Skip to main content

ठिपके

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 02/03/2021 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
शहरदिव्यांचे पिवळट ठिपके काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या धुरात भेसुर चमचमण्याच्या थोडे आधी तिथून निघूया, पाखरठिपक्यांच्या नक्षीला भगव्यापिवळ्या मावळतीशी किलबिलणारा कंठ फुटेतो जरा थांबूया मग बोलूया, चांदणठिपक्यांची रांगोळी गारूड पाडून विस्कटण्याच्या थोडी आधी चंद्रधगीने जरा वितळू दे मग थांबूया.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6184
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

राजगडावरच्या मुक्कामी असा अनुभव बर्‍याच वेळा घेतला आहे. पण तो शब्दात व्यक्त करण्याची हातोटी केवळ तुमच्या कडेच आहे. पैजारबुवा,

चांदणठिपक्यांची रांगोळी गारूड पाडून विस्कटण्याच्या थोडी आधी चंद्रधगीने जरा वितळू दे मग थांबूया. वाह..