✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आघाडी सरकारने, गेल्या वर्षभरांत किती कामे केली आहेत?

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 03/10/2021 - 18:52  ·  लेख
लेख
साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे... गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते. सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते.. आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही... आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत. संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे. अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते.... ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत. -- मिपा व्यवस्थापन
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28728 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

बरं

Rajesh188
Wed, 03/10/2021 - 19:34 नवीन
महागाई फक्त महाराष्ट्रात वाढली आहे की देशभर महागाई वाढली आहे. महागाई वाढण्यास केंद्र सरकारची धोरण जबाबदार असतात. Fuel price, आयात निर्यात,ही धोरण केंद्र ठरवते राज्य नाही. राज्यात मला तरी असुरक्षित वाटत नाही मूवी ना कसे काय आताच असुरक्षित वाटायला लागले? एक चाचपणी म्हणून mipa वर अजुन कोणाला असुरक्षित वाटत आहे का? अशी दोन चार लोक निघाली तरी मूवी ची भीती योग्य आहे असे समजता येईल. राज्यातील कोणत्याच बाजारात जीवन आवशक्य वस्तू भरपूर उपलब्ध आहेत. येथील मिपाकरांना दुकानात डाळ उपलब्ध नाही,साखर उपलब्ध नाही,भाज्या उपलब्ध नाहीत असा अनुभव आला आहे का? आला असेल तर राज्यात जीवन आवशकय वस्तू ची कमतरता आहे ह्याला आधार मिळेल.

धन्यवाद

मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 19:40 नवीन
आपल्या ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती आलं अंगावर, तर ढकल केंद्रावर...
↩ प्रतिसाद: Rajesh188

आहे ते आहे

हस्तर
Wed, 03/10/2021 - 20:41 नवीन
आहे ते आहे राज्य सरकार कसे करणार त्यांच्या अख्त्यारी बाहरेच प्रश्न ?
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बाय द वे ....

मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 20:33 नवीन
ह्या राज्य सरकारने केलेली जनहिताची कामे सांगीतलीत तर फारच उत्तम...
↩ प्रतिसाद: Rajesh188

ह्या सरकारने दीड वर्षात काहीच

Vichar Manus
Wed, 03/10/2021 - 20:42 नवीन
ह्या सरकारने दीड वर्षात काहीच काम केले नाहीत पण माझ्या मते मोदी सरकारने पण 5 वर्षात काहीच चांगले कामं केले नव्हते, दुसऱ्या फेरीत ते चांगले काम करताना दिसत आहेत, या सरकारला पण थोडा वेळ दयायला पाहिजे

अहो, हे आधी पण सरकारात होतेच की

मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 20:48 नवीन
कॉंग्रेस तर आधी पण होतीच आणि शिवसेना पण होतीच... त्यामुळे, समाजसेवा करायचा, ह्यांना चांगला अनुभव आहे.. कदाचित ते समाजसेवा करत पण असतील, पण, मला ते दिसत नाही. कुणी सांगीतले तर फारच उत्तम ....
↩ प्रतिसाद: Vichar Manus

खूप काही लिहिण्यासारखं आहे पण

बापूसाहेब
Wed, 03/10/2021 - 21:18 नवीन
खूप काही लिहिण्यासारखं आहे पण लिहिल्यावर कोणीतरी घरी नेऊन वळ उठेपर्यंत मारेल.. किंवा कोणीतरी येऊन घर तोडून जाईल.. जास्तच लिहिले तर चक्क पोलिसांमार्फतच माझा खून करवून आणला जाऊ शकतो.. त्यामुळे माफ करा मुवि.. मी इथे लिहिणार सरकारविरोधी काहीही लिहिणार नाही.. !!! लिहिले तर लगेच महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा, मराठी माणसाचा अपमान होईल.. आणि ते पातक माझ्या डोक्यावर नको.. सरकार एकदम मस्त चालले आहे.. महाभकास सॉरी सॉरी.. महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार आहे. आणि उद्धव जी ठाकरे अत्यंत चांगलं काम करत आहेत.. इतका पसारा आहे कि काम घरूनच करतात. उगा तिकडे मंत्रालयात जाण्या येण्याचा वेळ कशाला वाया घालवायचा.. ( कोण रे तो... घरबश्या म्हणतोय.. जीव वर आलाय का??? गप्प... !!!! ) तर हा.. मी हेच सांगत होतो कि सरकार अत्यंत जबाबदारी ने काम करतेय.. फक्त मुवि सारखी लोकं आहेत कि जे खबरदारी घेत नाहीत.. म्हणून थोडेफार प्रॉब्लेम होतात.. विसरलात का.. आपले मामु ( माननीय मुख्यमंत्री ) काय म्हणले होते ते?? तुम्ही खबरदारी घ्या. मी जबाबदारी घेतो.. कालच मी आजान स्पर्धा पाहून आणि ऐकून आलो.. कान कसे एकदम तृप्त झालेत.. या निमित्ताने जनाब बाळासाहेब ठाकरेंना दिलेला तो सन्मान पाहून जीव दाटून आला.. ( कोण रे तो हिंदुत्व हिंदुत्व ओरडतोय.. गप्प बस झेमण्या.. तू आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?? ) कालच मी विजेचे बिल भरले.. वाढीव 7-8000 रुपये होते पण परवा मुख्यमंत्री म्हणले ना.. कि आता मी देखील तुमच्या घरातलाच एक आहे.. त्यामुळे मग जास्त विचार नाही केला.. म्हणलं आपले पैसे आपल्याच घरी राहतील.. त्यामुळे सगळं वाढीव बिल पूर्ण भरले.. उलट अजुन एक्सट्रा पैसे देणार होतो. पण बायकोने अडवले..!! असो. ह्या सगळ्या गोष्टी मुवि आणि त्यांच्यासारख्या इतर लोकांना कश्या काय दिसत नाहीत देव जाणे.. जाऊदे. शेवटी अंधभक्त च ते.. त्यांना काय कळणार मराठी अस्मिता, ठाकरे पॅटर्न , हिंदुत्व, वगैरे वगैरे..

