मोदींची कॉंग्रेस?
भारतीय राजकारणाला मागील ७० वर्षात अनेक वेगवेगळी वळणे मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषक सांगतात, त्यात मला एकच महत्वाचे वाटते ते म्हणजे जे पीं चे आंदोलन ज्याने ईंदिरा कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात जनचळवळ उभारली. कॉंग्रेस पक्षाचे राजकारण या आंदोलनाने निवडणुक जिंकायच्या अनुषंगाने अधिक धार्मिक तुष्टीकरणाचे झाले. असे माझे मत आहे. आजचा विषय हा फक्त राजकीय विचारसरणी बदल यावर आहे. पंडीत नेहरु पासुन हिंदु धर्माला दुर्लक्षण्याची जी सुरुवात झाली ती रामाच्या अस्तित्व नाकारण्याच्या लेखी दाव्यापर्यंत पोहोचली. २०१४ च्या निवडणुकी पासुन भारतीय जनमानस निवडणुकीसाठी बाहेर येऊन मतदान करतांना दिसली. हळुहळु समाज माध्यमांद्वारे लोकांमध्ये राजकीय मते आणि विचार मांडण्याचे प्रमाण वाढले. लोकांची मते टोकाची आणि अधिक स्पष्ट होतांना दिसत आहेत.
त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे मागील काही दिवसात झालेल्या घटना काही वेगळी दिशा देऊ शकतात का?
गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाल समाप्तीचे मोदींचे भाषण आणि त्याचा पुढील भाग म्हणजे जी २३ च्या नेत्यांनी जम्मु मध्ये घेतलेली बैठक.
सदर प्रकारचे दृष्य दिसण्यासाठी बराच काळ अगोदर मागे पार्श्वभागात घटना घडलेल्या असतील, तरच हे समोर दिसते. याची सुरुवात मोदींच्या कॉंग्रेसमुक्त भारत योजनेच्या भागाचा पुढील टप्पा किंवा त्याचे प्रत्यक्षीकरण म्हणता येईल का?
कॉंग्रेसमुक्त भारत म्हणजे भारतात कॉंग्रेस पक्षाचे नावच राहणार नाही हे मोदींना अपेक्षित असेल असे समजणे मला व्यक्तीश: पटत नाही. कॉंग्रेस पक्षाने आपल्या विचारसरणीने आणि आपल्या थोड्या लाभाकरिता सत्ता वापरणे आणि देश हितापेक्षा व्यक्तीहित पाहणे बंद करणे हा व्यवहार्य आणि अमलात येणारा उपाय असेल. असा मुद्दा इतकी वर्ष सत्ता आणि त्याचे लाभ मिळणारे लगेच मान्य करतील हे मानवी स्वभाव आणि चरित्राच्या विरोधात जाते. तेच गेल्या ७ वर्षात आपण पाहत आहोत. २०१४ ला भाजपाला सत्ता मिळाल्यानंतर जे सत्तेच्या परीघापासून लांब गेले, मिळणाऱ्या लाभापासून वंचित झाले त्यांनी हा बदल तत्कालीन असल्याची भावना करून घेतली. त्यात राजकीय व्यक्ती, नोकरशहा, उद्योगपती, विविध तथाकथित समाजसेवी होते. पण हळूहळू जसे मोदी शहा जोडगोळी काम करू लागली, २०१९ ची निवडणूक एकहाती पुन्हा जिंकली, यातील बऱ्याच लोकांनी आपली निष्ठा बदलून भाजपाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. नोकरशाही यात सगळ्यात शेवटी होती असे मला वाटते. ती सगळी सोयीची नाहीत म्हणून मोदींची मागील काही दिवसातील बाबू लोकांवरील ट्विटर संदेश पहा.
