Ford vs Ferrari हा सिनेमा जरूर बघा ...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी रोज रात्री, एक तरी सिनेमा बघतोच...पण कधी कधी चांगला चित्रपट मिळाला नाही तर, Avengers जिंदाबाद...
मी Captain Marvel बघत होतो, तितक्यात मुलगा म्हणाला, की हा सिनेमा किती वेळा बघणार? कालच मी, Ford vs Ferrari बघीतला.जबरा पिक्चर आहे.मुलांना, Tenet, Inception,.वगैरे सिनेमे आवडतात.आम्ही कुणीच, खानावळीत जेवत नाही.
मुलांची आवड माहिती असल्याने, लगेच सिनेमा बघीतला.संवाद हिंदीतून असल्याने, सिनेमा समजायला पण सोपा गेला.
Fordच्या गाड्यांची मागणी घटत असल्याने,मागणी वाढवायची असेल तर, फोर्डने गाड्यांच्या शर्यतीत उतरावे, असा सल्ला, ली आयकोका देतो. (ली आयकोका बद्दल वाचायचे असेल तर, बोर्डरूम हे पुस्तक जरूर वाचा. खरं तर 'ली आयकोका' सल्ला देत आहे, ह्या घटने नंतरच मी सिनेमात रस घ्यायला सुरूवात केली.)
गाड्यांच्या शर्यतीत तो पर्यंत, फोर्डने कधीच भाग घेतलेला न्हवता.फेरारीचे मात्र, अशा शर्यतींवर वर्चस्व होते.
फेरारी डबघाईला आली असल्याने, फोर्डने आणि फेरारीने एकत्र करार करावा म्हणून, ली आयकोका, फेरारीकडे प्रस्ताव घेऊन जातो.
पुढची कहाणी सांगत बसणार नाही.कारण, ह्या कहाणीला अनेक पैलू आहेत.
मालकांचा उद्धटपणा आहे, मुजोरी आहे, संधीसाधू पणा आहे, कंपनी मधील अंतर्गत राजकारण आहे, योग्य माणसाची पारख करणे, मैत्री आहे, परस्पर सामंजस्य आहे....
सिनेमा बघीतल्या नंतर, माझ्या एकच गोष्ट लक्षांत राहिली आणि ती म्हणजे, स्वार्थी माणसांपासून दूरच रहा आणि मित्रांना कधीच दूर लोटू नका.
प्रतिक्रिया
चित्रपट पाहिला आहे
कॅरोल शेल्बी,
मुवि साहेब
कुठे बघायला मिळेल हा चित्रपट
डिस्ने-हाॅट स्टार
मस्त पिक्चर आहे हा
छान चित्रपट आहे
वेगवान गाड्यांची अजिबात आवड
फोर्ड विरुद्ध फेरारी