Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 02/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

वाचने 70291
प्रतिक्रिया 301

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मागे एकदा मोदीच म्हणाले होते की " माणूस तापात जसा बडबडत असतो तसा नेता निवडणुकीच्या रिंगणात आला की असेच वर्तन करतो ." भारतीय नागरिक आज देखील एखाद्या मुद्यावर अडून मतदान करताना दिसतात .अगदी कांद्याच्या भावाचा फटका देखील निवडणुकीत बसल्याचे उदाहरण इथले अभ्यासक सांगतीलच ! " पेशवाई " हा शब्द वापरला की निवडणुकीत एका विशिष्ट जातीची मते भरकन इकडून तिकडे जातात अशीही थियरी वापरली जाते ! अर्थकारण , नियोजन ,विकास याचा परिपूर्ण अभ्यास आपला मतदार करतो का ? दुसरे ते की जो फ्लोटिंग मतदार असतो त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी एक " विजयाचे " वातावरण उभे करावे लागते भारत देशात . त्यामुळे मोठ्या विजयाचे दावे करावेच लागतात कारण माणसाला हरणाऱ्या ला पाठिंबा द्यायला आवडत नाही ! प्रादेशिक अस्मिता आपल्या घटनेला अपेक्षित आहे का ... ? या शब्दाचा घटनेत उल्लेख आहे ? आपले संघराज्य आहे याचा अर्थ घटनेला वेगळा अभिप्रेत आहे ! तो मोडून तोडून आज राजकरणात वापरला जातो . भाजपा हा पक्ष हळू हळू सर्व भारत देशात आपले पाय येन केन प्रकारेण पसरत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही का दोनच आमदार केरळ मध्ये निवडून आले ? मग तिथे शरद पवारांना मतदारांनी धडा दिला असे म्हणायचे का ... ? लोकशाहीत घटनेच्या चौकटीत सर्व पक्षांना आपला आवाज बुलंद करायचा अधिकार आहे म्हणून तर एका मतासाठी बाजपेयी यांचे सरकार पाडण्यात आले ना ..... ?

In reply to by चौकटराजा

माझ्या मते भारतीय लोकशाही व मतदार प्रगल्भ होत आहेत. आपले आयुष्य छोटे असल्याने ही प्रगल्भता आपल्याला जाणवत नाही. मात्र देशाच्या दृष्टिने मात्र निश्चीतच घडत आहे. जर एखाद्या मतदारसंघातील २०-२५ वर्षांचा मतदान टक्केवारीचा अभ्यास केल्यास हे जाणवू शकते. आत्ताच्या पंढरपूर विधानसभा निवडणूकींचाही असा अभ्यास केल्यास त्यातून एखादी सुसुत्रता लक्षात येऊ शकते. मात्र अगदी तटस्थपणे अभ्यास करता आला पाहिजे. असो.

In reply to by शाम भागवत

प्रगल्भ? मला तरी वाटत नाही कारण मुरलेल्या इतर लोकशाही मध्ये एवढा एकदा इकडे एकदा तिकडे असे कमी दिसते ( काही अपवाद सोडता )

३ खासदारावरून भाजपा ची ३०० चे वर लोकसभेच्या जागा मिळविण्याची गोष्ट आता सर्वाना ठाउक आहे ! केरळ व बंगाल हे भा ज प ची राज्यच नव्हेत तरीही तिथे प्रवेश झाला आहे ! अर्थात भा ज पा च्या यशाला कारण इतर प्रभावहीन भाजपेतर नेते आहेत . महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय वादी आहे त्यामुले केरळ व बंगाल सारखे इथे क्रान्तीकारी मतदान काही होणार नाही की भा ज पा २०२४ मधे सत्तेवर यावा ! केरळ तामीळनाड व आंध्र ई भागातील आपल्या मर्यादा भा ज पा ला माहीत आहेत त्यामुळे बिहार ,बंगाल व पूर्वानचलातील राज्ये इथे जम बसवायचा याची भा ज पा ची धडपड चालू आहे ती यशस्वी होताना दिसते आहे. बन्गालमधे भाजपाचा सुपडा साफ वगैरे मथळा उद्याच्या सामन्यात आला तरी त्याची फार दखल घेण्याचे कारण मला दिसत नाही ! कारण बंगाल मधे भा ज पा चा पायाच मजबूत नाही जसा पन्जाब मधेही नाही !

In reply to by चौकटराजा

महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय वादी आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असताना सुद्धा 105 आमदार निवडून आले, आज 106 झाले. तरी पण महाराष्ट्राचा मतदार जातीवादी? भाजपला जर स्वबळावर महाराष्ट्र जिंकता येत नसेल तर हा भाजपाचा दोष आहे राज्याचा नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

२०२४ ला १०५ आले तर अँटी इंकम्बांसीने येतील एरवी मराठा मुख्यमंत्री जाहीर केला तरी १०५ मिळणार नाहीत ! शिवसेनेचे पण हाल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ! फक्त आताच्या सरकारवर राग असेल तरच भाजपा आता महाराष्ट्रात सत्तेवर येईल !

