Skip to main content

कविता - कृष्णधून

लेखक VRINDA MOGHE यांनी शुक्रवार, 19/03/2021 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
*कृष्णधून* पहाटवा-याची निशब्द धून , मावळती चंद्रकोर, फिकटशी !! झाडांची सळसळ, प्राजक्त सडा, धुक्याची चादर, पुसटशी !! आकाशी उधळण, सप्तरंगांची, घरट्यात चिवचिव, नाजुकशी !! पक्ष्यांचे थवे, उडती रावे, मोहक किलबिल, ऐकावीशी !! अलगद जाग, स्वप्नाचा भास खुदकन हसू, गालापाशी !! पडता कानी, कृष्णधून मन होई राधा, लागे समाधीशी !! -©️वृंदा 19/3/21
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2480
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पडता कानी, कृष्णधून मन होई राधा, लागे समाधीशी !! सर्वच ओळी खास... शेवटच्या चार ओळीही खासच आहेत, आवडल्याही पण शेवटच्या ओळीतला शब्दला, लयीत येत नाही असे वाटले. बाकी लिहिते राहा.