पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in राजकारण
3 May 2021 - 11:11 am

आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषानुवर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.

देशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता ? आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून टाकलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.

जनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.

जगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.

भारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.

सध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.

भारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का ? वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.

सध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.

नाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही नेत्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि 'गीरे भी तो टांग उपर'करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू...!

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

4 May 2021 - 11:45 am | सुबोध खरे

Ad hoc पद्धतीनेच चालू आहे.

हायला

३७०, तीन तलाक, राम मंदिर, नागरिकत्व विधेयक, उडी, बालाकोट हे सर्व ad hoc पद्धतीने आहे काय?

जाता जाता-- ad hoc चा शब्दश:अर्थ काय हो?

आग्या१९९०'s picture

7 May 2021 - 5:03 pm | आग्या१९९०

नोटबंदी, जिएसटी आणि आता कोविड लसीकरण ऑक्सिजन पुरवठा सगळ्याच ठीकाणी नियोजनाचा अभाव. केंद्र हे फक्त मलमपट्टी सरकार आहे.

मुक्त विहारि's picture

7 May 2021 - 5:21 pm | मुक्त विहारि

नोटाबंदी त्रास, धनदांडग्या मंडळींना झाला...

जीएसटी, जकात नाके मोकळे झाले...

कोविडच्या बाबतीत.....

बेडस् ची कमतरता, ऑक्सीजनची कमतरता, अपूरा स्टाफ ही सगळी राज्य सरकारची बेजबाबदारी आहे ....

भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लस उत्पादन करणे, कठीण काम आहे...

विनायक प्रभू's picture

3 May 2021 - 1:50 pm | विनायक प्रभू

महाराष्ट्र राज्यात काहीही त्रास नाही. औल इज वेल.
अफवा पसरवू नयेत. औल ला वाईड वाटेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2021 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, पण उद्या समजा, निवडून आलेल्या भाजपच्या लोकसभेतील प्रतिनिधींनी समजूतीने नेता निवडायचा ठरवला तर,
आणि समजा पक्षातील एखादा बंड करुन उठला तर ( तशी शक्यता वाटत नाही) जनतेसाठी कोणी रिस्क घेणार नाही.
पण, आदरणीय मोंदीऐवजी पक्षातील दुस-या कोणा सहका-याला संधी दिली पाहिजे, नवा चेहरा आला पाहिजे असे वाटले.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 11:56 am | चौकस२१२

पक्षातील दुस-या कोणा सहका-याला संधी दिली पाहिजे,
ते भाजपात "अंतर्गत लोकशाही नामक" गोष्ट असल्यामुळे ते ठरवतील शिवाय साथ दयायला लांब पल्याचा "घोडा" म्हणजे राष्ट्रीय संघ आहेच कि
इतरांनी काळजी करू नये .. "दिल्ली मे दीदी" या गाण्याची घरी बसून तालीम करावी ( मला आता या घोषणेच पेटंट घेतले पाहिजे )

अमर विश्वास's picture

4 May 2021 - 12:45 pm | अमर विश्वास

अहो तो खेजरी यांचा मसीहा होताना ?
आता दीदी त्यांच्या पत्ता कट करणार वाटत ...

बघा हं ... असं पेटंट घेतलत तर तो राघव आणि अतिशा चवताळून अंगावर येतील

सुबोध खरे's picture

4 May 2021 - 7:17 pm | सुबोध खरे

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कशाला आपला द्वेष इतका उघड करताय?

भरपूर खासदार केवळ मोदींच्या नावावर निवडून आले आहेत असे अनेक विरोधी पक्ष म्हणतातच ना

मग तेच खासदार श्री मोदींना विरोध कसा करणार हो?

त्यातून श्री मोदी हे रा स्व संघातून आले आहेत तेंव्हा आपल्याला अत्यंत प्रिय अन लाडक्या संघाचा त्यांना असलेला पाठिंबा काढल्याशिवाय असे होणे नाही.

त्यातून राजनाथ सिंह, गडकरी, फडणवीस, शिवराज सिंह चौहान सारखे लोक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत. ते विरोध करणे शक्य नाहीच.( संघात अशी परंपरा नाहीच)

राहता राहिले कोण योगी आदित्यनाथ

पहा तुम्हाला झेपतील का?

नंतर म्हणाल श्री मोदीच कसे योग्य होते ते.

बापूसाहेब's picture

4 May 2021 - 9:36 pm | बापूसाहेब

भरपूर खासदार केवळ मोदींच्या नावावर निवडून आले आहेत असे अनेक विरोधी पक्ष म्हणतातच ना

शेनेचे सर्व शेणिक पण मोदींच्या नावावर निवडून आलेले आहेत.. !!!

बाकी मोदींना बाजुला सारून इतर कोणाला पप्र करा म्हणणारे योगी आणि शहा यांना ती जबाबदारी द्या म्हणतायेत..

तुम्हाला त्या दोघांची कार्यपद्धती विशेषतः योगी आदित्यनाथ यांची कार्यपद्धती सोसणार नाही हो...

विनायक प्रभू's picture

3 May 2021 - 1:51 pm | विनायक प्रभू

महाराष्ट्र राज्यात काहीही त्रास नाही. औल इज वेल.
अफवा पसरवू नयेत. औल ला वाईड वाटेल.

मोदींचे नेतृत्व बदलण्याची वेळ आली तर भाजपाने अमित शहांना पंतप्रधान करावे.

