मोदींची कॉंग्रेस?
In reply to कॉंग्रेस आणि भाजप by मुक्त विहारि
In reply to @मुवि by उपयोजक
In reply to किस में है कितना दम! by शशिकांत ओक
In reply to किस में है कितना दम! by शशिकांत ओक
In reply to कोन्ग्रेस चा पाडाव लगेच नाही पण.. by चौकटराजा
प्रत्येक पक्षासाठी कठीण कालखंड येतच असतो. पण त्यात आपली नौका पार पाडणारा नेता आवश्यक असतो. आताच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे याच घटकाची कमतरता आहे. या बाबतीत मी मोदींना नशीबवान मानतो. फार कमी नेत्यांच्या नशिबात असा विरोधी पक्ष आणि विरोधी नेता येतो. या कारणाने कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झालेली होती.
समर्पक निष्कर्ष! सत्ताबदल होण्यासाठी सत्ताधारी पक्षाने खूप चुका करणे व त्याचवेळी पूर्णपणे नवीन पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असते. खूप चुका करूनही पर्यायी सक्षम विरोधी पक्ष व नेता नसल्याने बहुतेक वेळा तोच सत्ताधारी पक्ष परत निवडून येतो. अनेकदा समर्थ विरोधी पक्ष व चांगला नेता असूनही सत्ताधारी पक्षाविरूद्ध फारशी नाराजी नसेल तर सत्ताबदल होत नाही.
सध्या मोदी सरकारविरूद्ध फारशी नाराजी नाही. त्याचवेळी कॉंग्रेस अत्यंत दुर्बल झाला आहे. राहुलला लागोपाठ दोन निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी उमेदवार करूनही जनतेने नाकारले आहे. राहुल नेतेपदासाठी योग्य नाही हे अनेकदा दिसले आहे. आता मोदींविरूद्ध नाराजी वाढली तरी राहुल हा पर्याय समोर पुन्हा समोर आला तर जनता पुन्हा एकदा मोदींनाच सत्तेवर आणेल.
जर कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर मोदींनी खूप गंभीर चुका केल्या पाहिजेत. तसेच मोदींच्या प्रत्येक चुकीला जनतेसमोर अधोरेखित करणारा पूर्ण नवीन नेता कॉंग्रेसकडे हवा. सध्या कॉंग्रेसकडे असा कोणताही नेता नाही. प्रियांका गांधींचा फारसा प्रभाव उत्तर प्रदेशात पडलेला नाही. अर्थात प्रियांका अजून देशपातळीवर राजकारणात उतरलेली नाही. प्रियांकाला योजनाबद्ध पद्धतीने देशपातळीवर आणले व प्रियांकाने गांधी, नेहरू, चले जाव चळवळ वगैरे सद्यस्थितीत पूर्ण निरूपयोगी असलेल्या विषयांवर न बोलता मोदींच्या चुका व देशासाठी आपल्याकडे व पक्षाकडे कोणत्या योजना आहेत हे जनतेला सांगण्यावर भर दिला तर कॉंग्रेसचे पुनरूज्जीवन होऊ शकेल. अन्यथा जनता पक्ष, डावे पक्ष या पक्षांप्रमाणे कॉंग्रेस फक्त व्हेंटिलेटरवर जिवंत राहील.In reply to उत्तम लेख! by श्रीगुरुजी
In reply to उत्तम लेख! by श्रीगुरुजी
In reply to सध्या .. by चौकटराजा
भाजप हा खाजगीकरणा चा खंदा समर्थक आहे त्यामुळे नवश्रीमंतांचा एक गट त्यापक्षामागे उभा आहे हेही कारण आहे !
हे बरोबर आहे. परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला पिळून काढणे हे वाजपेयी व मोदी यांच्या कारकिर्दीतील समान सूत्र आहे. एकाचवेळी खाजगीकरण व उद्योगांना अनुकूल धोरणे आणि सातत्याने करवाढ करून मध्यमवर्गीय व श्रीमंतांना पिळून काढणे ही पूर्णपणे परस्परविरोधी धोरणे भाजप राबवित आहे.In reply to भाजप हा खाजगीकरणा चा खंदा by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी ... by चौकटराजा
In reply to सध्या केजरीवालांची लोकप्रियता by श्रीगुरुजी
In reply to काय वाटते ...? by चौकटराजा
In reply to एक पक्ष स्थापन करण्याची गरज by श्रीगुरुजी
In reply to सध्या केजरीवालांची लोकप्रियता by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी ... by चौकटराजा
In reply to सध्या .. by चौकटराजा
भाजप हा खाजगीकरणा चा खंदा समर्थक आहे त्यामुळे नवश्रीमंतांचा एक गट त्यापक्षामागे उभा आहे हेही कारण आहे !
