Skip to main content

सांगा वसंत कुणी हा पाहिला

लेखक विंजिनेर यांनी मंगळवार, 14/04/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

वसंत ऋतू हा कुणालाही वेड लावणारा असतो.
कोरिया आणि जपानात साकूरा अर्थात चेरी ब्लॉसम जेव्हा फुलतो तेव्हा लोक वसंताच्या आगमनाला सज्ज होतात. ही रंगाची मुक्त उधळण साधारण दर ८-१० दिवसांच्या अंतराने बदलत जाते. ती टिपण्याचा हा छोटासा प्रयत्न.

  1. हिवाळ्यातली कडाक्याची थंडी संपत आल्याची चाहुल आणि येणार्‍या वसंताचे स्वागत येथील लहानगी देवळांत जाऊन करतात.
    पारंपारिक कपडे घालून देवळाच्या भव्य लाकडी दरवाज्यावर "येणारा वसंत उदंड पीक/पाणी घेऊन येउदे" ह्या अर्थाच्या पताका डकवतात.(येथील शेती वसंत/ग्रीष्म अशा दोन हंगामात होते.) हा समारंभ ४ फेब्रुवारीला (तिथीप्रमाणे) होतो
  2. चित्र उपलब्ध नाही

  3. नंतर हळुहळू वातावरण उबदार होते आणि बहर येतो तो "प्लम" च्या झाडांना. (मिपाकर )हिमानीने एक जलरंगात चित्र बनविले होते (गेल्या वर्षी)
  4. चित्र उपलब्ध नाही

  5. प्लमचा बहर ओसरतोय न ओसरतोय तोच चेरीच्या झाडांना बहर येतो आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी बागांमधे लोटतात. चेरीच्या फुलांनी लगडलेल्या झाडाखाली निवांत बसावे, मंद वारा वाहात असतो, मधेच ती नाजूक फुले टपटप करून आपल्या अंगावर गळतात ... त्याचा आनंद घेत न्याहारी/बियर/इ. चा आस्वाद घेत दिवस मोठा छान जातो.
  6. चित्र उपलब्ध नाही

  7. पानाचा लवलेशही नसलेले आणि फुलांनी गच्च भरलेले चेरीचे झाड पाहून वेडी होणार नाही अशी व्यक्ती विरळाच. त्यात भर म्हणून की काय, इथल्या म्युशीपालट्या
    रस्ते/कॅनॉल/नदीकाठ अशा ठिकाणी दुतर्फा चेरीची झाडे लावतात.
  8. चित्र उपलब्ध नाही
    चेरीचे शुभ्र पांढर्‍या बरोबर पिवळा/गुलाबी आणि अशा अनेक छटा असतात त्यांचे जवळून दर्शन.
    चित्र उपलब्ध नाही
    चित्र उपलब्ध नाही
    चित्र उपलब्ध नाही

  9. चेरीचा बहर जेमतेम आठवडाभर असतो. तो संपतोय न संपतोय तोच इतर फुले फुलु लागतात.
  10. चित्र उपलब्ध नाही

ह्या नंतर असते ती रान गुलाबांची मादक उधळण पण त्याला अजून महिना-दोन महिने अवकाश आहे. तो पर्यंत आपली रजा घेतो :)

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5040
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

खरच रंगबिरंगी वसंताची 'मादक उधळण'' बर का साहेब :)
मस्त वाटले एकदम छायाचीत्रे बघुन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य


In reply to by परिकथेतील राजकुमार

अगदी! मादक उधळण आहे..
अप्रतिम फोटोज..
चेरीचे फुल किती नाजुक असतं! :)


मस्त माहिती आणि फोटो.:)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.


छान आलेत फोटो !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..


साकुरा चे फोटो जबर्‍या आलेत... :) कुठे टोक्यो मधेच काढलेत का?
मी पण गेलो होतो शिंजुकु ग्योएन मधे... हे फोटो कुठले आहेत ?

-----------------------
केदार जोशी


प्रतिक्रिया नोंदवणार्‍यांचे अनेक आभार.
जे वाचनमात्र होते त्यांना ही धन्यवाद.

@केदार्_जपानः काही फोटो टोक्यो मधे काढले आहेत (नेरीमा-कु मधे) तर काही सोलच्या योईदो-पार्क मधले आहेत. दोन्हीकडचा वसंतऋतू टिपण्याचा सुदैवाने योग आला :)

@अमोलः दुसरा फोटो हे हिमानी ने काढलेले जलरंगातील चित्र आहे. मुळ छायाचित्र वर्तमानपत्रातील होते.

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही