Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ ( भाग ९)

लेखक साहना यांनी मंगळवार, 30/03/2021 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
- इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष श्री जयालाल हे प्रेतपूजक असून, इस्पितळे वापरून अधिकाधिक लोकांना प्रेतपूजक बनवण्याचे त्यांचे विचार उघडकीस आले आहेत. आपल्या पदाचा गैरफायदा घेत ह्या व्यक्तीने IMA द्वारे आयुर्वेद, योग आणि विशेष करून पतंजलीवर मोठा हल्ला माध्यमांतून केला होता. त्याला सडेतोड उत्तर सुद्दा पतंजली ने दिले होते. आता IMA सारख्या निव्वळ व्यावसायिक संघटना सुद्धा राजकीय आणि धार्मिक गुंत्यांत अडकल्या आहेत हे पाहून वाईट वाटते. भूतकाळांत IMA ने पैसे घेऊन "जंतूंना मारणारा पेंट(रंग)" असल्या गोष्टींचे मार्केटिंग केले होते. - सुएझ मधील बोट सुटली. मिम वाल्यानी ह्या घटनेचा भयंकर फायदा घेत भरपूर किस पाडला. - होळी सर्वत्र उत्साहांत (म्हणजे कोरोनाच्या नादांत जितका उत्साह असेल तितकी) साजरी. नेहमीची पाणी बचाव मंडळी ह्या वेळेस गायब होती. कदाचित बंगाल निवडणुकांत गुंतली असावी. उर्दूवूडने होळी च्या संदर्भांत विनयभंगाचा पुरस्कार करणारी गाणी किंवा इतर अश्लील विनोद ह्या वर्षी आणली नाहीत ह्याबद्दल कोविडचे आभार. उदाहरण पहा : https://www.youtube.com/watch?v=6c1OuWRr3lk . आमचं इथे स्टॅनफर्ड ने ह्या वर्षी होळी ठेवली नाही. - भारतांत कोविड ची लाट पुन्हा आली आहे,. चालू घडामोडींच्या धाग्याप्रमाणे इतक्या लाटा आल्या आहेत कि आकडा आता आठवत सुद्धा नाही. - गोव्यांतील दुसरा आंतरराष्ट्रीय (आणि मोठा ) विमानतळ २२ मध्ये सेवेंत येण्याची चिन्हे आहेत. एकूण तीन फेज मध्ये हा विमानतळ सुरु होणार आहे. गोवा, कोंकण आणि पश्चिम कर्नाटक ह्यांच्यासाठी हा विमानतळ महत्वाचा ठरणार आहे. - काही मेल एक्सप्रेस रेल्वेन्ट शॉर्ट सर्किट मुळे आग लागली म्हणून रेल्वे मंत्रालयाने ह्यापुढे रेल्वेत रात्रीचं वेळी सर्व सॉकेट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी बरे इंजिन बिघडले नाही, नाहीतर रेलवे मंत्रालयाने रेल्वेच बंद ठेवली असती. - सोन्याचे दर पडत आहेत. - रंगून मध्ये बऱ्याच भानगडी घडत आहेत. सैन्याने शेकडो लोकांना आणि लहान मुलांना सुद्धा ठार मारले आहे. अनेक पोलीस भारतांत पळून आले. निशस्त्र नि निरपराध लोकांना ठार मारण्याचे आदेश होते आणि तसे करायचे नसल्याने त्यांनी भारतांत आश्रय मागितला. - परमबीर सिंग हे उधोजी सरकार विरोधांत कोर्टांत गेले असल्याने आता ३०-४० वर्षांत सर्व सत्य जनते समोर येईल ह्यांत शंका नाही. - बिटकॉईन ची मान्यता वाढत असून आता विजा सुद्धा ह्यांत उतरत आहे. असली थेरं भारतांत आपण सहन करणार नाही अशी RBI ची भूमिका असल्याने ह्या बाबतीत सुद्धा भारत कदाचित अशमयुगान्त राहील असे वाटते.

वाचने 33405
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by गणेशा

Fixed deposit schemes चे सगळ्यांचेच दर कमी झाले आहेत. माझ्या अंदाजाने अशी कोणतीही FD नाही जिथे यापेक्षा जास्त दर दिले जातात. सर्वसामान्यांना शेअर मार्केट कळत नाही. आणि कळले तरी मुद्दल वाचवण्याची शेअर मार्केट मध्ये guarantee नाही. थोडक्यात, असे पैसे कुठे गुंतवावेत असा आपला सल्ला आहे?

