सुशिक्षित अडाणी की अशिक्षित तारतम्य....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
20 Jan 2021 - 5:44 pm
गाभा: 

लहानपणी एक कथा वाचली होती.

एका गावात चार हुषार विद्यार्थी रहात असतात.पुढील शिक्षण घेण्यासाठी, ते एका गुरू कडे जायचे ठरवतात.हाताशी, एखादा स्वयंपाकी असावा, म्हणून ते गावातीलच एका माणसाला बरोबर घेतात.

चौघेही विद्यार्थी, गुरूकडून शिक्षण पुर्ण करून गावी येत असतात, बरोबर स्वयंपाकी असतोच.

वाटेत, त्यांना एका प्राण्याची हाडे मिळतात. प्रत्येकाला आपापले ज्ञान दाखवायची हुक्की येते.

पहिला विद्यार्थी, त्या हाडांपासून, सांगाडा तयार करतो.

दुसरा विद्यार्थी, त्यात मांस आणि रक्तवाहिन्या तयार करतो.

तिसरा विद्यार्थी, त्या सांगाड्यावर कातडे तयार करतो.

चौथा विद्यार्थी म्हणतो, आता मी ह्याला जिवंत करतो.

तितक्यात, स्वयंपाकी म्हणतो की, अरे बाबांनो, तुम्ही ज्याला जिवंत करत आहात तो, ड्रॅगन आहे. त्यामुळे, ह्याला जिवंत करू नका.

पण, इतर चौघेही म्हणतात की, आम्ही ह्याला तयार केले आहे, हा आमचेच ऐकणार. तू घाबरू नकोस.

स्वयंपाकी म्हणतो की, मी आधी झाडावर चढतो, मग तुम्ही ह्याला जिवंत करा.

स्वयंपाकी झाडावर चढल्यानंतर, चौथा विद्यार्थी त्या ड्रॅगनमध्ये जीव ओततो.

ड्रॅगन जिवंत होतो आणि चौघांनाही खाऊन टाकतो.

----‐---------

कळत नकळत आपणही, कधीकधी, ह्या चौथ्या विद्यार्थ्या सारखे वागतो. विशेषतः मतदान करतांना.

घराणेशाही, ही अशीच तयार होत असते. घराणेशाहीची वाटचाल, जुलमी राजवटीकडेच होत असते. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी, हे ह्याचे एक उदाहरण आहे.

माझा घराणेशाहीला विरोधच आहे.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jan 2021 - 6:18 pm | अमरेंद्र बाहुबली

माझाही.
नारायण राणे - नितेश राणे,
प्रममोद महाजन- पुनम महाजन,
गोपीनाथ मुंडे- पंकजा मुंडे
गंगाधर फडणवीस-शोभा फडणवीस- देवेंद्र फडणवीस.
बाळासाहेब विखे पाटील- सुजय विखे पाटील.
विजयकुमार गावीत - हिना गावीत.
घराणेशाहीची वाटचाल जुलमी राजवटीकडे होत असते ह्यावर सहमत.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2021 - 6:33 pm | श्रीगुरुजी

एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या खुर्चीवर आपल्या मुलीला/मुलालाच बसविणे आणि शाळेतील शिक्षकाने किंवा शिपायाने आपल्या जागेवर आपल्या मुलीला/मुलालाच बसविणे यात प्रचंड फरक आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jan 2021 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली

@श्रिगुरूजी - तितकाच फरक का?? साधारण सरकारी अधीकार्याने ५०० चा लाच घेणे आणी मोठ्या नेत्याने ५०० कोटीचा भ्रष्टाचार करणे?? मग त्या अधिकार्यावर कारवाई झाली तर त्या अधिकार्याच्या पक्शाच्या समर्थकानी ५०० चीच तर लाच आहे. ह्याला भ्रष्चाचार म्हणू नका असा दावा करायला हवा. ब

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2021 - 9:35 pm | श्रीगुरुजी

माझा मुद्दाच समजलेला दिसत नाही. असो.

सॅगी's picture

20 Jan 2021 - 6:57 pm | सॅगी

गांधीआणि ठाकरे कुटुंबाचे खरंच विस्मरण झाले की....?

