Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 14/04/2021 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे. यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल. युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली. हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे. पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी. अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या. ... ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.

वाचने 70447
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

मेल चेक करून बघा सर्व माहिती दिली असेल.
बरोबर आहे. माझे खाते खाजगी बँकांत आहेत. तिथून मला माझ्या कामाचे मेल्स (आणि प्रोमोशनल मेल्स पण) येतात. त्या खाजगी बँकांची सेवा तुलनेने चांगली आहे असा माझा अनुभव आहे.

अदर पुनावालांची जो बायडेन यांना हात जोडून विनंती शेठला असल्या फालतू विषयांवर बोलायला वेळ नाहीये. ते इलेक्शनमध्ये बिझी आहेत.

In reply to by प्रदीप

इथेही ती बातमी दिली आहे. ह्या बातमीत असे म्हटले आहे की अमेरिकेने ह्यासंदर्भात 'डिफेन्स अ‍ॅक्ट'खालील काही तरतूदी वापरून, लसी बनवण्यात वापरांत येणार्‍या काही अत्यावश्यक वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, भारत सरकारला, काही प्रदीर्घ वाटाघाटी कराव्या लागतील, असे दिसते. बहुधा, अमेरिकेच्या स्वतःच्या लसींच्या तरतूदी पूर्ण झाल्यानंतर ह्या वस्तूंवरील निर्बंध शिथल करण्यात यावेत, हा माझा अंदाज आहे.

In reply to by प्रदीप

असेल. पण आम्ही मोदींनाच दोष देणार. आम्हाला बाकी काही माहिती नसली तरी आम्ही मोदींनाच दोष देणार म्हणजे देणार.

In reply to by कपिलमुनी

कुणाचे ट्विट? आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे गल्लीतले राजकारण नाही, तेव्हा ते धीम्या गतीनेच होत असते. दुसरे, सीरम इन्स्टिट्यूट्ला, भारताप्रमाणेच इतरही काही देशांना, त्यांच्या अ‍ॅस्ट्रो-झेनेकाशी असलेल्या करारानुसार, लसी ठराविक प्रमाणांत व मुदतीत देणे बंधनकारक आहे. तेव्हा ह्या वाटाघातीत, भारताप्रमाणेच WHO ही निगडीत असावी. किंबहुना, त्यांचेही संबंध त्यात गुंतलेले आहेत. तसेच, आता अमेरिकेस निर्बंध उठवण्यास वेळ लागेल असे दिसल्यावर सरकारने बहुधा स्फुटनिकला तांतडीने मान्यता दिली असावी- हा माझा कयास आहे. आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची उत्पादनक्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

In reply to by प्रदीप

मोदीद्वेष्ट्यांना अजिबात माहिती आणि समज नसते. प्रत्येक मुद्द्यावरून मोदींना झोडपून स्वत:चे हसू करून घेणे एवढेच त्यांना जमते.

In reply to by प्रदीप

आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे गल्लीतले राजकारण नाही.... ऑ.... आदरणीय महा आदरणीय, पंतप्रधान यांनी पंचावन्न महिन्यात ९३ परदेश दौरे केले त्या परदेश दौ-याची काही फ़लनिष्पत्ती वगैरे काहीच नाही का ? काल अदर पुनावाल्यांनी बायडेनला कच्च्या मालाच्या निर्यातीच्या धोरणावर पुनश्च एकदा विचार करा असे म्हटले, मला वाटतं ही सरकारची स्वत:ची आयडीया असावी. अमेरिका कशी दुजाभाव करीत असून त्यांचं स्वरुप जगासमोर उघडे करायचा हा प्रयत्न असावा, एकदा अमेरिकेला जगासमोर नागडे केलं की मग जगावर सत्ता आपलीच. जसे की, परराष्ट्रीय धोरणाचं प्लॅनिंग करतांना आता आपल्याला मध्य-पूर्व आशियातील काही देशांशी धोरण ठरवितांना आपल्याला आता अमेरिकेचं दडपण असणार नाही. अशी काही तरी आंतरराष्ट्रीय माष्टर स्ट्रोक खेळी असावी असे वाटते. ;) -दिलीप बिरुटे (माष्टर स्ट्रोकच्या फॅन)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारताला प्रचंड बुध्दी मत्ता असलेले प्रधान मंत्री मिळाले आहेत.ते की खेळी खेळतील आणि बाकी देशांना चीत पट करतील ह्याचा अंदाज कोणालाच येणार नाही. एवढे बुध्दी चे तेज अमेरिकन राष्ट्र अध्यक्षत थोडीच आहे . भल्या भल्या त्यांची धोरण समजत नाहीत फक्त स्वामिनिष्ठ च धोरण कोणते ही असले तरी देशाच्या फायद्याचेच असणार असा विश्वास बाळगून असतात. नतभ्रश्ट विरोधी लोकांचं नेहमी खोटं दिसत असते..

In reply to by प्रदीप

मोदीविरोधक गेल्या सात वर्षात इतक्या वेळेला उघडे पडले आहेत तरी ते परत परत अज्ञानमूलक विधाने कशी करतात काय माहिती. पुराव्यानिशी मुळातला दावा खोडून काढल्यावर ही मंडळी गायब होणार आणि पुढच्या वेळी दुसरीकडे अशीच एखादी पुडी सोडणार. ती पुडी पण अशी खोडून काढली गेली की परत तिथून गायब होणार हा शिरस्ता गेली सात वर्षे अव्याहतपणे चालू आहे.

