✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शीत गोडाऊन..

प
प्राजु यांनी
Tue, 04/14/2009 - 23:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7368 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

अरे वा

संदीप चित्रे
Wed, 04/15/2009 - 01:33 नवीन
लेख चांगला आहेच आणि >> (बोंबलायला, पुण्यासारख्या गावांत अचानक येण्याचे असे प्रकार किती??, त्यातून जेवायला येण्याच्या शक्यता किती आणि.. आलेल्याला जेवूनच जा चा आग्रह असा तो किती!!!) >> या वाक्यातून पुणेकरांना गार करायचं ठरवलेलं दिसतंय :)
  • Log in or register to post comments

आता

रेवती
Wed, 04/15/2009 - 05:01 नवीन
आता पुण्यात गेल्यावर प्राजुकडे जाताना अचानक जाणार नाही, गेलेच तर तिने जेवूनच जा असा केलेला आग्रह हा खोटा आहे असं समजून न जेवता परत येइन. लेख आवडला. अगदी गार गार करून गेला.;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

गारेगार लेख वाचता वाचता

चतुरंग
Wed, 04/15/2009 - 18:58 नवीन
कधी भूतकाळात मन गेलं समजलं नाही! पहिल्यांदा फ्रिज घरी आला तेव्हा बर्फाच्या ट्रे मधे पाणी ओतल्यावर दर पाच मिनिटांनी ट्रेत बोटं घालू बर्फ झाला का बघितल्याने बर्फ व्हायला लागलेला मोडायचा आणि अशा रीतीने कित्येकतास बर्फाविना तळमळलेलो आठवले! :T (बोंबलायला, पुण्यासारख्या गावांत अचानक येण्याचे असे प्रकार किती??, त्यातून जेवायला येण्याच्या शक्यता किती आणि.. आलेल्याला जेवूनच जा चा आग्रह असा तो किती!!!) हे वाक्य वाचलं आणि माझा बर्फाचा खडा झाला! ;) (खुद के साथ बातां : रंग्या, परवाच्या कट्याला तू नीट जेवायला वाढलेलं दिसत नाहीयेस! ह्म्म्म्.. नीट लक्ष देत जा इथून पुढे! :? ) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

सही

समिधा
Wed, 04/15/2009 - 02:28 नवीन
काय सही लिहीलायस गं लेख.प्रत्येकाकडे थोड्याफार प्रमाणात फ्रिज चा असाच उपयोग होत असतो. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
Wed, 04/15/2009 - 02:53 नवीन
ताक जास्त असेल तर परसातल्या कढिलिंबाला मिळायचं. एकूण काय.. तर घरातला पदार्थ खराब होऊ नये.. आणि झालाच तर बागेला खत.. अशी एकूण परिस्थिती होती. सगळीच खुश होती. घरातली माणसं, बागेतली झाडं, कामवाल्या ... सगळा लेखच खूप आवडला.
  • Log in or register to post comments

कपाट

मीनल
Wed, 04/15/2009 - 03:37 नवीन
माझ्या मैत्रीणीच्या सासूबाई काहीही फ्रिज मधे ठेवतात. उद: बाटल्याची झाकण,खिळे, नळाला लावायचा वाय्सर. त्यांना म्हणे त्या वस्तू लगेच सापडतात तिथून. माझी मैत्रीण म्हणते त्यांनी शित कपाटाला कपाट केरून टाकलय. कारण त्या भाज्या ,दूध बाहेर ठवतात. =)) मीनल.
  • Log in or register to post comments

:)

चकली
Wed, 04/15/2009 - 04:14 नवीन
सासूबाई भलत्याच विनोदी दिसताहेत :) चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

वायरलेस् राउटर्

बेसनलाडू
Wed, 04/15/2009 - 05:08 नवीन
माझ्या एका मैत्रिणीचा नवरा घरचा वायरलेस् राउटर् जास्त तापला नि आंतरजाल जोडणीसंबंधित त्रास देऊ लागला की आंतरजालापासून डिस्कनेक्ट् करून शीतकपाटात ठेवतो. काही वेळाने बाहेर काढून, पुनर्जोडणीनंतर सगळे काही नीट पूर्ववत् चालू होत असल्याचा त्याचा अनुभव आहे. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असून हा मनुष्य स्वतः एक टेलिकॉम् अभियंता आहे :) (अनुभवी)बेसनलाडू लेख वाचला. आवडला. आणखी असे गमतीशीर अनुभव येऊ द्यात. (गमतीशीर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

हा हा! राऊटर फ्रिजमधे?!