असो....माझाही विरोध आहे...वरची दोन कुटुंबे अ‍ॅडवा या लिस्ट मध्ये :)

प्रसाद_१९८२'s picture

20 Jan 2021 - 7:28 pm | प्रसाद_१९८२

तिकडे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे मेव्हुणे, मेव्हण्याचे पाव्हणे, पाव्हण्याचे आणखी कोणी असे सगळे निवडणुक हरले. याला बहुतेक घराणेशाही म्हणत नसावेत. :))

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jan 2021 - 7:51 pm | अमरेंद्र बाहुबली

अहो. घराणेशाही फक्त काॅग्रेस, सेना, राष्ट्रवादीत असते मला दाखवून द्यायचे होते.

कानडाऊ योगेशु's picture

20 Jan 2021 - 6:28 pm | कानडाऊ योगेशु

अरे मुविकाका नक्की काय चाललेय?
एकाच विषयासंबंधीत तीन-तीन धागे?

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 11:17 am | मुक्त विहारि

तिन्ही विषय वेगवेगळे आहेत

इंदिरा जी चा जो प्रभाव होता राजकारणात तो प्रभाव राहुल गांधीचा नाही.
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव जी ची तुलना होवू शकत नाही .
प्रमोद महाजन ह्यांची जी उंची होती राजकारणात ती पूनम कडे नाही.
त्या मुळे ही घराणेशाही कर्तृत्व नसेल तर पुढे टिकणार नाही.
राजकारणी लोकांना मतदार ना सामोरे जावे लागते.
त्या मुळे कर्तृत्व हे हवंच .
पण वाशिल्या नी.
न्यायाधीश च मुलगा न्यायाधीश होणे.
आयएएस चा मुलगा आयएएस होणे.
क्रिकेटर च मुलगा क्रिकेटर होणे.
हे थोडे धोकादायक आहे.

चिगो's picture

21 Jan 2021 - 3:26 pm | चिगो

आपण धन्य आहात..

राजकारणी लोकांना मतदार ना सामोरे जावे लागते.
त्या मुळे कर्तृत्व हे हवंच .
पण वाशिल्या नी.
न्यायाधीश च मुलगा न्यायाधीश होणे.
आयएएस चा मुलगा आयएएस होणे.
क्रिकेटर च मुलगा क्रिकेटर होणे.
हे थोडे धोकादायक आहे.

कुठून आणता हो तुम्ही एवढं ज्ञान आणि आकलन? कमालच आहे बुवा तुमची..

न्यायाधीशांबद्दल खाली डॉ. खरेंनी लिहीलंच आहे. न्यायव्यवस्थेत जाणवणारी थोडीफार घराणेशाही मान्य केली, तरी किमान गुणवत्ता आणि शिक्षण असावेच लागते हे मान्य करावेच लागेल.

केवळ वशिल्याने आय ए एस झालेला आयएएसचा मुलगा/मुलगा दाखवावा, ही विनंती.. नावासकट खरे उदाहरण देऊ शकलात, तर पाच हजार हरायला तयार आहे. (जास्तीत जास्त तेवढेच परवडतील मला..)

किती क्रिकेटरची मुले यशस्वी क्रिकेटर होऊ शकलीत? गावस्कर-बिन्नी-तेंडूलकर? आणखी कुणी?

चिगो's picture

21 Jan 2021 - 3:27 pm | चिगो

*मुलगा/ मुलगी.. तेवढं सुधारुन घेता आलं तर बघा बुवा, संपादक मंडळ..

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jan 2021 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली

मुवीकाकांचे सततचे आघाडी सरकार, काॅग्रस विरूध्दच धागे बघता खदखद हा वेगळआ विभाग मिपा ने सुरू करावा अशआ मागणई करतो. ;)

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 11:18 am | मुक्त विहारि

मलाही आनंदच वाटेल.

शा वि कु's picture

20 Jan 2021 - 10:53 pm | शा वि कु

ड्रॅगन नाही, सिंह.

ड्रॅगन असेल तर झाडावरचा स्वयंपाकी फार काय हुशार दिसत नाही.

घराणेशाही मध्ये, इन इटसेल्फ, वाईट म्हणायला काय कारण आहे, (assuming that you are all for inherited property :))

सरकारी ऑफिस आपल्या आपत्याला देणे, हे तर नक्की चुकीचे.

