सांगा वसंत कुणी हा पाहिला
वसंत ऋतू हा कुणालाही वेड लावणारा असतो.
कोरिया आणि जपानात साकूरा अर्थात चेरी ब्लॉसम जेव्हा फुलतो तेव्हा लोक वसंताच्या आगमनाला सज्ज होतात. ही रंगाची मुक्त उधळण साधारण दर ८-१० दिवसांच्या अंतराने बदलत जाते. ती टिपण्याचा हा छोटासा प्रयत्न.
- हिवाळ्यातली कडाक्याची थंडी संपत आल्याची चाहुल आणि येणार्या वसंताचे स्वागत येथील लहानगी देवळांत जाऊन करतात. पारंपारिक कपडे घालून देवळाच्या भव्य लाकडी दरवाज्यावर "येणारा वसंत उदंड पीक/पाणी घेऊन येउदे" ह्या अर्थाच्या पताका डकवतात.(येथील शेती वसंत/ग्रीष्म अशा दोन हंगामात होते.) हा समारंभ ४ फेब्रुवारीला (तिथीप्रमाणे) होतो
- नंतर हळुहळू वातावरण उबदार होते आणि बहर येतो तो "प्लम" च्या झाडांना. (मिपाकर )हिमानीने एक जलरंगात चित्र बनविले होते (गेल्या वर्षी)
- प्लमचा बहर ओसरतोय न ओसरतोय तोच चेरीच्या झाडांना बहर येतो आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी बागांमधे लोटतात. चेरीच्या फुलांनी लगडलेल्या झाडाखाली निवांत बसावे, मंद वारा वाहात असतो, मधेच ती नाजूक फुले टपटप करून आपल्या अंगावर गळतात ... त्याचा आनंद घेत न्याहारी/बियर/इ. चा आस्वाद घेत दिवस मोठा छान जातो.
- पानाचा लवलेशही नसलेले आणि फुलांनी गच्च भरलेले चेरीचे झाड पाहून वेडी होणार नाही अशी व्यक्ती विरळाच. त्यात भर म्हणून की काय, इथल्या म्युशीपालट्या रस्ते/कॅनॉल/नदीकाठ अशा ठिकाणी दुतर्फा चेरीची झाडे लावतात.
- चेरीचा बहर जेमतेम आठवडाभर असतो. तो संपतोय न संपतोय तोच इतर फुले फुलु लागतात.
चेरीचे शुभ्र पांढर्या बरोबर पिवळा/गुलाबी आणि अशा अनेक छटा असतात त्यांचे जवळून दर्शन.
वर्गीकरण
खरच
In reply to खरच by परिकथेतील राजकुमार
अगदी! मादक
In reply to अगदी! मादक by भाग्यश्री
+१
मस्त
चेरी ब्लॉसम्
अप्रतिम
सुरेख फोटो..
मस्त आहेत फोटो
सुंदर
सुंदर
मस्तच !!
झकासच !!.... :)
अप्रतिम
वॉव..
In reply to वॉव.. by स्वाती दिनेश
+१
मस्त
दुसरा फोटो
रंग दे बसन्ती!
धन्यवाद