाती धर्माची असुद्या.. मुळ मुद्दा.. एक सहज प्रश्न विचारला होता..७७ मध्ये मुळ भाजपाई किती.. त्यावरून पार इतके अवांतर.. अवघड आहे..

In reply to by गणेशा

असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत.. तुमच्याबाबत विषयच नाही चिंतेचा... प्रश्न हा आहे जे असे ग्रंथ वाचतात व भेदाच्या भिंती मनात, देशात, समाजात उभ्या करतात मग ते कोणतेही धर्मीय असो त्यांना काउंटर करायचा कृतीकार्यक्रम तुमच्याकडे आहे का ? निव्वळ तुम्ही योग्यपणे जगत आहात त्याबद्दल गुन्हेगारी प्रव्रुत्तीचे लोक तुमच्या नादाला लागणार नाहीत असा तुमचा समज आहे का ?

In reply to by गॉडजिला

Hello, नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत.. ---- समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात.. उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र घेऊन फिरत असेल तर आपण हि शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय.. पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते. मी रस्त्यावर गाडी व्यवस्तिथ चालवत असेल तर रस्त्यावर इतर काही जण व्यवस्थित चालवणार नाही म्हणुन मी माझी स्व रक्षण करण्यास काय करेल हे माझ्या पाशी आहे.. बेल्ट लावणे.. हेल्मेट घालणे वगैरे.. पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक.. गुन्हेगार हा कुठल्या हि जातीचा धर्माचा असु शकतो.. तुमच्या कडे त्याला काउंटर करायचा पर्याय नसेल तर त्याला गुन्हेगार नजरेतून बघणे हा काउंटर आहे का?

In reply to by गणेशा

पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते. असं म्हणता ? असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय.. मंग आस्स कस्सं करता ? माझे मत काय त्याचा आशय काय याची खात्री तुम्हास नाही तरीही तुम्ही.... पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक.. सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?

In reply to by गॉडजिला

उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र घेऊन फिरत असेल तर आपण हि शस्त्र घेऊन फिरले पाहिजे तुम्ही शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे नव्हे पण उद्या तो तुमच्या फिरण्यावर निर्बंध घालू लागेल तेंव्हा तुम्ही त्याला गांधीवादी सदाचाराचे धडे शिकवणार आहात का? आपण पूर्ण शाकाहारी आहोत म्हणून आपल्याला सिंह खाणार नाही अशी भोंगळ मनोवृत्ती बाळगल्यामुळेच भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराचे काय काम? अशा विचाराच्या वृत्तींनी लष्करी उत्पादनाच्या कारखान्यात( ऑर्डेनन्स फँक्टरी) मध्ये शस्त्रास्त्रांऐवजी एस्प्रेसो कॉफी मेकर बनवायच्या ऑर्डरी दिल्या आणि चीनच्या युद्धात दयनीय अशी हार झाली हा इतिहास आपण विसरला असाल तर स्वा.सावरकरांचे "सन्यस्त खङग" हे नाटक जरूर वाचून पहा. बलाढ्यांची अहिंसा हि "खरी अहिंसा" असते. दुर्बलांच्या अहिंसेला कुत्रं सुद्धा भीक घालत नाही हाच इतिहासाचा सिद्धांत आहे.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे नव्हे पण उद्या तो तुमच्या फिरण्यावर निर्बंध घालू लागेल तेंव्हा तुम्ही त्याला गांधीवादी सदाचाराचे धडे शिकवणार आहात का? स्व संरक्षण हवेच.. पण जो अत्याचार करील त्याच्या विरुद्ध.. मग तुम्ही bjp ला वोट देऊन त्याचा बिमोड करणार आहे काय? मग पुढील शस्त्र धारी हा कुठल्या जातीचा असतो हे तुम्हीच ठरवून त्याच्या पुर्ण जातीला च बदनाम ठरवणार आहे काय? जो हिंसा भडकवेल तो चूक कि त्याची पुर्ण जात आणि धर्म? जातीय म्हणुन bjp ला वोट द्यायचे कि प्रगती साठी.. अच्छे दिन म्हणुन? नक्की काय ते ठरवा.. डॉ. साहेब.. तुमच्या कडे येणारा पेशंट हिंदू आहे का मुस्लिम यावरुन तुम्ही नक्कीच इलाज करत नसताल.. माझे हि तेच म्हणणे आहे पुढील व्यक्ती हा गुन्हेगार आहेच हे आपण फक्त त्याच्या धर्मावरून का ठरवायचे?
आपण पूर्ण शाकाहारी आहोत म्हणून आपल्याला सिंह खाणार नाही अशी भोंगळ मनोवृत्ती बाळगल्यामुळेच भारताचे अतोनात नुकसान झाले आहे.
पण आपण शाकाहारी असलो आणि समोरील माणुस मांसाहारी असला तरी समोरील माणुस मला खाणार नाही हे तर नक्की आहे ना? आपण माणसां बद्दल बोलतोय.. जंगली प्राण्याबद्दल नाही..
बलाढ्यांची अहिंसा हि "खरी अहिंसा" असते. दुर्बलांच्या अहिंसेला कुत्रं सुद्धा भीक घालत नाही हाच इतिहासाचा सिद्धांत आहे.
मी १००% अहिंसेचा पुरस्कारता नक्कीच नाही.. पण हिंसा हा एकच पर्याय प्रत्येक वेळेस आपल्याकडे आहे काय? अराजका विरुद्ध.. गुन्हेगारा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.. वेळ प्रसंगी त्याच्या शी दोन हात केले पाहिजे.. पण समोरचा गुन्हेगारच आहे हे फक्त त्याच्या जाती धर्मा वरून ठरवायचे.. आणि त्या साठी bjp ला हिंदू एकीकरण करतायेत म्हणत पाठपुरवठा करायचा हे मला चूक वाटते.. Bjp अजून ७० वर्षे राज्य करो.. मला आनंद आहे.. पण हिंदू मुस्लिम.. वगैरे मुद्द्यासाठी नाहि तर प्रगती आणि उन्नती साठी त्यांनी झटले पाहिजे आणि समर्थकांनी त्या साठी त्यांना पाठींबा दिला पाहिजे... आणि ते जर तसे करत नसतील तर असल्या लोकशाही म्हणजे तुमच्या माणुसकीची बोळवन करण्यास जन्माला आल्या आहेत काय?
स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराचे काय काम
अहिंसक विचार असणाऱ्यांचे हे मत असते असे तुम्ही सरसकट कसे म्हणू शकता? मला लष्कर महत्वाचे वाटते.. तुम्ही चुकीच्या गोष्टीत सरसकट लोकांना का तोलता? आणि सिंह, किंवा लष्कर असे मुद्दे भाषेचे सामर्थ्य वापरवून मुळ मुद्दे divert का करता? शक्यतो कोणी म्हणत नाही कि सिंह मला खाणार नाही.. किंवा लष्कर गरजेचे नाही..हे मुद्देच नाहीयेत

