http://misalpav.com/node/48684 इथे प्रतिसाद म्हणून लिहिणार होतो. पण मूळ लेखापेक्षा प्रतिसाद मोठा व्हायला लागला त्यामुळे नवीन जिलेबी पडायची ठरवली.
कोरोनाकाळात आमच्यासारख्या विंडो शॉपिंग करणार्या लोकांचे हक्काचे ठिकाण म्हनजे मिपाबाजार.. या बाजारात हर तऱ्हेची दुकाने आहेत. पण आजकाल काही दुकादारांकडून गोंधळ घातला जात असल्याने मिपाबाजार नेहमीचं गजबजलेला असतो.
बाजारात १८८ नंबर ला जे दुकान आहे ते दुकान एकदम मस्त आहे. प्रत्येक प्रकारचा माल तिथे मिळतो.. एक प्रकारचं D MART च म्हणा ना. अगदी कोणत्याही वस्तूचे नाव घ्या तिथे ती मिळणारच. पण दुकानाच्या मालकांना कमळाच्या वासाची अलार्जी आहे. त्यामुळे कधी तिकडे गेलात तर कमळ फुल जवळ ठेवणे, कमळाचा सेंट मारणे कटाक्षाने टाळा नाहीतर मालक अक्षरशः अंगावर येतात.
तिथेच बाजूला बाहुबली नावाचं आणखी एक दुकान आहे. तिथे १८८ मध्ये असणाऱ्या वस्तूंची जाहिरात केली जाते. १८८ नंबर दुकानात एखादा माल आला रे आला की बाहुबली नावाच्या दुकानामधून जाहिरात केली जाते.
चार पाच दुकाने सोडून मूव्ही अश्या आधुनिक नावाचे आणखी एक दुकान आहे.
गोल गोल राणी या गाण्याची सीडी फक्त तिथेच मिळते.
तिथेही अनेक वस्तू मिळतात पण शेती आणि त्याच्याशी संबंधित वस्तू तिकडे जास्त चांगल्या मिळतात. माझे जवळचे नातेवाईक " बाप्पू " यांनी तिथून बऱ्याच वेळेला खरेदी केली आहे.
यांची आणी दुकान नंबर १८८ यांची नेहमीच चढाओढ चालू असते की चांगलें दुकान कोणाचे. त्यांच्या भांडणामुळे बाजारात नेहमीच गोंगाट आणि गोंधळ असतो. बरेचसे पब्लिक स्पेशली हा गोंधळ बघायला बाजारात येतात.
या सर्व भांडणात मूव्ही दुकानाचे मालक पण काही कमी नाहीत. एक शब्द पडुन देत नाहीत. कित्येक प्रोडक्ट च्या जाहिराती आणि पांपलेट्स ते बाजारात आणून आणून वाटत असतात. त्यानी पांपलेट पब्लिश केले रे केले की १८८ वाले त्याच प्रोडक्ट मधले defects सांगणारे दुसरे पांपलेट आणतात आणि बाजारात pablish करतात..
असा हा खेळ अनंत काळापर्यंत चालूच असतो.
अजून थोडे पुढे गेल्यावर सुहाना मल्टीपरपस शॉपी आहे. दुकानात बरेचसे प्रकारच्या वस्तू मिळतात . बहुदा "अमेरिकेतून" आणत असाव्यात. वस्तू एकदम चांगल्या दर्ज्याच्या आणि सर्व कागदपत्रासोबत असतात. क्वालिटी चांगली असल्याने त्या दुकानाच्या owner थोड्या rude पणे बोलतात. पण त्यांचे बोलणे सडेतोड असते. टीका परखड आणि रोखठोक असतात. त्यामुळे १८८ वाले आणि इतर दुकानदार पण थोडे टरकून असतात.
सहसा त्या मालकीणबाई कोणाच्या वाट्याला जात नाहीत पण कोणी दुकानदार आडवा आला तर त्याला डायरेक्ट भुईसपाटच करुन टाकतात.
अजून पुढे गेल्यावर कुमार हेल्थ सर्व्हिसेस नावाचे आरोग्य विषयक समान विकण्याचे दुकान आहे. तिथले मालक खूपच हुशार आणि सचोटीने व्यवसाय करणारे आहेत. शक्यतो ते इतर कोणत्याही दुकानांमध्ये आणि बाजारात चाललेल्या गोंधळात भाग घेत नाहीत. आपण बरे आणि आपले काम बरे, असा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांची गट्टी सर्वांशी जमते.
अश्याच प्रकारचे अजून एक दुकान आहे. "खरे" हेल्थ सर्व्हिसेस नावाचे. तिथे सुद्धा चांगल्या क्वालिटी च्या आरोग्यविषयक वस्तू मिळतात. पण त्याचसोबत तिथे इतर प्रकारच्या वस्तू देखिल मिळतात. कदाचित याच मुळे त्यांची इतर दुकान मलकासोबत भांडणे आणि वादविवाद होतात पण नावाप्रमाणेच त्यांचे युक्तिवाद देखिल "खरे" च असतात.
"गणेश" एंटरप्रायजेस नावाचे एक दुकान आहे. त्यांचं आणि १८८ नंबरच समान बऱ्याच वेळेला सारखेच असते पण ते वस्तूचे पॅकिंग, क्वालिटी, कागदपत्रे इ गोष्टी खूप चांगल्या प्रकारे देतात त्यामुळे कधीकधी मी यांच्याकडून वस्तू खरेदी करतो..
सेम असेच दुकान कोपऱ्यावर प्राध्यापक साहेबांचे आहे. त्यांच्या दुकानाचे नाव वेगळे असले तरी सर्व बाजारात त्याला प्राध्यापक साहेबांचे दुकान म्हणूनच ओळखले जाते. तिथेही सर्व प्रकरचा माल मिळतो. कित्येक वेळेला चांगला असतो पण "डावखुऱ्या" लोकांना तिथल्या वस्तू विशेष आवडतात.
बाजारात पूर्वी एक दोन अध्यात्मिक बाबांची पण दुकाने होती. पण काही कारणास्तव बाजार समितीने ती दुकाने कायमची बंद केली.
३ नंबर गल्लीत "चंद्र"कांत आणि "सन"स् यांचे world फेमस दुकान आहे. यांचे पूर्वज आणि अमेरिकेचे बिल "क्लिंटन" यांचे पूर्वज कदाचित एकच शाळेत शिकले होते. या दुकानाचे मालक आकडेवारी , तारखा, statistics या गोष्टीत खूपच फेमस आहेत. फालतू बडबड करणारी गिऱ्हाईक आणि इतर दुकानदार यांच्या तोंडावर फाडफाड आकडे फेकून त्यांना "आकडी " आणण्यात स्पेशालिस्ट आहेत.
"जोकर" नावाची एक सर्कस देखिल मिपाबाजारात खूप फेमस होती.
तिथला विदूषक कायमच "तर्राट" असायचा. पण नंतर नंतर बाजारातील लोकांनी त्याच्याबाबत तक्रार केल्यामुळे त्याने सर्कस बंद केली. दुसऱ्या शहरातील कोणत्यातरी बाजारात त्याची सर्कस अजूनही चालू आहे असं जाणकार सांगतात.
जागू नावाचे एक फेमस नॉन वेज हॉटेल आहे मिपाबाजारात. मासे आणि सीफूड बाबत त्यांची स्पेशालिटी आहे.. पण सध्या तिथं नवीन डिशेस येताना दिसत नाहीत.
काही हात विक्री वाले बाजारात कॅलेंडर, डायऱ्या इ विकत असतात. मागच्या वर्षी याच तारखेला काय झाले होते याबाबत लोकांना माहिती देत असतात.
देशमुखकाका नावाचे सद्गृहस्थ गल्लीच्या शेवटी छोटेखानी दुकान चालवतात. काका खूप वयस्कर असल्याने आणि खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असल्याने त्यांच्याजवळ आठवणीचा पेटारा आहे. गिराईक आले रे आले की काका त्यांना सुंदर आठवणी सांगून अर्धा तास तरी दुकानातून बाहेर जाऊ देत नाहीत.