मोदींचे नेतृत्व बदलण्याची वेळ आली तर भाजपाने अमित शहांना पंतप्रधान करावे.

हाहा.. मग हे त्यांच्या नावाने सुद्धापुन्हा नवीन जिलेबी पडतील..

ह्या लोकांचे असेच आहे. जेव्हा काहीच नव्हते तेव्हा वाजपेयी चांगलें व्यक्ती होतें.. वाजपेयी पंप्र झाल्यावर अडवाणी चांगलें व्यक्ती होते.. अडवाणी पंत प्रधान व्हायला लागले की मोदी चांगलें होते.. मोदी झालेत तरं आता वाजपेयी च चांगलें होते..
एकंदरीत हे असं आहे. मुवि यांच्या भाषेत गोल गोल राणी..
उद्या शाह पंतप्रधान झाले की याच्यापकेशा मोदी चांगलें होते असे म्हणायला बसलेत हे.. !!

चंद्रसूर्यकुमार's picture

3 May 2021 - 2:36 pm | चंद्रसूर्यकुमार

हाहा.. मग हे त्यांच्या नावाने सुद्धापुन्हा नवीन जिलेबी पडतील..

जिलबी पाडणारे समाजवादी आहेत की नाही हे मला माहित नाही. नसावेत. पण समाजवादी लोकांची एक सवय असते. ती पुढे लिहितच आहे पण अमित शहा पंतप्रधान झाल्यास मोदी कित्ती कित्ती चांगले होते असे कोणी म्हणायला लागले तर तो समाजवादी असेल ही शक्यता बरीच जास्त. याचे एक कारण आहे.

समाजवाद्यांना सतत कोणाला तरी शिव्या घातल्याशिवाय अन्न गोड लागत नाही. हे लोक ३०-४० वर्षांपूर्वी टाटा बिरलांना शिव्या घालायचे आता अंबानी-अडानीला शिव्या घालत आहेत. हे तर काहीच नाही. समाजवाद्यांची दुसरी 'कातिल अदा' म्हणजे आधी ज्याला शिव्या घालायच्या तो माणूस कित्ती कित्ती चांगला होता हे दुसरा कोणी शिव्या घालायला मिळायला की जाणवते. एकेकाळी नेहरू पुरेसे समाजवादी नाहीत असे म्हणत त्यांना शिव्या घालणारे आता स्वतःला नेहरूव्हीअन म्हणवून घेतात. आपण प्राणपणाने आणीबाणीला कसा विरोध केला, आपल्यामुळे भारतातील लोकशाही कशी टिकली याचे श्रेय आपल्याकडे घेणारे लोक आता आणीबाणीत सामान्य लोकांना कसा त्रास नव्हता आणि ते कसे अनुशासन पर्व होते याचे गोडवे आता गात आहेत. पूर्वी टाटांना पण शिव्या घालणारे लोक आता टाटा सन्स आपला सगळा फायदा समाजासाठी कसा खर्च करते याचे गोडवे गातात. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना शिव्या घालणारे लोक आता ते कित्ती कित्ती चांगले होते अशा पंचारत्या ओवाळत आहेत.

एकूणच काय जग कितीही पुढे गेले तरी हे त्यांच्या भूमिकेतून बाहेर पडताना दिसत नाहीत आणि ती भूमिका म्हणजे सतत कोणालातरी शिव्या घालत राहायचे आणि शिव्या घालायला नवा माणूस मिळाला की पूर्वी ज्याला शिव्या घालायचो तो माणूस कित्ती कित्ती चांगला होता म्हणून नॉस्टॅलजीयाचे अश्रू ढाळायचे. असल्या लोकांना खूष करायला जो जातो त्याचा घात होतो.

आता एकच गोष्ट बघायची आहे की अमित शहा पंतप्रधान झाल्यावर मोदी कित्ती कित्ती चांगले होते आणि त्यानंतर योगी पंतप्रधान झाल्यावर मोदी आणि शहा कित्ती कित्ती चांगले होते अशी हळहळ व्यक्त करताना दिसावेत. आणि अंबानींपेक्षा मोठा कोणी उद्योगपती आला की अंबानी कित्ती कित्ती चांगले होते म्हणून अंबानींचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करू देत. अन्यथा असल्या लोकांना दिसेल तिथे आणि दिसेल त्या क्षणी दुर्लक्षित करावे.

बरोबर,माझंही हेच निरीक्षण आहे.
चांगल्याला चांगलं...योग्यला योग्य म्हणतच नाही.केवळ वाईट आणि चूक बोलतात.मागे मी असेच मत लिहील होत आमच्या ग्रुपमध्ये तर मला फिलोसाफर म्हणत पाकिस्तानला पाठवाव लागेल असे म्हणाले ..असो मी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे शिकले आहे.

शाम भागवत's picture

3 May 2021 - 4:57 pm | शाम भागवत

माझं निरिक्षण असं आहे की, हे समाजवादी ज्याला शिव्या घालतात तो नक्कीच चांगला माणूस असतो. त्याच्यापुढे समाजवाद्यांचे काही चालेनासे झालेले असते. त्यामुळे दुसर्‍या कोणितरी तो बदलावा अशी इच्छा धरणे एवढेच त्यांच्या हातात असते.
सर, जेव्हां जेव्हां मोदी नको म्हणतात तेव्हां तेव्हां मोदींच्या हातून नक्कीच काहीतरी मोठे कार्य झालेले असते.