In reply to by गणेशा

मुसलमान व्यक्ती आणि गट यांच्या वागण्यात फार मोठा फरक आहे. जगभरात जेथे जेथे मुसलमान बहुसंख्य झाले आहेत तेथे फुटीरता वाद धर्मांधता वाढीस लागते हा जगभरचा गेल्या १५ शतकांचा इतिहास आहे. हिंदू मुळात सहिष्णू आहेत याचा कायम गैरफायदा घेतला गेला आहे. भाजपला मी सरसकट पाठिंबा देत नाही पण ७० वर्षे काँग्रेसने मुसलमानांचा एक व्होट बँक म्हणून वापर केला आणि शाहबानो प्रकरणात आम्ही संख्याबळावर भारताची घटना बदलून घेऊ शकतो हा एक दंभ आणि फाजील आत्मविश्वास तयार झाला होता त्याला विरोध म्हणून राम जन्मभूमी आंदोलन सारख्या गोष्टींना पाठिंबा मिळत गेला. आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे. हा कायदा किंवा तीन तलाक वर बंदी सरसकट कुटुंब नियोजनाचा कायदा का अस्तित्वात येऊ शकला नाही याचा मूलगामी अभ्यास केला तर त्याच्या मुळाशी ही व्होट बँक आहे. जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो. बाकी भाजप किंवा मोदी हेच १०० टक्के बरोबर असे माझे अजिबात मत नाही. परंतु सद्यस्थितीत सर्वात चांगला आणि निर्णयक्षमता असणारा पक्ष म्हणजे भाजपच आहे आणि सध्या तरी त्याला पर्याय नाही असे माझे स्पष्ट मत आहे. समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी काय करता येईल याचा ठोस उपाय सुचवता येतो का ते सांगा अन्यथा आपले गुळगुळीत युक्तिवाद चालू द्या आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही. ( माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच). अंतिम सत्य इ काथ्याकुटात मला अजिबात रस नाही

In reply to by सुबोध खरे

@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद निमूळता झाल्याने येथे देतोय ) -----
आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.
आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही.. सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि.. घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही.. पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे.. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता.. मग निवडून आल्यावर काय केले.. बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय? मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही? का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का? अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना.. आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे.. उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो.. काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही.. असो..
आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.
तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)
प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो.. तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल... एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत.. आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले... तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून.. असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो.. तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या.. पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही.. समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...

In reply to by गणेशा

समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही. मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण; ३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते. पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये. तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय. सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय. थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय. समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत तर भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्‍या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.

