आम्ही शाळेत असताना आम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये निबंधलेखन म्हणून एक प्रकार होता..
खरे तर तो होता creativity बघण्यासाठी, पण सगळ्यांसाठी ते कसलं जमायला? मग आमच्या सरांनी एक युक्ती सांगितली आम्हाला.
सर काय म्हणायचे, एक निबंध व्यवस्थित पाठ करा.. समजा घराला लागलेली आग.
मग घराला लागलेली आग, म्हणजे काय, तर एका घराला आग लागली, मग कश्या ज्वाला आल्या, मग कोणीतरी फायरब्रिगेडला बोलावले, मग त्यांनी कसे पाणी मारले, ज्वाळा कश्या आकाशपर्यंत जात होत्या, ब्रिगेडने कशी काशी केली आगीची वगैरे.. आणि मग किती नुकसान झाले आम्ही कसे वाचलो इत्यादी इत्यादी.
तर हा निबंध पाठ झाला की पुढे काय?
पुढचा मार्ग सोपा आहे, समजा एक रम्य संध्याकाळ म्हणून विषय आला, तर मग सुरू करायचं, एके संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो होतो, तिथे अचानक एका घराला आग लागली... मग आपला निबंध पुढे सुरू. एक रम्यभीषण संध्याकाळ
समजा मी पाहिलेला निसर्ग म्हणून विषय आला, तर एके दिवशी आम्ही शेजारच्या डोंगरावर फिरायला गेलो होतो, तिथे एक घराला अचानक आग लागली.. मग पुन्हा आपला निबंध सुरू. डोंगरावरच्या भीतीदायक निसर्ग..
समजा दवाखान्यावर आला विषय, तर दवाखान्याला आग लावायची.
माझी शाळा म्हणून आला विषय, तर शाळेला आग लावायची..
हे एकदा जमले की कोणताही विषय लिहिणे सोपे, मराठी असो नाहीतर इंग्रजी..
रत्नागिरीमधले कोणी असतील तर ते सर पण तुम्हाला आठवतील.
पण हे सगळे मला आत्ता का बरे आठवले असेल?
वर्गीकरण
वाचने
6892
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या आयडीवरून सुचले असेल.
आयला भारी आहे ....
भारी सांगितले..
ह्या कामाचे पैसे मिळत असते तर
In reply to भारी सांगितले.. by गणेशा
सहमत आहे
In reply to भारी सांगितले.. by गणेशा
:0
In reply to सहमत आहे by मुक्त विहारि
अहो....
In reply to :0 by डॅनी ओशन
आणि
In reply to सहमत आहे by मुक्त विहारि
हे सांगणारे आपण कोण?
In reply to आणि by गणेशा
सुरुवात कोणी केली?
In reply to हे सांगणारे आपण कोण? by मुक्त विहारि
मी तुम्हाला लिहू नका,
In reply to सुरुवात कोणी केली? by गणेशा
जिनके घर शिशे के होते है, वो
In reply to आणि by गणेशा
हाहाहा.. खुप हसलो
In reply to जिनके घर शिशे के होते है, वो by आग्या१९९०
गोलमाल मध्ये-
In reply to जिनके घर शिशे के होते है, वो by आग्या१९९०
ते वेगळे ...
In reply to जिनके घर शिशे के होते है, वो by आग्या१९९०
असे कोणतेही गुरुजी आम्हाला
सहमत आहे ...
In reply to असे कोणतेही गुरुजी आम्हाला by बापूसाहेब
भारी आयड्या आगलाव्या निबंधाची
इंग्रजी भाषेतून my friend हा
भारी किस्सा आहे
In reply to इंग्रजी भाषेतून my friend हा by साहना