पवार जेव्हां काय वाट्टेल ते झाले तरी पुढचा मुमं फडणवीस नको म्हणतात तेव्हां फडणविसांना मॅनेज करणे पवारांना जड जातंय हे लक्षात येते व फडणवीसच मुमं झाले पाहिजेत हे पटते.
त्यामुळे भावी पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या राजकारणातच अडकवून ठेवण्यासाठी फडणवीसांना महाराष्ट्रातच मुमं अथवा विरोधी पक्षनेते पदी ठेऊन त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणे ही मोदींची गरज बनते. (आपली पंप्र ची खूर्ची शाबूत राहीली पाहिजे ही मोदींची सर्वोच्च इच्छा असावी. 😀 )
तसेच हे सगळे ओळखल्यानेच गडकरी महाराष्ट्रात यायला नाखूष असावेत. 😂

मला अशी एक शंका पूर्वीच आली आहे की, मुलायम, मायावती व अखिलेश यांचेपासून पंप्र च्या खूर्चीला बाधा येऊ नये यासाठी या सगळ्यांना उप्र च्या राजकारणात अडकवून ठेवण्यासाठी योगींना केंद्रातून राज्यात पाठवले असावे व त्यांना स्वातंत्र्य दिले असावे.

ममतांना राज्यातच अडकवून ठेवण्यासाठी ८० भाजप आमदार असण्याचा फायदा मोदींना नक्कीच होईल असे वाटते.

थोडक्यात असे की,
मी, नेहमीच, सर कधी एकदा मोदींना नावे ठेवताहेत याची वाट पहात असतो.
😉
दुसरे निरिक्षण असे की,
१८८ अंतर्धान पावल्यापासून सरांवर खूप ताण येतो आहे. यास्तव १८९ या नंबर वर एखाद्याने जन्म घ्यायची वेळ जवळ आली आहे असे वाटते.
😁

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2021 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मी, नेहमीच, सर कधी एकदा मोदींना नावे ठेवताहेत याची वाट पहात असतो.
आपल्या कौतुकाने लिहिण्याचे बळ येते. आभार...! ;)

>>> १८८ अंतर्धान पावल्यापासून...
आत्ताच त्यांच्या आयडीला क्लिक करुन आलो ते गप्प का आहेत कोणास ठाऊक. त्यांना खरड़ करुन या म्हणतो इकडे...! ;)

-दिलीप बिरुटे

असल्या लोकांना दिसेल तिथे आणि दिसेल त्या क्षणी दुर्लक्षित करावे.

आचार्य अत्र्यांच्या भाषेत अशा लोकांना दिसेल तेथे जोड्याने मारावें

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2021 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदींचे नेतृत्व बदलण्याची वेळ आली तर भाजपाने अमित शहांना पंतप्रधान करावे.

नवा चेहरा, गप्पा मारणारा नसावा. आदरणीय विद्यमान पंतप्रधान यांच्या गप्पांचा वीट आला आहे. शहा सद्य विद्यमान पंतप्रधानांच्या पुढे आहेत असे वाटते. ऑक्सीजन शिवाय तडफडणारी माणसं, व्हॅक्सीनसाठी वणवण फिरणारी माणसं, दैनिकांमधुन जळणा-या प्रेतांच्या रांगा हे पाहुनही ज्यांना दु:ख होत नाही, अशी ही लोकं आहेत. नव्या चेह-याचा शोध याचसाठी की भारतीय जनतेचं दु:ख त्यांना समजले पाहिजे.

बंगालच्या निवडणूकीत'' देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शाह यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हात आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं.

आत्ता जनतेने बंगालमधे नाकारले आहे, विद्यमान गृहमंत्र्यांना आपण काय बोललो होतो एव्हाना त्याचा विसर पडला असेल. विद्यमान पंतप्रधानांच्या लबाडवृत्तीचं हे नवं व्हर्जन आहे, त्यामुळे हे काही करु शकतील असे वाटत नाही. बाकी, नेता नीवडीच्या बाबतीत आपल्या मताचा आदर आहे, फक्त आगीतून बाहेर पडलो आणि फुफाट्यात येऊन पडलो असे व्हायला नको. तरीही आपण म्हणता त्यासाठी नव्या जाणीवांसाठी विचार करणारे नवे चेहरे आणि नवे नेतृत्वांचा विचार व्हायलाच हवा.

-दिलीप बिरुटे

आत्ता जनतेने बंगालमधे नाकारले आहे,

खरोखरच हसायला आले राव सर, ३ जागांवरुन ७५ जागा हे जनतेने नाकारणे आहे का? मतांची टक्केवारीही वाढलेलीच आहे. कुठलाही पक्ष एकाच झटक्यात छप्परफाड जागा मिळवत नसतो, अपवाद दिल्लीसारख्या अत्यंत लहान राज्याचा. पक्ष रुजायला वेळ लागतोच. आता कुठे बंगालच्या मातीत भाजप रुजायला लागलाय, पुढची निवडणूक ममतांसाठी कठीण आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2021 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बंगालमधे भाजप नवीन नाही, त्यामुळे पक्ष नवीन आहे, रुजायला वेळ पाहिजे वगैरे हे मनाचं समाधान करणे आहे. आमचं सरकार बहुमताने येईल असे पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणाले होते. आणि ते आलं नाही म्हणजेच जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे, असा त्याचा अर्थ होतो. तीनाच्या कितीतरी पट्टीत जागा आल्या म्हणजे यश मिळालं असे म्हणत असाल तर आपल्या मताचा आदर आहेच.