In reply to by सुबोध खरे

समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी काय करता येईल याचा ठोस उपाय सुचवता येतो का ते सांगा अन्यथा आपले गुळगुळीत युक्तिवाद... सडे तोड ,शतप्रतिसद सहमत .. डॉक्टर तुम्हाला एक ग्लास फुल्ल सोलकढी आणि मिसळ प्लेट लागू आपल्या कडून - कारण भाजपचं आयटी सेल च्या पगारात तेवढेच परवडणार आपल्याला !!!) एकवेळ वारीस पठाण परवडला पण हे गुळगुळीत आत्मघातकी " गांधीगिरी " वाले नकोत ... एवढेच बोलतो आणि माझे शब्द थांबवतो... लै कावायला होत बघा ...

In reply to by गॉडजिला

Hell o, गणेशा तुम रेहना संग हमेशा... कट्टा कधी करायचा ते बोला साहेब नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत.. आशा करतो हा तुमचा शेवटचा प्रतिसाद नसवा, आणि तुमचे विचार्/कवीता आमास्ने भरभ्रुन वाचायला मिळुदेत...

In reply to by गॉडजिला

सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?
याचे उत्तर द्या ना तुम्ही.. अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे? आणि पूर्णपणे पुढच्यांचा नायनाट कसा करायचा हे बघायचे? सांगा तुमचा काउंटर काय? माझे उत्तर एकच आहे.. खातरजमा झाली असेल तर ते सगळे पुरावे न्यायालयात दाखवून कारवाही करावी..खातरजमा व्हायला पुरावे पण हवे ना.. कि पुढून येणारी गाडी मला उडवनारच आहे हे म्हणुन त्याला गुन्हेगार मानणे म्हणजे काउंटर आहे का? असो थांबतो.. तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय.. उगाच इतर चर्चा करण्यात अर्थ नाही आणि वेळ हि वाया घालवू नये असे वाटते.. वयक्तिक घेऊ नये

In reply to by गणेशा

याचे उत्तर द्या ना तुम्ही.. अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे? उत्तर मी का द्यावे स्वतःच शोधा की ही सवय का बरे लागली ? कारण शांतताप्रीय गाडीवाल्यांनी धडका देउनही त्याना साधा जाबही विचारला गेला नाही म्हणूनच ना ? आठवा मुंबै वेठीला धरल्याबद्दल काय कारवाइ झाली ? आता असे म्हणून नका सुमडीत कारवाइ झाली आम्ही ते जाहीर करत नसतो... वगैरे . थांबतो.. मी कोण आडवणार ? तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय.. तसे असे तर तुमच्याशी चर्चा का केली असती ? मला तुम्हे चर्चा करणे अपेक्षीत आहे कारण मी शॅलो इंटरेस्टचे गोल गोल राणी प्रकरण करत नाही मला मुलभुत गोश्टींवर नेमकी व कमी श्ब्दात चर्चा करायला आवड्ते

In reply to by गणेशा

३४ पक्ष बद्दलणाऱयांपैकी पैकी १३ जणांना तिकीट मिळाले. आणि १३ पैकी फक्त ४ जिंकले. https://www.businessinsider.in/politics/elections/news/final-tally-of-s…

In reply to by कॉमी

म्हणजे हे म्हणणे बरोअबर होईल का कि ७७ पैकी ४ जणच मूळचे भाजप वाले नाहीत? तसे असेल तर एकूण ३ वरून ७३ वर गाडी नेली हे हि नसे थोडके आणि ते सुद्धा ३०% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यात ... पण हे कोणी कबुल करणार नाही बहुतेक . कारण मग फॅशिष्टांची थोडी तरी जीत झाली असे म्हणल्यासारखेच होईल नाही का?

In reply to by गणेशा

बंगालात भाजपला 38 टक्के मते मिळाली. उप्र सारखी चौरंगी निवडणूक झाली असती तर 40 टक्के मते पुरतात 200 सीट मिळवायला.. यावेळेस थेट लढत झाली, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्याचा फटका बसला असे माझे मत आहे.

In reply to by गणेशा

तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले. पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत? भाजपने तृणमूलमधून आलेल्या एकूण १४८ जणांना उमेदवारी दिली होती (त्यात १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता). त्यातील फक्त ६ जिंकले व उर्वरीत पडले. म्हणजे ७७ आमदारांमध्ये ६ आमदार आयाराम आहेत. https://www.google.com/amp/s/theprint.in/politics/trinamool-turncoats-f…

@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद निमूळता झाल्याने येथे देतोय ) -----
आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.
आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही.. सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि.. घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही.. पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे.. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता.. मग निवडून आल्यावर काय केले.. बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय? मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही? का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का? अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना.. आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे.. उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो.. काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही.. असो..
आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.
तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)
प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो.. तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल... एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत.. आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले... तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून.. असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो.. तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या.. पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही.. समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...

