Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 17/03/2021 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.

वाचने 47874
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

अपेक्षित प्रतिसाद. माणूस ओबीसी आहे हे बरे आधीच माहित आहे भक्तांना! मंत्रिमंडळात कोणाला किती प्रतिनिधित्व मिळाले आहे, ओबीसी माणसाचे धनी व नियंते कोण आहेत हे कोणाला कळत नाही असे समजायचे कारण नाही.

In reply to by नगरीनिरंजन

बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ बाजूला ठेवू. अनुरुप सारखी विवाहमंडळे अमुक एका जातीसाठी एक विवाहजुळणी मेळावा व इतर सर्व जातींसाठी एक मेळावा असे प्रकार करतात तिथे तरी अर्धवटरावांनी एकदा असे बोलून दाखवावे. तशा ठिकाणी बरोबर शेपूट घातले जाते हिंदूधर्माचे. तिथे नाही सगळे हिंदू एक मग. ह्या असल्या दुतोंडी लोकांना इतिहासात अनेकदा चपराकी बसल्यात तरी सुधारणा नाही.

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही अनुरूपला विरोध केला का? बरं, सर्व जनतेच्या पैशातून फक्त एका विशिष्ट जातीलाच मदत देणाऱ्या बार्टी, सारथी वगैरे संस्थांना विरोध केला का?

In reply to by श्रीगुरुजी

केला असेल वा न केला असेल आपल्याला काय त्याचे? जे जातीयवादी नसण्याचे दावे करतात त्यांनी केला की नाही ते महत्त्वाचे. आम्ही स्वतःला काही म्हणवत नाही; परंतु “हिंदुराष्ट्र” म्हणजे काय हे आम्हाला नक्की कळते.

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही अनुरूपला विरोध केला का? बरं, सर्व जनतेच्या पैशातून फक्त एका विशिष्ट जातीलाच मदत देणाऱ्या बार्टी, सारथी वगैरे संस्थांना विरोध केला का?

In reply to by नगरीनिरंजन

अनुरूप कुठून आलं मध्येच ? प्रत्येक जातीची स्थळे अथवा प्रत्येक जातीच्या स्थळांची वेगळी वेबसाइट हा प्रकार काही नवीन नाही. ब्राह्मणेतर जातींच्या विवाह जुळवणाऱ्या वेगळ्या वेबसाइट खंडीने सापडतील. कै च्या कै लॉजिक आहे. अनुरूप कडे ब्राह्मणेतर स्थळांची संख्या ब्राह्मणांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे ते दोन विभाग करणारच. तुम्हाला त्यांचे बिझनेस मॉडेल नसेल पटत तर द्या सोडून. आणि अनुरूप हा एक व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या खाजगी व्यवसायात काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. चायला उद्या तुम्ही लग्नात सामिष आणि निरामिष आहाराच्या वेगळ्या व्यवस्थेला पण नाक मुरडाल.

याआधी हिटलर, नरराक्षस, नराधम, मृत्युचा दलाल, सैनिकाच्या रक्ताचा व्यापारी, नीच माणूस वगैरे शेलक्या शब्दात संभावना झाली. परंतु जनतेचा विश्वास वाढतच गेला. आता बालबुद्धी असलेल्या एका ५१ वर्षीय अवखळ बालकाने मोदींची तुलना गड्डाफी व सद्दाम हुसेनशी केली आहे. हे समजल्यावर मोदी दाढीमिशीत हसले असतील. हा खट्याळ बालक मोदींचा movable asset आहे.

अरे भाई केहना क्या चाहते हो आरएसएस ही भटा ब्राह्मणांची संघटना, समाजात भेदाभेद फूट पाडते : पुरोगामी. मोदी सतत सत्तेत नकोत, ही एकाधिकारशाही झाली : राजेश१८८ आमच्यावर हजारो वर्षे अन्याय झाला, आता आम्हाला कायम संधी मिळालीच पाहिजे : बहुजन समाज मोदी हे इतर मागासवर्गीय समाजातले आहेत. : सत्य आरएसएस ही दलितांच्या, बहुजन समाजाच्या, ओबीसींच्या विरोधात आहेत. : पुरोगामी मोदी हे आरेसेसमधून पुढे आले आहेत. : सत्य मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर खबरदार : ओबीसी संघटना. आरक्षण आमच्या हक्काचं : मराठा समाज. सवर्णांमधील गुंड प्रवृत्तीच्या, सहकारी संस्था, पतपेढ्या, बँक, कारखाने ताब्यात असणाऱ्या लोकांविरुद्ध काही बोलण्याची हिम्मत नाही : दुर्दैवी सत्य काय भूमिका घ्यायची ते नक्की ठरवा.

In reply to by तेजस आठवले

आपली तर भुमिका नक्की आहे.... देश प्रथम .... देशाचे संरक्षण, ही प्राथमिकता आहे... घराणेशाहीला विरोध .... एकाच घराण्यातील लोकांच्या हातात सत्ता असेल तर, राष्ट्र लयाला जाते...

