Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 02/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

वाचने 70291
प्रतिक्रिया 301

प्रतिक्रिया

आसामात सरबानंद सोनोवाल परत जिंकले हे खूप चांगले झाले. गेल्या काही वर्षात भाजपने जे बाहेरचे लोक पक्षात घेतले त्यात पक्षासाठी खरोखरच 'अ‍ॅसेट' असलेले हे सोनोवाल आहेत. नाहीतर बाकी सगळे पद्मसिंग पाटील, मधुकरराव पिचड सारखे गणंग घेतले गेले. आसामात सी.ए.ए विरोधात बरेच वातावरण तापले होते (की तापवले गेले होते). याचे कारण आसामी हिंदूंचा पण सी.ए.ए ला काही प्रमाणावर विरोध होता. याचे कारण सी.ए.ए अंमलात आल्यास बांगलादेशातून अधिकृतपणे बांगलादेशी हिंदू आसामात येऊ शकतील आणि राज्याचा आसामी चेहरा जाईल. बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने आंदोलन केले होते त्यात भरपूर हिंसाचार झाला. त्यात बंगाली हिंदूंनाही काही प्रमाणावर लक्ष्य केले गेले होते. तेव्हा सी.ए.ए मुळे सोनोवालांना ही निवडणुक जड जाईल अशी भिती मला वाटत होती. पण सुदैवाने तसे झाले नाही. आसामात फकरूद्दिन अली अहमद आणि इतर काँग्रेस नेत्यांनी बांगलादेशी घुसखोरांना वाटा मोकळ्या करून दिल्या हे उघडे गुपित आहे. अगदी कुलदिप नय्यरसारख्या भाजपविरोधी पत्रकारानेही ते मान्य केले आहे. आसामच्या अनेक भागात त्यामुळे या घुसखोरांमुळे बांगलादेशी मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर तशीही वाढली होती. अशा परिस्थितीत आपण भाषेवरून न भांडता हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे हे मतदारांना समजले असेल तर उत्तम. काँग्रेसने बदरूद्दिन अजमलच्या ए.आय.यु.डी.एफ पक्षाबरोबर युती केली होती. सरबानंद सोनोवालांनी आसाम गण परिषदेत असताना आय.एम.डी.टी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात कायद्याची लढाई केली होती आणि २००५ मध्ये ते जिंकले. त्यानंतर बांगलादेशी घुसखोरांच्या हितरक्षणासाठी या ए.आय.यु.डी.एफ पक्षाची स्थापना झाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. असे असतानाही ज्या आसामी हिंदूंनी काँग्रेसला मते दिली असतील ते स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेत नव्हते का? त्यांच्याविषयी आपण का सहानुभूती ठेवावी?

आसामी हिंदूंनी काँग्रेसला मते दिली असतील ते स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेत नव्हते का? तीच गोष्ट महाराष्ट्र राज्यात पण होत आहेच की...CAA आणि NRC ला विरोध, महाराष्ट्र राज्यात, भाजप सोडून इतर सगळेच पक्ष करत आहेत... ---------- त्यांच्याविषयी आपण का सहानुभूती ठेवावी? कारण, ते आपलेच हिंदू बांधव आहेत... -------

In reply to by मुक्त विहारि

खास करून जर सोशल मीडिया वरच्या कमेंट्स वरून म्हणायचे तर महाराष्ट्रातले तरुण (हिंदू च) सुशिक्षित अडाणी आहेत. शिकले सवरले तरी डोकं न वापरता गुढघा वापरायची परंपरा तशीच आहे. फडणवीस ना जातीवरून हिणवणे, गुजराठ्यांना शिव्या घालणे, विदर्भाला वेगळे राज्य देऊन महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही अशा मूर्ख वलग्ना करणे, लायकी नसताना मोदीं वर आगपाखड करणे (अजून बऱ्याच लोकांना ते गुजराथी समाजाचे प्रतिनिधित्व करतात असे वाटते), नॉर्थ इंडियन्स ना हिणवणे अशी कामे आपले तरुण करतात. नोकरी का मिळत नाही ही एक प्रमुख बोंब सतत असते (म्हणजे याना फुकट शिक्षण पाहिजे आणि नोकरी पण द्या). बहुतांशी अंबानी अदानी यांना जिओ चे कार्ड वापरून शिव्या घालतात. आपल्या वेळेचा दुरुपयोग कसा करावा हे मराठी तरुणांकडून शिकावे. आजूबाजूला काय चाललंय हे अजिबात माहित नसतं. काय अपेक्षा करणार अशा हिंदू तरुणांकडून?

In reply to by पिनाक

1. आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही.... हे बंद झाले 2. आम्हाला मुस्लिम लोकांनी निवडून दिले आहे, हे माननीय शरद पवार यांचे वक्तव्य.... हिंदू धर्माला, हे काहीच किंमत देत नाहीत ... इतर जातींचा द्वेष करता करता, हिंदू धर्मच लयाला जायची शक्यता जास्त आहे ....