In reply to by प्रदीप

तुम्ही जे असेल वगैरे म्हणतंय त्याचा विदा द्या आणि कुणाचे ट्विट हेच माहिती नसेल तर मूळ मुद्दा तुम्हाला कळला नाही किंवा माहिती नाही

In reply to by कपिलमुनी

कुठला विदा तुम्ही माझ्याकडे मागताय? मी दोन बातम्यांचे दुवे दिलेत ते पुरेसे नाहीत? दुसरे, तुम्ही ट्विट्चा नुसताच उल्लेख केला आहे. मला अदर पूनावालाची ट्विट माहिती आहे. तुम्ही एक मोघम उल्लेख केला आहे "ट्विट आताच केले. म्हणजे महिना भर प्रयत्न करून फाट्यावर मारले आहे का ?" तो अदर पूनावालांच्या ट्विटचा आहे की त्यानंतर इतर कुणाच्या, हे स्पष्ट होत नाही. म्हणून विचारले होते, मला मुद्दा कळला आहे, पण तुम्ही माझा प्रतिसाद समजवून घेत नाही आहात, किंवा तसे दर्शवता आहात.

https://m.lokmat.com/crime/pnb-scam-clear-way-nirav-modis-extradition-a… नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला इंग्लंडच्या गृहमंत्र्याने मान्यता दिल्याने आता त्याला लवकरच भारतात आणले जाऊ शकते. मार्च २०१९ पासून तो लंडनमधील तुरूंगात आहे. नीरव मोदीचा मेव्हणा मेहुल चोक्सीने ऍंंटिग्वा बेटावर आश्रय घेतला असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत कायदेशीर व राजकीय लढाई लढत आहे. त्याने प्रचंड रक्कम देऊन त्या देशाचे नागरिकत्व विकत घेतले आहे. भारताच्या दबावामुळे नुकतेच चोक्सीचे नागरिकत्व ऍंंटिग्वाने रद्द केले आहे. परंतु या निर्णयाविरोधात तो न्यायालयात गेला आहे. भारत व ऍंंटिग्वा यांच्यात पदार्पणाचा करार नसल्याने त्याचे प्रत्यार्पण होणे अवघड आहे. मल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन जवळपास वर्ष होत आले. परंतु या प्रत्यार्पणाच्या मान्यतेची फाईल इंग्लंडच्या गृहमंत्र्याकडे अजून अडकली आहे. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण रखडले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कोणतंही बेकायदा काम हे कसलाही मुलाहिजा न बाळगता केले जातात. पण जेव्हा अशी कामं करणारी लोकं पकडल्या जाण्याच्या बेतात असतात, तेव्हा त्यांना कायदा आठवतो. सगळे दुर्योधन हे धर्मराजाला धर्म पाळणे किती गरजेचे आणि योग्य आहे हे या न त्या मार्गानं पोहचवतात. आणि स्वतः कसलाही मुलाहिजा न बाळगता, करणीला चुकत नाहीत. थोडक्यात हे सगळे, कायदा वगैरेचा भरपूर फायदा उठवतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी वाट्टेल तसा वापरून घेतात. अशा दुर्योधनांसाठी काय उपाय होऊ शकतो?

आताच आज तक वर न्यूज वाचली बिहार सरकार corona नी मरणाऱ्या लोकांची संख्या लपवत आहे सरकार जे आकडे देत आहे त्याच्या तिप्पट लोक मरत आहेत. पटना जी बिहार ची राजधानी आहे तिथे तीन च विद्युत दहिण्या आहेत. इतकी वर्ष bjp तिथे सत्तेत सहभागी आहे तरी बेसिक सुविधा पण तिथे उपलब्ध नाहीत. पटना railway station वर एक पण संडास ,मुतारी नाही. यूपी सरकार नी corona ना नी मरणाऱ्या लोकांची संख्या लपवून ठेवण्यासाठी स्मशान भूमी भोवती उंच भिंत बांधली आहे. गुजरात सुद्धा corona बाधित लोकांची संख्या आणि मृत्यू लपवत आहे. गुजरात मध्ये पूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.. असे हाल bjp शासित राज्याचे आहेत. महाराष्ट्र सरकार नी covid सेंटर ची मालिका उभी केली आहे राज्यभर,जेवण आणि औषध फुकट आहेत .उध्दव ठाकरे नी लपवा लपवी केली नाही जे आहे ते जगाला सांगितले अशा मुख्यमंत्री असलेल्या नेत्यावर bjp वाल्यांन टीका करण्याचा बिलकुल अधिकार नाही. कुंभ मेळा bjp शासित राज्यात झाला लाखो लोक जमा झाली .त्याचे किती तरी भीषण परिणाम होणार आहेत. बंगाल मध्ये गर्दी जमवली त्याचे परिणाम बाधित लोकांची संख्या मध्ये वाढ होणार. आहे.