केरळमधे राष्ट्रवादीचे एक की दोन उमेदवार निवडून आले तेही म्हणतील की केरळच्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. भरघोस पाठींबा दिला आहे. मागील वेळी त्यांची संख्या तीच होती याही वेळी तीच आहे. तर भाजपची एक जागा होती तीही गेली आहे. पराभव हा पराभवच असतो. त्यात रुजणे, आकडे, याला काही अर्थ नसतो.

-दिलीप बिरुटे

आमचं सरकार बहुमताने येईल असे पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणाले होते

ते तर सर्वच म्हणतात, निवडणूक लढताना, मतदान झाल्यावर सर्वच पक्षांचे नेते असा दावा करतातच, अगदी मा. राहुल गांधीही लोकसभेला तसे दावे करतच होते. कार्यकर्त्यांत जोश भरायला तितकं करावंच लागतं.

पराभव हा पराभवच असतो

तुम्ही म्हणता तसं ह्या पराभवामुळे मोदींना बदलावं हा तर्क लावल्यास सर्वच नेत्यांना (इतर पक्षांच्या) बदलावं लागेलंच कारण प्रत्येकाने कधी ना कधी पराभव खाल्लेलाच आहे. अगदी तुमच्या दिदीसुद्धा नंदीग्राम मधून पराभूत झाल्याच मग तर त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच कामा नये, दो मई, दिदी गयी हे मोदींचं वाक्य ममतांनी नंदीग्राममधून हारुन सिद्ध करुन दाखवलं.

बाकी आपल्याही मताचा आदर आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2021 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पराभवामुळे मोदींना बदलावं हा तर्क लावल्यास.....

मा.मोदींंच्या बंगालमधील पराभवामुळे नेतृत्व बदलावे असे म्हणत नाही, तर एकूण राष्ट्रहिताच्या दृष्टीने, त्यांच्या धोरणांमुळे, संकटाच्या काळात एक अपयशी पंतप्रधान बदलून नवा चेहरा नवे नेतृत्व आणने गरजेचे आहे, हा मुळ विषय आहे. असे पक्षातील नवे नेतृत्व जे की सध्याच्या संकटकाळात जनतेला तारण्याचा प्रयत्न करतील. म्हणून प्रतिसादात उल्लेख आला तो गृहमंत्री यांचा, ते एक पुढे पंतप्रधान म्हणून येतील असे होते. पण गप्पांच्या -फेकाफेकीच्या बाबतीत तेही काही कमी नाही म्हणून निवडणूकीच्या काळातील त्यांच्या संदर्भांचा उल्लेख करावा लागला.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

3 May 2021 - 4:41 pm | प्रचेतस

हेच नेतृत्व सध्याच्या परिस्थितीत तारुन नेईल असा ठाम विश्वास आहे.

हाच नियम महाराष्ट्राला लावा ना सर.
अधिक कशाला बोलू

खरोखरच हसायला आले राव सर, ३ जागांवरुन ७५ जागा ....
अहो कसली भलतीच अपेक्षा ठेवता तुम्ही प्रचेतस साहेब?
एकवेळ मी., डॉक्टर खरे किंवा गुर्जी सारखे अंध मोदी भक्त सुद्धा म्हणतील कि शरद पवारांनी २-४ गोष्टी चांगलया केलया म्हणून! किंवा ओवेसी तसा बरा आहे ! पण ह्यांच्या कडून "भाजपने काही कमावले आहे अशी दखल मिळविणे ! अशक्य ..
सतत नकारात्मक जिलब्या पाडायचे एवढेच ह्यांना जमते सुरवात मात्र "आदरणीय पंतप्रधान वैगरे"
आणि "मोदींना बदला अशी जागतिक मोहीम " यांनी सुरु केली आहे तेवहा ३ चे ७७ झाले असल्या फालतू घटनेकडे कोण लक्ष देणार ...

श्रीगुरुजी's picture

5 May 2021 - 2:56 pm | श्रीगुरुजी

गुर्जी सारखे अंध मोदी भक्त सुद्धा

माझ्याबद्दल लिहिलंय का?

चौकस२१२'s picture

5 May 2021 - 4:27 pm | चौकस२१२

हो पण ते तुमच्यावर आरोप करण्यासाठी नाही ... प्रोफेश्वरांना उद्देशून उपहासाने लिहिले होते ( असे अध्यहृत धरून कि आपण, मी डॉ खरे वैग्रे यांना काही मंडळी कदाचित अंध भक्त संबोधित असतील,,, आपण तसे आहात असे म्हणणे नाही -- संदर्भ लक्षात घ्या ) अर्थ असा कि अगदी मोदी अंध भक्त सुद्धा विरोधी पवार किंवा ओवेसी नच्य एखाद्या गुणाला मान्य करतील पण केवळ विरोधी लेखाचा रतीब घालणारे प्राध्यापक एकदाही "भाजपने काहीतरी बरे केले" म्हणण्याची दानत ठेवणार नाहीत .... असो तरी माझ्यहातून आपला उपमर्द झाला असेल तर क्षमा

सुबोध खरे's picture

5 May 2021 - 7:36 pm | सुबोध खरे

मला कुणी श्री मोदींचा (अंध) भक्त म्हटले तरी चालेल.