गांधी कुटुंबाच्या ताब्यात असलेली कॉंग्रेस ही देशहिताच्या बाबतीत पाहिजे तेवढी सक्षम नाही हे जनमानसात २०१९ च्या निवडणुकीने ठाम झाले. म्हणजे भाजपाने आपल्या काही निर्णयाने आम्ही कॉंग्रेसपेक्षा कितीतरी सरस आहोत हे सिद्ध करून दाखवले. लोकांशी आपण बोललो तर काही निर्णय कॉंग्रेस कधीच घेऊ शकली नसती हे सगळे मान्य करतात. त्यात भाजपा विरोधकही आहेत. याचा परिणाम कॉंग्रेसमधील नेत्यांवर होणार नाही असे नव्हते. ज्यांना आपल्या भविष्याची, राजकीय भवितव्याची काळजी होती त्यांनी आपला रस्ता शोधला. काहींनी लगेच तर काहींनी वेळ घेतला. शेवटी भारतात राजकारण हा व्यवसाय आहे. प्रत्येक पक्षासाठी कठीण कालखंड येतच असतो. पण त्यात आपली नौका पार पाडणारा नेता आवश्यक असतो. आताच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे याच घटकाची कमतरता आहे. या बाबतीत मी मोदींना नशीबवान मानतो. फार कमी नेत्यांच्या नशिबात असा विरोधी पक्ष आणि विरोधी नेता येतो. या कारणाने कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झालेली होती. जयराम रमेश सारखे नेते धोक्याची घंटा वाजवीत होते. त्यांना अगोदर बाहेर फेकले गेले. कारण कॉंग्रेसने या अगोदर हीच पध्दत वापरून विरोध थंड केल्याचा यशस्वी भूतकाळ पाहिलेला होता. पण आता मोदी हा नेता आणि जनमानस बदलले आहे. हे थोड्या थोड्या काळानंतर अनेक नेते सांगत होते. सिब्बल सारखे कट्टर भाजप विरोधक जेव्हा खुल्या पध्द्तीने समोर आले तेव्हा मोदी शहा जोडगोळीचे प्राथमिक काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. त्यांची काम करण्याची पध्दत पाहिली तर बुद्धीबळात जसे पहिल्यांदा राणीवर हल्ला केला जात नाही आणि अगोदर प्यादे आणि उंट, घोडे घेतले जातात तसे काम दिसते. त्यात अहमद पटेल सारखा कुटनितीज्ञ, कॉंग्रेसला बांधून ठेवणारा, नेते आणि गांधी यांच्यातील दुवा, मोठ्या नेत्यांना अडकवून ठेवणारा, आर्थिक बाजू साभाळून घेणारा नेता जाणे ही विघटनाला चालना देणारी घटना ठरली. गांधी कुटुंब त्यामुळे एकप्रकारे अंध झालेले दिसतील. त्यातच पक्षाचा निधी आटलाय. त्यात फार तर महाराष्ट्र सारख्या राज्यातुनही एकुण सरकारला मिळणार्या पक्षीय दानातील तीन भागातुन थोडा फार हिस्सा मिळत असणार.
सर्व नेते आपली विचारसरणी बदलतील आणि भाजपात येऊन कॉंग्रेसमुक्त भारत होईल असे कधीच शक्य नाही. पण भाजपला विरोध म्हणजे कोणत्याही बाबतीत विरोध हा मुद्दा सोडावा लागेल हे महत्वाचे. भारताच्या अंतर्गत बाबतीत, संरक्षण, घुसखोरी, भ्रष्टाचार, नागरिकता या बद्दल दुमत होण्याचे आणि शंका उपस्थित करून परदेशीय उपटसुंभांना अप्रत्यक्ष सोयीची भूमिका घेणे सोडावेच लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. या बाबतीत कॉंग्रेसपक्षाने भाजपाला मदत केली नसली तरी इतर छोट्या पक्षांनी यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आपण पाहिली आहे. भले जनतेत जाऊन त्यांनी विरोध केला पण संसदेत भाजपाला मदत केली आहे. उदा. शेतकरी कायदा. सी ए ए. आता हे जी २३ चे नेते ज्यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या भवितव्याबद्दल बोलत आहेत त्यांचा विचार पुर्वीसारखा करुन त्यांना कॉंग्रेसविरोधी म्हणुन सोडुन देणे गांधी कुटुंबाला शक्य नाही. कारण त्या गटाला मोदी संरक्षण देतील आणि तो गट मोदींना आवश्यक जागी मदत करेल असे दिसते. त्याची चुणुक आझाद यांचे जम्मुतील भाषण एकुण येवु शकते. शेवटी आझाद, राज बब्बर, सिब्बल, मनीष तिवारी यांना भारत सोडुन दुसरीकडे राहणे शक्य नाही. जिना यहा मरना यहा. यापुढे गांधी कुटुंब दुहेरी कैचीत सापडणार काय?भाजप आणि राष्ट्रीय कॉंग्रेस. यातुन २०२४ च्या निवडणुकीची तयारी दिसुन येते. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातुन तयारी धरत आहेत. त्यात गांधी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असा वाद लावुन प्रियंकाच्या मनसुब्यांना सुरुंग लावतांना दिसत आहेत. कारण अश्या वक्तव्याने भाजपला फायदा आणि होणारे नुकसान फक्त प्रियंकाला आहे. जी २३ चा गट पुढील काळात कसा वाढतो यावर बरेच आडाखे बदलु शकतात. आपल्या धोरणांना सोयीचा विरोधी पक्ष असणे, तो वाढवुन ठेवणे हे फार मोठे राजकारण असु शकते. पाहुया पुढे काय होते....