In reply to by Rajesh188

भाजप शासीत राज्यातील प्रचंड मृत्यूंची बातमी लपवली जात आहे. आजच्याच दैनिक भास्कर भोपाळ बातमी आहे. सरकारी आकडेवारी ४ मृत्यु सांगतेय प्रत्यक्शात ११२ मृत्यु झालेले. भरपूर प्रेत जळतानाचे फोटो फ्रंट पेजला आहे. लोकाना दिसू नये म्हणबन स्मशान भूमीला पत्रे ठोकले होते पण चतूर पत्रकारांनी ड्रोन कॅमेरा ने फोटो घेतले. ईतकं खोटं जनतेवर रेटनार्या भाजपशासीत राज्यांबद्दल कुणीही आजिबात बोलनार नाही. राज्याात भाजप सरकार असते तर अशीच आकडेवारी लपवली गेली असती. सुदैवाने पारदर्शक ठाकरे सरकार आहे. आता भाजपच्या खोटारडेपनावर किती लोक बोलतात पाहूयात.

....... व्हेंटिलेटरचे केवळ ५ बेड शिल्लक! https://www.loksatta.com/mumbai-news/bmc-shortage-of-oxygen-ventilator-… तुमचे कुटुंब, तुमची जबाबदारी आणि माझे कुटुंब, माझी जबाबदारी.... घरीच रहा, सुरक्षित रहा ... जनसंपर्क टाळणे, हा उत्तम उपाय आहे...

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/those-who-criticiz… संचारबंदी असतांना इतकी माणसे, रस्त्यावर कशी काय? हा प्रश्र्न दुय्यम आहे ... महाराष्ट्र सरकार, भुकेल्यांची योग्य ती काळजी नक्कीच घेत आहे ...

https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/patients-were-shi… परिस्थिति बिकट होत चालली आहे, असे वाटते ... घरीच रहा सुरक्षित रहा...

ठाकरे सरकार नी निर्णय घेतला आहे की राज्याचा सल्लागार म्हणून PRO म्हणून फडणवीस ह्यांना नेमायचे आणि सर्व काविळ सेंटर,उपचार बंद करायची.फडणवीस ह्यांचे शिक्षण मोदी साहेबांच्या मार्गदर्शनात झाले आहे ते त्याचा उपयोग करतील.आणि चतुर प्रदेश, गुजरात,बिहार,mp इथे त्यांनी प्रॅक्टिकल केले आहे. मृतांचे आकडे लपवून,बाधित लोकांचे आकडे लपवून कारोणा बाधित लोकांची संख्या कमी करण्याचा त्यांचा अभ्यास आणि प्रॅक्टिकल आहे तोच gun वापरून राज्य corona विरहित करता येईल आणि फडणवीस च ते करतील असे ठाकरे सरकार la वाटतं आहे.

In reply to by Rajesh188

साहेब तुम्ही गरळ ओकणे बंद करा आता, बाकी राज्यांचं सोडा त्यांचं ते बघून घेतील, आपल्या ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे माहित आहे का तुम्हाला? माझ्या आजूबाजूच्या गावामध्ये ७ -८ लोकांचा मृत्यू उपचाराभावी झालय आता याला कोणी जबादार आहे.

https://indianexpress.com/article/india/direct-msp-transfers-punjab-far… Dalip is one of the first three Punjab farmers to receive the payment of wheat MSP directly into his account. Pushed by the Centre, the state government has implemented the system of direct payment for the first time in the face of stiff opposition from the politically and financially powerful arhtiya associations. नवीन कृषी कायद्यांमुळेच हा बदल झाला असावा का?

In reply to by श्रीगुरुजी

असे घडले आहे असे बिन्धास्त समजा . खयाली पुलाव आम्हाला तर हेच माहीत आहे कर्तृत्व वान केंद्र सरकार नी त्या कायद्यानं स्थगिती दिलेली आहे प्रधान सेवकांनी तसे जाहीर केले होते. अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे येणे म्हणजे लय मोठे जगावेगळे काही घडले आहे असे काही नाही..ही अतिशय किरकोळ बाब आहे. सफाई कर्मचाऱ्यांची रक्कम पगाराची पण अशीच जमा होते महारष्ट्र मध्ये वीस वर्षापासून .प्रधान सेवकांना ते नवीन वाटत असेल.

In reply to by Rajesh188

तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत कि प्रश्नच समजत नाहीत कि वेळ जात नाही म्हणून TP करताय??

In reply to by धनावडे

त्यांनी ओकलेली गरळ वाचून लोकांचे मतपरिवर्तन होऊन ते मोदींना/भाजपाला मत देणार नाहीत असे त्यांना वाटते...म्हणूनच हा सर्व खटाटोप

In reply to by Rajesh188

अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे येणे म्हणजे लय मोठे जगावेगळे काही घडले आहे असे काही नाही..ही अतिशय किरकोळ बाब आहे.
लइ मनलं तं लइच हासलो भाव! रामपाऱ्यात मिपा उगडुन चांगल झालं. आणिक यऊ द्या भाव!

In reply to by वामन देशमुख

ती संपूर्ण बातमी वाचली आणि शेतकऱ्यांचे अनुभव व प्रतिक्रिया वाचल्या तर समजेल की त्यांच्या दृष्टीने हा निर्णय किती क्रांतिकारी आहे ते.