पण गोऱ्या काकीचा किंवा तिच्या मतिमंद मुलाचा गुलाम किंवा चमचा नाही

चौकस२१२'s picture

3 May 2021 - 7:24 pm | चौकस२१२

हे प्रोफेश्वरांचे नवीन टुमणे .. भाजपाला बदलता येत नाही ( लोकशाही कि काय पद्धतीने निवडून आलेत ना ) मग भाजपतील मुख्य चेहरा बदला म्हणे ....
हे म्हणजे कसे ... "काही करून मोदी हटवा मग त्यासाठी वाजपेयी किती चांगले होते यावर बोलत राहायचे किंवा आता गडकरी किती चांगले "
आणि एकदातरी थाळीनाद हा आलाच पाहिजे सरांचं भाषणात! तो हि आला वाचून धन्य वाटले ...
बाकी बंगाल मध्ये लोकांनी ३ वरून ८० कि काय जागा दिल्या म्हणजे "नाकारले " हा कोणत्या अभ्यासक्रमातील तर्क कोण जाणे? गारगोटी विद्यालय कि काय

यश राज's picture

3 May 2021 - 8:26 pm | यश राज

"प्रोफेश्वर" शब्द आवडला..

बाकी मुल्ला की दौड मस्जिदतक त्याप्रमाणेच आहे हे सगळे

कंजूस's picture

3 May 2021 - 3:20 pm | कंजूस

नंदाच्या लालाच्या गावात भागात गाईंचं काय होतं पाहा या विडिओत
https://youtu.be/kqqd_CJBBQg
16:30 ते 23:30
साठ हजार भाकड गाईंना शेतकऱ्यांनी सोडले पण एका गोशाळेत संभाळतात.
---------
कॉम्युनिझमच्या नावाखाली सिंगुरमधून कार कारखाना घालवला. भांडवलवाद आणि समाजवाद यात कुठेतरी सामंजस्य आणावे लागते.
-------------
बाकी इकडे एन्रॉन किती वेळा डुबवले आणि वर काढले.

------------
केरळचे ओढे नाले नद्या खाड्या पर्यटनासाठी वाखाणतात कारण उद्ययोगधंदे नाहीत दुषित करायला. इकडे केमिकल उद्योगांचे घाण पाणी सोडून उल्लास नदीचे काय झाले पाहा.

चित्रगुप्त's picture

3 May 2021 - 4:35 pm | चित्रगुप्त

ब्रेकिंग न्यूजः मोदी को बदनाम करने की आंतरराष्ट्रीय साजिश की मिपा पर दस्तक. देखते रहिये मिपातक.

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 5:30 pm | मुक्त विहारि

हे वाक्य भारी आहे ....

पेटंट घेऊन ठेवा

आदरणीय सरांचे विरोधासाठी विरोध हे राजकीय गणित ठरलेले असताना, लेखातील भूमिका आश्चर्याची नाही. राजकीय मंडळी असो दिल्लीतली असो वा सोशल मिडीयाच्या गल्लीतली, जळत्या सरणावरही राजकीय पोळी भाजतच असतात, स्वतःकडे नैतीक अधिकार असो वा नसो.

आदरणीय सरांनी हा धागा काढण्यापुर्वी बरेच महिने जुलै २०२० मध्येच 'मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? ' या शीर्षकाचा धागा काढला होता, जेम तेम तीन प्रतिसाद आले होते. सरांना राजकारणातून फुरसत मिळाली तर त्यांनी आमच्या त्या धाग्यावर अजूनही आपले विचार मांडावेत. आम्ही स्व मेहनतीने मोदी तसेच उद्धवजी सरकारांच्या ईपोर्टलवरून सरांच्या राजकीय भावना लिहून आणि सोबत त्यांनी परिस्थिती कशी हाताळली असती याचा ईंग्रजी अनुवाद आणि सरांना राजकारण बाजूला ठेऊन कोविड परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी बहाल करावी असे आवाहन जरूर करू.

कोविड हाताळण्याबाबत सत्तेतील राजकीय नेत्यांचा शहानिशा करण्यास काहीच हरकत नाही आणि जी मंडळी स्वतः जबाबदारीने वागतात त्यांना यशापयाची चिकित्सा करण्याचा नैतिक अधिकार आहे असे म्हणता येते. असा नैतिक अधिकार आपल्याकडे आहे का ? ह्याचे आत्मचिंतन ज्याचे त्याने करावे.
माझ्याकडे स्वतःकडे हे प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार कुठून येतो ?

मी विषाणू (व्हायरस) जन्य आजार, काही प्रश्न हा धागा काढला. राष्ट्रीय संकटाच्या वेळी शासकांसोबत जनतेची स्वतःची म्हणून काही एक नैतिक जबाबदारी असते जनता कोविडचा फैलाव होऊनये म्हणून काळजी घेण्यात कमी पडत असेल तर आतातरी भानावर या ह्या शीर्षकाचा धागा काढला पण मिपावरच काही मिपाकरांनीच आपल्या स्वतःच्या संवेदनाच बोथट झाल्याचे प्रदर्शन केले. धाग्याची जिलेबी म्हणून थट्टा कोण करत होते त्यातीलच कोणी येऊन .....