पवार, उद्धव, राज अशा अनेकांनी ममतावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. आपण परीक्षेत पहिला येऊ असे तावतावाने सांगणारा विद्यार्थी पहिला न येता दुसरा आल्याने शून्य गुण मिळविलेले सर्वजण आनंदाने बेभान होऊन नाचताहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पुढची निवडणूक, महाराष्ट्र राज्यात, भाजपला कठीण आहे... शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, MIM राज्य करणार....

In reply to by मुक्त विहारि

"Bengal Elections 2021 Sanjay Raut is like begani shadi me abdulla diwana says BJP leader | Bengal Elections 2021 : “संजय राऊत म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना” | Loksatta" https://www.loksatta.com/elections-news/bengal-elections-2021-sanjay-ra…

In reply to by मुक्त विहारि

पहिल्या वाक्याशी पूर्ण सहमत. पुढील निवडणुक भाजप विरूद्ध शिवसेना विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती अशी होईल व त्यात भाजप व शिवसेना या दोघांची धूळधाण उडून कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती सत्तेत येईल व राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. हे टाळण्यासाठी भाजप व सेना पुन्हा एकत्र यायचा प्रयत्न करतील. सेनेशी पुन्हा एकदा युती करण्याची गंभीर घोडचूक भाजपने पुन्हा केली तर, महाराष्ट्रात पुढील अनेक वर्षे भाजपचे अस्तित्व राहणार नाही. त्याऐवजी भाजपने एकट्याने लढून २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी. एम आय एम ला महाराष्ट्रात अत्यल्प स्थान आहे व पुढेही ते अत्यल्पच राहील. आता महाराष्ट्रात त्यांचा १ खासदार व २ आमदार आहेत. त्यातील १ आमदार व १ आमदार भाजपच्या कारस्थानांमुळे निवडून आले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

यांच्या बरोबरच जावे लागेल ... अशीच गत मनसेची झाली होती .... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, आपापल्या जागा शिवसेनेला देणार नाहीत... उरलेल्या जागांसाठी, भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत लावतील आणि ऐनवेळी शिवसेनेला धोबीपछाड देतील, कारण 50 पेक्षा शिवसेनेचे जास्त आमदार निवडून न आणणे, हीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांची रणनीति असेल... भाजप विरोधी पक्षांतच राहणार मुख्यमंत्री आणि इतर महत्वाची पदे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, वाटून घेणार... ह्यापुढे शिवसेना ही शेकाप आणि मनसे, यांच्या पावलावर पाऊल ठेवणार.... ह्याचा फायदा, MIM घेत आहेच आणि हळूहळू आपले आमदार, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या पक्षांत घुसवणार.... नवाब मलिक, अब्दुल सत्तार, ही यादी वाढतच जाणार ....

In reply to by गोंधळी

दीदी आणि तिचे हिंसक कम्युनिस्टांची कॉपी असलेले बगलबच्चे निवडून आले यात आश्चर्य काय? उलट दीदींना घाम फोडणार्‍या भाजपचं कौतुक करायला हवं.

In reply to by उपयोजक

दीदी जिंकल्यानंतर तिच्या हिंसक बगलबच्चे यांनी अपेक्षेप्रमाणे "खेला " सुरू केला आहे.. बंगालात बऱ्याच ठिकाणी भाजपा कार्यालयवर हल्ले व जाळपोळ सुरू केली आहे.. आणि रस्त्यावर मोठ्या संख्येनं उतरून जल्लोष ही केला आहे पण छे दीदी चे समर्थक आणि कोरोना.. काहीही काय?

बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगला अंगडी २९०१ मतांनी विजयी झाल्या आहेत.

अत्यंत धक्कादायक निकाल. शेवटच्या क्षणी ममता १,९५७ मतांनी पराभूत गड आला पण सिंंहीण गेली!

दोन जागी निवडणूक लढविली का काय त्यांनी ... ?

अजून निकाल लागलेला नाही. 19:16 IST - ममता 820 मतांनी आघाडीवर

एक निवडणुकीपुरता देखील पूजापाठ न करणारा " तो" साहेबाना मुख्यमन्त्रीपदी नको होता .कारण नम्बर नव्हते .आता निवडणुकीतील एक चाल म्हणून गोत्र सांगणारी , पूजापाठ करणारी ती" साहेबाना पन्तप्रधान झाली तरी मान्य आहे !! याला म्हणतात कुटील राजकारणी !!

In reply to by चौकटराजा

भारतिचे डाव्याची हीच "गोची " आहे पाहिजे तेवहा हे जानवी धा री आणि पाहिजे तेव्हा बाकीचे मनुवादी ! या "शतीर आणि चापलुसी " लोकांना साधं योगाची सरकारने जाहिरात केलेली खपत नाही ( का तर योग्य म्हणजे हिंदुत्वाचे प्रतीक !)

