श्रीरंग....
सावळ्याचा शाम रंग..
भक्तिमाजी गोपी दंग..
प्रेमाचे उधळुनि रंग..
स्वानंदे भिजले अंग..
ममत्वाचा होई भंग..
अहंतेचा सुटे संग..
वैराग्याचा मनी तरंग..
उजळुन जाई अंतरंग..
जाणिवेत "मी" च गुंग..
"तो" चि "मी" श्रीरंग...
"तो" चि "मी" श्रीरंग...
जयगंधा...
६-३-२०१७.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2228
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
राहिलेले शब्द सुचवा
प्रेमाचे उधळुनि रंग..
धन्यवाद
In reply to प्रेमाचे उधळुनि रंग.. by ॲबसेंट माइंडेड…