ज्यांनी कोविड साथ टाळण्यासाठी सुसंगत वर्तनास हातभार लागेल अशा भूमिका घेतल्या नाहीत त्यांनी त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी घेऊन 'राजी'नामे द्यावेत याची मागणी आम्ही ऑगस्ट २०२० मध्येच केली. मोदींचा राजीनामा जरूर मागा पण स्वतःच्या नैतिक जबाबदार्‍यांचे आकलन करून राजीनामे कोण कोण देणार आहेत? जिल्हापरिषद पालिकांच्या शाळांच्या मास्तरांना कोविड १९च्या सक्तीच्या ड्युट्यांना (आणि इतरही) जुंपले जाते. का? कारण जनता त्यांच्या कडे आदराने बघते . जनतेच्या पैशाने पगार काय केवळ शालेय शिक्षकच घेतात?

असो. वर नमुद केलेल्या मागच्या माझ्या स्वतःच्या धाग्यातून साथीचे प्रकरण किमान दिडएकवर्षे चालेल असे म्हटले होते . कॉमनसेन्स होता. लस तयार होण्यासाठी आणि वितरणासाठी किमान दिड ते दोनवर्षे जाईल हे सर्वच शिक्षीतांना ठाऊक होते. मोदींनी मागच्या वर्षीच्या भाषणातून जनतेकडून केवळ काही आठवडे मागितले हे त्यांचे चुकलेच कारण दोनेकवर्षे जातील गावोगावच्या हॉस्पीटलात सुविधांचा अभाव असेल हा कॉमनसेन्स होता. मोदींचे शिक्षण कमी असेल आम्ही शिक्षीत आहोत की नाही आमची (किमान शिक्षीत जनतेची) स्वतःची म्हणून काही नैतिक होत्या आणि आहेत की नाही? आम्ही सर्व (जनता) जर नैतिक जबाबदारी पाळणारे असू तर दुसर्‍यांदा लॉकडाऊन लावण्याची पाळी का यावी? 'जनता' या शब्दात आमचा स्वतःचा सहभाग नेमका कितपत जबाबदारपणाचा राहीला आहे हे कोण बघेल? हे प्रश्न कोणतेही राजकीय नेता जनतेला विचारु शकत नाहीत कारण त्यांना जनतेला नेहमीच बरोबर म्हणण्या शिवाय पर्याय नसतो. जनतेला प्रश्न विचारणे आणि योग्य मार्गदर्शन करण्याची अंशिक जबाबदारी काही एक विचारवंत म्हणून प्राध्यापक वर्गाचीही असावयास हवी की नको ? की सातत्याने राजकीय खापरफोड करतच फिरायचे हे ज्याचे त्याने ठरवावे पण नैतिक अधिकार संपल्यानंतर जनता विचारवंत म्हणणे सोडून देते आणि मोदी किंवा अजून कुणी ते विचारवंताना न विचारता ठरवते त्या वेळी हा पंतप्रधान हवा आणि तो नको या विचारवंतांच्या म्हणण्याचा त्यांनी विचार करण्याची काही म्हणून एक कारण उरत नाही.

प्रश्न मोदींचाच घ्यायचा झाला तर जनतेला किमान दोन वर्षांची कसरत आहे हे स्पष्ट सांगण्यास ते कमी पडले असतील. लॉकडाऊन आणि गर्दी नियंत्रण कदाचित अधिक स्मार्ट पणे करता आले असते कदाचित कुंभमेळा थांबवता आला असता कदाचित राजकीय सभा कमी घेता आल्या असत्या. आणि जनता नेहमीच आपले ऐकत नाही कदाचित कोविड टाळण्यासाठी लागणारे सुसंगत वर्तन सोडून आजारीपडूण मग ऑक्सीजन आणि रेम्डेसेव्हीर कमी पडले की राजीनामा मागेल हे लक्षात घेऊन कदाचित ऑक्सीजनच्या आणि रेम्डेसेवीर गरजेचा हिशेब अधिक चांगला मांडता आला असता. विरोधकांच्या चेष्टेचा विषय होऊ नये म्हणून दिवे लावले नसते आणि थाळ्या वाजवल्या नसत्या.

पण (तुलना आमेरीका आणि ब्रिटनमधील मागच्यावर्षीच्या सत्तेतील नेत्यांच्या वर्तनाशी करा) याच मोदींनी जगातल्या इतर कोणत्याही राष्ट्रनेत्यापेक्षा साथीची दखल अधिक गांभीर्‍याने घेतली. लसींची उपलब्धता कमी पडेल हे लक्षात घेऊन तातडीच्या परवानगी देऊन लस अधिक लौकर आणाण्याचे त्यांचे प्रयत्न मिडीयातील त्यांच्या विरोधकांनी आणि टिकाकारांनीच हाणून पाडले. ममता बॅनर्जींप्रमाणे ऐन साथीच्या काळात राजकीय सभा घेण्याचा दोष मोदींकडेही जाईल पण देशात पुन्हा पुन्हा निवडणूका न होता सर्व निवडणूका सोबत व्हाव्यात हे म्हणणारेही मोदीच असतात. कुंभ मेळा भरवण्याचा दोष भाजपा राज्यसरकारकडे जाईलही पण कोविडसाथ टाळण्यस सुसंगत वागणे नसलेले शेतकरी मोर्चे भरवून साथ गावोगावी पोहोचवण्याचे काम करण्यात मोदींचे राजकीय विरोधकही मागे नसतात.