वर्गीकरण
कॉंग्रेस आणि भाजप
In reply to कॉंग्रेस आणि भाजप by मुक्त विहारि
@मुवि
In reply to @मुवि by उपयोजक
त्यांची तुलना कुणाबरोबरही होऊ शकत नाही ....
संयमीत भाषेत छान मांडलंय.
किस में है कितना दम!
In reply to किस में है कितना दम! by शशिकांत ओक
कॉंग्रेसने,घराणेशाहीची पाळेमुळे इतक्या खोलवर रूजवून ठेवली आहेत क
In reply to किस में है कितना दम! by शशिकांत ओक
होय हे कष्टाचे आणि मेहनतीचे
हि पण शक्यता लक्षात घेतली पाहिजे
कोन्ग्रेस चा पाडाव लगेच नाही पण..
In reply to कोन्ग्रेस चा पाडाव लगेच नाही पण.. by चौकटराजा
कॉंग्रेसने आधी राज्य केले कारण...
१९९०
उत्तम लेख!
प्रत्येक पक्षासाठी कठीण कालखंड येतच असतो. पण त्यात आपली नौका पार पाडणारा नेता आवश्यक असतो. आताच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे याच घटकाची कमतरता आहे. या बाबतीत मी मोदींना नशीबवान मानतो. फार कमी नेत्यांच्या नशिबात असा विरोधी पक्ष आणि विरोधी नेता येतो. या कारणाने कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झालेली होती.समर्पक निष्कर्ष! सत्ताबदल होण्यासाठी सत्ताधारी पक्षाने खूप चुका करणे व त्याचवेळी पूर्णपणे नवीन पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असते. खूप चुका करूनही पर्यायी सक्षम विरोधी पक्ष व नेता नसल्याने बहुतेक वेळा तोच सत्ताधारी पक्ष परत निवडून येतो. अनेकदा समर्थ विरोधी पक्ष व चांगला नेता असूनही सत्ताधारी पक्षाविरूद्ध फारशी नाराजी नसेल तर सत्ताबदल होत नाही. सध्या मोदी सरकारविरूद्ध फारशी नाराजी नाही. त्याचवेळी कॉंग्रेस अत्यंत दुर्बल झाला आहे. राहुलला लागोपाठ दोन निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी उमेदवार करूनही जनतेने नाकारले आहे. राहुल नेतेपदासाठी योग्य नाही हे अनेकदा दिसले आहे. आता मोदींविरूद्ध नाराजी वाढली तरी राहुल हा पर्याय समोर पुन्हा समोर आला तर जनता पुन्हा एकदा मोदींनाच सत्तेवर आणेल. जर कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर मोदींनी खूप गंभीर चुका केल्या पाहिजेत. तसेच मोदींच्या प्रत्येक चुकीला जनतेसमोर अधोरेखित करणारा पूर्ण नवीन नेता कॉंग्रेसकडे हवा. सध्या कॉंग्रेसकडे असा कोणताही नेता नाही. प्रियांका गांधींचा फारसा प्रभाव उत्तर प्रदेशात पडलेला नाही. अर्थात प्रियांका अजून देशपातळीवर राजकारणात उतरलेली नाही. प्रियांकाला योजनाबद्ध पद्धतीने देशपातळीवर आणले व प्रियांकाने गांधी, नेहरू, चले जाव चळवळ वगैरे सद्यस्थितीत पूर्ण निरूपयोगी असलेल्या विषयांवर न बोलता मोदींच्या चुका व देशासाठी आपल्याकडे व पक्षाकडे कोणत्या योजना आहेत हे जनतेला सांगण्यावर भर दिला तर कॉंग्रेसचे पुनरूज्जीवन होऊ शकेल. अन्यथा जनता पक्ष, डावे पक्ष या पक्षांप्रमाणे कॉंग्रेस फक्त व्हेंटिलेटरवर जिवंत राहील.In reply to उत्तम लेख! by श्रीगुरुजी
प्रियांका गांधी यांना पहिला विरोध, राहूल गांधीच करतील
In reply to उत्तम लेख! by श्रीगुरुजी
सध्या ..