करोनाच्या बाबतीत दररोज नवीन काहीतरी ऐकायला मिळतं. आता आपण सर्वच या बातम्यांनी थकून गेलो आहोत. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाने नुकताच याबाबतीत नवा निष्कर्ष काढला आहे. गेल्या वर्षभरापासून आपण सर्वच मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा, सॅनिटाइजरचा वापर करा, यंव करा आणि त्यंव करा असे सांगितले गेले आहे, आजही आपण तेच पालन करीत आहोत. आता करोनाने (सार्स -कोवीड २) आपले रुपच बदलले असून त्याचा कहर आता हवेतून वेगाने होऊ लागला त्यामुळे पूर्वीचे उपाय आता तोकडे पडू लागतील काय अशी भिती व्यक्त केल्या जात आहे. लॅन्सेट मधील हे संशोधन इंग्लंड, अमेरिका व कॅनडातील तज्ज्ञांनी लिहिले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील या अभ्यासाचा मुख्य संशोधक त्रिश ग्रीनहोल यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनांनी विषाणूच्या प्रसाराबाबतची व्याख्या आता बदलली पाहिजे, शारीरिक अंतर, मास्क, आदींचे नियम आता नवीन विषाणूला रोखण्यास असमर्थ ठरणार आहेत. मोठ्या ड्रॉपलेट्सने विषाणूचा सर्वाधिक प्रसार झाल्याचा पुरावा मिळालेला नाही. (लॅन्सेट दुवा) आणि आपले मराठी वृत्तपत्र (दुवा) पीडीएफ फाईल थेट उघडेल (दुवा) आज दीडवर्ष जवळ जवळ होईल पण अजूनही कशामुळे करोना होतो काही निश्चित समजेनासे झाले आहे. सर्वच जग अनिश्चित वाटेवर उभे आहे. जाणकार मंडळी काय म्हणत आहेत ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपोकॅलिप्स आलाय, आता सर्व जग नष्ट होऊन नवीन जगाची निर्मिती होणार. ज्या काही इच्छा उरल्यासुरल्या असतील, त्या आत्ताच पूर्ण करून घ्या भो.

In reply to by प्रचेतस

विज्ञानाची करोना प्रतिबंधासाठी अहोरात्र धडपड चालूच असणार आहे. मागील वर्षी याचवेळी जग अंधकारमय झालं होतं. काहीच उपाय नव्हता आणि काहीच मार्ग सापडत नव्हता. आज एक वर्षानंतर किमान एकेक डोस घेतल्यामुळे काहींचे दोनही डोस पूर्ण झाल्यामुळे किमान होणारी गंभीर गुंतागुंत थांबेल इथपर्यंत आणि गोळ्या औषधांनी जीव वाचू शकतो इथपर्यंत आता परिस्थिती आली आहे. आता अशीच गोळ्या औषधांची पुढची उत्तम आवृत्ती येत राहील. जसे आता 'नासल व्हॅक्सीन'चा एक पर्याय येतांना दिसत आहे, नाकात फवारलं की चालले कामाला. कामावरुन आले की नाकात फवारले की संरक्षण मिळणार आहे. ( Nasal vaccine दुवा) असे काही तरी येत राहील. त्यामुळे स्वतःला खुश ठेवायचं, नाटक, सिनेमे, गाणी, मित्र मैत्रीणी यात स्वतःला गुंतवून घ्यायचं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण जे हवेतून कोरोना पसरण्याबद्दल लिहीले आहे तसे होत असावे असा माझा अगदी पहिल्यापासूनचा अंदाज होता. माझे काही मित्र आणि नातेवाईक गेले वर्षभर संपूर्णपणे घरातच राहूनसुद्धा कोरोनाबाधित झालेले आहेत. सर्व काळजी घेऊनसुद्धा आम्ही उभयता दिल्ली-अमेरिका प्रवासानंतर बाधित झालो होतो हे माझ्या प्रत्यक्ष माहितीतले पुरावे.

महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ नये अन्यथा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांना केंद्राकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप नबाव मलिक यांनी केलाय. -- https://maharashtratimes.com/india-news/nawab-malik-is-unaware-of-the-g…

In reply to by प्रसाद_१९८२

“…अन्यथा नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; भाजपाची मागणी..... https://www.loksatta.com/maharashtra-news/otherwise-nawab-malik-should-… ---------- पुरावा द्या नाहीतर माफी मागा....https://www.loksatta.com/maharashtra-news/remdesivir-shortage-in-mahara…

