Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 02/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

वाचने 70291
प्रतिक्रिया 301

प्रतिक्रिया

फक्त एक प्रश्न विचारला.. तो हि ३ चे ७७ मध्ये भाजपाचे मुळ लोक किती.. तर माझा जवळ जवळ खुप वेळ त्यावरील प्रतिसादाला उत्तर देण्यात गेले..कारण त्यावर हिंदू.. Bjp फलाना चालू करण्यात आले.. हिंदू हा शब्द आला तेंव्हाच हा मुद्दा नाहीच आहे असे स्पष्ट लिहिले तरी तेच तेच हिंदू मुस्लिम यावरच चर्चा आणली गेली.. अरे जो माणुस पहिल्यांदा म्हणतोय येथे काय संबंध धर्म आणायचा.. त्यावर शाब्दिक बोलुन.. हे असे न हे तसे.. मग लगेच काँग्रेस आणि फलाना.. अरे काय आहे हे.. तुमच्या विचारां सारखे विचार नसले कि पुढचे काय फक्त काँग्रेसी चमचे किंवा मूर्खच असतात काय? स्वतः धर्म जात मानायची आणी इतर कोणी सर्व धर्म समभाव म्हणाले कि त्याच्यावर पुर्ण लिहिलेल्या आणि कोणाला तरी उत्तर द्यायला लिहिलेल्या प्रतिसादातुन ४ लाईन्स bold करून हे असेन ते तसे लिहायचे.. मला अत्यंत खेदाने म्हणावे लागतेय.. तुमचेच खरे.. तुमच्याशी बोलण्यात मी माझा वेळ वाया घालवला याचे दुःख होतेय.. बस.. मते वेगळी असावीत.. पण आपलेच ते सत्य आणि आपणच तो काय बरोबर आणि इतर म्हणजे मूर्ख हे साधे येथे १० माणसात तुम्हाला वाटते यातच मी समजुन जायला हवे होते कि अर्थ नाही... येथे बोलायचे म्हणजे.. मिपा म्हणजे जणू bjp चे मुखपत्र आहे.. ते लगेच तुमच्यावर ह्याव त्यांव हल्ला करणारच.. अरे तुम्ही bjp माना नाही तर काँग्रेस... हिंदू माना नाही तर मुस्लिम.. अरे पण माणुस म्हणुन पुढच्याला मते असतात..तुम्ही माणुस म्हणुन वावरा ना फक्त.. बस आता... झक मारली आणि राजकीय धाग्यावर पुन्हा बोलायला आलो.. मुद्दा भरकटत ठेवून आपल्याला काय अपेक्षित आहे ते सर्व मिळून जे येथे मिपावर चालले आहे.. ते पुर्ण पणे चुकीचेच आहे.. आणि मिपा चा एक जुना सदस्य या नात्याने मला खेदाने म्हनावे लागतेय वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर... चालू द्या..

In reply to by गणेशा

वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...
हे मात्र खरे आहे. कारण २०१४ च्या अगोदर भाजप सगळ्यांचं गुपचुप ऐकून घेत असे. :)

In reply to by गणेशा

एक नंबर. मिपावरचे काही Bjp समर्थक लैच insecure बुवा. जरा खुट्ट वाजलं कि धावत येतात. टीका करणारा काँग्रेसचा आहे ठरवून टाकतात, आणि स्वतःच्या पक्षावरील टिकेकडे दुर्लक्ष करून whataboutry करतात. सेक्युलर, फुरोगामी वैगेरे शब्द फेकतात, आणि काय आर्ग्युमेन्ट केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटतात.