याचसोबत काही छोटेमोठे इतर दुकानदार आपला आपला माल विकला जावा म्हणून नेटाने प्रयत्न करत असतात पण वर सांगितलेल्या प्रसिद्ध दुकानदारांची रोजची शाब्दिक चकमक आणि गोंधळात या इतर दुकानदारांची व्यवस्थित जाहिरात होत नाही आणि मग त्यांच्याकडे कमी गिऱ्हाईके येतात.
असा हा मिपाबजार नेहमीचं गजबजलेला असतो. गिऱ्हाईक येतात जातात. दुकाने उघडतात बंद होतात.. पण बाजार नेहमीच सुरू असतो. आणि तो नेहमीचं सुरु राहील.
वाचने
19730
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
लई भारी बाप्पूसाहेब, एकदम झकास बर्रका.
बापू साहेब
चैत्रात होळी :)
मिपाबाजार एकदम फर्मास.
लई भारी ...
@चौरा: पुराणवस्तुचे दुकान कोणते, काही हिंट द्या वो
In reply to लई भारी ... by चौकटराजा
त्या दुकानाचा पत्ता
In reply to @चौरा: पुराणवस्तुचे दुकान कोणते, काही हिंट द्या वो by चित्रगुप्त
त्या दुकानाचा पत्ता
In reply to @चौरा: पुराणवस्तुचे दुकान कोणते, काही हिंट द्या वो by चित्रगुप्त
आजकाल बाजारात कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे
शोले काॅईन, बाजारात आले आहे
In reply to आजकाल बाजारात कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे by मुक्त विहारि
म्हणजे म्हणजे ..
In reply to शोले काॅईन, बाजारात आले आहे by मुक्त विहारि
हो ना ....
In reply to म्हणजे म्हणजे .. by चौकटराजा
:)
शा वि कु.. :) :)
In reply to :) by शा वि कु
आनंद घारेंचे मिसळपाववरील
लई भारी ! वाचून खूप मजा आली.
वा !
दांडी गुल झाली .. प्रथम त्या
मस्त, आवडेश!!
बाजाराची नेमकी जाण आहे
बाजारतच ऐन मध्यावर पर चेत अस
In reply to बाजाराची नेमकी जाण आहे by गॉडजिला
फर्मास
काही जण फुटपाथवर उभ्याउभ्याच हिरे माणकं विकतात.
भारी लिहिलंय, एकदम चपखल!
झकास !
छान.
व्वा ,, हा बाजार असाच चालत
मस्त लिहिलंय.
मस्तच. प्रचेतस..
In reply to मस्त लिहिलंय. by प्रचेतस
सही हैं प्रचेतस ! ✔
In reply to मस्त लिहिलंय. by प्रचेतस
Market यार्ड
हाहाहा
188 आणि भाऊबली हे दोन आयडी
मस्त
मिपाबजारातील सर्व
लै भारी !
लै भारी !
वाचताना ज्याम धम्माल आली ! बापूसाहेब, साष्टांङ दंडवत _/\_लेख आणि प्रतिक्रियांचा बाजार
मी जेमतेम चाळीशी ओलांडली आहे
In reply to लेख आणि प्रतिक्रियांचा बाजार by वामन देशमुख
मिडलाईफ
In reply to मी जेमतेम चाळीशी ओलांडली आहे by चौथा कोनाडा
मिडलाइफ / मिडवाइफ
In reply to मिडलाईफ by मुक्त विहारि
हो तर ...
In reply to मिडलाइफ / मिडवाइफ by वामन देशमुख
मिडवाईफचा कोमिकल अर्थ तुम्ही
In reply to मिडलाइफ / मिडवाइफ by वामन देशमुख
मुवि
In reply to मिडलाईफ by मुक्त विहारि
काय करणार?
In reply to मुवि by अमर विश्वास
मिपाबाजारास प्रणाम. आणि आमची एक क्विता.
रचना नाय कळ्ळी !
In reply to मिपाबाजारास प्रणाम. आणि आमची एक क्विता. by डॅनी ओशन
खरपूस
हा हा हा..
बसवला टँपोत