Skip to main content

नव्हतं ठाऊक

लेखक सरीवर सरी यांनी मंगळवार, 13/04/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
आता मनाच पाखरू घर कुठे बांधणार? नव्हतं ठाऊक आठवणींच झाड तू कधी तोडणार| भाळला होतास अखंड चिवचिवाटावर, नव्हतं ठाऊक ध्वनीसाज बोलीचा तू निष्पर्ण करणार| निराळा पसारा जाणूनही.. आवरणार, नव्हतं ठाऊक झाले​ पसा~याचे जाळं तू शिकारी कोळी असणार|
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1793
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

नव्हतं ठाऊक झाले​ पसा~याचे जाळं तू शिकारी कोळी असणार| क्या बात है! मस्त एकदम!