In reply to by गणेशा

तो हि ३ चे ७७ मध्ये भाजपाचे मुळ लोक किती.. शुन्य असोत त्याने फरक काय पडतो? उलट मुळ भाजपेयी नसलेले ही तेथे दाखल झाले असतील तर इतर पक्षांच्या प्रमुख नेत्रुत्वावर गाढ शंका आणी भाजपाच्या नेत्रुत्वावर प्रगाढ विश्वास निर्माण होतोय...
मिपा चा एक जुना सदस्य या नात्याने मला खेदाने म्हनावे लागतेय वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...
आता पुरातन कार्डच खेळणार असाल तर विषयच मिटला. कारण विधाने करुन त्यामागील स्पश्टीकरण आपण पार लपवत आहात गणेशाजी. २०१४ नंतर पुर्वीचे सदस्य बिघडले की २०१४ नंतरचे सदस्य हे तुम्ही स्पश्टच केलं नाहीयें फक्त मिपा गढुळ झालयं इतकच. क्मॉन तुमच्या सारख्या व्यक्तीने विधाने न्हवे अ‍ॅनॅलसीस दिले पाहिजे. बस आता... झक मारली आणि राजकीय धाग्यावर पुन्हा बोलायला आलो.. मुद्दा भरकटत ठेवून आपल्याला काय अपेक्षित आहे ते सर्व मिळून जे येथे मिपावर चालले आहे.. ते पुर्ण पणे चुकीचेच आहे.. मुद्दा राजकीय असेल तर राजकीय धुरळा उडणारच ना हो.

.वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर... गणेशा, कदाचित तुम्हाला देशातील वातावरण 2014 नंतर गढूळ झालंय आस म्हणायचं असेल. 2014 नंतर भरपूर बदल आपल्या देशात झालेत. 1) 2014 पूर्वी MIM सारख्या धर्मांध पक्षाचा खुलेआम पाठिंबा घेऊन सुद्दा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवता येत होतं 2) 2014 पूर्वी देशाच्या साधनसंपत्ती वरती अल्पसंख्याकाचा ( मुस्लिमांचा) पहिला हक्क आहे असे धर्मांध विधान देशाचा पंतप्रधानाला करता येत असे. 3) 2014 पूर्वी हिंदू दहशतवादाची प्रकरणे नसताना सुध्दा हिंदू दहशतवादी म्हणून हिंदूंना बदनाम करता येत असे त्याच वेळी अतिरेकी शांतताप्रिय समाजाचे असतील तर मात्र दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो असे म्हणायची सोय होती आणि ह्यात आघाडीवर हिंदूच असत. 4) 2014 पूर्वी एखाद्या चकमकित शांतताप्रिय समाजाचे अतिरेकी मेले असतील तर त्यावेळच्या सर्वांत मोठ्या पक्ष्याच्या प्रमुखाला रात्रभर झोप येत नसे आणि महत्वाचे म्हणजे झोप न येण्याची गोष्ट आपल्या समर्थकाकारवी शांतताप्रिय समाजाला काळावलीही जात असे. 5) 2014 पूर्वी सरकारी खर्चातून दर्ग्यावर्ती चादरी चढवल्या जात असत परंतु श्री राम मात्र काल्पनिक आहे अस म्हणणाची सोय होती. 6) 2014 पूर्वी संरक्षण दृष्टीने एखादा मोठा व्यवहार झाला आस माझ्यातरी वाचण्यात नाही आलं, 2014 नंतर मात्र असे भरपूर व्यवहार पूर्ण झाले.

