प्राजू तै ची भारी रोमॅण्टीक कविता पौर्णिमा वाचून आम्हाला आणखी एक (एकतर्फी) रोमान्स आठवला.
तोच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न! :X
चू. भू. द्या. घ्या.
देशात रंगलेल्या खेळात येशील का?
हा डाव मतपेटीचा तू पूर्ण करशील का?
बघ मागतो तुला मी आकाश बहुमताचे
मज आस जिंकण्याची, (तू) 'टेकू' होशील का?
(मत)पेटीस घेत हाती मल्हार छेडतो मी
आश्वासनांस भुलूनी, मज चिंब करशील का?
दिवसात कैकवेळा 'मिरवून' येत असतो!
(सत्ता-मुकुट घेऊन स्वप्नी येशील का?)
'भिजती' अनेक रात्री (मत) काळजीत तुझीया
दारूस मी दिलेल्या, वेळी(च) स्मरशील का?
घेतले मीच माझे उद्दीष्ट जीवनाचे
सत्तेत फिरून येण्या, तू 'हात' देशील का?
जरी पाहिले पुन्हा मी तसलेच(!!) स्वप्न माझे
देऊन भीक पुन्हा, सरकार देशील का?
राघव
वाचने
1827
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा.
मस्त रे
राघवा
ग्रेट!!
आयला
आभार!