बापू

Rajesh188
Wed, 03/10/2021 - 21:43 नवीन
कोणतेच क्लेश मनात न ठेवता मनापासून हे सांगा महाराष्ट्र सरकार नी त्यांची जबाबदारी पूर्ण नसेल पण काही प्रमाणात तरी नक्कीच योग्य पद्धती नी पूर्ण केली की नाही. पक्षीय विचार सोडून ध्यं. Corona मुळे जी स्थिती निर्माण झाली आणि लोकांचे जे हाल झाले ही स्थिती केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार च्या आवक्या बाहेर होती हे आम्ही पण मान्य करतो. पण अचानक lockdown करणे हा निर्णय महामूर्ख पणाच होता हे कोणी पण सांगेल. लोकांना दहा दिवसाचं अवधी खरी पोचण्यासाठी देणे गरजेचे होते. अचानक lockdown केल्या मुळे पर्यटक,जे कामानिमित्त घरा बाहेर होते त्यांची अवस्था घराब झाली आणि सरकार चा खर्च पण वाढला त्या लोकांना सुविधा देण्यासाठी. लोकांचे हाल पण झाले. चूक ती चूक च. कधीच अचानक लॉक डाऊन करू नका लोकांना सूचना ध्या आणि सात दिवसांची तरी मुदत ध्या.
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

खरंय. महाराष्ट्राच्या

सुक्या
Wed, 03/10/2021 - 23:34 नवीन
खरंय. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महारष्ट्राला एक "कुटुंबवत्सल आणि कोटुंबीक बोलणारे" मुख्यमंत्री लाभले आहेत. त्यांना विरोध करणारे पापाचे धनी आहेत. नाहीतर आमचे शिवसैनीक आहेतच पाठीवर वळ काढायला ....
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

कोविडच्या काळात सगळ्यांचीच

आग्या१९९०
Wed, 03/10/2021 - 21:22 नवीन
कोविडच्या काळात सगळ्यांचीच आर्थिक स्थिती नाजूक झाली होती, केंद्राची आणि सर्व राज्यांची. महाराष्ट्रात सरकार स्थापून स्थिरस्थावर होण्यापूर्वीच कोविड संकट आले. केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती वाईट होती. पैशाचे सोंग करता येत नाही. विकासाचे सोंग करणाऱ्या सोंगाड्याचे अनुकरण करण्यात महाराष्ट्राचे सरकार कमी पडले हे मान्य करतो.

आग्या 1990 जी सहमत आहे.

बापूसाहेब
Wed, 03/10/2021 - 21:35 नवीन
आग्या 1990 जी सहमत आहे. कोरोनामुळे आर्थिक स्थिती अवघड होती / आहे हे मला मान्य आहे.. विकास बाजूला ठेवुयात. पण काही गोष्टी आणि विशेषतः गृह मंत्रालय अत्यंत बेजबाबदार पद्धतीने काम करतेय.. कंगना आणि नंतरची तोडफोड प्रकरण तर कळस होता.. हिंदुत्व सोडून खांग्रेसी सेक्युलॅरिज्म आचरणात आणणे, राहुल जी यांच्यावर स्तुतीसुमने उधळणे, शेतकरी कायद्याला केलेला विरोधासाठीचा विरोध, वाढीव वीजबील आणि त्यातला गोंधळ, सरकारविरोधी बोलल्यास घरी बोलावून वळ उठेपर्यन्त मारहाण करणे, मुंडे प्रकरण, राठोड प्रकरण होऊनसुद्धा दिले जाणारे समर्थन आणि पाठराखण हे सर्व डोक्यात जातं.. आणि मी वर लिहिलेल्या मुद्यावर कोरोना, अर्थकारण, टॅक्स , विकास या सर्वांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही.
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ही प्रकरण च फालतू होती