In reply to सध्या .. by चौकटराजा
भाजप हा खाजगीकरणा चा खंदा
भाजप हा खाजगीकरणा चा खंदा समर्थक आहे त्यामुळे नवश्रीमंतांचा एक गट त्यापक्षामागे उभा आहे हेही कारण आहे !हे बरोबर आहे. परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला पिळून काढणे हे वाजपेयी व मोदी यांच्या कारकिर्दीतील समान सूत्र आहे. एकाचवेळी खाजगीकरण व उद्योगांना अनुकूल धोरणे आणि सातत्याने करवाढ करून मध्यमवर्गीय व श्रीमंतांना पिळून काढणे ही पूर्णपणे परस्परविरोधी धोरणे भाजप राबवित आहे.In reply to भाजप हा खाजगीकरणा चा खंदा by श्रीगुरुजी
गुर्जी ...
In reply to गुर्जी ... by चौकटराजा
सध्या केजरीवालांची लोकप्रियता
In reply to सध्या केजरीवालांची लोकप्रियता by श्रीगुरुजी
काय वाटते ...?
In reply to काय वाटते ...? by चौकटराजा
एक पक्ष स्थापन करण्याची गरज
In reply to एक पक्ष स्थापन करण्याची गरज by श्रीगुरुजी
माझे मत ...
In reply to सध्या केजरीवालांची लोकप्रियता by श्रीगुरुजी
पर्यायी नेता
In reply to गुर्जी ... by चौकटराजा
पर्याय होऊ शकतो!
In reply to सध्या .. by चौकटराजा
भाजप हा खाजगीकरणा चा खंदा
भाजप हा खाजगीकरणा चा खंदा समर्थक आहे त्यामुळे नवश्रीमंतांचा एक गट त्यापक्षामागे उभा आहे हेही कारण आहे !हे बरोबर आहे. परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला पिळून काढणे हे वाजपेयी व मोदी यांच्या कारकिर्दीतील समान सूत्र आहे. एकाचवेळी खाजगीकरण व उद्योगांना अनुकूल धोरणे आणि सातत्याने करवाढ करून मध्यमवर्गीय व श्रीमंतांना पिळून काढणे ही पूर्णपणे परस्परविरोधी धोरणे भाजप राबवित आहे.In reply to भाजप हा खाजगीकरणा चा खंदा by श्रीगुरुजी
हो
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
मोदींची राजकीय, लष्करी व
In reply to मोदींची राजकीय, लष्करी व by श्रीगुरुजी
ही प्रक्रिया फार पूर्वीच सुरू
In reply to ही प्रक्रिया फार पूर्वीच सुरू by पिनाक
सहमत आहे ...
गैरसमज होणे आणि गैर समज करून घेणे
मोदींची कॉंग्रेस?
अर्ध्या हळकुंडाने
Bjp हा सत्तेत नवीन आहे
मोदी ना मी ग्रेट समजेन
In reply to लाच घेणे ,आर्थिक घोटाळा करणे by सुबोध खरे
घरोघरी
या जगात शक्य असणाऱ्या मागण्या
गेल्या 6 वर्षातील मोदींचे
In reply to गेल्या 6 वर्षातील मोदींचे by Vichar Manus
कारण
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
सुशिक्षित वर्ग व्यापक हित लक्षात न घेता......
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
अगदी समर्पक आणि उत्तम लिहले
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
मुळात शालेय शिक्षण
कुठल्याही पक्षाचे काही
In reply to कुठल्याही पक्षाचे काही by मराठी_माणूस
मी त्याला ..
In reply to मी त्याला .. by चौकटराजा
आजकाल
In reply to आजकाल by सॅगी
यामुळे ..
In reply to आजकाल by सॅगी
गंमत म्हणजे ... ५०
देशात मत देताना लोक काय विचार करतात
कामाला लागा
In reply to कामाला लागा by चौकस२१२
राजेश भौ सर्वज्ञ आहेत.
जनता खूप हुशार आणि चाणाक्ष्य झालीय
In reply to जनता खूप हुशार आणि चाणाक्ष्य झालीय by घोरपडे
सहकारी तत्व, भारतीय समाजाला आणि विशेषतः हिंदू धर्माला
एक साखर कारखाने जेवढं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार ..........