चतुरंग
Wed, 04/15/2009 - 18:42 नवीन
त्या राऊटरचे पॉवर सप्लाय डिझाईन नीट केलेले नसल्याने किंवा तो ज्या ठिकाणी ठेवला जातोय त्या ठिकाणी पुरेशी हवा नीट न खेळल्याने, त्यात निर्माण होणारी उष्णता बाहेर पडत नसावी; त्यामुळे तो गरम होऊन नीट काम देत नसणार. फ्रिजमधे ठेवून थंड झाल्यावर त्याचे काम पूर्ववत होत असावे. (अवांतर - माझ्या मित्राचे वडील हे जुन्या बाजारातून विविध इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिकल वस्तू आणतात. त्यांचा तो छंद आहे. त्यांच्या घरात जुने फ्रिज हे इलेक्ट्रॉनिक काँपोनंट्स ठेवायला वापरतात. फ्रिज उघडला की रेझिस्टर्स, कपॅसिटर्स, ट्रांझिस्टर्स,वेगवेगळे आय सीज ह्यांनी भरलेले बॉक्सेस दिसतात! पाहून एकदम मस्त वाटतं! :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

>>या फ्रीज

चकली
Wed, 04/15/2009 - 04:16 नवीन
>>या फ्रीज चा महिमा तरी कित्ती वर्णावा! काय काय नसतं हो त्यात?? ४-५ दिवसांच्या थोड्या थोड्या राहिलेल्या भाज्या, २-३ प्रकारच्या आमट्या.... हे वाचून मला फ्रीज लावायची आठवण झाली :( चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

+१ सहमत

स्मिता श्रीपाद
Wed, 04/15/2009 - 10:59 नवीन
या फ्रीज चा महिमा तरी कित्ती वर्णावा! काय काय नसतं हो त्यात?? ४-५ दिवसांच्या थोड्या थोड्या राहिलेल्या भाज्या, २-३ प्रकारच्या आमट्या.... माझा पण फ्रीज ओसंडुन वाहातोय :-( तु हळुच माझ्या घरचा फ्रीज पाहुन गेलिस की काय? :-) प्राजु,रोजच्या वापरातल्या एखाद्या वस्तुवर इतका सुंदर लेख लिहिता येउ शकतो ? मस्तच लिहिलयस.... -स्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली

मस्त

नंदन
Wed, 04/15/2009 - 04:24 नवीन
लेख आवडला. साधाच विषय, पण त्याबद्दल छान खुलवून लिहिले आहे. इथल्या रेफ्रिजरेटर्सवर डकवलेली चित्रे, कामाच्या/वस्तुंच्या याद्या पाहिल्या की नोटिसबोर्डसारखाही फ्रीजचा वापर करता येतो याची खात्री पटते. मोबाईलसारखा फ्रीजही कधीकाळी स्टेटस सिंबॉल होता हे आता कुणाला खरं वाटणार नाही. पण त्यावरून 'श्रीमंत दामोदरपंत' मध्ये विजय चव्हाणची पाहुण्याला पाणी विचारताना घरी फ्रीज आहे, हे सांगण्याची धडपड आठवली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सहमत. फ्रिज

रेवती
Wed, 04/15/2009 - 05:12 नवीन
सहमत. फ्रिज आतल्या बाजूने काय कोणीही वापरेल; आम्ही बाहेरच्या बाजूनेही तो पुरेपूर वापरतो. सत्राशेसाठ मॅग्नेट्स आणि याद्या, फोटो यांनी बाहेरही सजावट (?) असते (म्हणजे आमच्याकडेही आहे, नावं ठेवत नाहीये कुणाला.;)) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अगदी अगदी!!

प्राजु
Wed, 04/15/2009 - 06:05 नवीन
याद्या, मॅग्नेट्स, फोटोज, शाळेची दरमहिन्याची वेळापत्रकं... सोव्हेनिअर्स.. जसे लिबर्टी स्टॅच्यू, नायगारा, अक्वेरियम.. कित्ती काय काय अंगावर मिरवतो तो फ्रिज! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त

शितल
Wed, 04/15/2009 - 06:50 नवीन
प्राजु, फ्रिजचा महिमा वर्णावा किती ह्या उक्तीची प्रचिती आली. मस्त लिहिले आहेस. :)
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Wed, 04/15/2009 - 07:57 नवीन
मस्त लिहले आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

+२

आंबोळी
Sun, 04/19/2009 - 20:44 नवीन
छान लिहिलय... प्रो.आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

एकदम

विनायक प्रभू
Wed, 04/15/2009 - 06:55 नवीन
थंड
  • Log in or register to post comments

कूल!

क्रान्ति
Wed, 04/15/2009 - 07:05 नवीन
मस्त लेख! ठंडा कर दिया! B) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

व्होल्टास

मदनबाण
Wed, 04/15/2009 - 07:49 नवीन
व्होल्टास काय, बिपिएल काय.. ऑल्विन काय!! केल्विनेटर भूल गये क्या ? :) हम्म...सध्या तापमान लयं वाढलय !!! त्यामुळे फ्रिजचा वापर जास्तच आहे. अतिअवांतर :-- "अय्या हो... कसं केलंस गं?" ह्याच पद्धतीने फिरंगी स्त्रिया काय म्हणत असतील? (गारेगार) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

खरंय

मेघना भुस्कुटे
Wed, 04/15/2009 - 10:22 नवीन
खरंय ब्वॉ! फ्रीज नसता तर मी काय केलं असतं? रात्री बेरात्री वाचताना भूक लागल्यावर फ्रीजच माझा अन्नदाता असतो. उरलेला उपमा, उकडून ठेवलेले बटाटे, थोडी शिळी भाजी, काहीच नाही तर पाव आणि लोणी, किंवा दूध-पाव... प्राजूतै, आता मॅगीवरपण लिही ना. त्या पदार्थाचं तितकं देणं लागतो आपण!
  • Log in or register to post comments

ठंडा किया

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/15/2009 - 10:34 नवीन
ठंडा किया रे ! अशा वाळवंटी वातावरणात एकदम गारेगार लेख. फ्रीज महिमा आवडला. हेहेहे आमच्याकडे अजुन फ्रीज घेतलेला नाहिये. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

वा .. मस्त!

स्वाती दिनेश
Wed, 04/15/2009 - 11:41 नवीन
मस्त ग प्राजु, लेख फार आवडला (आणि पटला,:)) स्वाती
  • Log in or register to post comments

वा!

अवलिया
Wed, 04/15/2009 - 11:45 नवीन
गारेगार --अवलिया
  • Log in or register to post comments

मजा आली...

चंद्रशेखर महामुनी
Wed, 04/15/2009 - 11:48 नवीन
माझ्या मुलाला तो शाळेतुन आला कि.. पहिल्यांदा फ्रिज उघडुन त्यात काय आहे.. हे पहाण्याची नामी सवय आहे. सगळ्यां प्रमाणे मि ही म्हणतो.... ठंडा कर दिया....
  • Log in or register to post comments

सही

पाषाणभेद
Wed, 04/15/2009 - 12:07 नवीन
सही लेख. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

आत सर्वात थंडगार !

मैत्र
Wed, 04/15/2009 - 14:36 नवीन
(की हाच सर्वात थंडगार?) ... ईट्स द कुलेस्ट वन ! :)
  • Log in or register to post comments

लेखाबरोबर

अमोल केळकर
Wed, 04/15/2009 - 14:37 नवीन
लेखाबरोबरच लेखाचे शिर्षक ही आवडले अमोल -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा
  • Log in or register to post comments

मस्तच!!

घाटावरचे भट
Wed, 04/15/2009 - 15:19 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments

मस्त लेख

स्वाती राजेश
Wed, 04/15/2009 - 17:57 नवीन
लेख मस्तच जमला आहे...गारेगार..... फ्रिजचे इतर उपयोग पण कळाले.... :) आणखी एक उपयोग, वर्षाचे प्लॅनर चिकटवण्यासाठी.....जवळच असल्यामुळे त्यावर वाढदिवसांच्या तारखा, सुट्ट्यांच्या तारखा चटकन दिसतात...
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून आभार. :)

प्राजु
Wed, 04/15/2009 - 18:38 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त एकदम.

देवदत्त
Wed, 04/15/2009 - 18:54 नवीन
मस्त एकदम. फ्रीजचे सर्व उपयोग आले ह्या लेखात :) आणि लिखाणही छान. ह्यावरून आठवले. काही वर्षांपूर्वी एल. जी. ने Door Cooling तंत्रज्ञान आणून मग ते पेटंटही केले होते. त्यामुळे कोणाला ते तंत्रज्ञान थेट वापरता येणार नव्हते. मग गोदरेज ने दरवाजा त्यांच्याकरीता सोडून दिला व बाकीच्या पाचही बाजू वापरून Penta Cool (पेंटाकूल) तंत्रज्ञानाचा फ्रीज आणला. गोदरेजने त्याचे पेटंट केले की नाही नक्की माहित नाही. पण एक छान स्पर्धा पहावयास मिळाली :)
  • Log in or register to post comments

मस्तच

विसोबा खेचर
गुरुवार, 04/16/2009 - 00:02 नवीन
मस्तच लेख..:) नाही म्हंटलं तरी, प्रेम्-माया य गोष्टी सुद्धा फ्रीजमध्ये साठवल्या जातात आपोआप. हो ना? हा मुद्दा बाकी खराच! :) असो, शीतकपाटांना पर्याय नाही..! तात्या.
  • Log in or register to post comments

एकदम ठंडा

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/16/2009 - 00:29 नवीन
एकदम ठंडा ठंडा कूल कूल लेख. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या लहानपणी आमच्या आख्ख्या बिल्डिंगमधे फक्त दोनच फ्रिज. पण एवढं मोकळं वातावरण की आम्ही नेहमी त्यांच्या कडून बर्फ - गार पाणी वगैरे आणायचो. ना आम्हाला त्यात लाज वाटायची ना त्यांना त्यात काही गैर वाटायचे. उन्हाळ्याचा सुट्टीत दिवसभर उंडारताना तर त्यांच्याचकडे कायम पाणी प्यायला जायचो. काकूपण अगदी न कंटाळता पाणी आणि एखादा लाडू हातावर ठेवायच्या. फ्रीजची अजून एक मजा म्हणजे बर्फ. त्यावेळी गोदरेजच्या फ्रीजमधे बर्फाचे ट्रे मोठ्या आकाराचे ऍल्युमिनियमचे असत. त्यातले ४-५ खडे आम्ही घ्यायचो. ते एका मोठ्या नॅपकिनमधे घालायचे. आणि मग त्याची पोटली करून ती बदड बदड बदडायची. मग आतल्या बर्फाचा चुरा व्हायचा. मग ते खडे एक एक करून जीभेवर ठेवायचे आणि खायचे. त्यानंतर तो थंडगार नॅपकिन मग छानपैकी तोंडावर दाबून धरायचा. कस्सलं गारेगार व्हायचं.... निव्वळ सुख. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लेखन मस्तच !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/16/2009 - 20:54 नवीन
लेख वाचला आणि विचारात पडलो की, फ्रीज ही गोष्ट समजण्यापूर्वी ..फ्रीजमधे पाण्याचा बर्फ होतो हेच खूप आश्चर्याचे वाटले होते. खेड्यातून वाढलेलो असल्यामुळे सुखवस्तू कुटुंबातील सुविधांचा तसा अभावच होता. कोणा मित्राकडे ज्याच्याकडे फ्रीज असेल तर गार-गार पाणी पिण्यात काय आनंद वाटायचा ! लेखातील फ्रीजमधील गोष्टी वाचल्यावर जाणवले किती डिफ्रंस असतो नै वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या गटात. आता घरातला फ्रीजही इतक्या सवयीचा झाला आहे की त्याचेही अपृप वाटत नाही आपल्याला ! असो, >>प्रेम्-माया य गोष्टी सुद्धा फ्रीजमध्ये साठवल्या जातात आपोआप. हो ना? खरंय ! फक्त प्रेम-माया गोठून जाऊ नये म्हणजे झालं :) -दिलीप बिरुटे (खेडवळ)
  • Log in or register to post comments

पूर्नवाचनाचा आनंद

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 04/18/2009 - 11:32 नवीन
हाच लेख इ सकाळ वर पण आहे. बहुतेक कालच्या (१७-०४-०९) च्या सकाळ मधे त्याचा मथळा "शीत कणग्या" असा आहे इतकाच फरक ________________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

हो बरोबर!

प्राजु
Sat, 04/18/2009 - 20:26 नवीन
पैलतीरच्या संपादकांनी पूर्व संम्मतीने त्याचं शिर्षक बददलं आहे. धन्यवाद प्रतिक्रियेसाठी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

सेम पिन्च

शक्तिमान
Sat, 04/18/2009 - 14:15 नवीन
>>आणि आला तो पिस्ता रंगाचा व्होल्टास चा. आमच्याकडेही सेम टू सेम हाच फ्रिज आहे! बाकी लेख खुसखुशीत झाला आहे..
  • Log in or register to post comments

मस्तच ..

मनीषा
Sat, 04/18/2009 - 17:43 नवीन
घरी फ्रिज नाही ही कल्पना सुद्धा नकोशी वाटते .. लेख छानच जमला आहे ... आवडला !
  • Log in or register to post comments

छानच..

पद्मश्री चित्रे
Sat, 04/18/2009 - 17:46 नवीन
एक्दम झक्कास लिहिल आहेस..
  • Log in or register to post comments

गीत गोडाऊन मस्त ..

सुधीर कांदळकर
Sun, 04/19/2009 - 20:31 नवीन
झकास. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा