Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 02/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

वाचने 70291
प्रतिक्रिया 301

प्रतिक्रिया

सद्यस्थिती - बंगाल - भाजप ७५, तृणमूल ८७, कॉंग्रेस+ ४ आसाम - भाजप+ २६, कॉंग्रेस+ ४ पुदुच्चेरी - भाजप+ ५, कॉंग्रेस+ ४ केरळ - भाजप ३, कॉंग्रेस+ ५७, डावे+ ८० तामिळनाडू - अद्रमुक+ ३२, द्रमुक+ ४२

मतमोजणीचे टेबल्स कमी असल्यामुळे निकाल यायला उशीर लागण्याची चिन्हे आहेत. पोस्टल मतांमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर.

तृणमूल भाजापापेक्षा दहा जागांनी पुढे आहे. आसाममधे परत भाजपा सरकार येणार असे दिसते. नंदिग्राम मधे ममताबानो ८००० मतांनी पिछाडीवर आहे.

सद्यस्थिती - बंगाल - भाजप १०४ तृणमूल १८२, कॉंग्रेस+ ६ आसाम - भाजप+ ७०, कॉंग्रेस+ ३९ पुदुच्चेरी - भाजप+ ९ , कॉंग्रेस+ ५ केरळ - भाजप २ , कॉंग्रेस+ ९९ , डावे+ ८९ तामिळनाडू - अद्रमुक+ ९८ , द्रमुक+ १३२ - पंढरपूर - भालके (राष्ट्रवादी) १७४१२, औताडे (भाजप) १७२१८ - ममता ७२८७ मतांनी मागे - अंदाजापेक्षा तामिळनाडूत अद्रमुकची चांगली कामगिरी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक - मंगल आवडी (भाजप) - ७०,८१३ सतीश जारकीहोळी (कॉंग्रेस) - ६७,४९३ शुभम शेळके (शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समिती पुरस्कृत) - १९,२८९ संजय राऊतने शेळकेंसाठी बेळगावात सभा घेऊन भाजपला सडकून शिव्या घातल्या होत्या. शेळके जिंकणारच अशी व्याघ्रगर्जना केली होती. परंतु शेळके खूपच मागे पडलेले दिसताहेत.

- पंढरपूर - भालके (राष्ट्रवादी) २१,३३४, औताडे (भाजप) २३,५००

19 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 892 मतांनी आघाडीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 19 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 892 मतांनी आघाडीवर भाजप – समाधान आवताडे : 55559 राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 54664

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक - मंगल आवडी (भाजप) - २,३७,११६ सतीश जारकीहोळी (कॉंग्रेस) - २,४७,०६२ शुभम शेळके (शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समिती पुरस्कृत) - ८१,७७१

In reply to by श्रीगुरुजी

मागच्या विधानसभा निवणुकी बंगाल मध्ये तीन जागा आणि २०२१ मध्ये ८० च्या जवळपास. याला पराभव म्हणता का तुम्ही ?

सद्यस्थिती - बंगाल - भाजप ८१, तृणमूल २०७ कॉंग्रेस+ २ आसाम - भाजप+ ८१, कॉंग्रेस+ ४५ पुदुच्चेरी - भाजप+ ८, कॉंग्रेस+ ३ केरळ - भाजप १, कॉंग्रेस+ ४१, डावे+ ९८ तामिळनाडू - अद्रमुक+ ८७, द्रमुक+ १४६ - पंढरपूर - भालके (राष्ट्रवादी) ८२,१२७, औताडे (भाजप) ८९,०३७ पंढरपूरात मतमोजणीच्या ३० फेऱ्या पूर्ण झाल्यात. अजून १० फेऱ्या व १५,००० मते मोजायची शिल्लक आहेत. औताडेंचा विजय जवळपास नक्की झालाय.

बंगाल विधानसभा निवडणुकीचे सर्व संस्थांंचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज संपूर्ण चुकलेले दिसतात. ममता २०१६ पेक्षा (२०४) जास्त जागा जिंकताना दिसते (२०७). भाजपचा विजयरथ ८१ वरच रूतलाय. भाजप १०० च्या पुढे जाणार नाही हे प्रशांत किशोरांचे भाकीत खरे ठरताना दिसतंय. २०१६ मध्ये कॉंग्रेस (४४) व डावे (४२) यांनी एकत्रित ८६ जागा जिंकल्या होत्या. २०२१ मध्ये त्यांना फक्त २ जागा मिळताहेत. एकंदरीत बंगालमध्ये भाजपचा मोठा अपेक्षाभंग होतोय.

इतर पोटनिवडणुकींचे निकाल - - तिरूपती (लोकसभा): मड्डीला गुरूमूर्ती (वाय एस आर कॉंग्रेस) तेलगू देसम उमेदवारापेक्षा २,०६,०९५ मतांनी पुढे - सॉल्ट (उत्तराखंड विधानसभा): भाजपचे महेश जीना १२२५ मतांनी पुढे - नागार्जुन सागर (आंध्र प्रदेश): नोमुला भगत (तेलंगणा राष्ट्रीय समिती) १०,२८९ मतांनी पुढे - राजस्थान विधानसभा पोटनिवडणुक: ३ पैकी २ जागांवर कॉंग्रेस व १ जागेवर भाजप पुढे - मिझोराम: मिझो नॅशनल फ्रंटचा उमेदवार २९५० मतांनी पुढे - दमोह (मध्य प्रदेश): कॉंग्रेसचे अजय टंडन भाजपपेक्षा २६०७ मतांनी पुढे - कर्नाटक विधानसभा: १ जागेवर भाजप व १ जागेवर कॉंग्रेस पुढे - मधूपूर (झारखंड): झामुमोचा उमेदवार ४६०७ मतांनी पुढे - मोरवा (गुजरात): भाजप उमेदवार ८६८० मतांनी पुढे - मल्लपुरम (केरळ लोकसभा): मुस्लिम लीग ६१,४२२ मतांनी पुढे

पश्चिम बंगाल मधील कूच बेहर येथील भाजपा कार्यालयाची आणि उमेदवार मिहीर गोस्वामी यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

बंगाल मधे भाजपाचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. निवडणुकी पूर्वी अमित शहांसहित भाजपाच्या इतर नेत्यांनी २०० + जागा निवडुन येतील अश्या ज्या बाता मारल्या होत्या त्यांच्या निम्म्या जागा देखील त्यांना निवडुन आणता आल्या नाहीत. 'दो मई, दिदी गयी' या सारखी विधाने करुन पंतप्रधान मोदींनी बंगाल निवडणुकीला इतकी प्रतिष्ठेची करुन ठेवली की आता तीच वक्तव्ये त्यांच्यावर उलटली. उद्या नॉटी संपादकाचा हग्रलेख लिहिताना भलताच चेव चढणार आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

१९८२, थर्ड वर्ल्ड देशातल्या निवडणुकीवर तुमचे भलते लक्ष ब्वॉ... हग्रलेखाची अगदी मिटक्या मारत, जिभल्या चाटत वाट पाहताय वाटतं. बाकी इंग्लंडची राणी काय म्हणते?

आजचे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहून वाटतंय, बांगला हिंदूंचा १९ जानेवारी १९९० हा दिवस २०३० च्या आधी येतो का नंतर हे आता पाहायचे. तोपर्यंत, काश्मिरातल्या गिरीजा टिंकूसारखाच अनुभव, बंगालातील असंख्य काफिर महिलांनादेखील येईल. अर्थात, देशाचे सेक्युलर फॅब्रिक टिकवण्यासाठी हे आवश्यकच आहे, नाही का?