Rajesh188
Wed, 03/10/2021 - 21:49 नवीन
संकट काळात सुशांत केस चे राजकारण,ते करणारे अर्णव,कंगना हा प्रकार म्हणजे मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोनी खाण्या सारखेच होते. केंद्र सरकार नीच ह्या नीच माणसांना डांबून ठेवले पाहिजे होते. पण जबाबदार bjp नी तसे केले नाही राम कदम सारख्या शुल्लक व्यक्ती ल तमाशा उभा करण्यास प्रतिबंध केला नाही. बाकी सुशांत ला न्याय मिळालाच पाहिजे . तो अजुन सुद्धा मिळाला नाही. राजकारण न करता राज्य आणि केंद्र सरकार नी गुप्त बैठक घेवून योग्य निर्णय घेणे अपेक्षित होते.
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

ही प्रकरण च फालतू होती

Rajesh188
Wed, 03/10/2021 - 21:49 नवीन
संकट काळात सुशांत केस चे राजकारण,ते करणारे अर्णव,कंगना हा प्रकार म्हणजे मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोनी खाण्या सारखेच होते. केंद्र सरकार नीच ह्या नीच माणसांना डांबून ठेवले पाहिजे होते. पण जबाबदार bjp नी तसे केले नाही राम कदम सारख्या शुल्लक व्यक्ती ल तमाशा उभा करण्यास प्रतिबंध केला नाही. बाकी सुशांत ला न्याय मिळालाच पाहिजे . तो अजुन सुद्धा मिळाला नाही. राजकारण न करता राज्य आणि केंद्र सरकार नी गुप्त बैठक घेवून योग्य निर्णय घेणे अपेक्षित होते.
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

म्हणजे एखादे प्रकरण चुकीच्या

बापूसाहेब
Wed, 03/10/2021 - 22:25 नवीन
म्हणजे एखादे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले कि ते प्रकरणच फालतू होते.. आणि BTW मी कुठेही सुशांत सिंग चा उल्लेख केलेला नाही..
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रतिसाद संपादित.

सुक्या
Wed, 03/10/2021 - 23:37 नवीन
प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

प्रतिसाद संपादित.

Ujjwal
गुरुवार, 03/11/2021 - 10:59 नवीन
प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
↩ प्रतिसाद: सुक्या

मान्य आहे. खिशात पैसे नसेल तर

आग्या१९९०
Wed, 03/10/2021 - 21:50 नवीन
मान्य आहे. खिशात पैसे नसेल तर होते चिडचिड. महाराष्ट्र सरकार कुठेतरी कारण नसताना तसे वागत असेल तर दुर्लक्ष करणे हेच योग्य. किती दिवस असे चाळे करतील? काम करून दाखवावेच लागेल त्यांना,नाहीतर कपाळमोक्ष अटळ आहे. मी तरी फार अपेक्षा करत नाही ह्या सरकारकडून. मीही शेती पंप बिल पाठपुरावा करून सरकारी सवलतीपेक्षा कमी करून घेतले. परंतू अजूनही माझे पूर्ण समाधान झालेले नाही. पूर्ण समाधान झाल्याशिवाय बिल भरणार नाही. वर्षभर शेती बंद असताना बिल येतेच कसे?
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

सोंग

सॅगी
Wed, 03/10/2021 - 21:38 नवीन
काही दिवसांपुर्वी सामनाचे मा.कं. देखील असेच काहीसे बोलले होते बहुदा....बाकी सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही असे काहीतरी... पण काही का असेना "राज्य सरकार सोंग करते" हे मान्य केले हेही नसे थोडके...
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

व्यक्तिपूजा, खंडणीखोर वृत्ती

साहना
गुरुवार, 03/11/2021 - 01:46 नवीन
व्यक्तिपूजा, खंडणीखोर वृत्ती आणि रस्त्यावरील गुंडगिरी ह्या पायावर निर्माण झालेल्या पक्षाकडून जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. शिवसेनेचा उदय शक्य झाला तो काँग्रेस च्या भ्रष्ट आणि सरंजामशाही वृत्तीमुळे. तोंडाने महाराजांचा जाप करायचा आणि गरीब आणि निशस्त्र लोकांवर हिंसा वापरून आपले पौरुष सिद्ध करायचे हेच शिवसेना आधीपासून करत आली आहे. शिक्षण, कायदा सुव्यवस्था, अर्थ व्यवस्था, संस्कृती, व्यापार पर्यटन कुठल्याच विषयावर ह्यांच्या नेत्यांना चार शब्द बोलता येत नाहीत, काही दूरगामी धोरण निर्माण करायचे दूरच ठेवा मुंबई जगाची आर्थिक राजधानी, पण अजून ह्यांना एक रस्ता धड मेंटेन करता येत नाही. पण कुणा नटीला घाबरावयाचे तर ह्यांच्या मिशीला पीळ चढतो. शिवसेनेची प्रगती ज्या काली झाली त्या काली शिवसेनेची गरज होती. सुदैवाने मराठी समाज प्रगत झाला आहे. आता रस्त्यावर मारामारी, संप, बंद असली थेरे भूतकाळ झाला आहे. हिंदी मुस्लिम कार्ड विशेष चालत नाही. परप्रांतीय-स्थानिक हा भेदभाव लोक जास्त करायला जात नाहीत. सुमित राघवन सारखा तामिळ माणूस अस्सलखीत मराठीतून चित्रपट काढतो आणि मराठी भाषेच्या नावाने मतांची भीक मागणारे आपल्या पोरांना "बोंबे स्कॉटिश" मध्ये पाठवतात आणि कुणा गरिबाने "बोंबे" म्हटले तर त्याला धमकावतात. महाराजांचे नाव घेणाऱ्या मंडळींनी हि असली भाकडकृत्ये करायची ह्या पेक्षा मोठे पाप नाही. शिवसेनेची एक्सपायरी डेट कधीच होऊन गेली होती. भाजपाला सुद्धा हे लक्षात आले असावे. शिवसेनेचा वाघ आता काँग्रेसचे मांजर आहे. जो पर्यंत गरज आहे तो पर्यंत वापरले जाईल नंतर उकिरड्यावर फेकले जाईल. आता कुणी म्हणेल कि राग फक्त शिवसेनेवर का ? काँग्रेस सुद्धा आहे ना सत्तेत. तर काँग्रेस हा कॅन्सर आहे. ह्यांना लोकांचे, देशाचे सोयरसुतक नाही. हि मंडळी उद्या राहुल ला थंडी वाजली म्हणून अक्खा महाराष्ट्र जाळून गरमी निर्माण करतील. ह्यांच्याकडून फक्त निलाजऱ्या लोकांनी अपेक्षा ठेवाव्यात.