आपल्या अवतीभोवती पहा .. ऑफिसात पहा ....! जो चांगली कामे करतो त्यांची बर्याच लोकांवर छाप पडण्याची शक्यता असते . अशावेळी सोसायटीत चांगले काम करून दाखवणार्या माणसास कॉर्नर करणे ,ऑफिसात काही चांगला परफॉर्मन्स दाखविणार्या विरुद्ध साहेबांचे कान फुंकणे ई उद्योग चालेले तुम्हास दिसतील . असाच प्रकार एखाद्या सनदी अधिकाऱ्याला गडचरोलीला पाठविणे ,पुराण संशोधन प्रकल्पाच्या प्रमुखाच्या जागी पाठवणे हे बाय डीफॉल्ट उपाय (?) मुख्यमंत्री अवलंबत असतात . काँग्रेस या पक्षाचे असेच आहे .मी बुडालो तरी चालेल पण भाजपा मेला पाहिजे असे त्यांचे धोरण आहे. वास्तविक अर्थकारणात भाजपा त्यांचा भाऊच आहे ! फक्त जातीय जातीय म्हणून बोंबा मारत सुटायचे इतकेच राहुल करीत आहे . नियती त्याचे फळ त्याला देत आहे. भाजप ला पाडायचे तर पर्याय काँग्रेस नको प्रादेशिक पक्ष चालेल मग तो भ्रष्ट का असेना असा मानस मतदाराचा होत चालला आहे !

पश्चिम बंगाल : राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त.... https://www.loksatta.com/elections-news/west-bengal-result-2021-congres… ---------- आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच ....

सर्वप्रथम... वर्षानू वर्षे कम्युनिष्टांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बंगाल राज्यात एवढया वर्षांचं मेहनतीने भाजपनं आपलं पाय मजबूत पने रोवले त्या बद्द्दल भाजपचे अभिनंदन... अशीच वाटचाल केरळ मध्ये होऊ देत अशी आशा करतो बंगाली लोकांबद्दल हे कधी कळले नाही, कम्युनिष्ट विचहरसरणीचा गड म्हणजे धर्माला पूर्ण विरोध मग तिथे दुर्गापूजा कशी काय प्रसिद्ध? दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे हे कि तृणमूल कशी उदयास आली? अचानक उदयास आलेल्या "आप" सारखी ? त्यात ३०% मुस्लिम लोकसंख्येचा काय वाटा ? जेवहा कम्युनिस्ट होते तेवहा मुस्लिमांची मते काँग्रेस ला जायची का? केरळ बद्दल असेच.. जे काही थोदेसुद्धा हिंदू संस्कृतीशी निगडित असेल ( योग, आयुर्वेद ) त्याचा जमेल तास पाणउतारा आणि तिटकारा करणाऱ्या डावयाचा हा अड्डा मग तिथे केरळी आयुर्वेदिक , मंदिरातील मिरवणूक वैगरे प्रसिद्ध कसे? कम्युनिस्ट विचारसरणी प्रमाणे यावर बंदी असली पाहिजे आणि "नया मुल्ला प्याज हि प्याज खाता है" या म्हणीप्रमाणे भारतातील कम्युनिस्ट म्हणजे चीन आणि जुन्या रशियापेक्षाही हि कडवे ना? केरळात खरे तर मंदिर मशीद आणि चर्च सर्वांवर भयंकर निर्बंध असले पाहिजेत ना?

दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे हे कि तृणमूल कशी उदयास आली? अचानक उदयास आलेल्या "आप" सारखी ? तृणमूल कॉंग्रेसचा उदय अचानक झालेला नाही. तृणमूल कॉंग्रेसची स्थापना १९९८ मध्ये झाली. १९९७ मध्ये बंगाल कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तत्कालीन कॉंग्रेसाध्यक्ष सीताराम केसरींनी सोमेन मित्रा या ममता विरोधकाची निवड केल्याने ममता चिडल्या होत्या. ममतांंना राज्य कॉंग्रेसचे अध्यक्षपद हवे होते. राज्य कॉंग्रेस सत्ताधारी डाव्यांना पुरेसा विरोध करीत नाही व त्यांच्याशी जमवून घेत आहे, असाही ममतांचा आरोप होता. त्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन हसै करण्याची विनंती केली होती. परंतु तेव्हा सक्रीय राजकारणात नसलेल्या सोनियांनी यात लक्ष घातले नव्हते. परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली व १९९८ ची लोकसभा निवडणुक भाजपशी युती करून लढविली होती. त्यात तृणमूलचे ७ व भाजपचा १ खासदार निवडून आला होता. नंतर १९९९, २००४ व २००९ मधील लोकसभा निवडणुकीत आणि २००१ व २००६ मधील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला फारसे यश मिळाले नव्हते. परंतु २००७-०८ या काळातील सिंगूर व नंदीग्राम येथील हिंसाचार व सत्ताधारी डाव्या आघाडीच्या घोडचुकांमळे २०११ मध्ये तृणमूलला बहुमत मिळाले व तेव्हापासून बंगालात तृणमूलला प्रभावी विरोधक शिल्लक राहिला नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीत तृणमूलचे ३४ खासदार व २०१६ विधानसभा निवडणुकीत २०४ आमदार निवडून आले होते. परंतु २०१९ लोकसभा निवडणुकीत तृणमूलचे फक्त २२ व भाजपचे १८ खासदार निवडून आले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे २११ तर भाजपचे ७७ आमदार निवडून आल्याने एक प्रभावी विरोधक निर्माण झाला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली म्हणजे थोडक्यात पवारांनी जसे स्वगृह सोडून केवळ क्यक्तिगत फायद्या साठी राष्ट्रीय नाव जोडून अजून एक काँग्रेस स्थापन केली तसेच ! .... मग ममता नंतर कोणी आहे का? तृणमूल मध्ये ?