In reply to by नावातकायआहे

nabab काही मुद्दे: १. हे पत्र गुजरात सरकारच्या एफ.डी.ए ने लिहिले आहे त्यामुळे त्यांची कार्यकक्षा गुजरात राज्य हीच आहे. २. हे लोन लायसेन्स नंबर जी/२८-ए/६०४१-ए ही काय भानगड आहे? वरकरणी मला तरी असे वाटते की गुजरात राज्यात अंकलेश्वर येथे काही औषधे निर्माण करून ती निर्यात करायच्या उद्योगासाठी गुजरात सरकारकडून काही सवलती या कंपनीला मिळाल्या असाव्यात. तसे असेल तर औषधे निर्यात न करूनही गुजरात सरकारने सवलती कायमच ठेवायच्या असतील तर ते औषध गुजरातमध्येच वितरीत केले जावे अशी अट गुजरात सरकारने घातली. वरकरणी- कारण असे दिसते की हे पत्र गुजरात सरकारच्या एका विभागाने दिले आहे त्यामुळे गुजरातबाहेर काय करावे हे सांगायचा त्यांना अधिकार नाही. ती त्यांची कार्यकक्षा नाही. ३. औषधे गुजरातमध्येच वितरीत केली जावीत असे लिहिले आहे म्हणजे त्या औषधांचे डिस्ट्रीब्युटर्स गुजरातमधील असावेत पण याचा अर्थ ती औषधे केवळ गुजरातमध्येच विकली जावीत असा होतो असे वाटत नाही. समजा केंद्र सरकारच्या एखाद्या विभागाने औषधे केवळ गुजरातमध्येच द्यावीत असे म्हटले तर तो पक्षपात म्हणता येईल. पण हे पत्र तो दावा सिध्द करायला पुरेसे आहे असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्र सरकारनेही औषध महाराष्ट्रातच विकावे (वितरीत करावे असे नाही) असे आदेश औषध उत्पादक कंपनीला दिले आहेत. https://www.republicworld.com/india-news/general-news/maharashtra-bans-… नबाब मलिक ज्या आधारावर गुजरात सरकारचा आदेश म्हणजे महाराष्ट्र राज्यावर केलेला अन्याय म्हणत असतील तर महाराष्ट्र सरकारचा हा आदेश म्हणजे इतर राज्यांवर केलेला अन्याय म्हणायचा का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Republic world ही लाडक्या अर्णव ची न्यूज पोर्टल आहे का?. राज्यसरकार चुकीचे निर्णय घेत असतील तसे आदेश देत असतील तर ते आदेश रद्द करण्याचे अधिकार नक्कीच केंद्र सरकार जवळ असणार. तेव्हा मलिक ह्यांनी सत्य स्थिती सांगितली की लाडके स्वामीभक्त मीडिया हाऊसेस भ्रम निर्माण करून स्वामी ना वाचवायचे प्रयत्न करणार. झी न्यूज नी सुद्धा एकदा नवीन शोध लावला असेल, टीव्ही १८ न्यूज बनवण्यात मग्न असेल आता येथून पुढे चार दिवस स्वामी भक्त न्यूज हाऊसेस नवं नवीन शोध लावतील.

ईथे काही आयडी ना कुंभ मेळा दिसत नाही ज्या मुळे किती तरी लोक बाधित झाली असतील त्या गर्दी च्या न्यूज दिसत नाहीत. बंगाल मधील लाखो च्या सभा दिसत नाहीत त्याच्या न्यूज दिसत नाहीत. यूपी , गुजरात,बिहार मधील लपवलापवी दिसत नाही. त्या बाबतीत आलेल्या न्यूज दिसत नाहीत. लस उत्पादक कंपन्यांना कच्चा माल मिळत नाही तरी भारत सरकार काही बोलत नाही. त्या बाबतीत येणाऱ्या न्यूज दिसत नाहीत. ह्या फक्त शिव भोजन थाळी च दिसते. असा रात आंधळे प्रतिसाद सारखे येत असतील तर उत्तर पण तशीच येणार. मग गरळ ओकू नका असा साजूक सल्ला दिला जातो.

In reply to by Rajesh188

पंतप्रधानांच्या लाखोतील सभा ह्यावर भाजपप्रेमी एक शब्दाने बोलनार नाहीत. पन्नास वेळआ राज्य सरकराची कामे देखवूनही तीच पिपाणी वाजवण्यात पुढे.

नवाब मलिक ह्यांनी पुरव्यासहित आरोप केले आहेत आणि ते सत्य च असण्याची शक्यता आहे महाराष्ट्र मधील 11 कोटी लोकांचं मानव अधिकार धोक्यात आहे.11 कोटी जनतेच्या जीवा शी खेळ चालू आहे. तरी केंद्र सरकार चे समर्थन महाराष्ट्रीयन लोक च पक्ष प्रेमानी आंधळे होवून करत आहेत. लाजिरवाणी गोष्ट आहे.

राजेश१८८ साहेब, जरा नीट लक्ष द्या. तुमच बेअरिंग मधेमधे खुपच सुटतय. अचानक तुम्ही अतिशय शुद्ध मराठीत लिहायला लागता. आणी कधी कधी अशुद्ध लिहायला घेतलेल्या बेअरिंगने....... मग मला गोंधळायला होतं. इतक्यात ऑफीस अपडेट केलय की काही फाईल्स डिलीट झाल्यात???????

लेख भारत सरकारचं अपयश दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे विश्वासार्हता किंवा पुरावा किंवा देशद्रोह वगैरे मुद्दे येतीलच.