पण पक्षांतर्गत जागा आणि मतदारांसमोर पर्याय, ह्यात आक्षेप काय गोष्टींवरून ?

फक्त नेत्यांचा पोरगा म्हणून मत देणे आणि फक्त नेत्यांचा पोरगा म्हणून मत न देणे हे सारखेच अतार्किक वाटते. समोरचा व्यक्ती आपल्याला हवी ती कामे करेल का नाही, हे जास्त महत्वाचे.

आनन्दा's picture

20 Jan 2021 - 11:36 pm | आनन्दा

सहमत आहे.
केवळ नेत्याचा मुलगा आहे म्हणून मत देणे वाईट, कारण बर्‍याच वेळेस राजकारणाच्या अनेक खाचाखोचा मुलाला आई वडिलांबरोबर समजलेल्या असतात. पण केवळ बाप कर्तबगार निघाला म्हणून मुलगा कर्तबगार निघेल अशी अपेक्षा ठेवणे पण चूक.. विशेषतः मुलगा सगळीकडे माती खात असताना :)

दुसरे - एखादा माणूस सर्वोच्चपदी बसताना त्याने किमान स्वतःला थोडेतरी सिद्ध करून दाखवलेले असावे. सर्वसामान्यपणे तळागाळातून आलेले नेते स्वतःला सिद्ध करतच आलेले असतात. बाकी घराणेशाही नकोच म्हटले तर विलासराव, प्रुथ्वीराज, अजितदादा पण नाकारावे लागतील, त्यांनी कर्तृत्व दाखवले असले तरी. तसे होऊ नये.

सुबोध खरे's picture

21 Jan 2021 - 1:41 pm | सुबोध खरे

न्या. धनंजय चंद्रचूड किंवा न्या रोहिंग्टन नरिमन हे सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीश आहेत. यांचे पण वडील दिग्गज होते.( सरन्यायाधीश यशवंत विठ्ठल चंद्रचुड आणि श्री फली नरिमन)

रिअर ऍडमिरल रविंद्र नाडकर्णी यांचे वडील ऍडमिरल जयंत नाडकर्णी पण नौसेनाध्यक्ष होते

पण त्यांना घराणे शाही का म्हणत नाहीत?

कारण वकील म्हणून काम करण्यासाठी प्रथम त्यांनी मूळ पदवी घेतली नंतर कायद्याची दुसरी पदवी (LLB) घेतली. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अनेक वर्षे वकिली केली. अशी दैदिप्यमान कामगिरी केल्यावर त्यांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमले तेथे अनेक वर्षे उत्तम काम केल्यावर आता त्यांना बढती मिळून ते सर्वोच्च न्यायालयात विद्यमान न्यायाधीश आहेत.
न्या रोहिंग्टन नरिमन यांनी हार्वर्ड मधून LLM केलेले आहे.
न्या धनंजय चंद्रचूड यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM आणि Ph. D सुद्धा केलेले आहे

श्री रविंद्र नाडकर्णी हे नौदल अकादमीत कॅडेट म्हणून भरती झाले. तेथून ते सब लेफ्टनन्ट, लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर, कॅप्टन अशा बढत्या मिळवत रिअर ऍडमिरल झाले

बाकी विविध पक्षातील "बाळराजे" यांच्या पदव्या, त्यांचे अनुभव किंवा योग्यता याबद्दल एकंदर शंकाच आहे.

अशीच स्थिती बॉलिवूड ची आहे.

दोन्ही ठिकाणी उच्च कोटीचे हलकट लोक भरून राहिले आहेत

बाकी चालू द्या.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 4:11 pm | मुक्त विहारि

सहमत आहे.

लोकसभा अध्यक्ष बिर्ला ची मुलगी मागच्या दाराने आयएएस झाली आहे.
भले ते आरोप फेटाळून लावत आहेत पण धूर निघत आहे म्हणजे आग लागलीच असणारं

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 10:05 pm | श्रीगुरुजी

कायप्पावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवणे अयोग्य आहे.

हे वाचून पहा.

https://www.google.com/amp/s/www.news18.com/amp/news/india/anjali-birla-...

https://www.google.com/amp/s/www.thequint.com/amp/story/news/webqoof/om-...