In reply to by वामन देशमुख

अहो असंख्य काफिर महिलांपैकीच एक काफिर महिला राज्याची मुख्यमंत्री होतेय... यापेक्षा आणखी काय हवं... हिंदू धर्म भारतीय जुमला पार्टीला आंदण दिलाय की काय

In reply to by आजानुकर्ण

भाजपचे तेवढेच हिंदू बाकी सगळे मुसलमानच, या आयडी साठी. कुठे पण कायपण करून हिंदू मुस्लिम जोडून आपले एक्सपर्ट टॉक्सिन द्यायचे.

In reply to by स्वलिखित

स्वलिखित प्रतिसाद द्यायला जमत नाही तर किमान आयडी तरी बदला. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा.

In reply to by वामन देशमुख

अपेक्षेप्रमाणे, तृणमूलच्या शांतीप्रिय गुंडांनी जाळपोळ सुरु केली आहे. टिवटिव एक, टिवटिव दोन आणि ही बातमी.

In reply to by वामन देशमुख

आणि आता चक्क भाजप कार्यकर्त्याचा खून! प्रभू श्री राम बंगालातील भाजप कार्यकर्ते, रास्वसं स्वयंसेवकांचे रक्षण करो.

केरळ मध्ये पिनरई विजयन आणि LDF यांचे मोठे यश, मागच्या वेळेपेक्षा ८ जागा जास्त घेऊन जनतेचा विश्वास अजून आहे हे दिसले. आत्ता भाजपाची एकही लीड नाही दिसत. बंगालमध्ये काँग्रेस आणि लेफ्ट भुईसपाट. त्रिनमूल आणि ममता यांचा मोठ्ठा विजय. पेला होबे. आसाम मध्ये भाजपावर विश्वास कायम.

या निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतील याविषयी लिहितो. काँग्रेसचा या निवडणुकांमध्ये पुरता पराभव झालेला दिसतो. आसामात बी.पी.एफ या भाजप आघाडीपासून दुरावलेल्या पक्षाला एकत्र घेऊन आणि बद्रुद्दिन अजमलच्या ए.आय.यु.डी.एफ पक्षाला बरोबर घेऊनही भाजपला सत्तेतून हुसकावणे काँग्रेसला शक्य झालेले दिसत नाही. केरळमध्ये एकदा डावे आणि एकदा काँग्रेस हा कल गेल्या अनेक वर्षांपासून होता. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीने केरळमधील २० पैकी १९ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. स्वतः राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेवर निवडून गेले होते. तरीही विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र डाव्या आघाडीने आरामात विजय मिळवलेला दिसतो. बंगालमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे तर तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या कृपेने १५ च्या आसपास जागा मिळतील. काँग्रेसच्या या निराशाजनक कामगिरीचा पक्षावर आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर नक्की काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल वगैरे २३ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असे पत्र लिहून गांधी कुटुंबियांविरूध्द क्षीण का होईना आवाज उठवला होता. राहुल गांधींमध्ये निवडणुक जिंकून द्यायची कुवत नाही हे गेल्या काही वर्षात सिध्द झाले आहेच. ते परत एकदा अधोरेखित झाल्यानंतर या २३ नेत्यांसह अन्य काही नेते गांधी घराण्याला आव्हान देणार का हा प्रश्न कळीचा ठरेल. यातून काँग्रेसमध्ये फूट वगैरे काही पडणार नाही. काही नेत्यांना पक्षातून काढणे किंवा त्यांचे जाणीवपूर्वक महत्व कमी करणे हे प्रकार होऊ शकतील. आतापर्यंत अनेक नेते काँग्रेसमधून बाहेर पडले पण तरीही पक्षावर त्यांच्या जाण्याचा फार परिणाम झाला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आताइतका काँग्रेस पक्ष कधीच कमकुवत नव्हता. तेव्हा असे प्रकार होणे पक्षाला परवडणारे नाही. ममतांनी बंगाल तिसर्‍यांदा जिंकला आहे. या विजयानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे आणायच्या हालचाली सुरू होतील ही शक्यता आहे. तृणमूलला युपीए मध्ये घेऊन ममतांना युपीएचा चेहरा (पर्यायाने पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार) बनविणे हा एक पर्याय असेल किंवा काँग्रेस सोडून इतर प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी (१९९० च्या दशकात झाली होती त्याप्रमाणे) करून त्याचे नेतृत्व ममतांकडे देणे हा दुसरा पर्याय असेल. या प्रस्तावित आघाडीत जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, केजरीवाल, हेमंत सोरेन, कदाचित नवीन पटनायक हे नेते जाऊ शकतील. या दोन पैकी काय होईल (की काहीच होणार नाही) हे येणारा काळच ठरवेल. मात्र या घडामोडीचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल हे बघणे रोचक ठरेल. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे मतदार विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये फरक करत असतो. लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान निवडायचा असल्याने लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांना फायदा होतो. याची अनेक उदाहरणे आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुक झाली. त्यात ११९ पैकी विधानसभेची अवघी एक जागा भाजपला मिळाली होती. पण त्यानंतरच पाच महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील लोकसभेच्या १७ पैकी ४ जागा भाजपने जिंकल्या. डिसेंबर २०१८ मध्ये भाजपचा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्येही पराभव झाला होता. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र या राज्यांमधील एकूण ६५ पैकी ६२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी हा निकष ठेवला असता तर अर्थातच तितक्या जागा भाजपला जिंकता आल्या नसत्या. हे का झाले? कारण लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रात कोण सरकार स्थापन करू शकेल या मुद्द्यावर लोकांनी मते दिले आणि तिथे मोदींचे पारडे आपोआप जड झाले. अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता विधानसभा निवडणुक झालेल्या चारपैकी तीन राज्यातील मुख्यमंत्री बर्‍यापैकी लोकप्रिय होते- किमान त्यांना स्वतःचा जनाधार राज्यात होता. तामिळनाडूच्या पलानीस्वामींना तसा फार जनाधार होता असे वाटत नाही पण इतर तीन मुख्यमंत्र्यांना नक्कीच जनाधार होता. बंगालमध्ये ममतांना आव्हान द्यायचे तर भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार होते? बोंब तिथे होती. आसामातही तरूण गोगोई गेल्यानंतर काँग्रेसकडे तसा लोकप्रिय चेहरा राहिला नाही. तेव्हा सरबानंद सोनोवाल या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला आव्हान काँग्रेसकडून कोण देणार? प्रश्न तिथे होता. केरळमध्ये काँग्रेसकडील रमेश चेनिथल्ला आणि ओम्मेन चंडी हे चेहरे विजयन यांना पुरे पडू शकले नाहीत. आता हेच चित्र राष्ट्रीय पातळीवर नेले की २०२४ मध्ये मोदींना आव्हान द्यायला काँग्रेस सशक्त असणे किती गरजेचे आहे हे समजेल. मोदी लोकप्रिय आहेत, मोदींना भरपूर जनाधार आहे यात काही वाद असायचे कारणच नाही. अशा लोकप्रिय मोदींना आव्हान द्यायचे असेल तर अखिल भारतीय पातळीवर लोकप्रिय (किमान ओळखीचा) चेहरा तरी विरोधी पक्षांनी पुढे आणणे गरजेचे आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव होऊनही काँग्रेसला पूर्ण देशात जवळपास १२ कोटी मते होती. हा आकडा खूप मोठा आहे. विरोधी पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला त्या खालोखाल अडीच कोटी मते होती. तेव्हा २०२४ मध्ये काँग्रेसकडून मोदींना आव्हान देणारा कोणता चेहरा पुढे आला तर पक्षाचे राष्ट्रीय अस्तित्व या कारणाने फायदा होऊ शकेल. ममता बॅनर्जी बंगालमध्ये कितीही लोकप्रिय असल्या तरी हिंदी भाषिक राज्ये, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक वगैरे राज्यांमधून 'मला पंतप्रधान करा' या आधारावर मते फिरवायची ताकद त्यांच्यामध्ये आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. अर्थात कोणी म्हणू शकेल की २०१४ मध्ये मोदींविषयीही असेच बोलले जात होते. पण त्यापूर्वीची १० वर्षे युपीएची अत्यंत निराशाजनक कामगिरी असलेले सरकार आणि प्रचंड प्रमाणावर प्रस्थापितविरोधी लाट त्यावेळी होती आणि भाजप कार्यकर्ते-संघ स्वयंसेवक यांची फौज त्यांच्या दिमतीला होती. मोदींचा कारभार अगदी युपीए सरकार इतकाच किंवा त्यापेक्षा जास्त भोंगळ आहे हा विरोधकांचा मुद्दा मान्य केला तरी ममता इतर राज्यांमध्ये मते फिरवू शकतील का हा प्रश्न हा एक कळीचा मुद्दा आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काँग्रेसच्या या निराशाजनक कामगिरीचा पक्षावर आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर नक्की काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल. पक्षावर व राष्ट्रीय राजकारणावर अत्यल्प परीणाम होईल कारण कॉंग्रेसमध्ये आता गांधी वगळता कोणताही नेता शिल्लक नाही. त्यामुळे गांधीऐवजी दुसरे आडनाव असलेला नेता पक्षाध्यक्ष होणे अशक्य आहे. नाराज असलेल्या २३ नेत्यांपैकी कोणत्याही नेत्यात पक्षाध्यक्ष होण्याची कुवत नाही, बहुसंख्य वयस्कर आहेत आणि बहुतेकांना जनाधार नाही. यातील काही जण पुन्हा एकदा पत्र वगैरे लिहून नाराजीचा सूर लावतील, परंतु यातील कोणीही पक्ष सोडणार नाही. फार तर राहुलऐवजी प्रियंका इतकाच बदल होऊ शकतो. परंतु उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल अशा राज्यात प्रियंकाने जोरदार प्रचार करूनही तेथे कॉंग्रेसची पाटी जवळपास कोरी राहिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जराजर्जर अवस्था कायम राहील. कॉंग्रेस सत्तेत असलेल्या पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री वयस्कर आहेत. त्यातल्या त्यात पंजाबच्या अमरिंदर सिंह यांचीच कामगिरी बरी आहे. जर कॉंग्रेस सत्तेत असलेल्या एखाद्या राज्यात कॉंग्रेसने तुलनेने तरूण मुख्यमंत्री निवडला व त्याने राज्यात खूप चांगले काम केले तर भविष्यात त्याला राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे आणता येईल (जसे भाजपने २०१३ मध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह वगैरे जुने नेते बाजूला करून मोदींना पुढे आणले). या प्रस्तावित आघाडीत जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, केजरीवाल, हेमंत सोरेन, कदाचित नवीन पटनायक हे नेते जाऊ शकतील. हे सर्व नेते, तसेच पवार, ममता, नितीश कुमार इ. ना स्वतःच्या राज्याबाहेर स्थान नाही. मुळात हे सर्व एकत्र येऊन आपल्यातील कोणीतरी एखादा/दी कर्णधार म्हणून मान्य करणे अशक्य आहे. अशा कडबोळ्यावर जनता फारसा विश्वास ठेवत नाही व असे कडबोळे फारच थोडा कळ एकसंध राहते हे १९७७ पासून अनेकदा दिसले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे. + १ भाजपने काही अत्यंत गंभीर घोडचुका केल्या तरच २०२४ किंवा त्यानंतर भाजपची घसरण होऊ शकते.