In reply to by पिनाक

व्यक्ती सापेक्ष उत्तर आहे याचे.. प्रत्येक जण वेगळा विचार करतो.. आणि त्याच्या म्हणण्याने ते योग्य असते.. माझ्या म्हणण्याने, gold, mutual fund आणि जमल्यास जमीन या मध्ये गुंतवणूक कधीही भारी राहिल.. पहिल्या दोन मध्ये मी पैसे गुंतवत आहे.. आणि त्याचा चांगला फायदा हि झालेला आहे.. वेगवेगळ्या धाग्यावर एकाच वेळेस सारखाच विषय नको म्हणुन थांबतो..:-) Good night

In reply to by पिनाक

व्यक्ती सापेक्ष उत्तर आहे याचे.. प्रत्येक जण वेगळा विचार करतो.. आणि त्याच्या म्हणण्याने ते योग्य असते.. माझ्या म्हणण्याने, gold, mutual fund आणि जमल्यास जमीन या मध्ये गुंतवणूक कधीही भारी राहिल.. पहिल्या दोन मध्ये मी पैसे गुंतवत आहे.. आणि त्याचा चांगला फायदा हि झालेला आहे.. वेगवेगळ्या धाग्यावर एकाच वेळेस सारखाच विषय नको म्हणुन थांबतो..

In reply to by श्रीगुरुजी

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारला कर्जाचे व्याज कमी ठेवायचे असल्याने deposit वरील व्याज कमी असणार हे ओघानेच आले. ही लूटमार कशी?

In reply to by पिनाक

>>> सर्वसामान्यांना शेअर मार्केट कळत नाही. आणि कळले तरी मुद्दल वाचवण्याची शेअर मार्केट मध्ये guarantee नाही. >>> असे असूनही भांडवली बाजारात झालेला अल्प मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा भांंडवली नफा पूर्ण करपात्र केला आहे. लाभांश करपात्र केला आहे. रस्तेबांधणीसाठी इंधनावर अधिभार आहे व त्याव्यतिरिक्त पथकर सुद्धा द्यावा लागतो. एवढे कर देऊनही रस्ते वाईट अवस्थेत आहेत. इंधनावर जवळपास १५० टक्के कर द्यावा लागतो. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान काढून टाकले आहे. बचतीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केलेत, परंतु कर्जाचे व्याजदर त्या प्रमाणात कमी झालेले नाहीत. आयकर आहेच व त्यावर अतिरिक्त अधिभार आहे. नोकरदारांकडून सक्तीने भविष्य निर्वाह निधी घेतला जातो, परंतु त्यावरील व्याजदर खूप कमी केला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असे वाटत असेल तर bjp सरकार देशातून हाकलून ध्या. परत कधीच देश असे पर्यंत bjp सत्तेत आली नाही पाहिजे. राज्यात पण नाही देशात पण नाही. हा पक्षच इतिहास जमा होणे गरजेचे आहे. बाबरी ची कृपा म्हणून ह्यांना सत्ता मिळाली . ह्यांना सर्व सामान्य लोकांशी काही देणे घेणे नाही शेठजी आणि ब्राह्मण बनिया च पक्ष आहे हा. ह्यांना हिंदू हिताशी पण काही देणे घेणे नाही. फायद्या साठी ह्यांना चीन पण चालतो आणि पाकिस्तान सुद्धा चालतो. फक्त ब्राह्मण,बनिया आणि शेठजी ह्यांचा त्या मध्ये फायदा झाला पाहिजे.

In reply to by Rajesh188

शेठजी आणि ब्राह्मण ... पगडी कि पागोटं हि घाण इथे पसरवू नका .. भाजपचा कसा चुकतंय ते जरूर सांगा पण हि घाण नको , संपादक कृपया लक्ष द्या

In reply to by श्रीगुरुजी

सरकारने पुन्हा सगळ्या गोष्टींवर अनुदान सुरू करून इंधन, गॅस वगैरे स्वस्तात उपलब्ध करून द्यावे असे तुमचे म्हणणे आहे का? तसं करूया. सगळे पथदर्शक प्रोजेक्ट्स बंद करून काँग्रेस सरकारप्रमाणे अनुदान वाटूया. राफेल परत विकून टाकूया आणि मिग 21 ची flying कॉफीन आपल्या पायलटस चे बळी घेत राहूदे. आपल्याला मोठ्या रोड्स ची, वेगवान ट्रेन्स ची गरजच नाही. बँकिंग सुधारणा डब्यात घालू. One road, one tax पण नकोच. पुन्हा परवाना पद्धत आणून आपल्या सगळ्या फॅक्टरीज बांगलादेश आणि व्हिएतनाम ला हाकलून देऊ. 5 त्रिलीयन डॉलर इकॉनॉमी ची पण गरज नाही आपल्याला. आपण सगळं जसं काँग्रेसच्या काळात होतं तसं करू. आर्मेड फोर्सेस ना modernize करायची पण गरज नाही. आपला गॅस 400 रुपये स्वस्तात मिळाला म्हणजे झालं. बरोबर ना गुरूजी?

In reply to by पिनाक

अनुदान सुरू होते तेव्हा एकही प्रकल्प सुरू नव्हता? एकही रस्ता बांधला नव्हता? एकही धरण बांधले नव्हते? भारतात एकही लढाऊ विमान नव्हते? मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात कर देऊनही सर्वसामान्य नागरिकांच्या पदरात काय पडते? रस्तेबांधणीसाठी पेट्रोलवर प्रतिलिटर ३-४ रूपये अधिभार आहे. त्यात भर म्हणून पथकर सुद्धा आहे. दुहेरी कर देऊनही रस्ते वाईट अवस्थेत आहेत. उदाहरणार्थ पुण-सातारा रस्ता. फक्त भरमसाट कर उकळणे व त्या बदल्यात अत्यल्प सुधारणा करणे हे किती दिवस सुरू राहणार?

In reply to by पिनाक

लष्करावर होणारा खर्च हा व्यर्थ खर्च आहे .फक्त देशातील कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी म्हणून मर्यादित प्रमाणात फोर्स असावी. जगातील सर्व देशांनी मिळून लष्करी हत्यार,अणू बॉम्ब,missile, ही सर्वांनी मिळून नष्ट करावीत. एवढं शहाणं पण माणसाने दाखवले च पाहिजे. जागतिक सर्व देशांच मिळून एक आधुनिक लष्कर असावे पण ते फक्त कधी पृथ्वी वर प्रगत अशा दुसऱ्या ग्रहावरील लोकांनी हल्ला केला तर पृथ्वी चे रक्षण करण्यासाठी. सर्व देशांनी लष्करी खर्च कमी केला तर किती तरी पैसा विकास कामासाठी उपयोगी पडेल.

In reply to by पिनाक

लष्करावर होणारा खर्च हा व्यर्थ खर्च आहे .फक्त देशातील कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी म्हणून मर्यादित प्रमाणात फोर्स असावी. जगातील सर्व देशांनी मिळून लष्करी हत्यार,अणू बॉम्ब,missile, ही सर्वांनी मिळून नष्ट करावीत. एवढं शहाणं पण माणसाने दाखवले च पाहिजे. जागतिक सर्व देशांच मिळून एक आधुनिक लष्कर असावे पण ते फक्त कधी पृथ्वी वर प्रगत अशा दुसऱ्या ग्रहावरील लोकांनी हल्ला केला तर पृथ्वी चे रक्षण करण्यासाठी. सर्व देशांनी लष्करी खर्च कमी केला तर किती तरी पैसा विकास कामासाठी उपयोगी पडेल.

In reply to by Rajesh188

माझा या सर्व प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही पंतप्रधान पदासाठी उभे रहा. माझं मत तुम्हालाच असेल. अर्थात बाकीच्या सगळ्या देशांचा विचार करता पंप्र पद उपयोगाचं नाही. तुम्ही युनोच्या सेक्रेटरी जनरल पदासाठी उभे रहावे ही नम्र विनंती.
जागतिक सर्व देशांच मिळून एक आधुनिक लष्कर असावे पण ते फक्त कधी पृथ्वी वर प्रगत अशा दुसऱ्या ग्रहावरील लोकांनी हल्ला केला तर पृथ्वी चे रक्षण करण्यासाठी.
ता.क. : ज्यावेळी दुसऱ्या ग्रहावरच्या लोकांनी पृथ्वीवर हल्ला केलेला असेल त्याच वेळी आपण ही लढाई हरलेलो असू. मी जास्त explain करत बसत नाही पण आपण अशा युद्धातून वाचणे म्हणजे प्रथमतः आपण कुणाही परग्रहवासी ला न सापडणे हे होय.

मार्च मधे एक बीजेपी एमपी किसान आंदोलनास समर्थन म्हणुन राजीनामा देणार असे श्री श्री टिकैत बोलले होते. अजुन काही बातमी आली नाही. राजीनामा रद्द केला की काय? णवीन काही घोषणा?