या निवडणुकीत कोणी काय कमावले/गमावले? भाजप आसाममध्ये दुसऱ्यांंदा विजय, स्थानिक पक्षाचा हात धरून पुदुच्चेरी जिंकले, बंगालमध्ये ३ वरून ७५ वर झेप घेताना कॉंग्रेस व डाव्यांना संपवून एकट्याने विरोधी पक्षाची जागा व्यापली . . . या जमेच्या बाजू. अर्थात इतर पक्षांच्या तोट्याच्या बाजू या सुद्धा भाजपसाठी जमेच्या बाजू समजता येतील. केरळ व तामिळनाडूत अजूनही जवळपास शून्य अस्तित्व; बंगालमध्ये मोठे यश मिळविण्याचा खूप गाजावाजा करूनही, प्रचंड प्रचार करूनही अपेक्षेपेक्षा खूप कमी यश . . . या तोट्याच्या बाजू. एकंदरीत प्याला अर्धाच भरल्याने अर्धा भरल्याचा आनंद घ्यावा की अर्धा रिकामा राहिल्याचे दु:ख करावे हे ठरविता येणे अवघड. कॉंग्रेस तामिळनाडूत सहकारी द्रमुकला जवळपास दोन तृतीयांश बहुमत, काही पोटनिवडणुकीत यश . . . या जमेच्या बाजू. अर्थात भाजपच्या तोट्याच्या बाजू या सुद्धा कॉंग्रेससाठी जमेच्या बाजू समजता येतील. केरळात सलग दुसरा पराभव, आसामात सलग दुसरा पराभव, पुदुच्चेरी गमावले, बंगालात पूर्ण अस्तित्व संपले . . . या तोट्याच्या बाजू. डावे केरळात सलग दुसरा विजय ही एकमेव जमेची बाजू. बंगालात पूर्ण अस्तित्व संपले ही तोट्याची बाजू. तृणमूल सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने बंगाल जिंकले, राष्ट्रीय पातळीवर मोदींना पर्याय म्हणून ममता सर्वात पुढे . . . या जमेच्या बाजू. ममताचा पराभव, बंगालात एका तगड्या राष्ट्रीय पक्षाचा विरोधी पक्ष म्हणून उदय . . . या तोट्याच्या बाजू राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे पक्ष दखल घेण्याजोगी चांगली/वाईट कामगिरी नाही.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/washington-post-criticizes-pm… निवडणुकांमधून मोदींचा जनाधार कमी झाल्याचच सूचित झालंय”, वॉशिंग्टन पोस्टमधून पंतप्रधान मोदींवर निशाणा! फारफार तर अपेक्षित यश मिळाले नाही आसे म्हणू शकतो पण जनाधार घातला हा निष्कर्ष चुकीचा आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

निशाणा वैगेरे ठिक आहे पण आकड्यांचे शब्दात रुपांतर करण्यात बातमीदार चुकलाय की काय अशी शंका येते. २०१६ मधे ३ जागा आणि एकूण मतसंख्येच्या १०.२% मते. २०२१ मधे जवळपास ७५ जागा आणी मतसंख्येच्या ३८% मते. जनाधार कमी झाला ?? आजचे गाणे : निशाणा तुला दिसला ना ?

In reply to by रात्रीचे चांदणे

निवडणुकांमधून ट्रम्प/बिदेनचा जनाधार कमी झाल्याचच सूचित झालंय”, लोकसत्तामधून अध्यक्ष ट्रम्प/बिदेनवर निशाणा! अशी वॉशिंग्टन पोस्टने लोकसत्ताच्या बातमीची दखल घेतल्याची चर्चा का नाही करत आपण? US वृत्तसंस्था भारतीय वृत्तसंस्थांचा प्रभाव स्विकारतील? आपण का स्विकारतो ? स्वतःच्या देशाची किंमत परकीय तराजूने केव्हा पर्यंत ?

तमिळनाडूच्या काही मतदारसंघात आश्चर्यकारक निकला लागले आहेत. ब्राह्मणबहूल आणि ADMK ची मक्तेदारी असणार्‍या अशा श्रीरंगम आणि मयिलापूरमधून DMK जिंकलंय आणि ख्रिश्चनबहूल अशा नागरकोईल आणि तिरुनेलवेलीमधून भाजपचे उमेदवार जिंकलेत. कोईंबतूरमधेही भाजपने खाते उघडले आहे.

तामिळनाडूत कमल हासन पराभूत. बंगालमध्ये क्रिकेट खेळाडू मनोज तिवारी विजयी. बंगालमध्ये क्रिकेट खेळाडू अशोक डिंडा मागे पडला होता.

सगळ्यात महत्त्वाचं. बंगाल मध्ये भाजप साठी आता पुढे कोणती रणनीती असेल? तिथे अजून भरपूर काम करावं लागणार हे नक्की. अर्थात फक्त 3 आमदारांपासून 200 ही उडी खूपच मोठी होती. पण भाजपच्या थिंक टॅंक मध्ये आता बंगाल साठी नवीन रणनीती आखली जाणार. त्यात कोणत्या गोष्टी ठरवल्या जाऊ शकतात?