गेल्या २५ वर्षात मुंबईत

सुक्या
गुरुवार, 03/11/2021 - 03:05 नवीन
गेल्या २५ वर्षात मुंबईत एकहाती सत्ता असताना ह्या लोकांना रस्ते / नद्या शुध्धता / मलनिस्सारण ह्यात एकही गोष्ट पुर्ण करता आली नाही ह्यातुनच हे किती निकम्मे आहेत हे दिसते. फक्त फुकाच्या वल्गना आनी इकडे तिकडे बोट दाखवणे याशिवाय काहीही नाही. "मुंबईत खुप पाउस पडतो म्हणुन रस्ते खराब होतात" अशी मुक्ताफळे पालिकेतील एका वरीष्ठ व्यक्ती ने उधळल्याचे माहीती आहे. जणु काय पाउस जगात फक्त मुंबई मधेच पडतो.
↩ प्रतिसाद: साहना

. मुंबई ची प्रचंड लोकसंख्या असून

Rajesh188
गुरुवार, 03/11/2021 - 14:00 नवीन
मुंबई ची प्रचंड लोकसंख्या असून सुद्धा मुंबई हे देशातील सर्व सुविधा असलेले शहर आहे. शुद्ध पाणी पुरविण्यात मुंबई चा नंबर देशात पाहिले आहे. मुंबई सारखे शुध्द पाणी देशातील एका पण मोठ्या शहरात पुरवले जात नाही. शहर रोज स्वच्छ केले जाते .मुंबई मध्ये कचऱ्याचे ठीक दिसत नाहीत . पण देशातील सर्व मोठ्या शहरात कचऱ्याचे ठीग पडलेले असतात. २४ तास वीज पुरवठा योग्य दाबाने देणारे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. मुंबई मध्ये रात्री दोन वाजता पण मिनी स्कर्ट वर मुली फिरू शकतात. ते महाराष्ट्र सोडून देशातील कोणत्याच शहरात शक्य नाही. सेने चा विरोध करता करता हे bjp चे असंतुष्ट थापडे महाराष्ट्र चाच् द्वेष करायला लागले. मुंबईमध्ये जेवढे देशातील अनेक राज्यातून लोक उज्वल भविष्याची स्वप्न घेवून येतात तेवढी देशातील कोणत्याच शहरात येत नाहीत. आकडेवारी गूगल वर शोधा
↩ प्रतिसाद: सुक्या

त्याचे कारण म्हणजे हे

मराठी_माणूस
गुरुवार, 03/11/2021 - 14:06 नवीन
त्याचे कारण म्हणजे हे लाडावलेले बाळ आहे , जास्तीत जास्त पैसा इथेच खर्च केला जातो . बाकीचे प्रदेश बसलेत वर्षानुवर्ष वाट बघत.
↩ प्रतिसाद: Rajesh188

आकडेवारी ध्याच तुम्ही

Rajesh188
गुरुवार, 03/11/2021 - 14:09 नवीन
भारताचे केंद्र सरकार मुंबई मधून घेते किती आणि मुंबई ल परत देते किती. ह्याची आकडेवारी तुम्हीच द्याच. फक्त परंपरेनुसार थापा मारू नका.
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

कॉर्पोरेट ऑफिस मुंबईला आणि

मराठी_माणूस
गुरुवार, 03/11/2021 - 18:43 नवीन
कॉर्पोरेट ऑफिस मुंबईला आणि प्लांट इतरत्र , आता तुम्हीच ठरवा . सगळे जर व्यवस्थित आहे तर वैधानीक विकास मंडळांची गरज काय.
↩ प्रतिसाद: Rajesh188

केंद्र सरकारला

मुक्त विहारि
गुरुवार, 03/11/2021 - 21:00 नवीन
इतर राज्ये पण सांभाळायची असतात...
↩ प्रतिसाद: Rajesh188