In reply to by श्रीगुरुजी

कॉंग्रेसने तृणमूल कॉंग्रेस आपल्यात विलीन करून ममताला पक्षाध्यक्ष केले, तर कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर एक विजयी चेहरा व मोदींना पर्याय देता येईल. जगनमोहन रेड्डींंना सुद्धा पुन्हा पक्षात आणले पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे. हे जरी खरे असले तरी गुरुजी मनात एक धास्ती आहे ती म्हणजे भारतीय समाज कधी कोणाला डोकयावर घेईल आणि कधी कोणाला पायाखाली हे सांगता येत नाही ! आणीबाणी संपली .. परत इंदिराजींना राक्षसी मतदान इंदिराजी गेलया लगेच राजीव ना राक्षसी बहुमत मोदी म्हून माझे मत पक्षाला.. पक्षाची धोरणे काय ? काही बघायचे नाही ! उद्या मोदी नसले तर पक्षाला खाली आपटणार ! हि कसली परिपकव लोकशाही .. भावनात्मक मतदान नुसतं आणि त्यात मग बाकीचे रंग तर आहेतच एकीकडे म्हण्याचे "जगातील सर्वात मोठ्ठी लोकशाही " आणि साधे २ तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष पण होऊ द्यायचे नाहीत मी प्राथर्ना करतो कि हि स्थानिक बुजगावणी बंद पडून काँग्रेस परत सबळ होऊ दे

In reply to by चौकस२१२

+1 काँग्रेस पार्टी (वजा गांधी घराणे) हा पर्याय पेपर वर तरी इतका वाईट नाही. ममता, उद्धव आणि तत्सम entities यांना संपूर्ण भारताचा विचार करण्याचा पोच पण नाही आणि तेवढी कुवत ही नाही. पण दुर्दैवाने जेव्हा काँग्रेस चे सध्याचे नेते तोंड उघडतात, तेव्हा त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक संपदे बाबतीत प्रश्न निर्माण होतो (उदाहरणार्थ, नाना पटोले कालच म्हणाले की केंद्र सरकारने पुनावाला यांना Y security त्यांची रेकी करण्यासाठी दिली आहे).

In reply to by चौकस२१२

मुळात जनता पक्ष हीच ५ पक्षांची खिचडी होती व ते स्वकर्तुत्वाने सत्तेत न येता इंदिरा गांधींवरील जनतेच्या रागामुळे सत्तेत आले होते. जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच मोरारजी, चरणसिंग व जगजीवन राम या वरीष्ठ नेत्यांमध्ये पंतप्रधान पदावरून धुसफूस सुरू होती. आपल्या अडीच वर्षांच्या काळात महागाई नियंत्रण हे एकमेव चांगले काम त्या सरकारने केले होते. त्यांनी इतर सर्व वेळ इंदिरा गांधीना तुरूंगात डांबणे, सूड उगविणे यात वाया घालविला. आपण या सरकारचे बळी आहोत ही प्रतिमा इंदिरा गांधींनी कौशल्याने उभी करून सहानुभूती मिळविली होती. साधारणपणे अशीच प्रतिमा मोदींनी २००४-२००१४ या काळात व या निवडणुकीत ममतांनी उभी करून फायदा मिळविला होता. जनतेची सहानुभूती, आपापसातील भांडणे व शेवटी पक्षविभाजन यामुळे इंदिरा गांधी १९८० मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत परतल्या होत्या. एखाद्या अनुभवी कामगारावर राग म्हणून त्याला काढून त्याचे काम अननुभवी कामगाराला द्यावे व ते त्याला न जमल्याने अनुभवी कामगाराला पगारवाढ देऊन परत बोलवावे असे या बाबतीत झाले होते. राजीव गांधींना फक्त सहानुभूतीचाच प्रचंड फायदा झाला होता. त्या काळात समाजमाध्यमे, आंतरजाल वगैरे नव्हते हे अजून एक महत्त्वाचे कारण. भाजप फक्त एका व्यक्तीवर अवलंबून नाही व पक्षात तशी भांडणे नाहीत. तसेच समाजमाध्यमे, आंतरजाल यामुळे मिळालेल्या माहितीतून जनता योग्य पर्याय निवडू शकते. त्यामुळे मोदींनंतर जनता लगेच कॉंग्रेसला परत आणेल असे नाही व भाजपलाही सत्तेत कायम ठेवेल असेही नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