In reply to by पिनाक

निष्ठावंतांवर अन्याय करून आयारामांना नको तितके महत्व देणे हा प्रकार, महाराष्ट्राप्रमाणेच बंगालातही भाजपाला महाग पडला आहे असे वाटते. १८ खासदारांच्या तुलनेत १२०+ आमदार अपेक्षित होते. अर्थात लोकसभा आणि विधानसभा मतदानाची वेगवेगळे निकष लक्षात घेऊन, तीन (१०%+) ते ८० (~४०%) हा प्रवास महत्वपूर्ण आहे हे acknowledged आहे.

In reply to by वामन देशमुख

निष्ठावंतांनी इतकी वर्षे फारसे काही केले नाही. रूपा गांगुलीचं नाव किती वर्षे ऐकतोय. बाकी 3 सीट्स असताना तेवढेच निष्ठावंत. हरणारा निष्ठावंत असला तरी काय उपयोग. 3 ते 87 ही खरं तर अवघड लढाई होती. कुठलाच बेस नसताना सगळी लढाई दिल्लीवरून रसद पुरवून लढली गेली. आता तिथे तळ निर्माण केला गेलाय. 1. आता या सगळ्यांना परफॉर्मन्स बेस्ड टार्गेटस द्यायला हवीत. पुढची पाच वर्षे संघटना तळागाळात नेणे आणि ममता सरकारचे अपयश पुढे आणणे या द्विसूत्रीय गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवं. आता प्रमुख विरोधी पक्ष भाजप असल्याने ममता ला पूर्वी जसं केंद्राला धुडकावून लावण्याची सवय होती ती बदलावी लागेल कारण भाजप प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवेल. 2. ममता चा भाच्चा हा कच्चा दुवा आहे. त्याची चौकशी वेगात पुढे न्यायला हवी. 3. ममता चे पुढचे लक्ष केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणे हे असणार आहे. तिचे सध्याचे प्रतिस्पर्धी पवार आणि राहुल असणार आहेत. बाकीचेही असतील. भाजप या गोष्टीचा chaos निर्मितीसाठी वापर करेल. ममता ला केंद्राच्या गोष्टीत गुंतवून तिचे राज्यावरचे लक्ष कमी होईल. अर्थात राज्य हे तिची ताकत असल्याने ती ते कुणा दुसऱ्याच्या हाती सोपवणे अशक्य. या गोंधळाचा फायदा उचलला जाईल. माझ्या मते 2016 पेक्षा ममता पुढे सध्या आव्हान जास्त आहे.

In reply to by पिनाक

सहमत आहे .... सुवेंदू अधिकारी, हा चेहरा तयार करू शकतात आणि जोडीला, मिथून चक्रवर्ती .... मिथूनला आता सक्रिय राजकारणांत आणणे ही दोघांनाही WIN-WIN परिस्थिति आहे ....

In reply to by पिनाक

3. ममता चे पुढचे लक्ष केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणे हे असणार आहे. तिचे सध्याचे प्रतिस्पर्धी पवार आणि राहुल असणार आहेत. बाकीचेही असतील. - १ पवार व राहुल हे केंद्रातील प्रतिस्पर्धी कधीच नव्हते आणि नसतील. पवारांना एक हाती जास्तीत जास्त ९ खासदार व ५८ आमदार निवडून आणता आले आहेत व कधीही स्वपक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. त्यांचे वय सुद्धा ८०+ आहे. He is at the fag end of his political career. राहुल मागील ७ वर्षात अगणित निवडणुका हरलेत. स्वतःची निवडणुक सुद्धा हरलेत. नेतृत्व करण्याची त्यांची कुवत नाही हे अगणित वेळा सिद्ध झाले आहे. याउलट ममताने सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुक प्रचंड बहुमताने जिंकली आहे. २०१४ मध्ये स्वपक्षाचे ३४ खासदार व २०१९ मध्ये २२ खासदार निवडून आणलेत. ममताच्या तुलनेत पवार व राहुल जवळपास सुद्धा येत नाहीत.

१९९६ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत बंगालात सत्ताधारी डावे व विरोधात कॉंग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. भाजपला त्या राज्यात अत्यल्प स्थान होते. शामाप्रसाद मुखर्जींंच्या काळात बंगालमधील सर्वात पहिल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जनसंघाचे १३ आमदार निवडून आले होते. परंतु त्यानंतर २०१६ पर्यंत बंगाल विधानसभेत भाजपचे जास्तीत जास्त ३ आमदार होते. १९९८ पासून २०१६ पर्यंत बंगालात डावे, कॉंग्रेस व तृणमूल कॉंग्रेस हे तीनच प्रमुख पक्ष होते. २०१६ मध्ये तृणमूलने २०४, कॉंग्रेसने ४४ व डाव्यांनी ४२ जागा जिंकल्या होत्या. ३ जागा जिंकणारा भाजप हा बंगालातील नगण्य पक्ष होता. २०२१ मध्ये भाजपला बंगालात अपेक्षेपेक्षा बरेच कमी यश मिळाले असले तरी भाजपने कॉंग्रेस व डावे या दोघांनाही पूर्णपणे संपवून विरोधी पक्षांची संपूर्ण जागा एकट्याने व्यापली आहे. भविष्यात बंगाली जनतेला बदल करावासा वाटला तर त्यांच्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. आपले स्थान निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला घालविणे आवश्यक असते. त्या बरोबरीने इतर प्रतिस्पर्ध्यांना संपविणे सुद्धा आवश्यक असते. भाजपला या वेळी निम्मे यश मिळाले आहे हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

आपले स्थान निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला घालविणे आवश्यक असते. त्या बरोबरीने इतर प्रतिस्पर्ध्यांना संपविणे सुद्धा आवश्यक असते. भाजपला या वेळी निम्मे यश मिळाले आहे हे नक्की.
+१

भाजपाला बंगाल मध्ये चांगला स्थानिक नेता शोधावा लागणार आहे. ताकतवाण स्थानिक नेत्यांशीवाय राज्य जिंकणं अवघड जातंय.