कोविडला बळीजाणार्‍यांपैकी आणि आजारी पडणार्‍यांपैकी काही जणांनी स्वतःही व्यवस्थित काळजी घेतली नसेल पण त्या सोबत त्यांच्याशी संपर्कात येणार्‍या आप्त स्वकीय ते त्यांचे मित्र ते त्यांचे ऑफीस/कामावरचे साहेब साथी ते त्यांचे दुकानदार ते त्यांच्या परिसरातील अनेक व्यक्ती ते त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोडून केवळ राजकीय भाषा करत फिरणारे विचारवंत अशा सर्वांनीच सत्ताधिशांसोबत राजीनामे द्यावयास हवेत.

प्रतिसाद कठोर वाटला तर क्षमा असावी पण सरण जळत असताना केवळ राजकारण नाही आपल्या देशाच्या व्यवस्था आणि तुटवड्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण आणिबाणीत स्वतःकाय काळजी घेतो तेही तेवढेच महत्वाचे असावे किंवा कसे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2021 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> प्रतिसाद कठोर वाटला तर क्षमा असावी.

नै नै प्रतिसाद कठोर वगैरे वाटला नाही. आपल्या लेखनाने नेहमीच सुसंस्कृत आणि सार्वजनिक संस्थळावरील सभ्यता पाळली आहे. ( असे वाटते) आपण नेहमीच नीसटलेल्या बाजूंवर सूक्ष्म, अतिसूक्ष्म, पद्धतीने निरीक्षण करुन वाचकांचे लक्ष वेधले आहे. विचारांच्या बाबतीत कोणी पारंपरिक असणे, सनातनी असणे,आधुनिक असणे एखाद्या गोष्टीला विरोध असणे, विरोधासाठी विरोध असणे, चांगली बाजू असणे, नसणे, नीसटलेल्या वगैरे बाजू, हे सर्व व्यक्तिपरत्वे विचारदृष्टीवर अवलंबून असते.

बाकी, राजीनाम्यापेक्षा नेतृत्व बदलाने, नव्या व्यक्तिमुळे प्रशासनात गतिमानता येईल, येणार नाही. बदल झाले असते, नसते झाले वगैरे यावरही 'प्रतिसादातील' तिस-या बाजूपेक्षा मत मांडले असते तर तेही वाचायला आवडलेच असते.

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

नेतृत्व आकाशातून थोडीच टपकते, सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्यांच्या गुण दोषांसहीतच हजर होत असते. आधी अंडे की आधी कोंबडी म्हणत जबाबदारी प्रत्येकजण केवळ नेतृत्वावर झटकत असेल तर एनीबडी, समबडी, नोबडीची अवस्था होते.

बाकी सर्वच राजकीय नेतृत्व दर आठवर्षानी रिटायर व्हावे याची मांडणी करणारा माझा धागा लेख आहे पण एकुण धागा लेखांच्या संख्येत चटकन सापडला नाही तसेच राजकीय घराणेशाहीच्या विरोधातही दुसर्‍या धाग्यातून सुस्पष्ट भूमिका आहे.

अशा सुस्प्ष्ट निष्पक्ष आधारांवर आपल्या लेखातील भूमिका आहे की राजकीय पुर्वग्रहांनी बाधीत आहे. बाधीत भूमिका ठेवण्याचा प्रत्येकाचा आधिकार आहे पण बाधित भूमिका असण्यापलिकडे अशा भूमिकांचे मुल्य जात नसावे किंवा कसे

पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले,
जसे २००+ आणि मग त्याहून अधिक, जशी गोव्यात सत्त मिळवली तसेच वर्षनुवर्षाच्य मेहनतीने ...
पण ते ततुमच्या सारखया अंध विरोधकांना "मिया गिरे तो भी टांग उपर" असेच वाटणार...
आपली नाकारत्मकता आता हास्यास्पद झाली आहे ..

आजानुकर्ण's picture

3 May 2021 - 10:12 pm | आजानुकर्ण

काहीही हं प्रा.डॉ. आपले आदरणीय पंतप्रधान बदलण्याची काहीही गरज आहे असे वाटत नाही. गेल्या काही वर्षात मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने बरीच प्रगती केली आहे. सद्यपरिस्थितीपासून थोडे थोडे मागे पाहत जाऊ.
1. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये केवळ चार लाख पेशंट प्रतिदिन सापडत आहेत. भारताची लोकसंख्या लक्षात घेता ही संख्या फारच कमी आहे. भारताच्या आरोग्यमंत्र्यांपासून ते अनेक मुख्यमंत्र्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा कसा पुरेसा आहे याची वारंवार ग्वाही दिलेली आहे. काही तुरळक केसेसमध्ये ऑक्सीजनच्या अभावामुळे रुग्ण मरण पावल्याचे दिसते पण हे सगळे क्षुल्लक प्रकार आहेत.
2. दुसरी लाट येण्यापूर्वी मिळालेले सर्व इशारे गांभीर्याने घेऊन मोदींनी पुरेशी तयारी केली. लसीकरण, ऑक्सीजन व औषधांचा पुरवठा यासाठी विशेष प्रयत्न केले. सोशल डिस्टन्सिंग व गर्दी टाळणे (उदा. निवडणुकांच्या सभा), मास्क वापरणे हे सगळे स्वतःपासून सुरु करून एक उदाहरण नागरिकांसमोर ठेवले. हे सगळे केल्याने भारताला कोविडचा अतिशय कमी फटका बसला.
3. गेल्या वर्षी कोविडच्या पहिल्या लाटेपासून भारत सुरक्षित राहिला याचे कारण मोदी यांचे नेतृत्त्व. मोदींचे सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे केलेले तात्काळ लॉकडाऊन, ताली आणि थाली हे अभिनव उपाय आणि भारतीयांची अंगभूत इम्युनिटी ही त्यामागची कारणे.
4. 65 वर्षांचे कायम तुणतुणे लावण्यापेक्षा मोदींनी झटून आरोग्यसेवेला कायम प्राधान्य दिले. एखाद्या पुतळ्यावर हजारो रुपये कोटी खर्च करण्याऐवजी ते आरोग्यसेवेत गुंतवले. मंदिराऐवजी हॉस्पीटल्स व दवाखाने यांना प्राधान्य दिले.
5. 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा पाया निश्चलनीकरणापासून सुरु झाला. जुन्या नोटा बंद करुन नवीन नोटा आल्याने - नोटा छापणाऱ्यांना रोजगार मिळाला. निश्चलनीकरणापासून देशाच्या इकॉनॉमीने मोठीच भरारी घेतली आहे.
6. मोदींच्या राज्यात इंधनाचे दर आणि महागाई अतिशय कमी राहिली आहे.
7. देशात सामाजिक सौख्याचे आणि शांततेचे वातावरण वाढीस लागले आहे.

