४. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : द्रविड चळवळ, तमिळींची प्रादेशिक आणि राजकीय अस्मिता
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आधीचा भाग:
३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण
जस्टीस पार्टी मधील नेते पेरियार इ. व्ही. रामासामी यांच्या नेतृत्वाखाली १९२५ मध्ये स्वाभिमान आणि सामाजिक सबलीकरणाच्या चळवळ सुरु झाली. त्यांनी "ब्राम्हणवादी हिंदुत्व" हेच दलित समाजाच्या विनाशचे एकमेव कारण असल्याचे प्रतिपादन करत दलित चळवळ अर्थात द्रविड कळघम (द्रविड महासंघ) तळागाळापर्यंत नेली. मद्रास प्रांतात जस्टीस पार्टी ही कॉंग्रेसला मुख्य राजकीय पर्याय म्हणून जोमाने काम करू लागली. १९३० नंतर भारत भर राष्ट्रीय भावना जोर धरू लागली. दोनचार राज्यांपुरते संकुचित धोरण राष्ट्रीय चळवळीपुढे जस्टीस पार्टी तोकडी पडू लागली. १९३७ मधील निवडणुकांत काँग्रेस कडून पराभव पत्करल्यानंतर संघटनेच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली ( नंतर फक्त १९५२ मध्ये यांचा एक प्रतिनिधी निवडून येऊ शकला होता) संघटना सरसकट राजकीय दावणीला बांधण्यापेक्षा सामाजिक सबलीकरणासाठीच प्रतिनिधित्व या आग्रहाखातर उगवत्या अण्णा दुराई सारख्या नेत्यांना राजकीय निवडूणुकीत भाग घेण्यासाठी विरोध करून संघटनेला राजकीय पक्ष होऊ दिले नाही.
अण्णा दुराई आणि पेरियार इ. व्ही. रामासामी:

अण्णा दुराई आणि द्रविड चळवळीची राजकीय वाटचाल: याचा परिणाम म्हणून अण्णा दुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा नवा राजकिय पक्ष १९४९ साली स्थापन केला. तामिळनाडूमधील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करत द्रविड मुन्नेत्र कळघमने उत्तर भारतीयांच्या कथित वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. पुढे हाच त्यांचा मुख्य मुद्दा बनत गेला. दक्षिणेकडील चार राज्यांचे एकत्रित वेगळे द्रविडनाडू / द्रविडीस्थान हे स्वतंत्र राष्ट्र करावे अशी देखील आणखी एक द्रमुकची मागणी होती. सुरुवातीला स्वतंत्र द्रविडनाडूची मागणी फक्त तामिळभाषिक प्रदेशापुरतीच होती, नंतर त्यात इतर चार दक्षिणी राज्यांनाही समाविष्ठ करण्यात आले. पण कालांतराने भाषावार प्रांतरचना झाल्याने आणि भारतातून फुटून स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणे के केंद्रसरकारने अवैध ठरवल्याने ही मागणी द्रमुकला सोडून द्यावी लागली. केंद्र सरकारच्या "त्रैभाषिक" धोरणला अर्थात राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याला) वेळोवेळी नापसंती दर्शवत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला. आणि याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून एनईपी-२०२० या राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील "त्रैभाषिक" सूत्राला (कारण त्यात पुन्हा "त्रैभाषिक" धोरणाच्या नावाखाली हिंदी सक्ती होणार म्हणून) त्यांचा विरोध आहे. चेन्नई मरीना बीचवरील रॉबर्ट काल्डवेल यांचा पुतळा:
१९६८ साली दुसरी आंतरराष्ट्रीय तामिळ परिषद पार पडली. त्यावेळी द्रविडी भाषा समुहाच्या संशोधन आणि लेखन योगदानासाठीचा गौरव म्हणून तामिळनाडू राज्य शासनाने रॉबर्ट काल्डवेल यांच्या सन्मानार्थ चेन्नईच्या मरीना बीचजवळ स्मारक उभं केलं. त्यात "चर्च ऑफ साउथ इंडिया"ने भेट दिलेल्या काल्डवेल यांच्या पुतळ्याचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले ! त्याचवेळी त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट देखील प्रकाशित करण्यात आले. चेन्नईला येणारे देशविदेशातील येणारे बरेच पर्यटक या स्मारकाला आवर्जून भेट देतात !
रॉबर्ट काल्डवेल यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट:

१९ व्या शतकातील काल्डवेल यांचा कालखंड आणि २० व्या शतकात रुजलेल्या सामाजिक व राजकीय चळवळींची सुरुवात आणि गेली काही दशके विशेषतः तमिळ लोकांचा केंद्रीय सत्तेशी (कारण केंद्रीय सत्तेत साधारणपणे उत्तरेकडील लोक असतात) वेळोवेळी संघर्ष व हिंदी भाषेला कडवा विरोध हे पाहता रॉबर्ट काल्डवेल यांना “तथाकथित तमिळ अस्मितेचे उद्गाते” असे म्हटल्यास वावगे ठरू नये. --------------------- समाप्त ----------------------------------------------------------------- प्रचि आणि इतर संदर्भ आंजावरून साभार.
तमिळ भाषा शिकल्यानंतर त्यांनी त्यातील साहित्यावर मनापासून प्रेम केले आणि त्याच्या वैशिष्ट्यावर संशोधन करण्यास सुरवात केली. " द्रविडी भाषा समुह " हा शब्दप्रयोग करणारे ते पहिले भाषा अभ्यासक होते. तमिळ बरोबरच त्यांनी तेलगू, कन्नड आणि मल्याळममधील समानतांबद्दल प्रचंड संशोधन केले. त्यांच्या संशोधनानंतर त्यांनी असे मत मांडले की, द्रविडी भाषांमध्ये तमिळ ही प्रमुख भाषा आणि संस्कृतोद्भव शब्द तमिळ मधून वगळल्यास तमिळ भाषा आणखी सशक्त होऊन आणि वाढू शकेल.
… .. पुढे
रॉबर्ट काल्डवेल यांच्या तमिळ भाषा संशोधनामुळे झालेले सामाजिक आणि राजकीय परिणाम:
रॉबर्ट काल्डवेल यांनी मांडलेल्या द्रविड सिद्धांतामुळे दक्षिणेतील समाजमन ढवळून निघाले आणि त्यांच्या दक्षिणी लोक "मुळ" देशी असण्याचा आणि उत्तरेकडील लोक परकीय असण्याच्या चर्चेला तोंड फुटले. जातीभेद आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ब्राह्मणवादी लोकांचे मोठे प्रतिनिधित्व यामुळे चर्चा टिपेला पोहोचली. यातूनच ब्राह्मण हे मूळ उत्तरेकडील असून त्यांनी संस्कृती, धर्म आणि त्यांचा वारसा दक्षिण भारतातील लोकांवर लादला आहे असा सार्वत्रिक समज रूढ केला गेला / होत गेला. उत्तरेकडील भाषा हिंदी म्हणून हिंदी विरोधालाही धार चढत गेली. उत्तरेकडील राज्ये आणि हिंदी भाषा व्हिलन ठरवली गेली.
ब्राह्मणेतर सामाजिक चळवळ:
यातूनच १९१७ साली जस्टीस पार्टीची स्थापना केली गेली. उत्तरेकडील प्रस्थापित काँग्रेस पक्ष ब्राह्मणधार्जिणा म्हणून काँग्रेसला देखील कडाडून विरोध केला गेला. आणि केंद्रीय संसदीय मंडळात आपले प्रतिनिधी देखील पाठवले नाहीत. या द्रविड चळवळीची द्वाही फिरवून १९१९ साली झालेल्या ब्रिटिश सरकारातील प्रांतीय निवडणुका जिंकल्या. यामुळे दलित चळवळी सशक्त होऊन खालील बाबींमध्ये यश मिळाले:
१. सरकारी नोकरीत विविध समुदायांना आरक्षण दिले.
२. असे कायदे केले गेले ज्यामुळे दलितांना सर्व सार्वजनिक जागा भेदभाव न करता वापरता येतील.
३. ब्राह्मणेतर लोकांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी मिळाली.
४. ब्राह्मण पुजारीविना विवाह पद्धती रूढ होऊ लागली, अश्या विवाहांना प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली.
५. देवदासी प्रथा निर्मूलन प्रारंभ
६. भारतातील पहिले महिला आमदार होण्यासाठी महिलांनी निवडणुका लढविण्यास परवानगी देण्यासही या पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
जस्टीस पार्टीचे संस्थापक: डॉ. सी. नटेसन, टी. एम. नायर त्यागराज चेट्टी व पानगलचे राजे सर पानगंती रामरायानिंगार
जस्टीस पार्टी मधील नेते पेरियार इ. व्ही. रामासामी यांच्या नेतृत्वाखाली १९२५ मध्ये स्वाभिमान आणि सामाजिक सबलीकरणाच्या चळवळ सुरु झाली. त्यांनी "ब्राम्हणवादी हिंदुत्व" हेच दलित समाजाच्या विनाशचे एकमेव कारण असल्याचे प्रतिपादन करत दलित चळवळ अर्थात द्रविड कळघम (द्रविड महासंघ) तळागाळापर्यंत नेली. मद्रास प्रांतात जस्टीस पार्टी ही कॉंग्रेसला मुख्य राजकीय पर्याय म्हणून जोमाने काम करू लागली. १९३० नंतर भारत भर राष्ट्रीय भावना जोर धरू लागली. दोनचार राज्यांपुरते संकुचित धोरण राष्ट्रीय चळवळीपुढे जस्टीस पार्टी तोकडी पडू लागली. १९३७ मधील निवडणुकांत काँग्रेस कडून पराभव पत्करल्यानंतर संघटनेच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली ( नंतर फक्त १९५२ मध्ये यांचा एक प्रतिनिधी निवडून येऊ शकला होता) संघटना सरसकट राजकीय दावणीला बांधण्यापेक्षा सामाजिक सबलीकरणासाठीच प्रतिनिधित्व या आग्रहाखातर उगवत्या अण्णा दुराई सारख्या नेत्यांना राजकीय निवडूणुकीत भाग घेण्यासाठी विरोध करून संघटनेला राजकीय पक्ष होऊ दिले नाही.
अण्णा दुराई आणि पेरियार इ. व्ही. रामासामी:
अण्णा दुराई आणि द्रविड चळवळीची राजकीय वाटचाल: याचा परिणाम म्हणून अण्णा दुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा नवा राजकिय पक्ष १९४९ साली स्थापन केला. तामिळनाडूमधील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करत द्रविड मुन्नेत्र कळघमने उत्तर भारतीयांच्या कथित वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. पुढे हाच त्यांचा मुख्य मुद्दा बनत गेला. दक्षिणेकडील चार राज्यांचे एकत्रित वेगळे द्रविडनाडू / द्रविडीस्थान हे स्वतंत्र राष्ट्र करावे अशी देखील आणखी एक द्रमुकची मागणी होती. सुरुवातीला स्वतंत्र द्रविडनाडूची मागणी फक्त तामिळभाषिक प्रदेशापुरतीच होती, नंतर त्यात इतर चार दक्षिणी राज्यांनाही समाविष्ठ करण्यात आले. पण कालांतराने भाषावार प्रांतरचना झाल्याने आणि भारतातून फुटून स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणे के केंद्रसरकारने अवैध ठरवल्याने ही मागणी द्रमुकला सोडून द्यावी लागली. केंद्र सरकारच्या "त्रैभाषिक" धोरणला अर्थात राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याला) वेळोवेळी नापसंती दर्शवत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला. आणि याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून एनईपी-२०२० या राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील "त्रैभाषिक" सूत्राला (कारण त्यात पुन्हा "त्रैभाषिक" धोरणाच्या नावाखाली हिंदी सक्ती होणार म्हणून) त्यांचा विरोध आहे. चेन्नई मरीना बीचवरील रॉबर्ट काल्डवेल यांचा पुतळा:
१९६८ साली दुसरी आंतरराष्ट्रीय तामिळ परिषद पार पडली. त्यावेळी द्रविडी भाषा समुहाच्या संशोधन आणि लेखन योगदानासाठीचा गौरव म्हणून तामिळनाडू राज्य शासनाने रॉबर्ट काल्डवेल यांच्या सन्मानार्थ चेन्नईच्या मरीना बीचजवळ स्मारक उभं केलं. त्यात "चर्च ऑफ साउथ इंडिया"ने भेट दिलेल्या काल्डवेल यांच्या पुतळ्याचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले ! त्याचवेळी त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट देखील प्रकाशित करण्यात आले. चेन्नईला येणारे देशविदेशातील येणारे बरेच पर्यटक या स्मारकाला आवर्जून भेट देतात !
रॉबर्ट काल्डवेल यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट:
१९ व्या शतकातील काल्डवेल यांचा कालखंड आणि २० व्या शतकात रुजलेल्या सामाजिक व राजकीय चळवळींची सुरुवात आणि गेली काही दशके विशेषतः तमिळ लोकांचा केंद्रीय सत्तेशी (कारण केंद्रीय सत्तेत साधारणपणे उत्तरेकडील लोक असतात) वेळोवेळी संघर्ष व हिंदी भाषेला कडवा विरोध हे पाहता रॉबर्ट काल्डवेल यांना “तथाकथित तमिळ अस्मितेचे उद्गाते” असे म्हटल्यास वावगे ठरू नये. --------------------- समाप्त ----------------------------------------------------------------- प्रचि आणि इतर संदर्भ आंजावरून साभार.
प्रतिक्रिया
वा !
धन्यवाद _/\_
मस्त झाली लेखमाला. खुप नवीन
गेले ते दिन गेले. सत्तेसाठी लाचारी,स्वार्थ आला.
भारी संदर्भ टाकलाय, एकदम सही.
तमिळ लोक फिके पडतील इतके
स्थानिक उत्पादनांवर हिंदीत
केम छो वरली
हा .. हा .... !
फक्त पाकिस्तानच नाहीं इथे
लेख माहितीपूर्ण होता..__/\__
फक्त पाकिस्तानच नाहीं इथे
ही लेखमाला एकदमच सुरेख झाली.
धन्यवाद _/\_
असेच अजून एक तमिळप्रेमी ख्रिश्चन मिशनरी
अतिशय रोचक माहिती !
तत्कालीन युरोपियन लोकांकडे
सत्तेपाठोपाठ
खूप माहितीपूर्ण लेखमाला
मला वाटतं त्या काळात
बऱयाच दिवसांनी मिपावर आल्याने मालिकेचे चारही भाग सलग
मिशनरी....
धन्यवाद _/\_
मस्त झाली लेखमाला.
धन्यवाद, बापूसाहेब !