In reply to by रात्रीचे चांदणे

भाजपला बंगाल मध्ये स्थान निर्माण करायचे असेल तर .... क्रिकेट आणि अभिनय श्रेत्रातील, उमेदवार द्यावेच लागतील.... सौरव गांगुली आणि मिथुन चक्रवर्ती, यांच्या मागे धावणारे पब्लिक, बंगाल मध्ये भरपूर आहेत .... भाजपच्या आत्ताच्या यशांत, (हो, यशच म्हणत आहे, काही टक्के मतदार नक्कीच वाढले आहेत...) मिथूनचा मोठा वाटा आहे ....

In reply to by मुक्त विहारि

भाषेचा अभिमान असता तर हिंदी सिनेमांइतक्या बजेटचे बनले असते बंगाली सिनेमे. १०० कोटी किती बंगाली सिनेमे मिळवतात? हिंदी सिनेमेच चालतात.

In reply to by रात्रीचे चांदणे

सुवेन्दू अधिकारी ममता सरकारमध्ये 2 नंबर चे मंत्री होते असे ऐकलंय. त्यांच्या नावाला पुढे ठेवून प्रचार करता आला असता. अर्थात जसा महाराष्ट्रात फडणवीसांनी स्वतः होऊन अधिकार ताब्यात घेतले तसं अधिकारींनी करायला हवं. पक्षात ऐनवेळी नवीन माणूस घेतला की त्याला फारसा प्रभाव दाखवता येत नाही. पक्षाची कार्यरचना समजेपर्यंत च एक दोन वर्षे निघून जातात. फडणवीस पूर्वीपासून पक्षात होते हा फरक आहेच.

काही शंका १. ममता बॅनर्जी खरोखरच नंदीग्राम मधून हरल्या असल्या तर त्या मतदान मोजणीला कोर्टात आव्हान देऊ शकतात काय ? २. जर पराभव मान्य केला तर उद्धव ठाकरेंप्रमाणे परत ६ महिन्याच्या आत निवडणूक लढविल्यानंतर मुख्यमंत्रीपद होऊ शकतात काय ?

In reply to by धर्मराजमुटके

१. ममता बॅनर्जी खरोखरच नंदीग्राम मधून हरल्या असल्या तर त्या मतदान मोजणीला कोर्टात आव्हान देऊ शकतात काय ?
कोर्टात कोणत्याही कारणाने आव्हान द्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याप्रमाणे ममता मतमोजणीला आव्हान देऊ शकतात. मतमोजणी करण्यात काही त्रुटी राहिल्या आहेत (काही मशीन्स मोजली गेली नाहीत किंवा आकडे चुकीचे धरले) अशाप्रकारे आक्षेप सिध्द करता आले तर कोर्ट पुन्हा मतमोजणी करायचा आदेश देऊ शकेल. ममता त्यामानाने खूपच सरळमार्गी ठरल्या. पी.चिदंबरमना एक फोन केला असता तरी ही वेळ आली नसती.
२. जर पराभव मान्य केला तर उद्धव ठाकरेंप्रमाणे परत ६ महिन्याच्या आत निवडणूक लढविल्यानंतर मुख्यमंत्रीपद होऊ शकतात काय ?
आताही ममता मुख्यमंत्री होऊ शकतील. राज्यघटनेत विधानसभा निवडणुक हरलेल्याने मुख्यमंत्री होऊ नये असे म्हटलेले नाही तर मुख्यमंत्री होताना विधानसभेचा सदस्य नसल्यास सहा महिन्यात सदस्य व्हावे असा नियम आहे. तेव्हा नियमाप्रमाणे आताही मुख्यमंत्री व्हायला ममतांना काहीच अडचण नाही. फक्त नोव्हेंबर पर्यंत विधानसभेवर निवडून जाता आले पाहिजे. आतापर्यंत सत्ताधारी पक्ष हरला पण मुख्यमंत्र्याने स्वतःची जागा जिंकली असे कित्येक ठिकाणी झाले आहे. सत्ताधारी पक्ष हरला आणि मुख्यमंत्रीही हरला असेही आतापर्यंत झाले आहे (२०११ मध्ये बंगालमध्ये बुद्धदेव भट्टाचार्य, १९९६ मध्ये तामिळनाडूत जयललिता यांचा पराभव झाला होता) तसेच विरोधी पक्ष जिंकला पण मुख्यमंत्रीपदाच्या नेत्याने/मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराने निवडणूक गमावली असेही झाले आहे (२०१७ मध्ये हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल, १९९६ मध्ये केरळमध्ये व्ही.एस.अच्युतानंदन). मात्र सत्ताधारी पक्षाने निवडणुक जिंकूनही मुख्यमंत्र्याचा पराभव झाला असे अजून कुठे झाले आहे का याची कल्पना नाही. तसे झाले असल्यास फार वेळा झाले नसावे. १९५२ मध्ये मुंबई प्रांताच्या पहिल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोरारजी देसाईंचा बलसाडमधून अवघ्या १८ मतांनी पराभव झाला होता. तरीही त्यानंतर त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केले होते (आणि त्यातून १०५ मराठी लोकांचा मुडदा पडला :( ) . त्यानंतर पराभूत झालेल्याला लगेच मुख्यमंत्री केले असे बहुदा पहिल्यांदाच होत असावे. २००३ मध्ये मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांचा तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी पराभव केला होता. शिवराज मुख्यमंत्रीही झाले पण ते लगेच नाही तर २ वर्षांनंतर.