In reply to by चौकस२१२

पवार आदिना जेंव्हा असा अन्दाज आला की काँग्रेसची दिवसेंदिवस पिछेहाट होते आहे त्यामुळे केन्द्रात तरी मिलीजुली सरकारे स्थापन होण्याचा काळ सुरू होत आहे ! अशावेळी चोर जसे लुटलेली संपत्ती वाटून घेतात तसे सत्तेची वाटणी ही करता येईल या फार्म्युल्याचा उपयोग राज ठाकरे ,रामदास आठवले पासून सर्व करू पाहात आहेत ! सबब सेना- मनसे ,आठवले-आंबेडकर , दि एम के ,एएआयडीएमके ,काँग्रेस -टीएमसी हे एकत्र येत नाहीत येणारही नाहीत ! या सर्वांचा अंदाज मोदी यांनी चुकविला .मोदींचा प्रभाव कमी होत असला तरी आता भाजपाने देशात पकके पाय रोवले आहेत . एकमेव आमदार रामभाऊ म्हाळगी ते १०५ आमदार अशी भाजपाची प्रगती महाराष्ट्रात झाली आहे जिथे कमालीचा ब्राहमण द्वेष होत आलेला आहे !त्या अर्थाने भाजपा सर्वसमावेशक झाला आहे गुंडगिरी सह !

In reply to by चौकस२१२

पवार १९९८ मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेता होते. १९९९ मध्ये वाजपेयी सरकार विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर, आपण विरोधी पक्षनेता असल्याने आपल्याच नेतृत्वाखाली पर्यायी सरकार स्थापन होईल असे त्यांना वाटत होते. परंतु सरकार स्थापनेसाठी नेता म्हणून सोनिया गांधी राष्ट्रपतींंकडे गेल्या व 'वी हॅव थू सेवंती थू' असा प्रसिद्ध दावा त्यांनी केला होता. जेव्हा भविष्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल तेव्हा सोनियाच पंतप्रधान होतील व आफली एखाद्या मंत्रीपदावर बोळवण होईल हे पवारांच्या लक्षात आल्याने संतापून ते बाहेर पडले होते. विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री/पंतप्रधान वेगळ्या व्यक्ती असण्याची कॉंग्रेसची परंपरा आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, परंतु विरोधात बसल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेता होते. परत सत्ता मिळाली असती तर विखे पाटील मुख्यमंत्री न होता पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले असते. हिमालय प्रदेशात सत्ता मिळाली की वीरभद्र सिंह मुख्यमंत्री होतात, परंतु विरोधात असताना विद्या स्टोक्स विरोधी पक्षनेता असायच्या. ही कॉंग्रेसी परंपरा पवार कसे विसरले याची कल्पना नाही. तात्पर्य - पवार कॉंग्रेस सोडण्यामागे फक्त स्वार्थ होता. ममता सुरूवातीपासून डाव्यांच्या विरोधात होत्या. १९८४ मध्ये डाव्यांविरोधात त्यांनी काढलेल्या एका मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्याने ११ कॉंग्रेस कार्यै मरण पावले होते. त्यामुळे ममतांचा संताप पराकोटीला पोहोचला होता. त्यांनी डाव्यांना सत्तेतून घालविण्याचा पण केला होता. या ११ कार्यकर्त्यांचा स्मृतिदिन ममता अजूनही पाळतात. १९८७ मध्ये वि. प्र. सिंह कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राजीव गांधींनी डाव्यांशी जमवून घ्यायला सुरूवात केली होती. त्यांनी ज्योती बसूंना पाठिंब्याची विनंती केली होती. नंतर आलेले नरसिंह राव सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर १९९३ पर्यंत तरले होते. १९९६ मध्ये देवेगौडा सरकारमध्ये इंंद्रजित गुप्ता व चतुरानन मिश्रा हे भाकपचे मंत्री होते व या सरकारला डावे व कॉंग्रेसचा पाठिंबा होता. डावे व कॉंग्रेसचे एकमेकांना होणारे सहकार्य ममतांना मान्य नव्हते. परीणामी त्या कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या. तात्पर्य - ममता कॉंग्रेस सोडण्यामागे निव्वळ स्वार्थ नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

नंतर आलेले नरसिंह राव सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर १९९३ पर्यंत तरले होते.
हे कशावरून? उलट १९९१ मध्ये मनमोहनसिंगांनी देश विकायला काढला आहे, ते आय.एम.एफ चे एजंट आहेत वगैरे गोष्टी बोलण्यात डावे आणि समाजवादी सगळ्यात पुढे होते. किंबहुना अयोध्या प्रकरण तापायला लागण्यापूर्वी भाजप तोंडदेखल्या सरकारला विरोध करत असला तरी विशेषतः आर्थिक धोरणांवर भाजपचे नरसिंहराव सरकारला सहकार्य होते. पण डाव्यांचा नरसिंह राव सरकारला विरोध होता.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