बाप्पू's picture

21 Jan 2021 - 10:13 pm | बाप्पू

कोणाला सांगताय गुरुजी.. स्वतः कायप्पा युनिव्हर्सिटी तील टॉपर आहेत राजेश भाऊ.
ते सगळा अभ्यास करून च बोलतात.

बाकी त्यांच्या मते आख्या जगात खोटं फक्त दोनच व्यक्ती बोलतात एक मोदी आणि दुसरे अंधभक्त.. ते स्वतः आणि त्यांचा कंपू म्हणजे हरिश्चंद्र च जणू.

सुबोध खरे's picture

21 Jan 2021 - 1:42 pm | सुबोध खरे

सर्जन च्या मुलाला बापाच्या रुग्णालयात सर्जन होण्यासाठी किमान MBBS आणि MS पास व्हावे लागते.

राजकारणात साध्या पदवी परीक्षेत नापास झालेले सुद्धा चालून जातात.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 4:14 pm | मुक्त विहारि

CA, CS, CE ह्यासाठी लागू होते.

पैसे आणि काॅपी करून, इंजीनियरिंग करता येईल, पण CE होता येत नाही.

काळे मांजर's picture

10 Feb 2021 - 8:30 pm | काळे मांजर

पेमेंटवर पण डिग्र्या मिळतात

आणि MBBS मार्क वाढवा वाढवीचे निलंगेकर की कुणीतरी प्रकरण घडले होते ना ?

अनोटॉमीला पहिल्या पेपरावेळी काहीतरी चिठ्ठी सापडले की हातावर लिहिले म्हणून एक्झामीनर ने घालवले

तशीच पुढची परीक्षा दिली

निकाल काय , तर पहिल्या पेपरात 20/100 आणि दुसर्यात 90/100 !! हे डोळ्याने पाहिले आहे.

मेडिकल मध्येच रीचेकिंग करून मार्क वाढवणारे रॅकेटही असते असे ऐकून आहे

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 9:01 pm | मुक्त विहारि

डुआयडीचे पण रॅकेट असते, असे वाचनात आले आहे .....

चंपाबाई सध्या काय करतात?

सचिन उद्दाम पोटे, यांच्या बरोबर, चंपाबाईचे आता पटते का?

बाळ हितेशला टेनिसची रॅकेट घेऊन द्या...

जागो मोहन प्यारे, यांना नमस्कार सांगा....

Rajesh188's picture

10 Feb 2021 - 9:41 pm | Rajesh188

परीक्षा न देता आयएएस पण होता येते असे आताच एक ताजी घटना घडली आहे त्या वरून म्हणता येईल.
असे पण एवढ्या कडक परीक्षा घेवून आयएएस आयपीएस अधिकाऱ्यानं प्रशासन कुठे नीट चालवता येत .
सर्व ठिकाणी सावळा गोंधळ तर आहे.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 9:58 pm | मुक्त विहारि

जीप घोटाळा झाला, तेंव्हाच कडक कारवाई केली असती, तर योग्य तो संदेश गेला असता....

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2021 - 10:02 pm | श्रीगुरुजी

आयसीआयसीआय बँकेने सुद्धा दोन वेळा एकाला बनावट पदवीमुळे हाकलले होते.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 10:11 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

सुबोध खरे's picture

11 Feb 2021 - 9:52 am | सुबोध खरे

पेमेंट वर डिग्री न मिळवता सुद्धा काहि जण स्वतः वर विश्वास नसल्याने धनगराचे औषध घेऊन बरे झाल्याचा दावा करतातच ना ?.

हे म्हणजे उच्च न्यायालयातील वकिलाने न्यायालयात खटला न करता गुंडाला सुपारी देऊन आपले काम केल्यासारखे आहे.