In reply to by गणेशा

तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही.. आता मला पर्वा नाही हे वाक्य फार फार महत्वाचे आहे यातुन त्यांची हतबलता ठळक होते आहे. आणी हे घडणे चुकीचे आहे मग सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव असो की नसो. महत्वाच्या बाबी अशा दुर्लक्षुन तुम्ही तर विपर्यास करत आहात. तुम्हाला ज्या कारणांसाठी बिजेपी आवडत नाही ती सोडुन इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे बी जे पी आज सत्तेत आहे. आणी ती कारणे आत्मसात करायचे सोडून इतर पक्ष वा त्यांचे समर्थक बि जे पी वर आवडत नसणार्‍या कारणासाठी चिखलफेक करुन जर तुम्ही भाजपाचा निषेध करत असाल तर तुम्ही स्वतः त्या निषेधाला तितकेच पात्र बनता.

In reply to by गणेशा

संयत आणि तर्कपूर्ण. दोनदा बहुमताने निवडून आलेल्या सरकारला विचारण्याऐवजी सोशल मीडियावर "आवेशाने" दुसऱ्यांना मूलमुळीत म्हणून "का आला नाही समान नागरी कायदा?" असे गुरकावणे म्हणजे एकदम विनोदी प्रकार. ते पण ऍक्टिव्हली कधीही सनाका चा विरोध न केलेल्या, उलटे समर्थनच करणाऱ्या माणसाला !

In reply to by गणेशा

समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही. मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण; ३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते. पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये. तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय. सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय. थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय. समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत तर भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्‍या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.

In reply to by शाम भागवत

राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही.
बरोबर, हे झाले तर भाजप कडून होईल असे मला हि वाटते.. काँग्रेस ला हे जमणार नाही... (तो जाहीरनामा आठवायचे कारण, तो वाचुन मी त्यावेळी भाजपाला वोट दिलेले होते..) आणि मला समान नागरी कायदा आवडतो.. तो सर्व लोक समान आहे हि माझी भावना आहे.. त्याचे कोणाला काय फायदा.. वगैरे त्यामागे काही माझी भावना नाही.. माझ्या म्हणण्याने.. ब्राह्मण.. मराठा.. माळी.. सुतार..महार.. मुसलमान .. हिंदू.. बौद्ध असे सगळे एक समान नागरी कायद्यात असावेत... कोणी खालचे नाही कोणी वरचे नाही...यात समानता असावी.. झाले गेले वाईट होते पण प्लिज माणुस म्हणुन एक राहू असे माझे म्हणणे आहे... औरंगजेबाने आणि मुघलांनी आक्रमण केले.. अनेक दुष्कर्म केले ते चुकीचेच.. पण म्हणुन आता अजूनही इतर धर्मीय सर्व सरसकट लोकांना जर आपण गुन्हेगार म्हणुन पाहत असेल तर अवघड आहे.. मग आपण कसली समान नागरी कायड्याची पाठराखन करतोय..? आधी आपल्या मनात समानता आहे काय? येथे कुठेही मी गुन्हेगार लोकांचे समर्थन करत नाही.. समजा उद्या मुस्लिम गुन्हेगार म्हणुन भारता बाहेर लावले.. किंवा हिटलर नीती वापरून मारून टाकले.. मग पुढे काय? मग दलित विरुद्ध उच्च जातीय दरी आखून युद्ध करायची आहेत काय? म्हणजे धर्म झाले कि जाती वर यायचे काय? आणि याला उत्तर एकच आहे.. सर्व जण माणसे आहेत.. त्यात जातीय आणि धार्मिक फुट नको.. असो धृवीकरण ध्रुवीकारण झाले तर हरकत नाही.. पण काय चांगले काय वाईट यावर व्हावे.. विचार सारखे नसतात सगळ्यांचे.. पण धर्मा वरून जातीवरून ते होत असेल तर अवघड आहे.. बरं उद्या फक्त समान नागरी कायदा पहिला आणला आणि त्याच वेळेस आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सगळ्यात भारताचे पार कंबरडे मोडणार असेल तर priority wise सगळे नीट करू पाहणाऱ्या बद्दल मत चांगले असणे कधी हि चांगले.. कधी काही गोष्टी करण्यास वेळ लागतो.. ते मी मान्य करतो... एक समान नागरी कायदा आणू शकले नाहीत म्हणुन अटल जी असो वा मोदी त्यामुळे त्यांचा विरोध नाहीच.. पण ज्या पद्धतीने आता राजकारण चालू आहे, ते वयक्तिक मला चुकीचे वाटते.. अर्थ विभागात तर सपशेल fail आहे bjp.. मग कोणाला या अश्या कारणा साठी काँग्रेस योग्य वाटत असेल तर ह्या साठी तसे माणनारा माणुस म्हणजे लगेच व्यक्तिपूजा.. घराणेशाही माननारा.. आणि हिंदू विरोधी होत नाही..आणि असे ज्याला वाटते तो माणुस महामूर्ख असावा.. पण हे सांगण्यात तासन तास घालावावे लागत आहे, किती वाईट आहे हे.. जातीय ध्रुवीकरण नेहमी वाईटच...

In reply to by गणेशा

सरकार जो खर्च करते त्यातील गळती कमीत कमी होऊन, जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. हे ज्याच्या कार्यकाळात होईल असे मला वाटते, त्याला मी माझे मत देतो. या अर्थाने मला मोदींंची व महाराष्ट्रात फडणवीसांची राजवट आवडलेली आहे व त्यांना मी मते देतो. कोणत्या प्रकारचे राजकारण करून ते सत्तेत येतात याबद्दल मी जास्त खोलात शिरत नाही कारण त्यातील खर्‍या बाबी सर्वसामान्यांना कधीच कळत नाहीत. जातीभेद नष्ट करणार्‍या पक्षाला मतदान करण्याची अपेक्षा बाळगणे, हे मला दिवास्वप्न वाटते.

In reply to by शाम भागवत

सरकार जो खर्च करते त्यातील गळती कमीत कमी होऊन, जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. हे ज्याच्या कार्यकाळात होईल असे मला वाटते, त्याला मी माझे मत देतो. या अर्थाने मला मोदींंची व महाराष्ट्रात फडणवीसांची राजवट आवडलेली आहे व त्यांना मी मते देतो.
तुमच्या मताचा आदर आहेच.. प्रत्येकाचे मत आणि विचार सारखे नसतात.. वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला.. आता इतरांनी लगेच वाढवू नये कि पर्याय काय आणि काय काय fail आहेत.. ते कसे successfull आहे.. आहेत तर असुद्या.. तुम्ही असेच वोट द्या आणि बहुमताने ते निवडून येऊद्या..
जातीभेद नष्ट करणार्‍या पक्षाला मतदान करण्याची अपेक्षा बाळगणे, हे मला दिवास्वप्न वाटते.
हो.. पण म्हणुन त्याची पाठराखण करणे चूक आहे हेच माझे म्हणणे आहे... आणि india deserves this only .. कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...

In reply to by गणेशा

वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला..
लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचण्याचे प्रयत्न करण्यासाठी, मोदींचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना भरपूर वेळ देऊन झालेला आहे. त्यामानाने मोदींनी गेल्या पाच वर्षात चांगले प्रयत्न केलेले आहेत. असे माझे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसच्या नंदन निलकेणींना ही असं वाटतं हा हव तर तुम्ही अपवाद समजू शकता. कारण तुमच्याही मतांचा आदर आहे.
कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...
हो म्हणूनच कमी भ्रष्टाचार करणारे सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करतोय. तसेच अगोदरचे सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय.

In reply to by शाम भागवत

हो म्हणूनच कमी भ्रष्टाचार करणारे सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करतोय. तसेच अगोदरचे सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय.
टोला जबरदस्त आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

कसला टोला? ते काय म्हणाले आणि मी काय म्हणालो. ते त्यांना आणि मला माहित. त्यांच्या वयक्तिक मताला माझा आक्षेप नाहीच.. तुमच्या सारखे मध्ये येऊन जे असे आगीत तेल ओतणारे असतात ना म्हणूनच सोशल मिडीया आणि विशेष करून मिपा पार राजकीय धुराळ्यात गुरुफ़ुटून गेले आहे.. मी उत्तर देणे टाळले होते.. कारण त्यांना तसे वाटत होते कि bjp कमी भ्रष्टाचार करते.. असुद्या प्रत्येकाला सारखे वाटत नसतेच.. खाली लिहितोय...

In reply to by प्रसाद_१९८२

हिंदू हा प्रश्नच नाहीये.. तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही.. हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का? आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का? सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही.. बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले.. यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..
हा माझा हे संभाषण चालू झाले तेंव्हाचा पहिला प्रतिसाद.. तरीही विषय हिंदू.. कुराण.. काँग्रेस.. मुस्लिम असले सगळे वाढवून इतके सगळे लिहून भरकटत न्ह्यायाचा आणि शेवटी bjp कसे भ्रस्टाचार मुक्त हे दाखवायचे... आणि याला शेवटी टोला म्हणायचे? Bjp भ्रष्टाचार कमी करणारी पार्टी आहे असे म्हणणेच मला चूक वाटते.. उलट आधी काँग्रेस ला शिव्या घालत होतो.. आता ह्यांच्या राजकारणा मुळे आधीचेच जास्त योग्य असे मला वाटते... असो थांबतो..

In reply to by गणेशा

कदाचीत नेक्स टाइम आपला फक्त शेअर मार्केटचा धागाच सुसंगत धरण्यात येइल... असो. भेटु कधी तरी मुवी काकांनी योग जमवला कट्याचा तर. तो पर्यंत पुलेशु.

In reply to by गणेशा

ब्राह्मण.. मराठा.. माळी.. सुतार..महार.. मुसलमान .. हिंदू.. बौद्ध असे सगळे एक समान नागरी कायद्यात असावेत... कोणी खालचे नाही कोणी वरचे नाही...यात समानता असावी.. मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत आहे? आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी लेयर लावण्याबाबत आपले काय मत आहे? मविआने मुसलमानांना ५% आरक्षण देण्याबाबत मागणी केली आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? Prithviraj Chavan says the Marathas and Muslims have been given reservation without affecting existing reservation for the SCs, STs and OBCs https://www.livemint.com/Politics/1RomndWQy1wh8iH0dsBMiI/Maharashtra-go… Maharashtra to provide 5% quota to Muslims in education: Nawab Malik Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/maharasht…

In reply to by सुबोध खरे

मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत आहे?
माझ्या मते सगळे भारतीय एक आहेत, आणि सर्वांना सारखे नियम असावेत.. जे गरीब आर्थिक दुर्बल असतील मग ते दलित असो, ब्राम्हण असो वा मराठा त्यांच्या शिक्षनासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पर्यत्न झाले पाहिजेत.. डॉ. माझी मते ठाम आणि पक्की असतात.. त्यात कोणाचा तिरस्कार नसतो कि कोणाच्या चुकीची पाठराखन नसते... मुसलमान, हिंदू असे जे तुम्ही बोलत असता, तरीही एक डॉ म्हणुन तुमच्या कडे येणार्या पेशंट मध्ये तुम्ही भेदभाव करत नसताल असे मला वयक्तिक वाटते.. कारण माणुस परखड असला तरी तो वाईटच असतो असे नाही.. असे मला वाटते.. पण तुम्ही नेहमी मला असले प्रश्न करता.. मी केला कधी तुम्हाला, मुसलमान बाई सोनोग्राफीला आली तर तुम्ही काय करता.. कारण मला अजूनही खात्री आहे.. डॉ हे माणसातले देव असतात.. आणि जर तुम्ही कर्म करताना जे भाव मनात ठेवता ते मी येथे समाजात वावारताना ठेवतो.. याला तुम्ही गुळमुळीत म्हणा हरकत नाही.. पण ते आहे तसे... तशीच माझी मते आहेत, मला माणुस म्हटल्यावर धर्म जात दिसत नाही.. तसे मी बोललो तर तुम्हाला गूळमुळीत वाटत असेल, पण वयक्तिक रित्या मी तसा नाही..मी जहाल आहे.. अगदी खुप भांडणारा.. उरुळी कांचनला मी गेलो तरी शफिक पण माझ्या गळ्यात हात टाकून बोलतो... आणि राम पण.. त्यात काय एव्हडे.. असो थांबतो.. आता आणखिन नको...

In reply to by गणेशा

आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी लेयर लावण्याबाबत आपले काय मत आहे? मविआने मुसलमानांना ५% आरक्षण देण्याबाबत मागणी केली आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? याला आपण उत्तर दिलेले नाही. आणि मी सुरुवातीलाच म्हटले आहे कि मुसलमान व्यक्ती आणि गट म्हणून वागणे संपूर्णपणे वेगळे असते. त्यामुळे मुसलमान व्यक्तीला मी माणूस म्हणूनच वागवतो. माझे रुग्ण, आंबेवाला किंवा ए सी चा मेकॅनिक मुसलमान आहेत यामुळे मला फरक पडत नाही. हे मला दुर्दैवाने येथे लिहावे लागते आहे कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक व्यवसाय निष्ठेवर घसरला आहात.( अनवधानाने आहे असे समजून मी हा विषय पुढे वाढवत नाही)