डाव्यांचा आर्थिक सुधारणांना विरोध होता तरी विरोधामुळे त्यांनी नरसिंह राव सरकार तुटेपर्यंत ताणले नव्हते, कारण भाजप त्यांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू होता व राव सरकार पडल्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होईल हे त्यांना समजत होते. १९९२ मध्ये कॉंग्रेसच्या शंकर दयाळ शर्मांना त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. १९९२ मधील बाबरी प्रकरण, १९९२ मधील हर्षद मेहता प्रकरण इ. प्रकरणात त्यांनी नरसिंह राव सरकारवर खूप टीका केली होती परंतु त्यांनी सरकार पडून दिले नव्हते. सरकारला धारेवर धरणे परंतु भाजपला फायदा होऊ नये यासाठी सरकार पडू न देणे अशी त्यांची जुलै १९९३ पर्यंत भूमिका होती. शेवटी जुलै १९९३ मध्ये त्यांनी नरसिंह राव सरकार विरूद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. परंतु जनता दल व झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष फोडून नरसिंह रावांनी सरकार वाचविले होते. साधारणपणे २००४ ते २००८ या काळात त्यांची अशीच भूमिका होती. शेवटी २००८ मध्ये त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर सरकार विरोधात मतदान केले. परंतु समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवून मनमोहन सिंगांनी सरकार वाचविले होते.

In reply to by चौकटराजा

तांत्रिकदृष्ट्या त्यांना काढले होते. परंतु काढले नसते तरी त्यांना व त्यांच्या समर्थकांंना राष्ट्रीय पातळीवर व राज्यातही अडगळीत फेकून दिले असते व त्यामुळे त्यांना समर्थकांना बरोबर घेऊन बाहेर पडावेच लागले असते.

In reply to by श्रीगुरुजी

परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली व १९९८ ची लोकसभा निवडणुक भाजपशी युती करून लढविली होती. त्यात तृणमूलचे ७ व भाजपचा १ खासदार निवडून आला होता. >>>>> म्हणजे टी एम सी आणि भा ज पा चे होतं तर

In reply to by स्वलिखित

१९९९ ची लोकसभा निवडणुक सुद्धा भाजप व तृणमूलने एकत्र लढून अनुक्रमे २ व ९ जागा जिंकल्या होत्या.

“निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झाला हिंसाचार; २४ तासांत ९ जणांचा मृत्यू” https://www.loksatta.com/desh-videsh-news/violence-erupted-in-west-beng… ये तो होना ही था

थोडक्यात दीदी वर्सेस मोदी असा सरळ सामना बंगालमधे झाला आणि कॉंग्रेसने मानच टाकल्याने भाजपा मतांच्या विभाजनाची इतर राज्यात वापरलेली हुकमी किमया साधु शकला नाही आणि ही बाबा दीदींच्या पथ्यावर पडली. ३ वरुन ८०+ झाले म्हणुन खुष व्हायचं की २०० म्हणता म्हणता शंभरीही गाठता आली नाही ही बाब दुख्खः समजायचं याचा निर्णय ग्लास आर्धा भरलेला समजावा की रिकामा याइतकाच कठीण असला तरी लांबपल्याचा विचार केल्यास निराशादायक नक्किच नाही.

In reply to by गॉडजिला

लांबपल्याचा विचार केल्यास निराशादायक नक्किच नाही. सहमत... लांब रेस चा घोडा ... २०० च्या वर हे जरा भीत भीतच म्हणले असतील... गड आधी आला नाही .. आता कुठे वेसण बसली आहे ... पण अंधविरोधी आता "दीदी फॉर दिल्ली" वैगरे बर्ळतीलच बाकी अजूनही बंगाली बाबुंचे काही कळत नाही.... इतर भारतातात एखादा मतदार काँग्रेस -भाजप / आणि स्थानिक असा बदल करेल तर त्यात आश्चर्य नाही .. पण बंगाली बाबू खरंच तिथे कम्युनिस्ट आणि एकदम भाजप अशी कोलांटी कशी मारतो ? दोन टोके

दीदींच्या शांतताप्रिय समर्थकांनी जिंकण्याच्या उन्मादात अपेक्षेप्रमाणे हल्ले आणि जाळ पोळ सुरू केली आहे. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. www.indiatvnews.com/elections/news-bengal-post-poll-violence-tmc-bjp-ma… रात्रंदिवस मोदिंच्या नावाने रडणारे इथले महाभाग ज्यांना दिदीचे खूप कौतुक होते ते सोइस्कररीत्या मौन धारण करतील. कोरोनासाठी मोदींना जबाबदार ठरवणारे आता या tmc च्या उन्मादी समर्थकांच्या नाकावर मास्क आहे का हे चेक करतील का.

In reply to by यश राज

असा कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अलिखित नियम आहे ... निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली आणि सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली आणि हिंदू माणसाला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी, अब्दुल सत्तार यांनी दिली, तरी अशावेळी हे पक्ष गप्पच बसतात .... अगदीच काही वाटले तर, थोडा फार निषेध व्यक्त करतात ....

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही बातमी वाचली काय. मला ते पान सापडले नाही. की तुम्हाला बातमी न वाचताच त्यामध्ये काय लिहिले आहे ते दिसले?

In reply to by आजानुकर्ण

अनंत करमुसे मारहाण https://www.dainikprabhat.com/anant-karamuse-assault-case-when-was-jite… ..... https://www.esakal.com/mumbai/jitendra-awhad-3-bodyguard-policemen-arre… ------------ निवृत्त नौसैनिकाला मारहाण https://www.google.com/amp/s/www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/b… ----------- अब्दुल सत्तार यांनी दिलेली धमकी https://m.lokmat.com/politics/shiv-sena-minister-abdul-sattar-video-vir… -------- थोडं गुगलला विचारलेत तर, ह्या प्रकरणांच्या बाबतीत, बरेच काही मिळेल.....