In reply to by तुषार काळभोर

लेख चांगला होता, पण अमेरिकेची आर्थिक शक्ती प्रचंड आहे. भारताची नाही. भारत सरकार लशीच्या किमती बद्दल वाटाघाटी करत होतं. सुरवातीला लस यशस्वी होईल का नाही याबद्दल शंका होत्या त्यामुळे सर्व अंडी एका बास्केट मध्ये ठेवणं चुकीचं ठरलं असतं. सिरम ची लस अयशस्वी ठरली तर काय झालं असतं? विरोधी पक्षाच्या अतिमूर्ख नेत्याने (तोच तो) या गोष्टीचं भांडवल कसं केलं असतं? जेव्हा लस यशस्वी ठरली तेव्हा सरकारच्या प्रतिनिधींनी सिरम बरोबर वाटाघाटी करायला सुरुवात केली. या वाटाघाटी अतिशय अवघड होत्या. कारण फक्त सिरम कडे लस होती आणि भारत बायोटेक ची तिसरी फेज टेस्टिंग चालू होतं (बहुतांश लसी याच फेज मध्ये बाद होतात). सरकार ला त्यामुळे जितके दिवस covaxin बद्दल विश्वास वाटत नव्हता तेवढे दिवस त्यांनी वाटाघाटी लांबवल्या. एक आठवत असेल की covishield ला ऑर्डर आणि covaxin ला मान्यता या दोन्ही गोष्टी घडण्यातला काळ फार कमी होता. कारण ज्यावेळी हे नक्की झालं की सिरम चा प्रतिस्पर्धी बाजारात तयार होतोय त्या वेळी वाटाघाटी यशस्वी झाल्या असाव्यात. भारत सरकार ला 130 कोटी लोकांना लस द्यायची होती. त्यांना किंमत पाडून हवी असणे गैर नाही. लक्षात घ्या की आपले सरकार आणि नोकरशाही मूर्ख नाही. आपल्याला मर्यादा आहेत, मुख्य करून पैशाच्या. आणि त्या मर्यादेत आपल्याला काम करावं लागतं. बाकी सध्याचा जो प्रॉब्लेम आहे तो बिडेन सत्तेवर आल्यावर तयार झालेला आहे. कदाचित ट्रम्प आणि भारत सरकार चं आधीच कच्च्या मालाबद्दल बोलणं झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिडेन आल्याने यावर पाणी पडलं असण्याची शक्यता आहे. सगळ्याच गोष्टी मीडिया ला सांगितल्या जातात असं नाही.

In reply to by पिनाक

तुम्ही अधोरेखित केलेले रिस्क - फॅक्टर व सीरमशी केकेल्या वाटाघाटी, महत्वाचे भाग आहेत. हा मूळ लेखही मी अन्यत्र वाचलेला आहे. आता इथे व इतरस्त्र येणार्‍या प्रतिक्रिया गंमतीच्या असतील. इतरस्र 'भांडवलदारांची शय्यासोबत' वगैरे आरोप करत फिरणारे अनेकजण आता 'सीरम ह्या खाजगी मालकीच्या कंपनीस भारत सरकारने पैसा वगैरे दिला पाहिजे होता' असे सांगत आता फिरणार !

In reply to by तुषार काळभोर

१. 'अमेरिका लस विकसित करेल व भारत त्याचं उत्पादन करेल' हे चुकिचे गृहितक आहे. कारण सर्वसाधारणपणे, फार्मा.कं. त्यांच्या नव्या उत्पादनांवर प्रचंड रॉयल्टी आकारतात. दुसरे, तेथे जॉन्सनची सोडून इतर एकही लस विकसित झालेली नाही. व जॉन्सनही अलिकडेच बाजारात वापरासाठी आलेली आहे.फायझर व मॉडर्ना वापरत असलेली टेक्नॉलॉजी (एम. आर. एन. ए.) अतिशय नवी आहे, व ती जर्मनीतील बायो-एन-टेक ह्या एका कंपनीने विकसित केकेली आहे. फायझर व मॉडर्ना ती पैसे देऊन, वापरत आहेत. ह्या लशींना भारतात वापरता येणे तांत्रिकदृष्ट्याही अशक्य आहे, कारण तिला - ७० डिग्रीज से. ला ठेवावे लागते, व तिचे वितरण करतांनाही काही विशेष कंटेनर्स आवश्यक आहेत. अशा तर्‍हेने विकसित केलेल्या कुठल्याही औषधावर सर्वसाधारणपणे कुठलीही कंपनी भरमसाट रॉयल्टी लावते व ती भारतासारख्या देशास परवडण्यासारखी नाही. ऑक्सफर्डने विकसित केलेली लस अ‍ॅस्टो- झेनेकाने घेतली. व ह्या स्विस कंपनीने सध्यातरी तिच्यावर अतिशय नगण्य रॉयल्टी लावली आहे. तेव्हा आपण ती भारतांत वापरू शकतो तसेच इतर विकसनशील व अविकसित देशही ती वापरू शकतात. तेव्हा ह्या लसीचे उत्पादन सीरमकडे आले आहे. अर्थात, वरील हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट भारत सरकार व सीरम इन्स्टिट्यूट ह्या दोघांनाही पहावी लागली असणार. ह्याच बरोबर भारतात, भारत बायोटेकने स्वतःची लस विकसित करण्याचे समांतर कार्यही हाती घेतले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. २. सीरमला लागलेल्या आगीमुळे त्या कंपनीला आपली ह्या लसीची उत्पादनक्षमता कमी करावी लागली असे लेखात लिहीले आहे. पण ह्याविषयीच्या बातमीत असे म्हटले गेले आहे की "Mr Poonawalla said there would be no impact on the production of the Oxford-AstraZeneca vaccine, known locally as Covishield, "due to multiple production buildings that I had kept in reserve to deal with such contingencies". ३. अमेरिकेने जे काही तेथील फार्मांना हाताशी धरून, त्यांना विशेष गुंतवणूक देऊन धडाधड उत्पादनाची सोय केली वगैरे लेखात म्हटले आहे, ते सर्व ट्रंप ह्यांनी करवून घेतले. तेथील सरकारी व राजकीय व्यवस्थेमुळे त्यांना ते सहजसाध्य झाले असावे. आता, भारतांत अशी गुंतवणूक किंवा इतर कसल्याही प्रकारची प्रत्य़क्ष अथवा अप्रत्यक्ष मदत एका खाजगी कंपनीस देणे आपल्या सरकारला, संविधानिकरीत्या कितपत शक्य आहे, त्याची माहिती करून घेणे मलातरी आवडेल. आणि तसे जरी सरकारने करायचे ठरवलेच, तर मग 'अडानी-अंबानी' ह्यांच्या जोडीला अजून एक नाव, राजकारणांत जाऊन बसले असते, त्याचे काय? ४. सरकारने, जाने शेवटापर्यंत खरेदीची ऑर्डर का पाठवली नाही, ह्याविषयी माहिती नाही. पण मला वाटते, आपल्या येथील लसीकरण फेब्रुवारीच्या मध्यावर सुरू झाले, म्हणजे इतर देशांपेक्षा फार उशीर झाला नाही. तसेच ज्या वेगाने लस दिली जात होती, तोही गेल्या आठवड्यापर्यंत चांगला होता. ५. ब्रझिल येथे हजारो माणसे मरत आहेत वगैरे सर्व खरे आहे, पण त्यांनी चीनकडूनही सिनोव्हॅक ही लसही घेतलेली आहे. भारताने सध्या दोन्ही लसींच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, पण त्याचव्यतिरीक्त सीरमच्या लशीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेने सध्या निर्यात करणे बंद केले आहे, हेही लस निर्यात न करता येण्याचे एक कारण असावे?