In reply to by मुक्त विहारि

लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राने बातम्या देताना त्यातील मजकूर योग्य आहे की नाही याविषयी अधिक काळजी घ्यायला हवी. माझ्यासारखा मिपासारख्या संकेतस्थळावर लिहिणारा जर त्यांच्या मजकूरातील त्रुटी जर शोधून काढू शकत असेल तर ते कसे चालेल?
त्यामुळे आता ममता पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या तरी त्यांना सहा महिन्याच्या आत विधान परिषदेवर निवडून जावं लागणार आहे.
पश्चिम बंगाल राज्याला विधानपरिषद आहे?
२०१७ साली गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यानंतरही भाजपाने राज्यातील इतर स्थानिक पक्षांसोबत युती करुन सरकार स्थापन केलं होतं. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष या दोन्ही पक्षांबरोबर काही अपक्ष आमदारांच्या मदतीने भाजपाने बहुमताचा आकडा गाठला होता. मात्र त्यानंतर सहा महिन्यांमध्ये भाजपाने पार्सेकरांना विधान परिषदेवर न पाठवता केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना गोव्याचं मुख्यमंत्री पद दिलं होतं.
गोव्यात विधानपरिषद आहे?
१९७० ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्रिभूवन नारायन सिंघ यांचा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर त्रिभूवन यांनी राजीनामा दिला होता.
ही घटना जानेवारी १९७१ च्या पहिल्या आठवड्यातील. गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम पोटनिवडणुकीत त्रिभुवन नारायण सिंग यांचा काँग्रेसच्या रामकृष्ण द्विवेदींनी पराभव केला होता. या रामकृष्ण द्विवेदींविषयी दुसर्‍या प्रतिसादात लिहितो. पराभव झाला तरीही त्रिभुवन नारायण सिंग यांनी लगेच राजीनामा दिला नव्हता. ते ऑक्टोबर १९७० मध्ये मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे एप्रिल १९७१ पर्यंत त्यांच्याकडे वेळ होता. विधानसभेत जाता आले नाही तरी विधानपरिषदेवर निवडून जाता येईल असा अंदाज असावा. ते नक्की तपासून बघायला हवे. पण त्रिभुवन नारायण सिंग यांनी लगेच राजीनामा दिला नव्हता. इतकेच नव्हे तर मार्च १९७१ मध्ये लोकसभा निवडणुक झाल्यानंतर उत्तर प्रदेश विधीमंडळाचे अधिवेशनही झाले होते. ते १९७१ या वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषणही झाले. मात्र या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर विरोधी काँग्रेस (आर) च्या सदस्यांनी दुरूस्ती सुचवली आणि विधानसभेत ती दुरूस्ती मान्य झाल्याने ३० मार्च १९७१ रोजी त्रिभुवन नारायण सिंग यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस (आर) चे कमलापती त्रिपाठी ४ एप्रिलला मुख्यमंत्री झाले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वरील प्रतिसादात लिहिलेच आहे की जानेवारी १९७१ च्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांचा काँग्रेस (आर) च्या रामकृष्ण द्विवेदींनी मनीराम पोटनिवडणुकीत पराभव केला. हे रामकृष्ण द्विवेदी अगदी हाडाचे काँग्रेसवाले होते. २००४ मध्ये राहुल गांधीने अमेठीतून लोकसभा निवडणुक लढवली तेव्हा 'अमेठीका डंका बेटी प्रियांका' ही घोषणा देणारे हेच रामकृष्ण द्विवेदी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांनी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांनी नेहरू जयंतीच्या कार्यक्रमात राज्यात पक्ष मजबूत करायला काय करता येईल याविषयी चर्चा केली आणि प्रियांका गांधींच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. वयाच्या ८७ व्या वर्षी पक्षात फार मोठे स्थान कधी न भूषविलेला माणूस पक्षविरोधी कारवाया करू शकेल ही शक्यता फारच थोडी. पण त्यांनी प्रियांकांवर नाराजी व्यक्त केल्याने ते गांधी घराण्याच्या मर्जीतून उतरले आणि त्यांना पक्षातून काढण्यात आले. तेव्हा 'मी नक्की कोणत्या पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत हे तरी सांगा' असे डोळ्यात अश्रू आणत द्विवेदी म्हणाले होते. पक्षातून काढताना कारणे दाखवा नोटिस वगैरे काहीही बजावण्यात आली नव्हती तर तडकाफडकी त्यांना पक्षातून काढले गेले. काही दिवसातच त्यांना दुर्घर आजार (बहुदा कॅन्सर) झाला. तेव्हा द्विवेदींना 'मानवीय' आधारावर पक्षात घेण्यात येत आहे असे काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. म्हणजे त्यांना काढण्यात आपली चूक झाली हे मान्य करणे दूरच राहिले अंथरूणाला खिळलेल्या ८७ वर्षांच्या हाडाच्या काँग्रेस कार्यकर्त्याला उपकार केल्याप्रमाणे पक्षात परत घेतले गेले. त्यानंतर मागच्या वर्षीचा लॉक डाऊन सुरू व्हायच्या ५ दिवस आधी म्हणजे १९ मार्चला त्यांचे निधन झाले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ममता त्यामानाने खूपच सरळमार्गी ठरल्या. पी. चिदंबरमना एक फोन केला असता तरी ही वेळ आली नसती.
व्वा चंद्रसूर्यकुमार! हे प्रकरण मी विसरलोच होतो.