In reply to by यश राज

बंगाल मध्ये फार पूर्वीपासून कम्युनिस्ट सरकारे आणि विचारसरणीचा प्रभाव होता. कम्युनिस्ट विचारसरणी ( रक्तरंजित क्रांती इ इ) सरळ सरळ हिंसाचाराचे समर्थन करते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने सुद्धा कम्युनिस्टांना विरोध करताना हिंसाचाराचा मार्ग सर्रास चोखाळला होता. त्याचीच फळे इथे दिसत आहेत. हीच स्थिती केरळ मध्ये आहे. तेथे भाजप किंवा रा स्व संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या होताना दिसते. भाजपाला या स्थितीतूनच पुढे जायचे आहे. याच कम्युनिस्ट विचारसरणी मुळे बंगालमध्ये उद्योगधंद्याची अपरिमित हानी झाली आणि बंगालची आर्थिक स्थिती खालावत गेली इतकी कि १९६० मध्ये डॉ बिधान चंद्र रॉय असताना तिसऱ्या क्रमांकावर असणारे हे राज्य आता १७ व्या स्थानावर पोचले आहे. मा माटी आणि मानुष चा उदो उदो करताना दीदी नि उद्योगांचे उच्चाटन केले आहे. त्यामुळे जर आपले आर्थिक धोरण सुधारले नाही तर ( अमित मित्र सारखा फिक्की चा अध्यक्ष घेऊनही काही फरक झाला नाही) येणार काळ तेथील जनतेला अजूनच वाईट असणारे

In reply to by सुबोध खरे

आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. पुनावालाला शिवसेनेने धमकी दिल्यानंतर (आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राला प्राधान्याने लस मिळावी अशी भूमिका ठेवल्यानंतर) आता सिरम ने आपला पुढचा प्रकल्प गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक वगैरे ठिकाणी हलवला तर नवल वाटणार नाही. मग हे बोंबलतीलच प्रकल्प पळवला म्हणून. नतद्रष्ट अडाणी आणि झोपडपट्टी सरकार आहे हे.

In reply to by पिनाक

ती बिचारी गरीब माणसे असतात. मिळाल्या पैशाला जागणारी. त्यानी पैशासाठी फक्त काम केलेले असते.. त्यान्ची झोपडपट्टिमधुन बाहेर पडायची इछ्चा असते. ही राजकिया माणसे नतद्र्ष्ट आहेत. याना समाधान नसते. कोणत्याही थराला जातात. याना झोपडपट्या टिकायला किवा वाढायला हव्या असतात.

In reply to by सुखीमाणूस

कुठलीही गोष्ट मोफत मिळणे ही जी मानसिकता आहे ती कितपत चांगली आहे? तुम्ही म्हणता तसे लोकही असतील, पण शहरातली prime land गिळंकृत करणे, त्यावर पक्की घरे बनवणे, शासन दुसरीकडे जागा देत असतानाही झोपड्या न सोडणे इत्यादी प्रकारच बहुसंख्येने असतात. गुन्हेगारी जास्त असते. स्वच्छतेचा बोर्या वाजलेला असतो. पक्ष यांना निवडणुकीपूरते वापरतात. शहरांना काही सौंदर्य वगैरे हवे की नको? सतत कुठून तरी लोक शहरात येत राहतात आणि झोपडपट्ट्या वाढत जातात. जे कर भरतात आणि जागा खरेदी करून रहातात त्या नागरिकांना शहरात झोपडपट्टी नको, गुन्हेगारी नको वगैरे म्हणण्याचा अधिकारच ठेवला गेला नाहीये. तुम्ही आयुष्यभर कष्ट करून फ्लॅट विकत घेणे हे जेव्हा नागरिक करत असतात तेव्हा दुसरे कुणी तरी शहरातली prime land बळकावून रहाणे हेही होत असते. त्या मानसिकतेला दुसरा काय शब्द आहे मला माहित नाही.

In reply to by पिनाक

आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. शिवसेना नोव्हेंबर २०१९ पासून अशी आहे का आधीपासूनच अशी आहे? आधीपासूनच असेल तर साधारणपणे केव्हापासून अशी आहे?

In reply to by श्रीगुरुजी

पूर्वी पासूनच शिवसेनेची प्रतिमा तशीच आहे. फक्त त्यांचे पहिले सरकार असताना निदान सुशिक्षित लोक तरी त्यांच्याकडे होते. मनोहर जोशी, नवलकर इत्यादी. आता आहेत संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम आणि तत्सम. संपादित

नंदीग्राम मध्ये EVM चा विजय >>> बन्गाल, तामिळनाडु व केरळ मधे भाजपाचा पराभव होऊन सुद्धा अजून काहीजण EVMवर अविश्वास दाखवत आहेत हे वाचून आश्चर्य वाटले.

In reply to by दिगोचि

नंदीग्राम मध्ये EVM चा विजय
हा प्रतिसाद मीच sarcastically लिहिला होता . ममता बानूच्यां पार्टीचा इतर ठिकाणी दणाणून विजय झाला तो पक्षाच्या मेहनतीने पण नंदीग्राम मध्ये ममता हरली तो केवळ EVM मुळे असे मला म्हणायचे होते.

असा नेता असल्यास पक्ष खड्ड्यातच जाणार.