जसं शोधत जाल तशी अनेक उदाहरणं सापडत जातील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2021 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनावर विषयानुरूप सहमती- असहमती आणि आपली मतं व्यक्त करणा-या सर्व मिपाकर, वाचक यांचे मन:पूर्वक आभार..!

-दिलीप बिरुटे

कितीही मोठे, अभ्यासपूर्ण, मुद्देसुद प्रतिसाद दिले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की करोना प्रकरणात केंद्र सरकारची चूक झाली आहे, विशेषतः लशी च्या बाबतीत. अर्थात दुसरे कोणी असते तर चूक झालीच नसती असे मला म्हणायचे नाहीये. पण चूक झाली हे दिसत असताना , समर्थकांनी ते मान्य करण्यात काही कमीपणा नाही

मुक्त विहारि's picture

4 May 2021 - 9:49 pm | मुक्त विहारि

केंद्र सरकारने, आणीबाणी लागू करून, 100% लाॅकडाऊन किमान 3 महिने तरी करायला हवा होता ....

नाहीतरी प्रत्येक वेळी केंद्रावरच बोट दाखवत आहेत ...

कॉमी's picture

4 May 2021 - 7:51 pm | कॉमी

कोणत्या नेत्याला काढावे आणि ठेवावे असे स्थूल मतप्रदर्शन केल्यावर कोणाचे मत बदलत नसते. त्यापेक्षा,सूक्ष्म बाबींवर चर्चा केल्यावर नेत्यांभोवतीची आभा कमी होते असा अनुभव आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 May 2021 - 5:19 pm | चंद्रसूर्यकुमार

ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना मरायचं नसेल तर नवीन पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर

एकेकाळी खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला ऑक्सिजन गेल्या सात वर्षात नाहीसा झाला हे माहित नव्हते.

ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना मरायचं नसेल तर नवीन पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर. यातील खोडलेल्या जागी कोणतीही परिस्थिती घाला. या लोकांना त्या परिस्थितीशी काहीही घेणेदेणे नाही. तर नवीन पंतप्रधानांची गरज हे आपले म्हणणे पुढे दामटायचे हे महत्वाचे.

उदय भास्कर या संरक्षण तज्ञाची मुलगी अशी का निघावी? अशी म्हणजे तुकडे तुकडे वाल्यांच्या बाजूची?

https://maharashtratimes.com/entertainment/swara-bhaskar-says-india-need...

मुक्त विहारि's picture

6 May 2021 - 6:22 pm | मुक्त विहारि

स्वतःच्या राज्यात काय परिस्थिति आहे?

ज्या राज्य सरकारांनी, करोनाची लागण थांबवली आहे.. त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलायचा अधिकार आहे ....

चंद्रसूर्यकुमार's picture

6 May 2021 - 6:35 pm | चंद्रसूर्यकुमार

गल्ली चुकली का?

स्वरा भास्कर, राजन वगैरे मंडळींचे प्रतिसाद जास्त मनावर घ्यायचे नसतात ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2021 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दुरदुष्ट्रीचा अभाव यामुळे करोनाचा दुस-या लाटेने देशात मोठे नुकसान केले अशी कठोर टीका रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली. सरकारमधील कोणी जगाकडे लक्ष दिले असते तर, इतरत्र कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले तर कदाचित भारतात वाईट स्थिती ओढवली नसती. पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळविल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला'' - रघुराम राजन. (बातमी)

करोनासारख्या भयंकर महामारीत पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) पूर्णतः निरुपयोगी ठरल्याने या संकटविरोधी लढ्याचे नेतृत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना द्या असा सल्ला भाजपचे ज्येष्ट नेते; राज्यसभा सदस्य सुब्रण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना दिला आहे या सल्ल्याने हळुहळु नेतृत्व बदलाची चर्चा सुरु होईल का हे पाहणे रोचक ठरणार आहे. (बातमी)

-दिलीप बिरुटे

रघुराम राजन यांसारखे उत्तम अर्थतज्ज्ञ हल्ली दुर्दैवाने खूप एकांगी झालेत असे म्हणावे वाटते.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2021 - 7:56 pm | प्रसाद गोडबोले

हल्ली म्हणजे काय ?

ते आधीपासुनच एकांगी होते , तुम्हाला आत्ता उमगायला लागलं आहे , सॉरी सॉरी हल्ली उमगायला लागलं आहे !