In reply to by श्रीगुरुजी

खरयं. गम्मत म्हणुन गूगल वर शोध घेतला तर फक्त काही टिनपाट न्युज मिडीया सोडलया तर याची आता बातमी पण येत नाही. परदेशातुन उगाच ओढुन ताणुन काही शिख लोकांचा सपोर्ट घ्यायचे चालु आहे. त्यालाही आता काही प्रसिद्धी मिळत नाही.

सेव्हिंग स्कीम वरचे व्याजदर कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक मोदींनी मारला आहे. आता सगळे पैसे शेयर मार्केट मध्ये येऊन उद्योगांना भांडवल मिळणार, उद्योजक खुष , ब्रोकर खुश आणि देशाची प्रगती होणार. मुळात असल्या योजना चालवणे सरकारचे काम नाही. (जसे कम्पन्या विकल्या तशा या योजनांपासून सरकारने अंतर ठेवले पाहिजे) अमेरिकेत बघा एवढे व्याजदर नसतात , म्हणून अमेरिका प्रगत आहे.

In reply to by कपिलमुनी

सेविंगदर ठरवण्याची पावर कुणाच्याही हातांत दिली तर मग ती मंडळी ती पावर वापरणारच. कंठशोष करून फायदा नाही. योग्य सेविंग दर काय हे कुणालाच ठाऊक नाही, मार्केट ठरवतो तो दर ठेवल्यास बहुसंख्यांकाचे कल्याण होते. > आता सगळे पैसे शेयर मार्केट मध्ये येऊन उद्योगांना भांडवल मिळणार, सेविंग दर कमी झाले ह्याचा अर्थ लोक पैसे शेयर मार्केट मध्येच गुंतवतील असे नाही. सेविंग दर कमी झाले तर इतर सर्व लोन चा दर सुद्धा कमी होतो आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार जास्त होतात. > मुळात असल्या योजना चालवणे सरकारचे काम नाही. (जसे कम्पन्या विकल्या तशा या योजनांपासून सरकारने अंतर ठेवले पाहिजे) सरकारी बँक विकल्या तर हे आपोआप होईल. > अमेरिकेत बघा एवढे व्याजदर नसतात , म्हणून अमेरिका प्रगत आहे. भांडवल जिथे स्वस्त तिथे प्रगती जास्त.

In reply to by कपिलमुनी

Amerika प्रगत राष्ट्र आहे असे समजणे हाच मोठा जोक आहे. जगातील सर्वात जास्त कर्ज बाजारी देश आहे तो. अमेरिका वर २९ लाख करोड डॉलर कर्ज आहे .प्रतेक अमेरिकन नागरिक च्या डोक्यावर ६० लाख रुपये कर्ज आहे. अमेरिकेचा काहीच भाग प्रगत असल्या सारखा वाटत तो पण कर्जाच्या पैशावर . पूर्ण अमेरिके चा विचार केला तर भारता पेक्षा पण बेकार अवस्था आहे त्यांची.

In reply to by Rajesh188

तुम्ही ज्या विद्यापीठातून हे ज्ञान घेतलेत तिथे प्रवेश मिळायला नक्की काय करायला लागते? तिथे अर्ज करेन असे म्हणतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Laughing Stock होणे काय असते हे असले प्रतिसाद वाचून समजले असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

व्हाट्सअँप विद्यापीठात शिकतात ते.. आणि शरद कोचिंग कलासेस मध्ये शिकवणी लावलीये.. कॉलेजपर्यंतच शिक्षण त्यांनी इटली मधून घेतले असावे.. त्यांच्या डिग्र्या आपण मिपाकरांनी मागु नयेत.. कारण ते स्वतःची सोडून, मोदीं, स्मृती इराणी इत्यादी बड्या असामींची डिग्री शोधण्यात व्यस्त असतात.

ग्राहकांचे पैसे बुडतील म्हणून अख्या व्यवहारावर बंदी घालणे कितपत बरोबर वाटते ? त्याशिवाय अनेक भारतीय कंपन्या आणि पाहिजे तर स्टेट बँक सुद्धा है व्यवसायात जाऊ शकते. २ वेगळ्या गोष्टी १) केवळ क्रिप्टो ट्रेडिंग साठी एक्सचेंज काढावे आणि त्यास सरकारने परवानगी दव्ययी असे म्हणत असाल तर ती एक वेगळी गोष्ट आहे अहो त्यासाठी प्रत्यक्ष एक्सचेंज काधण्याची जरुरी पण नाही चिकागो मर्कंटाईल एक्सचेंज वर बिटकॉइन वॉर बेतलेले फुचर कॉन्ट्रॅक्ट आहेत तसे एन एस सी काढू शकते .. यात प्रत्यक्ष ग्राहक बिटकॉइन घेत नाही तर त्याचं किमतीवर फुचार मध्ये खेळतो... म्हणजे चिकागो मर्कंटाईल एक्सचेंज सारखी तंगडी "काउंटर पार्टी त्यामुळे एक्सचेंज बुडेल हा धोका नाही २) क्रिप्टो ( हयात असेलेल्या भारताबाहेरील ) ट्रेडिंग साठी सरकारने मुभा दवावी तर अनेक प्रश्न निर्माण होतात ते मी आधी मांडलेच आहेत, आणि त्यात भारतातून संपत्ती बाहेर जाऊ देणे ना देणे हा मुद्दा येतो ३) क्रिप्टो एक्सचेंज ( नवीन भारतात काढणे ) तेच प्रश्न + क्रिप्टो असल्यामुळे मग भारताबाहेर नेने आणि आणणे हे जर नसेल तर मग उपयोग काय? सध्या जसे "फिनतेक " या नावाखाली अनेक धंदे विना परवानगी आर्थिक उलाढालीचं धंद्यात घुसू पाहू लागले तसेच आहे .. स्मार्ट फोन वर अँप द्वारे करा नाहीतर रोख नोटा देऊन करा शेवटी गुंतवणूक ती गुंतवणूकच त्या साठी ग्राहकाचे हित बघणे आणि त्यास्तही जमेल तसे कायदे करणे हे महत्वाचे आहे .. त्याकडे दुर्लक्ष नाही करता येत

ह्या भागाचे नाव खरे तर क्रिप्टोकरन्सी असे असायला हवे होते. मला वाटते की क्रिप्टोकरन्सी या नावाने नवीन धागा काढून त्यात याधाग्यातील संबंधीत संदेश हलवण्यात यावे. खूपच साधक बाधक चर्चा झाली आहे.

एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो. क्रिप्ट करन्सी भारत सरकार स्वीकारणार नाही असे मला म्हणायचे नाही. सरकारने स्वतः तयार केलेली क्रिप्ट करन्सी नक्कीच successful होईल. पण कुणी तरी दुसर्याने तयार केलेलं चलन "बहुधा" भारत जसेच्या तसे स्वीकारणार नाही. ज्या गोष्टीवर स्वतः चा कंट्रोल नाही ते चालू दिले जाणार नाही हा माझा अंदाज आहे.

१) जगातील सर्व देशात central bank hi असणारच. २) ही सेंट्रल बँक च देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष आणि नियंत्रण ठेवणार. ३) तज्ञ(स्वयं घोषित) लोकांनी किती अपरिपक्व मत व्यक्त करून बीट coin किंवा त्याच प्रकारच्या चलनाची तरफदारी केली तरी जगात कोणताच देश त्यांची बकवास ऐकणार नाही. ४) खासगी उद्योगपती नी मोकळे रान देणे म्हणजे विनाश ओढवून घेणे हे सर्व देशांना चांगले समजते त्या मुळे कोणत्याही व्यक्ती ची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार जग भरात सर्व सरकार नी स्वतः कडेच ठेवला आहे. ६) अकाउंट सील करणे,संपत्ती जप्त करणे हे अधिकार सरकार नेहमीच स्वतः कडे ठेवेल. ७) रस्ते बांधणी,कारखाने उभे करणे,विमान तळ उभी करणे ह्या साठी जगभरात ह्याच सरकारी अधिकार चा वापर करून खासगी मालकीच्या जमिनी सरकार ताब्यात घेते.. तसे अधिकार सरकार कडे नसते तर आज रस्ते ,धरणे,कारखाने,विमानतळ , शाळा,कॉलेज,हॉस्पिटल,शहर . उभी च निर्माण झाली नसती बाजारभाव प्रमाणे जमिनी विकत घेवून धरण,रस्ते,विमानतळ,हॉस्पिटल,शाळा,कॉलेजेस, बांधण्याचा व्यवसाय करून नफा कमावणे अशक्य आहे .जगात एक उद्योग पती एवढं श्रीमंत नाही की तो फक्त ५० किलोमीटर रेल्वे मार्ग बाजार भावा नुसार खासगी जमिनी विकत घेवून तयार करेल आणि त्या ५० km railway मार्गावर गाडी चालवून नफा कमावेल. अनियंत्रित खासगीकरण जगात कोणीच स्वीकारणार नाही . . ह्या विषयावर ची चर्चा,भांडवल शाही चे गुणगान वांझोटे आहे. कोणी स्वीकारणार नाही. स्वार्थी बुध्दी चे विकृत लोकच फक्त स्वीकारतील.