In reply to by सुबोध खरे

कितीही पुन्हा लिहिणार नाही म्हणालोय तरी लिहावे लागतेय..पण संपवतोय.. कृपया आपण येथे थांबू..निदान हा शेवटचा रिप्लाय असावा आपल्यात येथे अशी माझी request आहे..
हे मला दुर्दैवाने येथे लिहावे लागते आहे कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक व्यवसाय निष्ठेवर घसरला आहात.( अनवधानाने आहे असे समजून मी हा विषय पुढे वाढवत नाही)
धन्यवाद.. प्लिज वाढवू नका.. पण मी कुठे तुमच्या वयक्तिक निष्ठेवर घसरलोय.. तुम्ही गैरसमज करताय.. उलट मला तुमच्या निष्ठेवर शंका नाही असेच मी म्हणालोय.. जर तुम्हाला तसे वाटले असेल तर मला दाखवून द्या.. तसे असेल तर नैतिकता म्हणुन मी मिपा सदस्य पणाचा त्याग करेल... उलट आपले विचार किती हि जुळले नाही तर तुमचा वयक्तिक व्यवसाय आणि डॉ म्हणजे माणसांतले देव असेच मी म्हणालोय.. आणि नक्कीच टाळ्या थाळ्या वाजवून कृतज्ञता दाखवण्या पेक्षा मनातून असे खरे वाटणे मला जास्त योग्य वाटते. आणि ते तसेच आहे.. उलट मला खात्री आहे तुम्ही निष्ठेने उपचार करत असताल हेच म्हणालोय. मग तुम्ही जे मला वर पासून परखड जहाल बोलताय वगैरे म्हणताय ते का? मी कधी कुठल्या हिंसक लोकांचे समर्थन करतोय..हिंसक गट हे मुसलमान असु शकतात, हिंदू असु शकतात आणि कोणीही.. त्यामुळे माणुस म्हणुन समाजात वावरताना मला वयक्तिक सर्व धर्म समभाव पणे इतरांशी वागणे मला समाजा प्रती निष्ठा वाटते .. मग तुम्ही माझ्या वयक्तिक निष्ठेला गुळमुळीत कसे म्हणू शकता.. तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल बोलल्याने निदान हे तरी समजले असेल कि मी काय म्हणतोय..म्हणजे तुम्ही वयक्तिक व्यवसायात भेदभाव करणार नाही पण मी वयक्तिक वागताना तसे करू नये म्हणताना यात असे काय वेगळे आहे कि मी चूक ठरतो? मी कुठल्याही गटाबद्दल थोडेच बोलतोय...आणि कोणत्या गुन्हेगारांना थोडेच पाठराखण करा म्हणतोय.. दुसरे डॉ म्हणजे तुमचा व्यवसाय आहे, आणि शेती हा माझ्या बापाचा व्यवसाय आहे तर त्यावेळेस तुम्ही जे सरसकट बोलता तेही चूकच असते.. तुम्ही जेंव्हा सरसकट बोलता ना त्यावेळेस जे त्यातील चांगले आहेत त्यांना हि तुम्ही त्यांच्या कार्यावर प्रश्नच उपस्तिथ करत असता.. असो तो विषय येथे घेत नाही.. दुसरी गोष्टी क्रिमि्लेअर म्हणजे काय हे मला माहित नाही.. Obc साठी असते असले शाळेत ऐकल्याचे जाणवते.. मला ते माहिती नाही.. नसू शकते माहिती.. एका माणसाला सगळ्या गोष्टीं माहित असाव्यात असे काही नाही.. म्हणुन त्यावर मी बोलू शकलो नाही.. मला मात्र कधी क्रिमी लेअर लावावे लागले नाही त्यामुळे मला माहिती नाही त्याबद्दल (कृपया यांनंतर काहीही रिप्लाय आला तरी राजकीय या धाग्यावर मी बोलणार नाही.. प्रश्न किंवा वयक्तिक बोललो असे वाटल्यास आणि काही बोलायचे असल्यास ९९८७६७३३३२ वर बोला बिनधास्त.. येथे नाही..) समाप्त..

In reply to by गणेशा

बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय? उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो.. आणी आणि बाकीचे काय हातात त्रिशूल घेऊन दिसला मुस्लिम कि भोसक करत सुटलेत... काय च्या काय सेल्फ सर्टिफिकेट देताय तुम्ही अहो साधे ३७० हटवले तर केवढा गदारोळ घातलात .. धर्म सोडा ,पक्ष सोडा देशाच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने तरी त्यावर तुमच्या सारखया विचारच्या लोकांनी हरकत ना घेता मनमोकळे पनाणे साथ नाही दिली... आणि बोलताय समान नागरी कायद्याचे ! एक एक करीत करत आहेत .. ते अजेंडयावर येण्याची शक्यता आहे जरा याचा विचार करा दुटप्पी कोण ते एकीकडे समानता म्हणायचे , भाजप एकांगी म्हणून बोलायचे आणि समान नागरी कायदा ६० वर्शे सत्तेत असून सुद्धा त्यादृष्टीटीने काह्ही पावले उचलायची नाहीत आणि पहिली ५-७ वर्षात ते करून का नाही दाखवले म्हणून भाजपच्या नावाने ओरडायचे ६० वर्षे भिजत घोंगडे जे काँग्रेस ने ठवलेय त्याच्यावर किती रोड रोलर चालवावा लागेल/// सगळी फिल्डिंग लावावी लागेल उद्या आला कायदा तर नुसते भारतातील विरोधी नाही जगभरातील "उम्मा " काय गदारोळ घालेल याची कल्पना आहे का? तेवहा अतिशय काळजी पूर्वक ते पाऊल उचलावे लागणार आहे त्याला फारुख अब्दुल्ला पासून ओवेसी पर्यंत विरोध आणि खोटा प्रचार करतील ( सीए ए च्या वेळी सारखा ) पण त्याहून हि दुखद म्हणजे बारामती पासून बंगाल ची वाघिणी पण गप्प बसून फुसकुल्या सोडतील ...