In reply to by प्रदीप

>>> पण मला वाटते, आपल्या येथील लसीकरण फेब्रुवारीच्या मध्यावर सुरू झाले, म्हणजे इतर देशांपेक्षा फार उशीर झाला नाही. भारतात सार्वजनिक लसीकरणाचा प्रारंभ १६ जानेवारीस जाहला.

In reply to by तुषार काळभोर

घरचं कार्य असल्यासारखं धडाडीने केंद्र सरकारचा बचाव करणारे प्रतिसाद येत आहेत. आज रात्री ....... असं म्हणत विरोधक, स्वकीय, मंत्री, जनता कुणालाही n जुमानता, कुणाचीही पर्वा न करता, कोण काय म्हणेल, कोणावर काय परिणाम होईल याची चिंता न करता धडाडीने निर्णय घेणारे भारतातील खाजगी लस उत्पादकांना प्रोत्साहन दिल्याने टीका होण्याला घाबरतील, असे वाटत नाही. काही शे रुग्ण असताना अर्थव्यवस्थेचं चक्र काही तासात जागेवर थांबवताना न भिणारे, धडाडीचे नेते कोट्यवधी लोकसंख्येला वाचवण्यासाठी सरकारकडे तेवढा पैसा नाही, भारताची आर्थिक ताकद अमेरिकेहून कमी आहे, वगैरे लंगडी कारणे देऊ शकतील असे वाटत नाही. (२००*१४०,००,००,०००=२,८०,००,००,००,००० अक्षरी अठ्ठावीस हजार कोटी रुपये इतका खर्च देशातील प्रत्येकाचं लसीकरण करायला आला असता. दोन डोस प्रत्येकी छप्पन हजार कोटी. त्यातील किमान निम्मे लोकांनी स्वतःची काळजी घेत स्वखर्चाने डोस घेतले असते. देशाला हेसुद्धा परवडलं नसतं, असं जर केंद्र सरकार चालवणाऱ्या व्यक्तीचं मत असेल तर हे कारण किंवा समर्थन लंगडे नाही का?)

In reply to by तुषार काळभोर

भारतातील खाजगी लस उत्पादकांना प्रोत्साहन दिल्याने टीका होण्याला घाबरतील >>>>> सिरम इन्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही प्रायव्हेट कंपन्या आहेत ...

In reply to by तुषार काळभोर

>>>>> घरचं कार्य असल्यासारखं धडाडीने केंद्र सरकारचा बचाव करणारे प्रतिसाद येत आहेत. =)) चांगला होता. अगदी खरं आहे. बाकी सध्या केंद्र सरकार सुडाच्या भेदभावाच्या राजकाराने कळस गाठला आहे. महाराष्ट्रातही विरोधी पक्षाच्या होत असलेला थयथयाटही लक्षात येत आहे. काल दमनच्या फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्राला ही कंपनी सर्वात जास्त रेमेडेसीवीर पूरवत होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर मा.फड़नवीस आणि प्रवीण दरेकर तिथे पोहोचले. (बातमी ) महाराष्ट्राला रेमेडेसीवीर पुरवू नका अशा ज्या कंपन्यांना ताकीद दिल्या गेल्या त्या काही कंपन्यानी महाराष्ट्र सरकारला पुरावे दिल्याच्या बातम्या येत आहेत, परंतु अशा काळात केंद्राशी वाद नको अशा महाराष्ट्र सरकारच्या वर्तुळातील म्हणने आहे. खरे खोटे आरोप पुरावे हे सर्व भविष्यात उपलब्ध होतीलच. सध्या महाराष्ट्रभर आणि इतरही राज्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत, केंद्रीय आरोग्य पथकांनी, मंत्र्यांनी, मा.प्रधानमंत्र्यांनी या सर्व परिस्थिती हाताळायला केंद्रसरकार म्हणून, माणुसकीच्या नात्याने म्हणून मदत केली पाहिजे. अर्थात, मा.पंतप्रधान आणि त्यांचं अस्तित्वशून्य केंद्रीय मंत्रीमंडळ बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला की मग या सर्व गोष्टीकड़े पाहतील अशी एक भारतीय म्हणून अपेक्षा करायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे (एक अस्वस्थ भारतीय)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला सामना आहे ... एका बाजूने सातत्याने गरळ ओकणारे आणि दुसऱ्या बाजूने धडाडीने बचाव करणारे .. चालुद्या