In reply to by पिनाक

या माणसाचा खरंच आय क्यू तपासून पहिला पाहिजे ! पूर्वी असे म्हणत की लतादीदींच्या स्वरयंत्राचा शास्त्रोक्त अभ्यास होणार आहे तसाच राहुल गांधी यांच्या मेंदूचा झाला पाहिजे !

In reply to by श्रीगुरुजी

आपल्या परसदारी काय जळतंय ते दिसत नाही कि काय ह्यांना ! आता बहुतेक चिंतनास कांचन बुरी किंवा पताया ला जातील

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची अवस्था Ipl चीयर्स गर्ल्स सारखी झाली आहे. चौका, छक्का कोणीही मारो, यांना नाचावे लागते.

निवडणूक आणि निकाल follow केले नाही. थोडेफार न्यूज माहिती आहे पण जास्त नाही.. तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले.. पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत? आणि ५०% जरी ते असे लोक असतील तर भाजपा ने हि पाठ बडवून घेण्यात अर्थ आहे का? असो..

In reply to by मुक्त विहारि

हिंदू हा प्रश्नच नाहीये.. तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही.. हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का? आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का? सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही.. बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले.. यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..

In reply to by गणेशा

मग काहीच बोलण्यात अर्थ नाही ..... राम मंदिराला विरोध करणारी कॉंग्रेस, आमच्या सारख्या हिंदूंना तरी पसंत नाही.... बाय द वे, तृणमुल कॉंग्रेसने भाजपच्या लोकांवर हल्ला केला, त्याबद्दल आपले मत काय आहे?

In reply to by मुक्त विहारि

हल्ला हा तृनमूल च्या लोकांनी केला असेल तर त्यांचा निषेध आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाही झालीच पाहिजे.. माझे मत हे पक्ष बदलून नक्कीच बदलत नाही.. आणि राजकारणी म्हणजे आपले बाप नाहीत कि त्यांचा पाठपुरवठा करायला.. जेल मध्ये टाकून बडवले पाहिजे जे हिंसा पसरावतात, बलात्कार करणार्यांना सोडवतात.. आणि बरेच.. - बाकी या देशाचे सगळे जाती धर्मीय भारतीय आहेत.. यात हिंदू मुस्लिम.. ब्राह्मण.. ब्राम्हानेतर.. मराठा -माळी असले जात, पात धर्म उराशी बाळागून त्याप्रमाणे वागणाऱ्यांची मला किव येते.. असो..

In reply to by गणेशा

पाकिस्तान आणि बांगलादेश यांची फाळणी का झाली? हे वाचले आहे का? टिपू सुलतान, हैदर अली, मलिक अंबर, रझाकार याबद्दल काहीही वाचलेले नाही, हे नक्की .... अगदीच काही नाही जमले तरी कुराण नक्की वाचा. त्यात काफिरांच्या बाबतीत काय केले पाहिजे? हे सांगीतले आहे. आणि तेही नाही जमले तर, रोहिंग्या मुसलमानांना देश का सोडावा लागला? पाकिस्तान आणि बांगलादेश मधले हिंदू अचानक कमी कसे होत आहेत? हे पण वाचा आसाम मध्ये हिंदू लोकांना काय भोगावे लागत आहे, हे पण वाचा काश्मिरी पंडितांच्या बद्दल, एका मिपाकराने लिहिले आहे, तो पण लेख जरूर वाचा .....

In reply to by मुक्त विहारि

बंगाल या धाग्यावर तुम्ही म्हणता कि कुराण वाचलं कि उदारमत वितळून जाते. उदारमत वितळून गेल्यावर माणसाच्या वर्तनात काय फरक पडतो ?

In reply to by मुक्त विहारि

अरेच्चा, सरळ उत्तर द्या की. मी एक व्यक्ती म्हणून, उदारमतवाद वितळल्यावर काय करायचे ? जपान आणि उत्तर कोरिया मधले काय करायचे आपण उदारमतवाद वितळल्यावर ?

In reply to by मुक्त विहारि

जग तिकडे कसे हि नाचत असले तरी मानवतावाद हा मी आदर्श मानतो.. एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार.. मानवता, समाजिक भावना ह्या माणसाच्या माणुसकीच्या खुणा आहेत.. राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठीराखे नेमके ह्या विरुद्ध वागतात.. कारण त्यांना फुट पाडून राज्य करायचे असते.. अरे असेल हिम्मत तर विकास आणि उन्नती वर राज्य करावे मग हिंदू तितुका फलाना न म्हणता.. भारतीय समाज म्हणणे योग्य होईल.. आणि सगळे बरोबर येतील.. आणि काही वाचायची गरज काय? मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यात राहतोय.. आणि त्यांचा इतिहास मला नक्कीच माहिती आहे.. असो.. स्वराज्य आणि सुराज्य ह्या दोन्हीची सांगड फक्त तेथे.. बाकी फोडा आणि राज्य करा हि नीती म्हणजे हिंदू एकत्रिकरण म्हणणे म्हणजे जाती पाती धर्म यांचा अवडंबर मानणे होय.. आणि मग किती हि वाचन करा ह्या भेदाच्या भिंती कधीच मिटत नाही...

In reply to by गणेशा

फाळणीच्या सुमारास, पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदूंचे होते... असेच विचार, इराण मधील, पारशी लोकांचे होते ... इतिहासातून कधीच काहीही धडा न घेणे, हे हिंदू लोकांनाच जमते ...

In reply to by मुक्त विहारि

फाळणीला काय झाले, यावरून bjp हिंदू चा आहे म्हणुन त्याला मत द्यायचे? फाळनीच्या वेळेस माझ्या सारख्या विचार असणाऱ्यांनी इतर धर्मीय लोकांना काही नसेल केले.. पण तुमच्या सारख्या धर्मात बुडालेल्यानी कत्तली केल्या असतील... आणि अखंड हिंदुस्थान च्या घोषणा तुम्हाला प्रिय आहेत? अखंड हिंदुस्थान म्हणजे फक्त जमीन का त्यावर राहणारी लोक सुद्धा? अवघड आहे..एक तर जात, धर्म असले माणून तसे वागणे चूक आणि त्यात तुम्ही त्याचा सरळ पाठपुरवठा करून हे वाचले का.. हे माहिती का विचारता.. मग पाकिस्तान मधील धर्माच्या नावा खाली तयार केले जाणारे दहशतवादी आणि तुमच्या विचारात असा काय फरक आहे..? आणि काय काय वाचायचे पुढचा भाग आहे.. वाचन माणसाच्या विचाराला सुधरवत असते... जर वाचनविचार सुधारवण्या पेक्षा फक्त ते बदलवत असेल तर त्या वाचनाला तरी काय अर्थ आहे?

In reply to by गणेशा

गणेशाजी विशीष्ठ लोकांच्या दंगली कोणत्या पक्षाने किती वेळा ठेचल्या याचा विदा तुमच्याकडे आहे का ?

In reply to by गणेशा

मी पण काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच विचार करत होतो. माझ्या अनुभवांनी मला बदलले. माझ्यासारखे अनेक हिंदू असतील जे proactively नव्हे तर reactively भाजपच्या बाजूला मत टाकत आहेत. असे का बरे झाले असेल नेमके? तुमचे काय मत आहे याबाबत?

In reply to by आनन्दा

आनंदा, हा रिप्लाय तुम्हाला देतोय पण नंतरचे प्रश्न सर्वांसाठी आहे.. अनुभव तुमचे...विचार तुमचे बदलले.. आणि तुम्ही असे का झाले असेल? हा प्रश्न मला विचारता आहात.. कोणी bjp ला किंवा काँग्रेस ला वोट दिल्याने तो वाईट किंवा मूर्ख ठरत नाही.. त्याला जे योग्य वाटते ते चांगलेच असेल..तुम्ही मी काही वाईट नाही.. पण जेंव्हा बोलण्यात मोदी, bjp येते तेंव्हा हिंदू आणि मुस्लिम यावरच गाडी येऊन थांबते.. मी जर मोदींना मत देत असतो आणि त्यांचा पुरस्कार करत असतो, तर मी जाहीर म्हणालो असतो की हिंदू ना बळ मिळावे म्हणुन मोदींना मी वोट देतो.. बाकी party with differance.., पर्याय नाही.. अच्छे दिन.. देशाची अवस्था हे सगळे मी बघत नाही.. पण मोदी आणि bjp म्हणजे यांव त्यांव पण करायचे.. आणि हिंदू एकीकरण पण म्हणायचे.. अवघड आहे.. जे आहे ते तरी स्पष्टच असावे...

In reply to by गणेशा

पण जेंव्हा बोलण्यात मोदी, bjp येते तेंव्हा हिंदू आणि मुस्लिम यावरच गाडी येऊन थांबते.. याला काराणे - हे नेहमी आधी कोण काढते ते बघणे महत्वाचे आहे ... - भाजप आलं एम्हणजे आता मुस्लिमांची कत्तल हा चुकीचा आणि अतिशय नालायक असा केला गेलेला प्रचार - देश हित साठी काह्ही केलं कि ते म्हणजे हिंदुत्ववकडे वाटचाल असा खोटा प्रचार इंदिरा गांधींनी जे देशासाठी ७१ साली केले तसे जर या सरकारने काही केले तर ते मात्र "हिंदुत्वासाठी केलं" असा ढोंगी प्रचार .. कमालिचा भाजप द्वेष ( भाजपला साथ देणारा सुद्धा म्हणेल कि काँग्रेस सारखा राष्ट्रीय जुना पक्ष अगदीच विरून जाऊ नये ... पण तेच तुम्ही डाव्या आणि काँग्रेसनं विचारआ . त्यांचं मते भाजप अस्तत्वातच असू नये सत्ता तर दूर एवढा कमालीचा द्वेष )