छान विश्लेषण! धन्यवाद! आता मार्च २०२२ ला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर, तसेच नंतर गुजरात, हिमाचल आणि २०२३ ला कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कांही लहान राज्ये- इतक्या निवडणुका पुढच्या लोकसभेआधी आहेत. आपण म्हणल्याप्रमाणे या विधानसभा निवडणुकांत कसेही लागले तरी राष्ट्रीय पातळीवर सक्षम विरोधक सध्या तरी दिसत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अगदी दोनच दिवसांपूर्वी तुमचं विश्लेषण वेगळं होतं. भाजपाच्या विजयाची खात्री असल्याने इलेक्शन कमिशनबाबत इतर पक्ष थयथयाट करत आहेत असं तुमचं मत दिसलं. यातही भाजपाचं काय चुकलं याच्या आत्मपरिक्षणापेक्षा मरणासन्न कॉँग्रेस कसा आडवा झालाय वगैरे आपटाआपटी चालू आहे.

मतदारांनी विद्यमान आदरणीय पंतप्रधान, आदरणीय गृहमंत्री, केंद्रीय मंत्रीमंडळ, समस्त भाजपा आमदार, खासदार, समस्त कलाकार, प्रशासनातील सर्व व्यवस्था, निवडणूक आयोग यांची काही तरी इज्जत म्हणून, एवढ्याशा जागांसाठी ज्यांनी संपूर्ण देश आणि शिष्टीम करोना काळात वेठीस धरलेली होती, म्हणून आपण बंगालवासियांनी ज्या शीटंस निवडून दिल्या. जवळपास तीनाच्या सत्तावीस पटीने अधिक संख्या आहे, त्याचं समाधान आहे. आभार. तुर्तास इतकेच. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे मत भाजपा निवडून यावा असे होते. किमान त्यानंतर तरी रंगा-बिल्ला आपले निवडणुकीचे राजकारण बाजूला ठेवून करोनाचा मुकाबला करण्याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा होती. असो.

In reply to by आजानुकर्ण

माझे मत भाजपा निवडून यावा असे होते.
काय करणार, हे बंगाली लोक जादुगार निघाले. बंगाली जादू तशी प्रसिद्धच आहे. बंगालसाठी सेठ लोकांनी काय नै केलं. अच्छे दिनाचे निमंत्रण दिलं, बंगाल सोडून सर्व देश कसा सुजलाम सुफलाम आहे ते सांगितलं. बंगालसाठी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर बनले, बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य रणसंग्रामात सत्याग्रह केल्याची आठवण जनतेला करुन दिली. बांग्लादेशाला लशी पुरवल्या. चोवीस बाय सात, देशाची अहोरात्र सेवा चालू असतांना ते सोडून करोना काळात आंतरराष्ट्रीय बदनामी झाली तरी त्याला फाट्यावर मारुन प्रचार केला. टीव्हीवर येऊन दोनशेपेक्षा जास्त शीट्स निवडून येऊन आम्ही सरकार स्थापन करु अशा गप्पा मारल्या. एवढं खोटं बोलायची ताकद येते कोठून येते तेच कळत नाही. टाइम्स नाऊच्या मुलाखतीत तर आदरणीय गृहमंत्र्यांचा आव तर असा होता की २९२ पैकी ३०० जागा निवडून येतील, असे ते अविर्भाव होते. कसं जमतं इतकं बाता मारायला देव जाणे. पण योग्यवेळी जनतेने नीट धडा दिला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकाळ मधील ब्रिटिश नंदी... तो निदान विनोदी तरी लिहितो यांना सगळंच काळ बेर दिसंत एक प्राध्यापक आणि विचारवंत नागरिक म्हणून हे तरी कबुल करा कि ज्या पक्षाची निशाणी सुद्धा नवहती त्या पक्षाने ३ चे ७७ केले ! आणि ते सुद्धा बंगाल मध्ये .. एकवेळ पंजाब मध्ये शिखानची मने जिकून भाजप न सत्ता मिळवली तर आशचर्य वाटणार नाही पण बंगाल , गोवा आणि केरळ मध्ये पुढे कदाचित हे भाजपने करून दाखवले तर त्यांची दखल (कुठले हि रडगाणे न गाता ) दाखवण्याचा तरी मनाचा मोठेपणं दाखवा ! तो दिन कधी येईल असे वाटत नाही ( म्हणजे प्राध्यापकांनी भाजपने काही तरी "बरे केले" हे म्हणण्याचा दिवस!) एक विनंती बाकी सकारात्मक टीका चालू असदुद्दे .. आणीबाणी नाहीये त्यामुळे बोलण्यास मुभा आहे