In reply to by चौकस२१२

जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो. - सुबोध खरे. ---= तुम्ही जे bold करून लिहिले आहे ते वरील डॉ सुबोध यांच्या प्रतिदाला रिप्लाय होता.. आणि यापुढे ते समान नागरी कायद्या बद्दल बोलतात..
आणी आणि बाकीचे काय हातात त्रिशूल घेऊन दिसला मुस्लिम कि भोसक करत सुटलेत.
नाही, असे मी म्हणालोय काय? तुम्ही जे bold केले आहे, ते या साठी लिहिलेले कि जात पात धर्म यावर बोलायचे.. हिंदू एकीकरण फलाना बोलायचे.. दुसरे म्हणजे गुन्हेगार असे म्हणायचे.. आणि वरतून समान नागरी कायदा मागायचा... ह्या पेक्षा मी समान नागरी कायदा मागितला तर त्याचा उद्देश सर्व धर्म समभाव असा तरी अर्थ होईल.. उगाच धार्मिक भेद माणायचे आणि सर्व समान असावेत हे म्हणायचे हे ढोंगी मत आहे माझ्या मते

In reply to by चौकस२१२

१९५१ साली मुस्लिम ९.९ टक्के होते जे २०११ मध्ये १४.२ टक्के झाले आहेत. आणि अजुन माहिती येथे मिळेल https://en.wikipedia.org/wiki/Islam_in_India#Population_growth_rate राजकारणी स्वताचा स्वार्थ साधायला समाजाचे दुरगामी भले कशात आहे हे बघत नाहीत. नुसते सात पिढ्यान्साठी सम्पत्ती जमवतात. पण त्या पुढच्या पिढ्याना सुखाने जगण्यासाठी निकोप समाज व्यवस्था असेल का याचा विचार करत नाहीत. आज आम्ही हिन्दु स्त्रियाना मोकळा श्वास देतो आहोत पण भविष्यात त्या बुरख्यात जायची शक्यता तर निर्माण करत नाही ना? याना परत वैदिक सन्स्क्रुती रुपी पारतन्त्र्य यायची भीती वाटते पण नजिक असलेला धोका दिसत नाही. कम्युनिझम मध्ये पण स्त्रियाना हुकुम्शाहीच सहन करावी लागते..

In reply to by सुखीमाणूस

कम्युनिझम मध्ये पण स्त्रियाना हुकुम्शाहीच सहन करावी लागते..
१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुकांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने के.आर.गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जरी जाहीर केले होते. केराच्या (नारळाच्या झाडांच्या) भूमीत के.आर.गौरीअम्मांना राज्य करू द्या असे मल्याळम भाषेत यमक होणारी पक्षाची निवडणुकीसाठी घोषणा होती. निवडणुका डाव्या आघाडीने जिंकल्याही. पण निवडणुक झाल्यावर मात्र गौरीअम्मांना मुख्यमंत्री न करता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत त्यावेळेपर्यंत कधीच नसलेल्या ई.के.नयनार यांना मुख्यमंत्री केले. इतकेच नाही तर १९९४ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. आपण नक्की काय चूक केली म्हणून पक्षातून काढले हा प्रश्न त्यांनी विचारला होता. https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/may/11/kr-gouri-amm… १९९६ च्या केरळ विधानसभा निवडणुकांमध्ये डावी आघाडी जिंकली तरी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्ही.एस.अच्युतानंदन यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर परत एकदा कोणाला मुख्यमंत्री करायचे हा प्रश्न उभा राहिला. तेव्हाही सुशीला गोपालन यांना मुख्यमंत्री न करता ई.के. नयनार यांना परत एकदा मुख्यमंत्री केले गेले. ए.के.गोपालन या ज्येष्ठ नेत्याची पत्नी असलेल्या सुशीला गोपालन यांनाही तीच वागणूक मिळाली. मग कोणतीही मुळातली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गौरीअम्मांना वेगळी वागणूक मिळेल ही अपेक्षा करणेही चुकीचेच. वृंदा करात यांना पक्षाच्या सरचिटणिस केले गेले नाही. आणि हेच लोक भाजप-संघात स्त्री कधी सर्वोच्च स्थानावर जाणार हा प्रश्न विचारत असतात. आहे की नाही मज्जा? अन्यथा ही चर्चा ज्या दिशेने जात आहे त्यामुळे मला फार रस राहिला नव्हता पण कम्युनिस्टांचा उल्लेख आला म्हटल्यावर झोडपायला मी आलोच. परवाच के.आर.गौरीअम्मांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्याविषयी ताज्या घडामोडींच्या धाग्यात लिहायचा विचार करत आहे.

या धाग्यावरील अनेक प्रतिसादांची लेखनशैली, कल, विचार पाहून, Rajesh_118 यांची आठवण येते आहे. हे विधान प्रतिसादांमधील मजकूरांबद्धल आहे, लेखकाबद्धल नाही.

स्वतः फेक विखारी बातम्या टाकायच्या, आणि खंडन झाले की दुर्लक्ष करून उपहासात्मक खवचट टीका करायची.