महाविकास आघाडीचे सिंहासन डळमळीत झाल्याने बऱ्याच लोकांची मोदी द्वेषाची मूळव्याध परत उपटलेली दिसते आहे. त्याकडे पाहून छान करमणूक होते आहे. लोक हो मनोरंजनाचा नवा सिझन चालू होतोय त्यात थापाडेमहाराज इतक्या अतिरंजित, विनोदी, सुरस आणि चमत्कारिक कथा लिहीत आहेत कि मिपा वर आल्याचे सार्थक व्हावे. चला हवा येऊ द्या पेक्षा जास्त मनोरंजन होते आहे.

१९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन चालु झाले. तेव्हापासुन ७० व ८०च्या दशकात नेहमी दिसणारे नाव म्हणजे विनायक चासकर. 'गजरा'सारखे दर्जेदार कार्यक्रम देउन सांस्क्रुतिक जीवन सम्रुद्ध करणारे विनायक चासकर ह्यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. https://maharashtratimes.com/maharashtra/thane/mumbai-doordarshan-senio… भावपूर्ण श्रद्धांजली.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रद्धांजली _/\_ माईंचे "हे" १९७२ मध्येच गडगंज कमवायचे. तेव्हासुद्धा त्यांच्याकडे टीव्ही होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भावपूर्ण श्रद्धांजली. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या नावाखाली स्मोकिंग पाईपचे चित्र असायचे.

जशास तसं… भारताची विनंती फेटाळणाऱ्या सौदीकडून आयात कमी करणार मोदी सरकार; ‘या’ देशाकडून घेणार तेल... https://www.loksatta.com/arthasatta-news/india-to-cut-saudi-arabian-oil… घराणेशाही, ही राष्ट्राला घातकच असते .....

८० घरांची नासधूस .... https://www.loksatta.com/desh-videsh-news/bangladesh-hefazat-e-islam-fo… भारतातील, उदारमतवादी लोकांचे, ह्यावर काय म्हणणे आहे, हे वाचणे, रोचक ठरेल....

In reply to by मुक्त विहारि

अहो भारतातले उदारमतवादी अर्थात लिब्रान्दु अश्या वेळेला मौनव्रत धारण करतात.. आणि घटना बांगलादेशातील आहे, इथं भारतातल्या अश्या प्रकारच्या घटनांवर भाष्य करायला यांचा जीव वर खाली होतो. माणसे सोडा पण कुत्रे, कुत्री, शेळ्या यांच्यावर अत्याचार करणारे महाभाग समोर दिसत असताना देखील ही जमात ए लिब्रान्दु बिळात जाऊन बसलीये.. ती तेव्हाच बाहेर येईल जेव्हा एखाद्या शांतिप्रिय साधी व्यक्तीला ठेच लागेल.!!! आपल्या विचारसरणीशी सहमत नसलेल्या लोकांचे गळे कापण्याची धमकी देऊन आणि कित्येकदा गळे कापून ( कमलेश तिवारी, रिंकू शर्मा इ घटना ) देखील आमचा धर्म किती शांतिप्रिय आहे याचा दाखला वरचेवर ही लोकं देत असतात पण अश्या वेळी सुद्धा उदारमतवादी जमात ए लिब्रान्दु गप्प च असते... !!

In reply to by मुक्त विहारि

त्या घटने विषयी तीव्र निषेध व्यक्त केला पाहिजे. भारतीय जनता नक्कीच भारत सरकार चे समर्थन करेल. बांगलादेश सारख्या किरकोळ देशाला भारत सरकार दबावात आणू शकते. त्यांनी ते काम करावे.

जपान मधली घटना आहे ... https://www.loksatta.com/desh-videsh-news/leaving-office-2-mins-early-i… आपल्या इथे, खाजगी नौकरीत असे बडगे उचलल्या जातातच...... सरकारी खात्यांच्या बाबतीत माहिती नाही...

In reply to by मुक्त विहारि

वरील घटना जपान मधील आहे भारता मधली नाही. जपान ची भारता ची तुलना करूच नका. आपल्या इथे खासगी व्यवस्थापन मध्ये तळवे चटनारी लोक सरकारी नोकर असलेल्या लोकांपेक्षा फुकट पगार आणि बाकी सोयी उकळत असतात. खासगी उद्योग म्हणजे काही वेगळे नसते. तिथे सुद्धा कमिशन घेवून च काम केली जातात. जेवढे गैर धंदे सरकारी ऑफिस मध्ये होत नाहीत त्या पेक्षा जास्त खासगी मध्ये होतात. आता तुमचा संबंध पाच पन्नास लोक काम करत असलेल्या किरकोळ खासगी उद्योग शी आला असेल त्या मुळे तुमची मतं वेगळी असतील.

In reply to by Rajesh188

तांदूळ घोटाळा, खाजगी धंद्यात झाला का? मुद्रांक घोटाळा, खाजगी धंद्यात झाला का? सात बारा मध्ये, फेरफार खाजगी धंद्यात झाला का? नकली पासपोर्ट घोटाळा, खाजगी धंद्यात झाला का? वरील प्रश्र्नांची माहिती घेतलीत तर उत्तम.... बाय द वे, सायरस मिस्त्री, नंदा कोचर यांना डच्चू दिला बरं का? बदली नाही केली....

In reply to by श्रीगुरुजी

त्याचे स्वागतच आहे bjp सारखा राजकीय पक्षाची सत्ता येथील कोणत्याच संस्थेत असली नाही पाहिजे. अगोदर त्यांना मत देवून लोकांनी खूप मोठी चूक केली आहे. त्या मुळे केंद्रातील सामान्य लोकांचे अहित कसे होईल अशीच काम करणारे सरकार डोक्यावर बसवून घेतले आहे. चूक तर लोक सुधारतील च.

In reply to by मुक्त विहारि

फक्त २० वर्षा पूर्वी काँग्रेस ला पर्याय ह्या देशात नव्हता. Bjp पूर्ण देशात दहा जागा सुद्धा लोकसभेच्या जिंकू शकतं नव्हती. त्या मानाने आज BJP विरोधक खूप बलवान आहेत. अडवाणी आणि श्री राम ची कृपा म्हणून आज bjp सत्तेवर आहे. ह्या पलीकडे त्यांचे काही च कर्तृत्व नाही

In reply to by Rajesh188

त्यांना मत देवून लोकांनी खूप मोठी चूक केली आहे. साठ कोटी मतदारांपैकी २३ कोटी लोकांनी भाजपला आणि २७ कोटी लोकांनी मते रा लो आ ला दिली आहेत. बाकी आपल्या लाडक्या काँग्रेसला ४ कोटी मते मिळाली आहेत. २७ कोटी लोकांना चूक म्हणण्यापूर्वी एकदा विचार करून पहा

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब तुमचा काँग्रेस विरोध माहीत आहे पण काँग्रेस ला 2019 मध्ये जवळपास 12 कोटी मतं मिळाले होते केवळ 4 कोटी नाही.

In reply to by मुक्त विहारि

खडसेंची कोंडी केल्याने त्यांना भाजप सोडावा लागला. जळगाव महापालिकेत खडसेंचे थोडेसे वर्चस्व आहेच. त्यामुळेच फोडाफोडी झाली. आता खडसेंची कोंडी कोणी केली हे उघड गुपित आहे.

In reply to by मुक्त विहारि

मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करणे ही मनमानी नाही. ही इच्छा पंकजा मुंडेंनी सुद्धा व्यक्त केली होती.

In reply to by श्रीगुरुजी

मुख्यमंत्री पद कशासाठी हवे होते? ह्याचा विचार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला असेलच की.... खडसे यांच्या सारखा, वरिष्ठ नेता असतांना, फडणवीस यांना, मुख्यमंत्री का केले असावे?

In reply to by मुक्त विहारि

असेल ना. पण इच्छा व्यक्त केली म्हणून ३०+ वर्षे पक्षात असलेल्या जेष्ठ नेत्याला अनेक खोट्या प्रकरणात अडकविणे, मंंत्रीमंडळातून घालविणे, अवमानकारक पद्धतीने उमेदवारी नाकारणे, मुलीला निवडणुकीत पाडणे व नंतर राजकारणातून खच्चीकरण करणे हे योग्य होते का? पंकजा मुंडेंबद्दल असंच केलं गेलं. विनोद तावडेंबद्दलही हेच. बावनकुळेंंनी काय अपराध केला हेच माहिती नाही. मी खाली लिहिलंय ते काही नेहमीच्याच यशस्वी प्रतिसादकांना पटणे अवघड आहे. २०१७ त २०१८ मध्ये झालेल्या १९ महापालिका निवडणुकीत १४ महापालिकांंमध्ये भाजपचा महापौर झाला. ३ महापालिका कॉंग्रेसकडे गेल्या. शिवसेनेने ठाणे महापालिका जिंकली व मुंबई महापालिका भाजपने सेनेला आंदण दिली. त्यावेळी लातूर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, सांगली या महापालिकेत भाजपला अनपेक्षित विजय मिळाला होता. त्यातील लातूर, सांंगली व जळगाव महापालिकेतील महापौर निवडणुकीत आता भाजपचा पराभव झालाय. पुढील २ वर्षात या महापालिकांंची निवडणुक होईल. त्यात पिंपरी चिंचवड, पुणे, लातूर, सांगली, सोलापूर, उल्हासनगर या महापालिकेत भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. शिक्षक-पदवीधर विधानपरीषद निवडणुकीत भाजपचा पुणे व नागपूर या दोन बालेकिल्ल्यात मोठ्या फरकाने पराभव झाल्याने जनमताचा कल दिसू लागला आहे. मोदी-शहांचा फडणवीसांवर कितीही विश्वास असला तरी जनतेचा विश्वास असल्याशिवाय निवडणुक जिंकणे शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

नक्कीच. आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांंना खोट्या प्रकरणात अडकवून संपविणे, स्वतःच्या खुर्चीसाठी किळसवाणी लाचारी करणे व सत्तेसाठी मतदारांना दिलेली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून त्यांचा विश्वासघात करणे यातून लालसा स्पष्ट दृग्गोचर होते.