In reply to by प्रचेतस

हो कळलं .. मी त्यांच्या लिखाणाला आणि लिखाणातील कोडगेपणा ला ब्रिटिश नंदीचीच उपमा देतोय पण निदान ब्रिटिश नंदी चे लिखाण मनोरंजक तरी असते एकांगी असले तरी .. येथे तर फक्त थाळी कुचेष्टा आणि सगळी कडे एकाच एक द्वेष

In reply to by प्रचेतस

तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि विखारी वाटते. मी तुमच्या अत्यंत सहमत आहे. त्यपेक्शा चौकसजींनी हाच निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता म्हणजे त्याला माझ्या नजरेत तरी विचारधन समजले गेले असते.

In reply to by गॉडजिला

मी मोदींचा समर्थक आहे हे गृहीत धरताय कि काय ! निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता .. घ्या -मोदींचा चमको पनाचा कंटाळा येतोच कि,,, - त्यांना हिंदू कंपू मधील काही अति टोकाची विधाने करणाऱ्या व्यक्तींना काबूत ठेवले पाहिजे - भाजपात आयाराम गायराम फार होत आहेत - "राष्ट्रीयत्व " या मुद्य्याचा दर वेळी वापर करणे हे त्यांचे आणि पक्षाचे चुकत आहे असे वाटतेय - कुंभ मेला तो सुद्धा या प्रमाणात होऊ दिला हे चुकलेच .. एक पक्ष म्हणून आणि एक निर्णय घेणारा त्या पक्षाचा नेता म्हणून आपलं पाठिंबा आहे पण तो नक्कीच आंधळा नाही आणि मोदीच कशाला तो पक्ष दुसरे हि लोक पुढे आणील... हाय काय आणि नै काय ! "काका हलवाई ची बाकरवडी खाणाऱ्याला चितळेची बाकरवडी" वर्ज असू नये .. दोन्ही ठिकाणची खा जेव्हा जिथे जी चांगली असेल तेव्हा एकाची आवडते म्हणून दांभिक पानाने दुसऱ्याला फक्त नावे ठेऊ नका येवढेच .. पण जेव्हा लोक अशी चापलुसी करतात तेव्हा आपण रोख ठोक प्रशन विचारतो त्याला "विखारी" वगैरे म्हणणार असाल तर म्हणा...

In reply to by चौकस२१२

चौकस राव, मराठी कच्चं की हो तुमचं. माझ्या मते focus word was विचारधन ;) तुम्हाला नव्हता, शालजोडितला होता तो. निदान मी तरी तसचं वाचलं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण पहिला येणार म्हणून नाचणारा मुलगा पहिला आला नाही, परंतु बऱ्यापैकी पण अपेक्षेपेक्षा बरेच कमी गुण मिळवून उत्तीर्ण झालाय. पण तो पहिला न आल्याने शून्य गुण मिळवून अनुत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी भान विसरून नाचत बसलेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या समर्थकांची अवस्था IPL मधल्या चिअरगर्ल्स सारखी झालीय. चौकार षटकार कोणीही मारले तरी त्या उठून नाचत बसतात, तसंच यांचं झालंय.