In reply to by रात्रीचे चांदणे

वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...
कितीही समजावलं तरी ही मुळमुळीत लोक सुधारणार नाहित. सर्व धर्म सम भाव या फालतुगिरी च्या मोहजालात हे अडकले आहेत. जेव्हा १९४७ किंवा १९७० सारखा तडाखा यांना व्यक्तिशः बसेल तेव्हाच हे सुधारतील. पण तेव्हा देखिल सुधारायला ते या भूतलावर नसतील.!! कारण ते कोणत्या तरी भाई चा "चारा" बनलेले असतील. सर्व मुस्लिम लोकांनीं देश सोडून जावे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकावा किंवा त्यांच्यावर आपण हिंसात्मक कारवाई करावी असं माझं म्हणणं नाही पण वेळीच पावले उचलून अखंड भारताचा अजुन एक तुकडा पडण्यापासून भारताला वाचवावे असं वाटते. इतिहासातून धडा घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला १ , २ नव्हे तर ५०-६० वेळेला चुना लावला असेल तर अश्या लोकांशी डील करताना सावध राहावे इतकी देखिल अपेक्षा करणे चूक कसे काय?? २०१४ पर्यंत सेकुलारिजम आणि अल्पसंख्यक अश्या गोंडस नावाखाली एका विशिष्ठ समाजाला नेहमीच झुकते माप देउन व बहुसंख्य समाजाचा नेहमीच अपमान आणि बदनामी करून याआधीच्या सरकारांनी नेमके काय मिळवले??? तर स्वतः च्याच देशात ९ राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्यक झाले आणि तसे होऊन सुध्दा इतर अल्पसंख्यक लोकांनां हिंदूंनी दिलेल्या सुविधा ते स्वतः साठी वापरू शकत नाहीत.. एक नाही अश्या शेकडो हजारो गोष्टी आहेत. एक अखलाख मेला तर UN मध्ये जायची भाषा करणारे तूम्ही फुटोगमी लोकं, लाखो हिंदूंची भरदिवसा त्यांच्या घरात हत्या झाली.. त्यांनी आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगावे लागले.. त्यांच्यासाठी साधा एक शब्द पण बोलला नाही.. इथेच तूम्ही फुटोगामी लोक उघडे पडलात.. अश्या एक नव्हे.. शेकडो हजारो घटना झाल्यात आणि त्या बोलून दाखवल्या की लगेच वातावरण गढूळ झाले का ?? १०० कोटी लोकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम यांना काल्पनिक व्यक्ती म्हणणे आणि त्याचवेळी ५-६ वेळेला भोंगा वाजवून अल्लाह हाच एकमेव देव आहे असे सांगणे म्हणजे तुमचे सेकुलारिजम असेल तर खड्ड्यात गेले तुमचे सेकुलारिजम. पाणी तेव्हाच गढूळ होते जेव्हा पाण्याच्या बुडाशी भरपूर "चिखल" जमा झालेला असतो.. तुम्हाला आज पाणी गढूळ झालेले दिसते पण शेकडो वर्षे जमा होणारा चिखल दिसला नाही का ???

In reply to by बापूसाहेब

भोंग्यावर बंदी आणा ,कोणी रोखलय ? सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांना एकच नियम लावा.

In reply to by कॉमी

बर मग आता काय करायचं ? काही सजेशन्स ?
हो आहेत ना. १) समान नागरी कायदा आणणे. २) मदरसे , मिशिनारिज ई हिंदूंच्या व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक शिक्षण देणारे सर्व दुकाने बंद. !!! ३) सरकारी जमीन बळकावून उभ्या केलेल्या मशिदी जमीनदोस्त करणे. ४) अल्पसंख्यक आयोग, अनुदान, आणि त्यांच्यबरोबर त्यांच्या सर्व सुविधा बंद करणे. ५) मंदिराप्रामाने इतर सर्व प्रार्थनास्थळे सरकारी नियंत्रणात आणणे. ६) पाकिस्तानच्या नागरिकत्व मिळवण्याच्या प्रोसेस चा अभ्यास करून ज्या व्यक्तींना पाकिस्तान मधे जायचे आहे अश्या लोकांना मदत आणि आर्थिक सहाय्य पुरवणे. ७) घटनाबाह्य पद्धतीने घुसवलेले सोशलिस्ट आणि सेकुलर हे दोन्ही शब्द राज्यघटने मधुन काढून टाकने. ८) काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन करणे. त्यांना सरकारी मदत करणे. नोकरी देणे. ९) इतिहासातील हिंदूंच्या मंदिरांचे पुनर्निर्माण करणे ( सोमनाथ मंदिर सारखे ) १०) वाफ्फ बोर्ड सारख्या धार्मिक संस्थांना दिलेले अधिकार आणि खैरती प्रमाणे वाटलेल्या जमिनी परत घेणे. ११) सार्वजनिक ठिकाणी बुरखा, हिजाब घालणं बेकायदेशीर करावे. १२) आतंकवादी संघटना किंवा आतंकवादी कृत्य करणारे किंवा त्यांना मदत करणारे ( आर्थिक सामाजिक राजकीय कायदेशीर) सर्वांना जन्मठेप किंवा फाशी दोनच शिक्षा असाव्यात. १३) शिक्षण हक्क कायदा रद्द करावा. १४) सर्व पर्सनल बोर्ड रद्द १५) हिंदुव्यातिरिक्त भारतात कोणत्याही धर्मप्रसार कार्यक्रमास बंदी. केल्यास आजन्म कारावास.. १६) १७) अजुन बरेच आहेत आता तुम्ही म्हणणार के हे सर्व शक्य नाही वगैरे वगैरे... पण अजुन ५००-६०० वर्षांनी हिंदू हा शब्द ऐकण्याईतपत जरी जिवंत ठेवायचा असेल तर हे सर्व आज ना उद्या करणे आवश्यक आहे... !! नाहीतर ज्याप्रकारे पर्शिया चा इराण झाला त्याप्रमाणे भारताचा दुसरा पाकिस्तान होणारं हे नक्की. बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!