In reply to by वामन देशमुख

यात मनमोहन सिंहांचाही हात होता. चिद्दू ६०००+ मतांनी पडल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर फेरमतमोजणी साठी पंतप्रधान कार्यालयातून फोन गेले होते. इतका मोठा फरक असूनही दबावामुळे फेरमतमोजणी केली. त्यातही तोच फरक दिसला. शेवटी काही 'अर्थ'पूर्ण व्यवहार होऊन अजून एकदा मतमोजणी केली व त्यात चिद्दू साडेतीन हजार मतांनी जिंकल्याचे जाहीर केले गेले.

ममता सलग तिसरी टर्म जिकल्यात तेही पहिल्या पेक्षा जास्त आमदार जिंकूण यायचं अर्थ बंगाली जनतेला ममताच पाहिजेत. आपल्याला तिथली स्थानिक परिस्तिथी माहिती नाही परंतु ममतांनी नक्कीच चांगले काम केले असेल, म्हणूनच जनतेने त्यांना भरभरून मत दिलीत.

In reply to by रात्रीचे चांदणे

अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच की सध्या ममता ला पर्याय नाही. तो पर्याय पुढे आला की ममता ना नारळ मिळेल. बाकी ममता ने कोणत्या गोष्टीत चांगलं काम केलं आहे ते ऐकायला आवडेल.

In reply to by पिनाक

आणि ह्या अजेंडा भोवती फिरणारी इतर कामे .... मुख्यतः हिंदू द्वेष ..... इतकी वर्षे तिला चंडीपाठ म्हणायची गरज भासली नाही आणि आत्ता मात्र भासली ....

२०१४ पासून २०२१ पर्यंत वेगवेगळी राज्यात व केंद्रशासित प्रदेशात एकूण ४० निवडणुका झाल्या. यातील ३५ निवडणकात कॉंग्रेसला विजय मिळविता आला नाही किंवा सर्वात माठा पक्ष असूनही सरकार स्थापता आले नाही. २०१६ मध्ये पुदुच्चेरीत बहुमत मिळवून कॉंग्रेसचे सरकार बनले, परंतु २०२१ ची निवडणुक कॉंग्रेस हरली. २०१७ मध्ये कॉंग्रेसने पंजाब जिंकले. २०१८ मध्ये कॉंग्रेसने छत्तीसगड, मध्य प्रदेश व राजस्थान जिंकले, परंतु २०२० मध्ये पक्षातील फाटाफुटीने मध्य प्रदेश गेले. आपण हरलो किंवा संपलो तरी चालेल, परंतु भाजप हरला पाहिजे अशी विचित्र भूमिका कॉंग्रेसने घेऊन प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देऊन दुय्यम भूमिका घेतली. त्याचाच परीणाम म्हणून कॉंग्रेस आज बहुतांशी राज्यात संपली आहे. भाजपने सुद्धा पूर्वी प्रादेशिक पक्षांना अवास्तव महत्त्व देऊन दुय्यम भूमिका घेण्याची चूक गोवा, आसाम, पंजाब, महाराष्ट्र, बिहार, बंगाल अशा अनेक राज्यात घेऊन स्वतःची वाढ खुंटवली होती. सुदैवाने गोवा, बंगाल व आसामात भाजपला प्रादेशिक पक्षांचे जोखड भिरकावता आले. बिहारात अजूनही संजदचे जोखड मानेवर आहे. पंजाबात अकाली दलाचे जोखड मानेवरून उतरले असले तरी तेथे भाजपकडे स्थानिक शीख नेते नसल्याने तेथे भाजपची वाढ होण्यास बराच कालावधी लागेल. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे जोखड मानेवरून उतरवल्याने सत्तेवर येता आले होते. दुर्दैवाने भाजपने हे जोखड पुन्हा मानेवर घेतल्याने सत्ता गमवावी लागली. भविष्यात भाजप पुन्हा एकदा हे जोखड मानेवर घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे केले तर महाराष्ट्रात भाजप कायमचा संपेल.