नाहीतर काय

अनन्त अवधुत
गुरुवार, 03/11/2021 - 14:17 नवीन
ईतर प्रदेश म्हणजे इतर आज्ये नव्हेत , आपल्या महाराष्ट्रातीलच बाकी भाग बहा, विदर्भ आहे, मराठवाडा आहे त्याचे काही सोयर्सुतक नाही. यंदा तर चंगळ झाली मुंबईची, २-२ अर्थसंकल्प. देशाच्या कोणत्याच शहरासाठी २ अर्थसंकल्प नाहीत, पण यंदा मुंबईला आहेत.
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

नाहीतर काय

अनन्त अवधुत
गुरुवार, 03/11/2021 - 14:19 नवीन
इतर प्रदेश म्हणजे इतर राज्ये नव्हेत , आपल्या महाराष्ट्रातीलच बाकी भाग पहा, विदर्भ आहे, मराठवाडा आहे त्याचे काही सोयरसुतक नाही. यंदा तर चंगळ झाली मुंबईची, २-२ अर्थसंकल्प. देशाच्या कोणत्याच शहरासाठी २ अर्थसंकल्प नाहीत, पण यंदा मुंबईला आहेत.
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

.

अनन्त अवधुत
गुरुवार, 03/11/2021 - 14:13 नवीन
२४ तास वीज पुरवठा योग्य दाबाने देणारे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे.
खाजगीकरण आहे विजेचे तिथे. अडानी, टाटा, आणि अंबानी वीज पुरवठा करतात मुंबईला.
↩ प्रतिसाद: Rajesh188

बाबो, आणि श्रीश्रीश्री 188 ना

पिनाक
गुरुवार, 03/11/2021 - 15:37 नवीन
बाबो, आणि श्रीश्रीश्री 188 ना तर अंबानी आणि अडानी ना हाकलून लावायचंय. कसं व्हायचं मग.. बाकी मोबाईल जसा ते प्रायव्हेट कंपनीचा वापरतात, तशीच वीज पण रिलायन्स चिंच वापरतात बरं का
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

विदर्भातील वीज पश्चिम

उत्खनक
गुरुवार, 03/11/2021 - 21:27 नवीन
विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते. मग होणारच ना २४ तास वीज पुरवठा. विदर्भ वेगळा केला तर केवळ वीजेचा बोजा इतका होईल यांचा की *** धुवायला सुद्धा कर्ज काढावे लागेल.
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

विदर्भातील वीज पश्चिम

सुबोध खरे
Sat, 03/13/2021 - 12:20 नवीन
विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते. नीट माहिती घेऊन टंकत जा. स्वतंत्र विदर्भ यावर मिपा वर या विषयावर भरपूर चर्वित चर्वण झालेलं आहे. विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते ती महावितरणचा नफा व्हावा म्हणून मुंबईला गुजरात कडून स्वस्त दराने (४ रुपये दराने) वीज सहज मिळेल आणि ती चंद्रपुरवरून ७५२ किमी चंद्रपूर पडघा HVDC लाईन ने आणण्यापेक्षा जवळून आणण्यामुळे स्वस्तही पडेल. https://www.deshgujarat.com/2020/03/12/gujarat-sold-surplus-power-to-10-states/ पण मग शेतकऱ्यांना फुकट वीज कशी देता येईल? मुंबईतील उद्योगधंदे ११ रुपये दराने वीज बिल भरतात . त्यांना महावितरणची मुळीच गरज नाही.
↩ प्रतिसाद: उत्खनक

https://m.timesofindia.com

आग्या१९९०
Sat, 03/13/2021 - 13:29 नवीन
https://m.timesofindia.com/city/nagpur/iit-powai-exposes-excess-billing-scam-in-msedcl/amp_articleshow/74215769.cms IIT पवईने केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या १५-२० वर्षात महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना विजमंडळ आणि सरकारने किती फसवले हे समजते. कृषीविजवापरचे आकडे किती फसवे आहे तेही कळले. मी जेव्हा प्रत्यक्ष शेती करू लागलो तेव्हा खऱ्या अर्थाने ही लूट अनुभवली.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुबोध खरे

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 15:51 नवीन
शेतकऱ्यांना फुकट वीज मिळते हा जुमला काय आहे. शेतीसाठी सुद्धा मीटर नीच वीज पुरवठा होतो. गुजरात आणि मुंबई चा काय संबंध . कोणत्याही महानगर पालिकेला दुसऱ्या राज्यातून वीज घेण्याचा हक्क नाही.राज्याच्या परवानगी वीणा हे तुम्हाला माहीत नाही का. Gulf मध्ये पेट्रोल खूप स्वस्त आहे महाराष्ट्र किंवा बाकी राज्य सरळ gulf देशांशी व्यवहार करून मुंबई मध्ये पेट्रोल आयात करतील. केंद्राला त्या वर कर लावण्याचा हक्क का असावा? महाराष्ट्राला तीस रुपये ltr ni पेट्रोल मिळेल. राज्य अजुन पुढे जाईल. देश नियमांनी चालतो मनमानी पद्धतीने नाही. जेवढे अधिकार केंद्राला घटनेने दिले आहे तेवढेच अधिकार राज्यांना पण दिले आहेत. हे भारतीय संघराज्य आहे. संघराज्याची व्याख्या खाली देत आहे. देशातील केंद्रीय सरकार आणि देशातील प्रादेशिक सरकार ह्यांच्या मध्ये अधिकार विभागणी संविधानाने केलेली असते त्या पद्धतीला संघराज्य म्हणतात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपके

प्रसाद_१९८२
Sat, 03/13/2021 - 15:59 नवीन
चरण किधर है, भाईसाहब. जरा हमें भी दर्शन करवाईये.
↩ प्रतिसाद: Rajesh188

हायला

सुबोध खरे
Sat, 03/13/2021 - 19:00 नवीन
हायला कोणत्याही महानगर पालिकेला दुसऱ्या राज्यातून वीज घेण्याचा हक्क नाही.राज्याच्या परवानगी वीणा हे तुम्हाला माहीत नाही का. वर दिलेला दुवा वाचण्याचे निदान कष्ट तरी करा कि त्यात लिहिलंय कि गुजरातने महाराष्ट्राला ४ रुपये दराने वीज विकली. देश आणि परदेश यातील फरक समजत नाही का तुम्हाला? मग काश्मिरातील स्वातंत्र्यसैनिकानी पाकिस्तानातून शस्त्रास्त्रे आणि अफू मागवली तर चालतील का? Officials in the energy department said the conservative estimate of the subsidy for farmers and allied sectors is Rs 10,000 to Rs 12,000 crore per year. During peak summer, when power demand goes up, the cost for procuring power also came at a higher price, they added. Officials also said the subsidy to farmers, however, remained constant resulting in higher expenditure that had to be cross subsidised to recover money through power supplied to industries and domestic consumers. https://indianexpress.com/article/cities/mumbai/govt-promises-eight-hours-of-power-supply-to-farmers-in-daytime-through-solar-power-7126897/ प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
↩ प्रतिसाद: Rajesh188

माझ्या माहितीप्रमाणे

श्रीगुरुजी
Sat, 03/13/2021 - 19:18 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना वीजशुल्कासाठी दोन पर्याय आहेत. प्रतियुनिट अल्प दराने किंवा कृषीपंपाच्या अश्वशक्तीनुसार एका ठराविक अल्प दराने (या योजनेत किती वीज वापरली जाते याचा संबंध नाही). चूभूदेघे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर आहे

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 23:51 नवीन
मला वाटतं अंदाजे 2005 पर्यंत अश्व शक्ती नुसार शेत पंपाला वीज आकारणी केली जायची. मग तुम्ही पंप बंद ठेवा किंवा 24 तास चालू ठेवा . ठराविक बिल च यायचं. पण त्या मुळे लोक वीज,आणि पाणी दोन्ही ची नासाडी करायचे. अत्यंत मौल्यवान पाणी वाया जायचं,वीज वाया जायची. उसाच्या शेतात रात्री पाणी सोडून सरळ सकाळी जावून च पंप बंद करणारे महाभाग होते. रात्र भर पाणी वाहत असायचे . नंतर मीटर प्रमाणे वीज आकारणी चालू झाली. पण शेती साठी दरात सवलत दिली जाते. शेती असू नाही तर घरगुती वापर पाणी आणि वीज मीटर प्रमाणेच दर आकारून दिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. 1998 ते 2000 च्या आसपास विजेची कमतरता नव्हती वीज 24 तास उपलब्ध असायची . शेती साठी सुद्धा 24 तास वीज होती . नंतर तुटवडा निर्माण होवून वीज कपात सुरू झाली. आता शेती साठी 24 तास वीज उपलब्ध करून दिली जात नाही. रात्री च दहा ते बारा तास वीज उपलब्ध असते. देवेंद्र साहेब नी तर शेती साठी वीज देणेच बंद केले . सौर ऊर्जा वापरून गरज भागवां वीज मिळणार नाही असा दंडक च होता त्यांचा. सौर उर्जेवर पाण्याचा पंप चालवायचा तर चार ते पाच लाख खर्च. परत सुरक्षेची काहीच खात्री नाही. आता परत वीज जोडणी देणे चालू झाले. जाणता राजा सत्तेवर आला ना.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जाणता राजा सत्तेवर आला ना.