In reply to by बापूसाहेब

हे सगळे करायच्या आधी एक अतिशय महत्वाची पायरी आहे ०) डाव्या विचारवंतांचे शिक्षण संस्था, मिडिया इत्यादी ठिकाणचे महत्व पूर्णपणे पुसून टाकणे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

डावखुरे लोक इंटलेक्चुअल्स ना बेमालुमपणे गळास लावतात कारण हेच लोक सर्वप्रथम असतात ज्यांच्याकडे शिक्षण, आत्मविश्वास, (चालु)राजकारणाबद्दल चिड, इतिहासातील चुकांबद्दल द्वेश, अंधश्रध्दांबद्दल तिरस्कार या गोष्टी मुबलक प्रमाणात असतात( व अजुन बरीच कारणे ज्यामुळे अस्वस्थता वाटत असते). आता अशा गोश्टी असुनही जेंव्हा ते चालु स्माजात बदल घडवु शकत नाहीत तेंव्हा ते नैसर्गीकपणेच आतुन क्षुब्ध असतात, तुंबलेले असतात व आतिल भावनांना वाट मोकळी करायचा मार्ग हुडकत असताना अचानक एखादी व्यक्ती/संघटना त्यांच्या उपरोक्त गुणांचे पध्दतशीर कौतुक करुन त्यांना डोक्यावर घेते तेंव्हा हे नैसर्गीकपणेच त्याविचारसरणीकडे आकर्षीत न झाले तरच नवल... कारण डावखुरेपणा कितीही स्वप्नाळु असला/ भासमान असला तरी ती आधुनीक काळाची देणगी आहे म्हणून हे प्रकरण नया है वो, भुल पाडणारे आहे हे सत्यच, यांना कुठल्या पुस्तकातील देवाचे राज्य पृथ्वीवर पसरावयाचे नसुन यांचा उहापोह सामान्य माणसांच्य प्रश्नाशी जास्त असतो म्हणून कोणालाही त्याचे आकर्षण नेमकं पडु शकतं अ‍ॅज लोंग अ‍ॅज ते नवखे आहेत.... सुशीक्षीत आहेत, सेंटर ऑफ अटेंशन आहेत.

In reply to by बापूसाहेब

"हिंदू सोडून कुठलाही धर्म भारतात चालणार नाही" हे थेट न म्हणता इतर सगळया प्रयत्नांनी तोच संदेश द्यायचा तर. बऱ्याचश्या गोष्टी मान्य नाहीत, आणि तीव्र विरोध आहे. यादीतल्या एखाददुसऱ्या गोष्टी कधीच अमान्य नव्हत्या, फक्त प्रयोरिटी वाईज फार फार खाली. असो, तुमचे मत समजले, आभार.
बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!
अच्छा, असं आहे तर. बऱ्याचश्या गँमतीशिर बाबी पण वाटल्या. उदा- सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द असून काय फरक पडतोय ? कायदे आणि इतर संविधान आहेच सेक्युलर. बाबासाहेब तर सेक्युलर हा शब्द पुन्हा घातला तर redundant होईल असे म्हणायचे. पण नुसत्या सेक्युलर शब्द असण्याने किंवा नसण्याने काय फरक पडतो ? संविधानाचे कोअर तत्व आहे सेक्युलॅरिझम. प्रिअम्बल मधून शब्द काढा अथवा घाला, काही फरक पडत नाही.
Secularism was inherent to the Constitution’s structure and he felt that mentioning it in the preamble would be redundant
त्यामुळे फक्त सेक्युलर शब्द काढून तुमच्या २,६,११,१५ या इच्छा पूर्ण होणार नाहीत. सोशलिस्ट पण तेच. शब्द ठेवा अथवा काढा, हु केअर्स. लोकोपयोगी कामे करत राव्हा म्हणजे बस.