In reply to by श्रीगुरुजी

आपण हरलो किंवा संपलो तरी चालेल, परंतु भाजप हरला पाहिजे अशी विचित्र भूमिका कॉंग्रेसने घेऊन प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देऊन दुय्यम भूमिका घेतली. त्याचाच परीणाम म्हणून कॉंग्रेस आज बहुतांशी राज्यात संपली आहे.
काँग्रेसचे समर्थकही तसेच आहेत. आताही स्वतःच्या पक्षाचा बंगालमध्ये पूर्ण धुव्वा उडाला याविषयी अजिबात खंत न बाळगता भाजप हरला* याविषयी हे लोक आनंद व्यक्त करत आहेत. अर्थात त्यांचीही काही चूक नाही. जसे नेते तसे त्यांचे समर्थक. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडवून आपचा विजय झाल्यावर पी.चिदंबरमनी आनंद व्यक्त केला होता. तेव्हा भाजपचे किमान ८ आमदार तरी निवडून आले पण स्वतःच्या पक्षाचा लागोपाठ दुसर्‍यांदा एकही आमदार निवडून आला नव्हता तेव्हा आपण आनंद व्यक्त करण्यासारखे काहीही झालेले नाही हे बहुदा चिदंबरमच्या लक्षात आले नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रश्न विचारला होता की आपण इतरांच्या विजयात सुख मानणार असू तर आपण आपले दुकान बंद करायचे का? सध्याच्या काळात डाव्या आणि पुरोगामी पक्षांची/समर्थकांची पण तिच स्थिती झाली आहे. बंगालमध्ये डाव्या आघाडीने २९४ पैकी २५० च्या आसपास जागा अनेक निवडणुकांमध्ये मिळवल्या होत्या. पण यावेळी त्यांचा एक आमदार तरी निवडून आला आहे का हे पण तपासून बघावे लागेल. असे असताना यांना आनंद कसला? तर मागच्या वेळी ३ आमदार असलेला भाजप १५० आमदार मिळवू शकला नाही तर त्याच्या अर्धेच आमदार मिळवू शकला. ही सगळी मानसिकताच समजण्यापलीकडची आहे. *: तांत्रिकदृष्ट्या सत्तेत नसलेला पक्ष (विशेषतः पूर्वीच्या विधानसभेत अवघ्या १% जागा असलेला पक्ष) हरणे कसे शक्य आहे? फारतर जिंकायला अपयश आले असे म्हणू. पण सध्यापुरती ती तांत्रिकता बाजूला ठेऊ.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

२०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडवून आपचा विजय झाल्यावर पी.चिदंबरमनी आनंद व्यक्त केला होता. तेव्हा भाजपचे किमान ८ आमदार तरी निवडून आले पण स्वतःच्या पक्षाचा लागोपाठ दुसर्‍यांदा एकही आमदार निवडून आला नव्हता तेव्हा आपण आनंद व्यक्त करण्यासारखे काहीही झालेले नाही हे बहुदा चिदंबरमच्या लक्षात आले नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रश्न विचारला होता की आपण इतरांच्या विजयात सुख मानणार असू तर आपण आपले दुकान बंद करायचे का? २०१३ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २५% मते मिळून ८ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३४% मते व ३२ जागा होत्या. २०१५ मधील निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू नये यासाठी कॉंग्रेसने आआपला छुपा पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसला फक्त ९% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३२.५% मते व ३ जागा मिळाल्या होत्या. २०२० मध्ये कॉंग्रेसने पुन्हा तेच केल्याने कॉंग्रेसला फक्त ४% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३८% मते व ८ जागा होत्या. या दरम्यान २००४ व २००९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सर्व ७ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ० जागा मिळाल्या. म्हणजे भाजपचे नाक कापण्यासाठी कॉंग्रेसने दिल्लीतून स्वतःला पूर्णपणे संपविले. भाजपने लोकसभेत सर्व ७ जागा जिंकल्या व विधानसभेही मते टिकविली आहेत.

एकूणच बंगालच्या लोकांचा एकाच नेत्यावर वर्षानुवर्षे विश्वास राहतो असे दिसते. बिधनचंद्र रॉय जवळपास १४ वर्षे, ज्योती बसू २३ वर्षे तर बुद्धदेव भट्टाचार्य साडेदहा वर्षे तर आता ममता बॅनर्जी १५ वर्षे मुख्यमंत्री असणार. तसेच ज्या पक्षाच्या बाजूने कौल दिला जातो तो अगदी दणक्यात असतो. २९४ पैकी १५० जागा जिंकून थोडक्यात शेपटावर निभावले असे कधी होत नाही. जिंकणार्‍या पक्षाला/आघाडीला किमान २०० जागा तरी मिळतातच हा गेल्या अनेक वर्षातील कल आहे.