In reply to by श्रीगुरुजी

अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस विरोध यात तिळमात्र फरक नाही. अर्थात ज्याप्रमाणे अंधविरोधी असलं काही मोदींविरोधात बरळायला लागले की लोकांचा मोदींवरील विश्वास अधिक पक्का होतो हेच आतापर्यंत दिसून आलेले आहे, त्याप्रमाणे इथेही काही वेगळे होईल असे वाटत नाही.

In reply to by बिटाकाका

माझा फडणवीसविरोध अंध नसून पूर्णपणे डोळस आहे. त्यामागे अत्यंत सबळ कारणे आहेत व ती कारणे मी अनेकदा विशद केली आहेत. अर्थात फडणवीसांच्या अंधभक्तांना ती दिसणारच नाहीत. मातोश्रीवर फेऱ्या मारून उधोजींनी मारलेले सर्व जोडे सहन करून त्यांचे सर्व आदेश मान्य करण्याची चाटुगिरी करणे हा त्यांना मास्टरस्ट्रोक वाटतो. आपल्या सहकाऱ्यांचा विश्वासघात त्यांना राजकीय चातुर्य वाटते. मतदारांचा विश्वासघात त्यांना कौतै वाटतो. सर्व आश्वासने बासनात गुंडाळून भ्रष्टांशी केलेली हातमिळवणी त्यांना प्रशंसनीय वाटते. मोदी आणि फडणवीस यांच्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. लवकरच हे समजेल (अर्थात डोळ्यांवरील पट्टी काढली तरच).

In reply to by श्रीगुरुजी

Bjp चे वरिष्ठ नेते च काढतील.आज जे महाराष्ट्रात चालू आहे त्याचा शेवट असा होईल की फडणवीस ह्यांचे राजकीय खच्छी करणं होईल. राजकारणात काही होवू शकत. अती शहाणी लोक कोणालाच नको असतात.

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीस यांना, बिहार मध्ये प्रचाराला, उगाच पाठवले नाही... तुमचा फडणवीस यांच्यावर कितीही राग असला तरी, केंद्रीय मंत्रीमंडळात, फडणवीस नक्कीच असतील...

In reply to by श्रीगुरुजी

अंधविरोधाच्या पातळीची खात्री पटली. वरील प्रतिसादात फडणवीस ऐवजी मोदी टाकले की असले अंधविरोधक मोदींच्या नावाने अगदी याच शब्दात खडे फोडताना दिसतात. वरून इतरांना अंधभक्त म्हणणे, डोळ्यावरची पट्टी काढायला सांगणे, आपणच कसे अभ्यास करतो आणि आपला विरोध हा अभ्यासानंतर आहे वगैरे सांगणे - लक्षणे तंतोतंत जुळतात. त्यामुळे, शुभेच्छा! ********* भ्रष्टाशी हातमिळवणी वगैरे पवारांशी युतीशी जोडणारे, उगाचच स्वतःचा ज्वर कुरवाळण्यासाठी असले मुद्दे वापरतात हे स्पष्ट आहे. ती मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांच्या समर्थकांनाही आवडली नव्हतीच हे स्पष्ट असतानाही, शिवाय भाजपचा विश्वासघात करून महाघाडीचा घाट घातल्यानंतर त्याला उत्तर म्हणून पवारांना सोबत घेतले गेले होते हे सोयीस्कररित्या विसरून उगाच असले मुद्दे फडणवीस विरोध कुरवाळण्यासाठी वापरतात हे काही आता नवीन राहिले नाही. कुठेतरी कुठलेतरी नगरसेवक फुटून झालेल्या सत्ताबदलात आशा लोकांना फडणवीसांचा पराभव दिसू लागतो जसा मोदीविरोधकांना पंजाब च्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवात शेतकरी आंदोलनामुळे झालेला मोदींचा पराभव दिसला होता. ********* असो, तीन पक्षांच्या एकत्रित मतांचा भाजपला फटका बसू शकतो हे सांगायला काही कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. तूर्तास तरी १०५ जागांसह भाजप हा महाराष्ट्रातील जनतेची पहिली पसंती आहे हे गणित शेंबड्या पोरालाही कळते.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ते हवेत नाहीत. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव आहे. म्हणून तर स्वबळावर लढण्याची त्यांची तयारी नव्हती व सेनेबरोबर युती करण्यासाठी ते अत्यंत कासावीस झाले होते. आता जर हे सरकार पडले तर फडणवीस मुदतपूर्व निवडणुकीऐवजी राष्ट्रवादी किंवा सेनेशी युती करून सरकार स्थापण्यासाठी जिवाचे रान करतील, कारण निवडणुक स्वबळावर लढली तर पूर्ण वाट लागणार याची त्यांना कल्पना आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

काय म्हणता?? २०१९ विधानसभेला? नवलच म्हणायचे, काँग्रेस उमेदवाराच्या दुप्पट मते होती म्हणतात त्यांना.