In reply to by बापूसाहेब

१) समान नागरी कायदा आणणे. बहुमतातील सरकारला लवकरात लवकर का कायदा आणायला भाग पाडा. आंतरधर्मीय विवाहांना बंदी घालायची की नाही?

गोंधळ किंवा गदारोळ याबाबत २०१४ च्या ऐवजी मी २०१२ म्हणेन. २०१२ च्या अगोदर प्रिंड मिडिया व टीव्ही चॅनेल्स यांचे वर्चस्व होते. ते जे दाखवतील किंवा जे काही छापले जाईल त्यावर लोकांवर विश्वास असायचा. मोदींविरूध्द इतकं काही चालू असताना ते बहुमताने कसे काय निवडून येत असत याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत असे. २०१० च्या आसपास इन्टरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला लागले. मनोगत, मायबोली वगैरे ब्लॉग्स सुरू झालेले होतेच ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला लागले. त्या अगोदर हा सगळा प्रकार आयटी मधील श्रीमंत वर्गात प्रचलित होता. २०१२ च्या अगोदर मला प्रथमच मानुषी या डाव्या विचारवंतीणीचा ब्लॉग वाचायला मिळाला व मी चक्रावून गेलो. मोदी विरोधक ते मोदी प्रशंसक हा त्यांचा प्रवास मला थक्क करणारा वाटला. प्रिंट मिडिया व चॅनेल्स जे दाखवत नाहीत ते वाचायला मिळायला लागले. पुराव्यानिशी अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या. २०१४ नंतरचा बदल मात्र जास्त झपाट्याने व्हायला लागला. प्रस्थापीतांनी मांडलेले विचार निमूटपणे मान्य करणे व त्यावर विश्वास ठेवणे ह्या प्रथेला तडे जायला लागले. विरोधी मते मांडली जायला लागली. प्रश्न विचारले जायला लागले. खळबळ उडायला लागली. जीओ च्या यशानंतर फारच बदलून गेलंय. जगात सर्वात स्वस्त अशी आंतरजालीय जोडणी भारतात उपलब्ध झालीय. काहींना गोंधळ वाढलाय असं वाटतंय. काहींना बोलायचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याचा आनंद होतोय. तर काहींना आपण बोलायचे व इतरांनी निमूटपणे मान डोलवायची याची झालेली सवय नडतीय. थोडक्यात २०१४ नंतर गोधळ किंवा वैचारिक प्रदूषण खूपच वाढले आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती. आपले मत मांडताना दुसर्‍यांचा अपमान होईल अशी भाषा न वापरणे हा एकमेव मार्ग यावर आहे. मग मात्र मतभेद राहतील पण इथला वावर सुसह्य असेल. त्यामुळे या गदारोळापासून लांब राहणारेही इथे यायला लागतील. भागही घ्यायला लागतील. इकडचे ४-५ व तिकडचे ४-५ अशी सध्याची विचारमंथनाची पध्दत बदलून जाईल. मग मात्र अभ्यासपूर्वक लिखाण वाढायला लागेल. तोपर्यंत काय? वेळ काढत राहायचा. वाट पहात राहावयाचे.

In reply to by शाम भागवत

संपूर्ण प्रतिसादाच्या आशयाशी आणि विशेषतः
पुराव्यानिशी अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या.
या वाक्याशी पूर्णतः सहमत. .