In reply to by चौकस२१२

येथे हिंदू आणि मुस्लिम कोणी सुरु केले हे तरी बघा.. माझा सवाल होता ३ चे ७७ झाले चांगली गोष्ट आहे.. पण यात मूळचे भाजपाचे किती.. यात वावगे असे काही नाही.. कोणी तरी लिंक दिली कि ४ जण tmc चे आहेत फक्त.. जर तसे असेल तर चांगले आहे.. भाजप वाढतोय.. तसे नसेल तर त्यांनी हि पाठ थोपटण्यात अर्थ नाही.. -- १
.हे नेहमी आधी कोण काढते ते बघणे महत्वाचे आहे
येथे हिंदू. मुस्लिम कोणी सुरु केले? ह्याचे उत्तर वरती मिळेलच..मुवि हे पहिले होते.. मग काय करणार आता? २.
भाजप आलं एम्हणजे आता मुस्लिमांची कत्तल हा चुकीचा आणि अतिशय नालायक असा केला गेलेला प्रचार
बरोबर, राजकारणी आणि त्यांचे पक्ष हे कोणत्या जातीच्या विरुद्ध आहेत हे पसरवने चुकीचेच आहे.. असे कोणी पसरवत असेल तर त्या पक्षाच्या लोकांनी, त्यांच्या संघटनांनी तशी त्या विरुद्ध न्यायालयात रीतसर कारवाही करावी.. पण त्याच वेळेस त्यांनी आपण कोणत्या तरी धर्मासाठी लढतोय.. वगैरे सुद्धा बोलू नये.. ३.
कमालिचा भाजप द्वेष
काँग्रेस मुक्त भारत हा विचार भाजपाच आहे.. या आधी भाजप मुक्त देश कोणी म्हणाले हि नव्हते.. द्वेष हा पक्षा वर नसावा..द्वेष हा त्या त्या वेळी अवलंबलेल्या त्यांच्या नीती वर किंवा कार्यावर असावा.. जे चूक ते चूक.. जे बरोबर ते बरोबर.. -- येथील चर्चा हिंदू मुस्लिम कशी चालू झाली ते आपण पाहणार नाही आणि इतर उदाहरणे दिल्यास त्याचा काय अर्थ आहे? असो..

In reply to by गणेशा

https://en.wikipedia.org/wiki/Azad_Maidan_riots हा २०१२ सालचा इतिहास आहे फार दुरचा नाही. जगभरात मुस्लीम धार्मिकता धोकादायक ठरते आहे म्हणुन तरी सावध रहायला हवे. https://en.wikipedia.org/wiki/Bengali_Muslims

In reply to by सुखीमाणूस

कोरोनाने लाखो लोक ( सर्व धर्माचे ) मृत्युमुखी पडत आहेत ते केंद्र सरकारला दिसत नाही का? हिंदू हिंदू करून सगळ्यांनाच संकटात टाकलेय ह्या अडाण्यांने .

In reply to by आग्या१९९०

काय संबध आहे या धाग्याशी ? मुस्लिम धर्मांधता संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरत आहे सध्या. बंगालमधे हिंदूच्या कत्तली सुरु आहेत व महाराष्ट्रात पोलीसांची धुलाई सुरु आहे दिवसाढवळ्या. या धुलाई करणार्‍यांपैकी एकाला तरी अटक केल्याची बातमी आहे का कोणाकडे ?

In reply to by प्रसाद_१९८२

संबंध तर मुस्लिम धर्मांधतेचा तरी कुठाय या धाग्याशी ? तरी काढलाच की तुम्ही आणि मुक्त विहारींनी विषय. धागा आहे- विधानसभा निवडणुकींचा.

In reply to by कॉमी

निवडणूक झाल्या नंतर, भाजप कार्यकर्त्यांच्या वर झालेले हल्ले हेच दाखवत आहेत.... अजूनही काही दाखले हवे असतील तर, Youtube वर काही व्हिडियो आहेत, ते बघा ....

In reply to by मुक्त विहारि

भाजप म्हणजे हिंदू धर्म आहे की काय ? राजकीय हाणामारी बंगालमध्ये जुनी आहे. आणि TMC पण अर्थात दोषी आहे, शंकाच नाही. त्यांनी ना हिंसा रोखण्याचा प्रयत्न केला ना निषेध केला, आणि तिथेही केंद्रावर दोष मढण्याचा प्रयत्न केला. पण, इथे हिंदू धर्मावर हल्ला ही थाप आहे. TMC सुद्धा हिंदू बहुसंख्य पक्ष आहे. TMC मधल्या प्रिस्युमेबली (निदान काही) हिंदू गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. जिथे तिथे धार्मिक ट्विस्ट देणे भाजपाचा USP आहे. काय आधार आहे सांगा तुमच्या म्हणण्याला. आणि माझा मुद्दा अवांतर बाबत होता.

In reply to by गणेशा

मानवतावाद हा मी आदर्श मानतो.. अहो सगळेच मानतात हो ... त्यात काय ! कोणाला हिंदुराष्ट्र कर्यायाचे नाहीये ... भाजप ला मत देणारे पण या गोष्टीतील तयार नाहोये ना कोणाला अफगाणिस्तान पासून बंगाल पर्यंत "अखंड भारत" करण्याचे वेध लागलेत अनेकांना या "गांधीगिरी " आणि टायपेक्षा हि वाईट म्हणजे "काँग्रेसी फसवेगिरी आणि दाव्याचा "शातिर " पण याचा प्रथम उबग आणि चीड आली आहे आणि धर्मावर आणि जातवार राजकारण करतो म्हणतात तर काँग्रेस ने एवढे वर्षे काय केला? आणि राष्ट्रवादी काय करतात ? जाता जाता एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार.. आपण म्हणता ते बरोबर मग हे हि ऐका बहुतेक मांसाहारी हिंदू हलाल पद्धतीचे खायला नाही म्हणणार नाही .. एक मुस्लिम दाखवा जो झटका पद्धतीचे मास खायला तयार होईल एकतरी .. पळपुटा उत्तरे नकोत .. जर माझा हिंदू धर्म मुसलमानाच्या हातचे खाल्याने बुडत नाही तर त्याला उलटे का वाटतेय ? होऊनच जाऊद्या सर्वधर्म समभाव आता प्रश्न "व्ययक्तिक वैगरे काही नाही " रोख ठोक