In reply to by बिटाकाका

तूर्तास तरी १०५ जागांसह भाजप हा महाराष्ट्रातील जनतेची पहिली पसंती आहे हे गणित शेंबड्या पोरालाही कळते.
मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता. बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी. तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या. दुसरे म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकांचा वारंवार उल्लेख आला आणि त्यातून जनतेने भाजपविरोधी कौल स्पष्टपणे दिला असे म्हटले गेले आहे. याविषयी एक महत्वाची गोष्ट विसरली जात आहे की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नव्याने मतदारयाद्या बनवल्या जातात. खरं तर असे करायला तसा काही अर्थ नाही. एकदा एखादा मतदार पदवीधर असेल तर तो आणखी सहा वर्षांनी पदवीधर राहणार नाही असे थोडीच आहे? तेव्हा दरवेळी नव्याने याद्या कशाला बनवायला हव्यात? पण कायदा गाढव असतो असे म्हणतात त्यातला हा एक अर्थहिन नियम आहे. हे प्रकरण कोर्टात गेले होते. हायकोर्टाने ही पध्दत रद्दबादल ठरवली पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र दरवेळी नव्याने मतदारयाद्या बनवायला लागतील असे स्पष्ट केले. याविषयी अधिक https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/Instruction_GraduateTeach_… येथे पान २ वर. भाजप इतकी दशके विरोधी पक्षात असताना पक्षाचे कार्यकर्ते दरवेळी पदवीधर/ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका आल्या की पात्र मतदारांची नोंदणी करून घ्यायला विशेष कष्ट घ्यायचे. पण काँग्रेस पक्ष (आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी) या निवडणुका फार गांभीर्याने घ्यायचा नाही त्यामुळे आपल्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष कष्ट घ्यायचे नाहीत. झाले तर झाले असा त्यांचा दृष्टीकोन असायचा.तसेही विधानपरिषदेला फार अधिकार नसतात आणि ती केंद्रातील राज्यसभेइतकी अजिबात बलिष्ठ नसते. त्यातूनच देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर फडणवीस, नितीन गडकरी हे दिग्गज नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून जात होते. २०२० च्या निवडणुकांसाठी ही मतदार नोंदणीची प्रक्रीया नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी पूर्वीइतके कष्ट घेतले नाहीत असे (मला वाटते भाऊ तोरसेकरांच्या) व्हिडिओत ऐकल्याचे आठवते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच. फडणवीसांच्या अनेक गोष्टी मला पण आवडत नाहीत. तरीही फडणवीस म्हटले की अंगावर पाल पडल्यासारखे मला तरी वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता. १८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी युतीची घोषणा करताना फडणवीस, शहा व उधोजी या तिघांनीही मुख्यमंत्री कोण यावर चकार शब्द काढला नव्हता. बाय डिफॉल्ट फडणवीसच मुख्यमंत्री असे भाजप समर्थकाना वाटले असेल. परंतु निवडणुक जिंकली तरी विद्यमान मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्री होतोच असे नाही. "शहांंशी झालेल्या चर्चेनुसार पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्या अटीवरच मी युती केली आहे." असे १९ फेब्रुवारीस उधोजींनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाहिन्यांंच्या उपस्थितीत सांगितले होते. त्याची चित्रफीत अनेकदा वाहिन्यांंनी दाखविली आहे. त्यावेळी कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे सेना नेते हेच सांगत होते. तेव्हाही भाजपच्या कोणीही आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये आदित्यने टाईम्सच्या मुलाखतीत हेच सांगितले होते. परंतु सर्व भाजप नेते गप्प होते. आपण विरोध केला तर सेना युती तोडेल ही भीति वाटत असावी. नंतर ११ ऑक्टोबरच्या सुमारास सर्वात पहिल्यांदा आपण असे काही मान्य केल्याचे शहांनी नाकारले. मग आधीचे ८ महिने ते का गप्प होते? मतदानाला जेमतेम एक आठवडा असल्याने आता सेना युती तोडू शकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांनी तोंड उघडले होते का? सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले. बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी. त्यांनी एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली हे फक्त तेच सांगू शकतील. कोण थापा मारतोय व कोण सत्यवादी राजा हरीश्चंद्र आहे हे तेच सांगू शकतील. परंतु सेना युतीसाठी तयार नव्हती व फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे. तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या. सेनेच्या मतदारांनी सेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिला आणि भाजपच्या मतदारांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच. पदवीधर मतदारसंघात लाखो मतदार असतात. पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात. १९९०, १९९६, २००८ व २०१४ अशी चार वेळा भाजपने पुण्यातील निवडणुक जिंकली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपने सलग ६-७ वेळा जिंकला होता. या दोन्ही मतदारसंघात यावेळी भाजपचा चांगल्या फरकाने पराभव झाला. त्यातून कल स्पष्ट दिसतो.