हे बरोबर आहे. परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला पिळून काढणे हे वाजपेयी व मोदी यांच्या कारकिर्दीतील समान सूत्र आहे. एकाचवेळी खाजगीकरण व उद्योगांना अनुकूल धोरणे आणि सातत्याने करवाढ करून मध्यमवर्गीय व श्रीमंतांना पिळून काढणे ही पूर्णपणे परस्परविरोधी धोरणे भाजप राबवित आहे.In reply to भाजप हा खाजगीकरणा चा खंदा by श्रीगुरुजी
परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत.आयुष्यमान भारत, उज्वला योजना वगैरे शेकडो योजना आहेत त्या डाव्याच आहेत. अनेकांना एखादा पक्ष राजकीय दृष्ट्या उजवा असला म्हणजे आर्थिक दृष्ट्या पण उजवाच असेल असे वाटत असते किंवा या दोन गोष्टींमध्ये फरक असतो हे लक्षात येत नाही. राष्ट्रवादाचे समर्थन करत असल्याने भाजप हा राजकीय दृष्ट्या नक्कीच उजवा पक्ष आहे पण या सगळ्या योजनांमधून सरकारचा अर्थकारणातील सहभाग वाढविला जात असल्याने आर्थिकदृष्ट्या डावा पक्ष आहे. अमेरिकेत १९६९ ते १९८९ या वीस वर्षांमध्ये दोन मुळातले उजवे अध्यक्ष झाले. ते होते १९६९ ते १९७४ या काळात रिचर्ड निक्सन आणि १९८१ ते १९८९ या काळात रॉनाल्ड रेगन. निक्सन मुळातले उजवे असले तरी सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण डावी आर्थिक धोरणे अवलंबली होती. तर रेगन यांनी बरीच उजवी धोरणे अवलंबली. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर ते भारताचे रेगन होतील असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र ते भारताचे निक्सन होताना दिसले. मला स्वतःला डावी आर्थिक धोरणे अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत. तरीही कोणाही राज्यकर्त्याविषयी मत बनविताना नुसत्या एका गोष्टीवरून मत न बनवता तो नेता नक्की कोणते 'पॅकेज' देतो यावर मत बनवावे असे मला वाटते. आर्थिक धोरणे आवडली नाहीत तरी मोदींनीच भारतीय लष्करी सज्जता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे, ३७० सारखे कटकटीचे प्रश्न एका फटक्यात उडवले, नुसता पाकव्याप्त काश्मीरात नाही तर थेट वायव्य सरहद्द प्रांतात जाऊन आपली विमाने हल्ला करून परत आली आहेत, पुरोगामी विचारवंतांना अभिनंदन वर्तमानच्या सुटकेमागे इम्रानखानचा मोठेपणा दिसत असला तरी प्रत्यक्षात ते मोदी सरकारने दम भरल्यामुळे शक्य झाले हे अलीकडेच उघडकीला आले आहे. तसेच पूर्वी एकटा पाकिस्तान सांभाळणे जड जात होते तिथे एकाच वेळी पाकिस्तान आणि चीनलाही आपण सांभाळू शकतो हा आत्मविश्वास मोदींमुळे आला आहे हे पण नाकारता येणार नाही. तसेच तंत्रज्ञानाचा अवलंब करून सरकारी पैशाची बरीच गळती मोदींनी कमी केली आहे आणि मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर भर दिला जात आहे या जमेच्या बाजू आहेतच. जी.एस.टी हे पण नक्कीच चांगले धोरण आहे. सुरवातीच्या काळात अंमलबजावणीमध्ये अडचणी आल्या पण आता पूर्वीइतका त्रास राहिलेला नाही. त्यामुळे चलनबंदी वगैरे आर्थिक धोरणे आवडली नाहीत तरी एक पॅकेज म्हणून मोदी इतर कोणत्याही पर्यायापेक्षा कितीतरी जास्त चांगले आहेतच. फक्त अपेक्षा ही की निदान २०२२ किंवा २०२३ मध्ये तरी मोदी रेगन बनून मोठ्या प्रमाणावर करसवलती देतील.
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to मोदींची राजकीय, लष्करी व by श्रीगुरुजी
In reply to ही प्रक्रिया फार पूर्वीच सुरू by पिनाक
In reply to लाच घेणे ,आर्थिक घोटाळा करणे by सुबोध खरे
In reply to गेल्या 6 वर्षातील मोदींचे by Vichar Manus
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कुठल्याही पक्षाचे काही by मराठी_माणूस
In reply to मी त्याला .. by चौकटराजा
माझ्याकडेही त्यांची फाईल आहेआजकाल फाईलच्या जागी सीडी असते, प्रत्यक्षात मात्र साधी फ्लॉपी सुद्धा बाहेर पडत नाही ती गोष्ट वेगळी..
In reply to आजकाल by सॅगी
In reply to आजकाल by सॅगी
In reply to कामाला लागा by चौकस२१२
In reply to जनता खूप हुशार आणि चाणाक्ष्य झालीय by घोरपडे
कॉंग्रेस आणि भाजप