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्राला ही कंपनी सर्वात जास्त रेमेडेसीवीर पूरवत होती. जर ही कंपनी महाराष्ट्राला सर्वात जास्त रेमेडेसीवीर पूरवत होती, तर पोलीसांनी ताब्यात कशाला घेतला. आणि ताब्यात घेतला तर लगेच सोडून का दिल? राज्यात होणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टीला केंद्रच कस जबाबदार आहे? बंगाल च्या सभांमधून कोरोना पसरत असेल तर पंढरपूर मध्ये ५-६ मंत्र्याच्या सभांमधून कोरोना पसरत नाही का? तीच गोष्ट लसीकरणाची, जर केंद्राने लस दिली नाही तर राज्यात सर्वात जास्त लसीकरण कस काय? मध्यंतरी शरद पवारांनी फक्त बारामती ला रेमेडीसीविर दिले, हे योग्य आहे का?

In reply to by रात्रीचे चांदणे

तसे अवघड प्रश्न विचारू नका हो. त्यांचा अस्वस्थपणा वाढतो. सध्याच्या काळात ते धोकादायक आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० हजार रेमेडेसीवर इंजेक्शंस देण्याचे कबूल करणा-या मालकाला पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि नंतर सोडूनही दिले. रेमेडसीवर इंजेक्शंस महाराष्ट्र सरकारला अत्यंत आवश्यक असतांना, महाराष्ट्र सकारला न देता भाजप प्रदेश अध्यक्षांना देत होता असे वाटल्यामुळे पोलिसांनी त्यास चौकशीस बोलावले. कंपनी मालकाला बोलावल्या बरोबर आणि त्याला बसवून ठेवल्याबद्दल ताबड़तोब फड़नवीस आणि दरेकर तिथे पोहोचले, या अगोदरही ही दोन्ही थोर माणसं कंपनीत दोनेक दिवसापूर्वी कंपनीत गेल्याच्या बातम्या वुत्तपत्रात येत आहेत, अर्थात महाराष्ट्राला इंजेक्शंस देण्यात कमी पडू नका असेच सांगायला गेले असतील याबद्दल महाराष्ट्र जनतेला कोणतीही शंका नाही. :) बाकी. करोना हा कुंभमेळ्यातील गर्दीने पसरतो, पश्चिम बंगालमधील रॅलीने पसरतो तसा महाराष्ट्रातील पंढरपुर निवडणुकीनेही पसरतो हे मी पूर्वी इथेच सांगितले आहे. गर्दी करणारी आणि त्यास पाठिंबा देणारी निवडणूक आयोगासोबत त्याचं नेतृत्व करणारी ही सर्व नालायक मंडळी आहेत असे माझं व्यक्तिगत मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० हजार रेमेडेसीवर इंजेक्शंस देण्याचे कबूल करणा-या मालकाला >>>>>> ही इंजेक्शन्स काय भाजप कार्यालयात विक्रीस ठेवण्यात येणार होती काय ? ही महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फतच वितरीत होणार होती हे सांगायला प्राध्यापक साहेब विसरले वाटत

In reply to by अमर विश्वास

महाराष्ट्र सरकारला ही इंजेक्शंस दिलीच असती असे आपण क्षणभर समजू. आपल्या पक्षीय कार्यकर्त्यांना, आपल्या संघीय हॉस्पिटलला, आपल्या ख़ासगी मालकीच्या रुग्नालयांना ही इंजेक्शंस दिली असती असे मला वाटत नाही. आजच्या काळात फक्त दोनच ऋषितुल्य व्यक्तिमत्व उरली आहेत एक 'हे' अध्यक्ष महोदय आणि दूसरे 'ते'. भाईयो और बहनोवाले. आपलं असं म्हणने आहे की कंपनीवाल्यांकडून इंजेशन्स घेऊन ती महाराष्ट्राला द्यायची, अशा शोची काय गरज ? की जाहिरात करुन मिरवायचं असेल महाराष्ट्र सरकारला आम्ही कशी मदत केली असेच ना ? अरे भावांनो, महाराष्ट्र सरकारला काय मदत करायची, काय मदत मिळवून द्यायची, ती केंद्रसरकारकडून मिळवून दिली पाहिजे, असे वाटते. इथे दात कोरून पोटभर जेवण दिले, असा ठाणाना करुन काय उपयोग. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समजायचं कशाला ? खरं काय ते जाणून घ्या ... बाकी ऋषितुल्य व्यक्तिमत्व किती उरलेत माहीत नाही ... पण गरळ ओकणारे सर्वत्र पसरले आहेत (प्रतिसाद संपादित)