In reply to by श्रीगुरुजी

सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले.
तुमचा फडणवीसांवर आकस असल्याने तुम्ही असे म्हणणार हे अपेक्षितच आहे. पण भाजपचा सगळा प्रचार 'मी परत येईन' यावर आधारलेला होता त्यालाही कधी शिवसेनेने आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. बाकी पत्रकारांसमोर सेना नेते नक्की काय म्हणतात यापेक्षा भाजपच्या दाव्यांवर शिवसेनेने अधिकृत आक्षेप घेणे याला नक्कीच जास्त किंमत द्यायला हवी. अगदी सर्वोच्च पातळीवर- मोदींच्या सभेत व्यासपीठावर उद्धव उपस्थित असतानाही त्याविषयी आक्षेप घेतला नसेल तर इतर गोष्टी गैरलागू आहेत. बाकी या प्रकरणात कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचा आहे यात मी जातच नाही. मतदान करताना मतदारांना नक्की काय लक्षात असायची शक्यता जास्त- मी परत येईन हे स्लोगन की आठ महिन्यांपूर्वीची पत्रकार परिषद की आदित्य आणि आणखी कोणी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखती? इतके असूनही मतदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील हे चित्र त्यांच्यापुढे उभे असताना १०५ + ५६ =१६१ जागा दिल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या वेळेस फडणवीसांविरूध्द फार मोठा रोष होता वगैरे गोष्टी तथ्यहिन आहेत.
फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे.
असे का ना. पण फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील या मोदींच्या दाव्यावर तिथेच हजर असलेले उधोजी काहीही आक्षेप घेत नव्हते हे पण तितकेच खरे. शक्यता आहे की भाजपने शिवसेनेला फसवले. असू दे. हे राजकारण आहे. आणि शिवसेनेने पूर्वी, विशेषतः २०१४ नंतर केलेले प्रकार लक्षात घेता त्यांना बेसावध ठेऊन नंतर लाथ घालायचा भाजपचा बेत असेल तर तो चुकीचा मानता येणार नाही. पण तो डाव चुकीच्या अंमलबजावणीमुळे फसला आणि शिवसेनेने पण असाच डाव तयार ठेवला असेल याची कल्पनाही भाजपने न केल्याने भाजपला त्याची फळे भोगावी लागणे भाग आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात.
पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे केवळ पुणे शहर/जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे पण त्यात येतात. तीन चार जिल्ह्यात चार लाख मतदार (त्यापैकी प्रत्यक्ष मतदान करणारे किती हा प्रश्न विचारतच नाही) म्हणजे खूप मोठा आकडा आहे असे नाही. काही एकेक विधानसभा मतदारसंघांमध्ये पण त्यापेक्षा जास्त मतदार असतात. आणि त्यातही भाजपने आपली सत्ता कायम राहणार या गुर्मीतून विधानसभेत यावतचंद्रदिवाकरो आपलेच आमदार निवडून येणार मग विधानपरिषदेला कोण विचारतो या अनाठायी आत्मविश्वासातून पूर्वी या मतदारांची नोंदणी करण्यासाठी जितके प्रयत्न केले जायचे तितके केले नसतील पण काँग्रेस-राष्ट्रवादीने ते प्रयत्न केले असतील तर मुळात हे मतदार हे सँपल बायस्ड होते का हा प्रश्न विचारायला नक्कीच वाव आहे. असो. आता याविषयी माझा पूर्णविराम.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एकमेकांच्या दाव्याला दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे दोघांनी एकमेकांना नक्की कोणती आश्वासने दिली होती हे फक्त तेच सांगू शकतात. मुख्य फरक हा आहे की पहिली अडीच वर्षे आमचा मुख्यमंत्री होण्याचे शहांनी मान्य केले आहे हे उधोजी व इतर सेना नेते १९ फेब्रुवारी २०१९ पासून वारंवार सांगत होते, परंतु तो दावा भाजपने सर्वात पहिल्यांदा ११ ऑक्टोबर २०१९ च्या सुमारास नाकारला. भाजप नेते ८ महिने का गप्प होते? आधीच दावा नाकारला तर सेना युती तोडेल ही भीति असावी. त्यामुळे मतदानाला जेमतेम ७-८ दिवस असताना भाजपने दावा नाकारला कारण त्यावेळी सेना युती तोडणे अशक्य होते. परंतु आधी लिहिल्याप्रमाणे युती करण्यासाठी भाजपच अत्यंत आग्रही होता व शिवसेना खूपच थंड होती हे लक्षात घेतले तर भाजपनेच युती करण्यासाठी सेनेला, निदान मोघम स्वरूपात तरी, मुख्यमंत्रीपद व इतर काही अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता दिसते. युती करून आपला आकडा १३० पर्यंत नेला की नंतर सेनेला लाथाडता येईल अशी त्यामागे योजना असू शकते. परंतु १०५ वरच विजयरथ रूतल्याने पुढची योजना फसली.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्यामते सेनेला युती नकोच होती पण तोडण्याचे पातक डोक्यावर घ्यायचे नव्हते त्यामुळे जेव्हा सेनेचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा मुद्दा मांडला गेला तेव्हा मुख्यमंत्री म्हणुन आदीत्य ठाकरेंचे नाव पुढे केले गेले. हे हेतुपुर्रस्सर केले असावे कारण उध्दव जर आता मुख्यमंत्री होऊ शकतात तर तेव्हाही ते काही सोवळ्यात नव्हते पण मुद्दामुन ज्युनिअर ठाकरेंचे नाव पुढे नाचवत ठेवले. कारण हा पर्याय भाजपाला सोडा सेनेतल्या बहुतेकांना मान्य नसणार. कारण तसे जर असते तर तिघाडीचा मुख्यमंत्री म्हणुनही आदित्य ठाकरेंच्या नावावरच सेना ठाम राहिली असती. पण इथे काका बिलंदर निघाले. उध्दवजींना कमरेचे सोडुन डोक्यावर घ्यायची अट टाकली आणि आतापावेतो भाजपाशी काडीमोड घ्यायला संधी बघणार्या उध्दवजींनी ती लगोलग मान्य केली.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही.) फडणवीस आणि काकांमधला फरक हा एक नवशिक्या शिकारी आणि अनुभवी शिकारी ह्यामधल्या फरकासारखा आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही) ते २०१४ मध्ये. तेव्हा अमित शहा नव्हते. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांशी जागावाटपाच्या चर्चेला आदित्य गेला होता. माझ्या मते फडणवीस भाजपतील पवार आहेत व चंपा भाजपतील राऊत आहेत.