मुक्त विहारि's picture

11 Feb 2021 - 10:22 am | मुक्त विहारि

सहमत आहे

राजकारणची एखादी अशी डिग्री आहे का की जी त्या व्यक्तीची गुणवत्ता सिध्ध करु शकेल? इथे डीग्री नाही तर अनुभव, कार्य व लोकसंपर्क लागतो. घराणेशाहीला माझा विरोधच आहे कारण त्यामुळे अशी गुणवत्ता असणारी लोकं लवकर पुढे येवु शकत नाहीत / येवु दिली जात नाहीत. फार कमी वेळा असे कार्यकर्ते यशस्वी होवु शकतात.
बाकी घराणेशाहीची सुरुवात / उदय, त्याचा विस्तार होत संपन्नतेचे शिखर गाठणे आणि नंतर नैतिक भ्रष्टाचार बोकाळुन लोकंचे प्रेम घालवुन बसणे हे चक्र अवीरतपणे चालुच असते. जी घराणेशाही असे होवु नये म्हणुन सतत काळजी घेते, ती जरा जास्त टिकते. तरीही प्रत्येक उदया नंतर अस्त ठरलेलाच असतो. काळ कमी जास्त लागतो, इतकेच.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 4:47 pm | मुक्त विहारि

बाबा आमटे, आठवले.

मराठी_माणूस's picture

21 Jan 2021 - 4:28 pm | मराठी_माणूस

मुद्दा समजला , पण गोष्टीचा संबंध कळला नाही.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 4:58 pm | मुक्त विहारि

एखादी संघटना उभी करतो...

पण, ज्यावेळी, त्या संघटनेत, घराणेशाहीचा किडा घुसतो, तेंव्हा ती संघटना, स्वार्थी होते आणि समाजाचाच घात करते.

पहिली पिढी, कार्यकर्ते गोळा करते

दुसरी पिढी, कार्यकर्त्यांना दिशा देते

तिसरी पिढी, कार्य लयास नेते.

चौथ्या पिढी पासून, घराणेशाहीची सुरुवात होण्याची शक्यता वाढते...ही रूपक कथा आहे... कदाचित एखाद्या संघटनेत ही सुरूवात, 5व्या पिढीत होईल किंवा नंतर कधीतरी होईल...

नंद घराणे, मौर्य घराणे, वाकाटक घराणे, राष्ट्रकूट घराणे ही काही उदाहरणे...

चौथा कोनाडा's picture

21 Jan 2021 - 4:52 pm | चौथा कोनाडा

राहुल गांधी यांच्या नंतर कोणी नसेल याचे वाईट वाटते.

राहुल गांधी यांनी देशासाठी सर्वात मोठे बलिदान दिले ते हेच. मनापासून धन्यवाद

पण त्याची कसर ताईंनी भरून काढलीये. आडनाव वाद्रा असले तरी जसा गंधी चा गांधी केला तसा त्यांचाही गांधी करून राजकुमारांना लाँच केले जाईल. वर आजी आजोबा सारखी हेअरस्टाइल ठेवून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील..
तोवर तरी भारतीय समाज प्रगल्भ होईल अशी अपॆक्षा करतो.

स्वलिखित's picture

21 Jan 2021 - 10:14 pm | स्वलिखित

वाड्रयाची पोरं सुद्धा गांधी म्हनवुन घेत आहेत

उपयोजक's picture

21 Jan 2021 - 11:12 pm | उपयोजक

ते पण जनेऊधारी आहेत का?? ;)

पिनाक's picture

22 Jan 2021 - 12:34 am | पिनाक

दत्तात्रय गोत्र

काळे मांजर's picture

11 Feb 2021 - 11:00 pm | काळे मांजर

डेंटिस्त्री च्या हजारो जागा मोकळ्या राहिल्याने नीट नापास लोकांनाही प्रवेश देणार म्हणे

सहावी पास महामहिमची पनवती की काय

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 11:31 pm | श्रीगुरुजी

तुझ्या त्या धनगराला आणि तुलाही आता प्रवेश मिळेल.

बाप्पू's picture

12 Feb 2021 - 12:42 am | बाप्पू

त्यांना कॉलेज ची गरज नाही. सगळे ज्ञान अस्मानी पुस्तकात आहे.. ते पाठ केले की झाले.

आग्या१९९०'s picture

11 Feb 2021 - 11:24 pm | आग्या१९९०

दात पडक्या सिंहाला इतकी गरज लागेल असं वाटत नव्हते. कदाचीत भक्तही आता मोठ्या प्रमाणात तोंडावर पडत असल्याने असेल.