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 06:27 नवीन
काय सांगता? तांदूळ घोटाळा अजिबात झाला नाही साधू हत्याकांड झाले नाही सामान्य माणसाला मारहाण झाली नाही करोना सेंटर मध्ये बलात्कार झाला नाही जळगांव मध्ये स्त्रीयांचे शोषण झाले नाही सोलापुर मध्ये, सामुहिक बलात्कार झाला नाही इतकेच कशाला? आता फक्त स्त्रीने केस दाखल केली की 21 दिवसांत निकाल लावतात... करोना तर गर्दीत चेंगरून मरणारच आहे... ----------- देवेंद्र साहेब नी तर शेती साठी वीज देणेच बंद केले . हे नक्की का? कारण आमच्या गावात, अर्ज केला की महिन्याभरात, 3 फेजची लाईन टाकली. आणि ती पण फडणवीस सरकारच्या काळांत, आता कोकण महाराष्ट्र राज्यात, येत नसेल तर गोष्ट वेगळी आहे. --------- सौर उर्जेवर पाण्याचा पंप चालवायचा तर चार ते पाच लाख खर्च. आपल्याला ही माहिती कुणी दिली? दोन लाख रूपये खर्च येतो आणि त्याला पण सबसिडी आहे.... कदाचित कोकणांत, सबसिडी देत असावेत आणि कोकणांत सौर पंप स्वस्त असावेत. माझा एक मित्र हाच धंदा करतो. ------------ परत सुरक्षेची काहीच खात्री नाही..... हे मात्र एकदम बरोबर बोललात.... ज्या राज्यात, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण होते, त्या राज्यांत, अशा गोष्टी वारंवार होण्याची शक्यता जास्तच.
↩ प्रतिसाद: Rajesh188

देवेंद्र साहेब नी तरशेती साठी

सुबोध खरे
Mon, 03/15/2021 - 19:58 नवीन
देवेंद्र साहेब नी तर

शेती साठी वीज देणेच बंद केले .

थापाडे महाराज याचा कुठे काही दुवा कि असंच संध्याकाळी चांदणी बार मध्ये बसून कुणी तरी सोडलेली पुडी आहे?
↩ प्रतिसाद: Rajesh188

विदर्भातील वीज पश्चिम

उत्खनक
Mon, 03/15/2021 - 22:01 नवीन
विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते ती महावितरणचा नफा व्हावा म्हणून
इथे विदर्भातून वीज वळवली जाते याला केवळ नफा हे एकमेव कारण देऊन थांबता येत नाही. विदर्भात थर्मल पॉवर प्लांट्स आहेत. आधीच विदर्भ मुळात उष्ण. त्यात हे. ५० ला टेकणारा पारा. त्यात भर उन्हाळ्यात सरासरी १२ तास लोडशेडींग खेडेगावांत. नागपूर सारख्या शहरात ४ तास होते ते आता कमी झालेय. बाकी शहरांचे हाल वेगळेच. या सर्वांचा काही विचार? की केवळ नफा हा एकमेव दृष्टीकोन बरोबर? घ्या की गुजरातेतून वीज, कोणी नाही म्हटले? इथे अकोल्या सारख्या शहरात भर उन्हाळ्यात ८-८ तास वीज नसते, पाणी आठवड्यातून एकदा येतं प्यायचं. गावांत काय असेल याची कल्पनाही करवत नाही. लोकं वैतागणार नाहीत? महावितरण फायद्यात नसण्याची अनेक कारणं आहेत. सगळ्यांवर कार्यवाही केलेली दिसते काय? माणसांचं ३-४ महिने जगणं हराम करून नफ्याचं कारण देणारं कोणतंही सरकार हे चूकच.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

क्रॉस सबसिडी याबद्दल ऐकलं आहे

सुबोध खरे
Tue, 03/16/2021 - 10:16 नवीन
क्रॉस सबसिडी याबद्दल ऐकलं आहे का? ५-६ रुपये दराने उत्पादित वीज ( चोरी आणि सवलतीच्या दराने वीज दिल्याने) घरगुती ग्राहकाला ३-४ रुपये दराने वीज विकण्यासाठी उद्योगधंद्याला ११ रुपये दराने विकावी लागते. हे उद्योग धंदे मुंबईत असल्याने वीज मुंबईपर्यंत आणावी लागते. त्यातून विदर्भ आणि मराठवाडा येथील मागास भागात उद्योगधंदे सुरु व्हावे यासाठी तेथील उद्योगधंद्याला सुद्धा सवलतीच्या दराने वीज पुरवावी लागते. https://www.nagpurtoday.in/concession-in-power-tariff-to-industries-in-vidarbha-marathwada-extended-till-2024/05281757 विदर्भात घरगुती वीज बिलांची थकबाकी वाढतेच आहे. तेथील उच्च दाबाचे (औद्योगिक) ग्राहक आपली बिले प्रामाणिकपणे भरतात. (म्हण्जेच घरगुति ग्राहक भरत नाहीत). महा वितरणाचा संचित तोटा ३५००० कोटी रुपये आहे. म्हणजेच ११ कोटी महाराष्ट्राच्या जनतेवर हा भार १००० रुपये दर डोई आहे. हे पैसे कुठून येणार? १०० युनिट पर्यंत फुकट वीज पुरवण्याची घोषणा करणारे सरकार या तोट्यात ७१०० कोटी रुपयांची भर घालू इच्छिते. म्हणजे दरडोई अधिक ६६० रुपये. https://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-working-group-formed-to-cut-losses-in-power-sector सरकार कडे स्वतःचे काहीही नसते ते एकाच्या खिशातून काढून दुसऱ्याच्या खिशात टाकतात. ( जसे ग्राहकाला स्वस्त माल पुरवायचा असेल तर शेतकऱ्याला कमी भाव द्यावा लागतो). मुंबईला २४ तास खंडित न होणार वीज पुरवठा पाहून पोटात दुखणाऱ्या माणसांनी वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे.
↩ प्रतिसाद: उत्खनक

विदर्भ ला आम्ही परके समजत नाही

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 23:39 नवीन
विदर्भ हा महारष्ट्र ची शान आहे त्याला महाराष्ट्र परका समजत नाही.पण काही राज्य द्रोही लोक राज्याशी द्रोह करून विष कालवत असतात लोकांच्या मनात.
↩ प्रतिसाद: उत्खनक

અમે મુંબઈને અજાણ્યું સ્થળ માનતા નથી.