In reply to by बिटाकाका

ज्या नागपूर मधील पश्चिम ,दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्या मतदार संघात त्यांचा स्वतःचा प्रभाव किती आहे आणि पक्षाचा प्रभाव किती आहे. तो मतदार संघ त्यांच्या साठी सुरक्षित आहे का? त्यांना त्या मतदार संघात किती किंमत आहे! उद्या bjp नी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर ते त्या मतदार संघात निवडून येवू शकतात का? ह्याची उत्तर नाही असतील तर bjp त्यांचे पंख कधी ही chhatu शकते.

In reply to by श्रीगुरुजी

आपले निरीक्षण योग्यच वाटत आहे... फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर, खडसे यांनी काय केले? हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशी माणसे, कुठल्याही पक्षांत नकोतच.. स्वतःच्या घरातील मंडळींना उभेदवारी मिळावी, म्हणून खडसे यांनी किती जणांना लग्गा लावला, हेही सगळ्यांना माहिती आहे.. सत्तेसाठी, भाजपने दिलेले सगळे विसरून, मतदारांना फाट्यावर मारून, खडसे राष्ट्रवादीत गेले, हे पण सगळ्यांना माहिती आहे... आता CD लावतीलच, असे वाटते...

In reply to by मुक्त विहारि

>>> फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर, खडसे यांनी काय केले? हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशी माणसे, कुठल्याही पक्षांत नकोतच.. नक्की काय केले? अरे हो विसरलोच. मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अक्षम्य दंडनीय अपराध केला होता की. >>> स्वतःच्या घरातील मंडळींना उभेदवारी मिळावी, म्हणून खडसे यांनी किती जणांना लग्गा लावला, हेही सगळ्यांना माहिती आहे.. प्रत्येक जण तेच करतात. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातच उमेदवारी मागितली होती. चंपासारखा आयत्या बिळावर नागोबा बनून दुसऱ्यांंच्या मतदारसंघावर डल्ला मारला नव्हता ना. राधाकृष्ण विखे पाटलांनी, राणेंनी मुलासाठी व स्वतःसाठी काय केले ते माहिती असेलच. त्यांना तर भाजपत येण्यासाठी लाल पायघड्या पसरल्या होत्या. >>> सत्तेसाठी, भाजपने दिलेले सगळे विसरून, मतदारांना फाट्यावर मारून, खडसे राष्ट्रवादीत गेले, हे पण सगळ्यांना माहिती आहे... ते उघड उघड सांगून बाहेर पडले. पक्षाने पूर्णपणे वाळीत टाकल्यानंतर त्यांनी दुसरे काय करणे अपेक्षित होते? फडु त्यांना संपवित असताना पक्षाने संपूर्ण दुर्लक्ष केल्यानंतर बाहेर पडणे हा एकच मार्ग शिल्लक होता. बाकी मतदारांना वारंवार कोणी फाट्यावर मारले हे माहिती असेलच.

In reply to by श्रीगुरुजी

जनतेने निवडुन दिलेल्या नगर्सेवकांनी असा बदल केला तर ती लोकशाही ची थट्टा नाही का? माझ्या मते अशा केसेस मधे नवीन निवड्णुका घ्यायला हव्यात. पक्ष कोणताही असो.

In reply to by सुक्या

फक्त नगरसेवक नको. आमदार, खासदार किंवा एखाद्या पक्षाने विरूद्ध पक्षाला मदत केली किंवा विरूद्ध पक्षाची मदत घेतली तरी नव्याने निवडणुक व्हावी.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांच्या रूपात भाजपला आणखी एक बिप्लब देब सापडलेला दिसतो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब फालतू बडबड करून आपले नाव बातम्यांमध्ये राहिल याची काळजी मधूनमधून घेत असतात. त्याप्रमाणे आता तिरथसिंग रावत यांनी 'फाटक्या जीन्स घातलेल्या स्त्रिया आपल्या मुलांवर काय संस्कार करत असतील' असे विधान काही कारण नसताना केलेले आहे. अपेक्षेप्रमाणे स्त्रियांच्या संघटना त्यांच्यावर तुटून पडल्या आहेत. काय गरज होती त्यांना फालतू काहीतरी बोलायची? असे काही बोलणे हे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या के.आर.ए मध्ये येते का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अशीच व्यक्तव्ये भोगावी लागतात.... सामान्य माणसाने, असे बोलले तरी चालते, पण पदावर असलेल्या व्यक्तीने, पदाचा योग्य तो मान, राखलाच पाहिजे...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संदर्भ लक्शात घेता सयुक्तिकच बोलले अस वाटेल. कुठल्यातरी ड्रग निवारण शिबिराचा समारंभात बोलत होते ते. संस्काराच्या मुद्यावर बोलतांना मातोश्री फाटकी जीन्स घालुन फिरताहेत तर पोरांवर कितपत संस्कार होतिल अश्या आशयाचं बोलले. आता आपण तेवढंच हाय्लाईट केलं.

In reply to by श्रीगुरुजी

बोलत राहीलेत तर टिकेत सरळ हिंसेला चिथावणी देताय म्हणुन आत टाकतील!

In reply to by श्रीगुरुजी

व्यापाऱ्यांची गोदामेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यात अडथळा आणतात. ह्यात केंद्र सरकार मदत करते. हमीभाव देण्याचे लेखी आश्वासन देता येत नसेल कोण सरकारवर विश्वास ठेवेल? कांद्याचे भाव वाढले होते तेव्हा ह्याच सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा बासनात गुंडाळून कांदा आयात केला, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून स्वस्तात घेतलेला कांदा चाळीत साठवून भरमसाठ नफा कमावला होता.

In reply to by आग्या१९९०

आग्या जी. हमीभावाचा विषय काढलाय म्हणून सांगतो. - आजवर हमीभावाबाबत कोणताही कायदा नव्हता. सरकार मग ते काँग्रेस असो वा BJP दोघांनीही हमीभाव दिला ( कोणी कमी आणि कोणी जास्त हा मुद्दा इथे नको ) पण कोणताही कायदा किंवा लेखी आश्वासन नव्हते. मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी आश्वासन आणि कायदा करण्याचे मान्य केले आहे. पण तरीही आंदोलक नवीन आलेले तीनही कायदे रद्द करूनच पाहिजेत त्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी आडमुठी भूमिका घेऊन आंदोलनाच्या नावाखाली काहीबाहि चाळे करत आहेत.. अजुन एक. मोदी सरकारने कायदयामंध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याचे मान्य केले होते तसेच काही काळासाठी कायदे स्थगित करण्याचा देखील प्रस्ताव ठेवला होता पण यांना कायदे रद्द करण्याशिवाय दुसरे काहीही नको.. आता तुम्हीच ठरवा हट्टवादी भूमिका कोण घेतेय. कोण विनाकारण सरकार आणि जनतेला वेठीस धरतेय आणि त्याआडून आपला छुपा अजेंडा पुढे रेटतेय. असो यावर याआधीच व्यापक चर्चा झाली आहे आणि मला पुन्हा त्याच विषयावर मिपावरच्या सो कॉलड लिबरल आणि डाव्या लोकांशी वाद घालायची इच्छा नाही धन्यवाद.