डॅनी ओशन
Sun, 03/14/2021 - 21:05 नवीन
મહારાષ્ટ્ર એ મુંબઈ વિસ્તારનું ગૌરવ છે. તે મુંબઇ વિસ્તારને અજાણી વ્યક્તિ માનતો નથી.પરંતુ કેટલાક રાજ્ય વિરોધી લોકો રાજ્યના દગો કરીને લોકોના મનને ઝેર આપી રહ્યા છે. સો સો એંસી ભગવાન, ક્રોધ ના કરો, આનંદ કરો. :)
↩ प्रतिसाद: Rajesh188

पुर्ण माहिती अशी आहे

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 22:37 नवीन
मुंबई ल काही ही झाले तरी 24 तास वीज पुरवठा करण्याचा करार mseb बरोबर झाला आहे. आणीबाणी निर्माण झाली तरी बाकी महाराष्ट्र चा वीज पुरवठा खंडित करून मुंबई ला वीज पुरवली जाते. Maharashtra मुंबई साठी नेहमीच kurbani देत आला आहे. महाराष्ट्र स्वतः अंधारात राहतो पण मुंबई ला वीज पुरवठा केला जातो. तुमच्या ह्या pvt कंपन्या मुळे 24 तास वीज मिळत नाही. देशातील सर्वात जास्त वीज निर्मिती महाराष्ट्र पहिल्या पासून आता पर्यंत करत आला आहे. बाकी कोणतीच राज्य जवळपास पण फिरकू शकत नाहीत. आज महाराष्ट्र 42491 mw वीज निर्मिती करतो तर दोन नंबर ला असलेला गुजरात 38039mw वीज निर्मिती करतो. देशातील पाच राज्य महाराष्ट्र, गुजरात,तमिळ nadu, Andhra, आणि उत्तर प्रदेश ही सर्वात जास्त वीज निर्मिती करतात. त्या मध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी असून उत्तर प्रदेश शेवटच्या स्थानी आहे. महाराष्ट्र उत्तर प्रदेश पेक्षा दुप्पट पेक्षा जास्त वीज निर्मिती करतो. नाद करायचा च नाही महाराष्ट्र चा
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

मुंबई ल काही ही झाले तरी 24

मराठी_माणूस
Sun, 03/14/2021 - 12:34 नवीन
मुंबई ल काही ही झाले तरी 24 तास वीज पुरवठा करण्याचा करार mseb बरोबर झाला आहे. आणीबाणी निर्माण झाली तरी बाकी महाराष्ट्र चा वीज पुरवठा खंडित करून मुंबई ला वीज पुरवली जाते.
असे का ? इतर राज्यातल्या राजधान्यासाठी सुध्दा अशीच व्यवस्था असते का ? तसेच विजेची गरज manufacturing plant ला जास्त असते का खर्डेघाशी करणार्‍या ऑफिसला ?
↩ प्रतिसाद: Rajesh188

देशाच्या आर्थिक राजधानी ची किंमत

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 12:49 नवीन
राज्याला द्यावी लागते फक्त त्याचे कौतुक कोणी करत नाही. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल एवढे पाणी महाराष्ट्र मुंबई ला पुरवतो. स्वतःच्या राज्यातील पर्यावरण धोक्यात आणून. हजारो टन कचरा महाराष्ट्र ची भूमी प्रदूषित करते. पांढरा हत्ती चा सांभाळ केल्या सारखे आहे हे.पण जास्तीत जास्त कर मात्र केंद्र सरकार वसूल करून देशभर त्याचे वाटप करते . आपल्याला भीक मागावी लागते हक्क च्या पैश्यासाठी.
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

आणि हो

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 12:52 नवीन
मोदी साहेब गुजरात चे मुख्य मंत्री होते तेव्हा त्यांनी पण प्रश्न केला होता. गुजरात नी केंद्राला कर का द्यावा? असा
↩ प्रतिसाद: Rajesh188

कधी?

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 13:20 नवीन
काही लिंक?
↩ प्रतिसाद: Rajesh188

११ Jun २००८ economics time

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 13:56 नवीन
मला लिंक देता येत नाही अडचण येतेय तुम्ही गूगल वर बघा. प्रतिक्रिया म्हणून मोदी वर देशद्रोह चा आरोप काँग्रेस नी केला होता
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्ही अजूनही कॉंग्रेस वर भरवसा ठेवता?

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 14:14 नवीन
अर्थात, बहुतेक तुम्हाला, बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन हवे असेल.....
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा