Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 06/02/2021 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल. ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni… आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.

वाचने 50586
प्रतिक्रिया 226

प्रतिक्रिया

In reply to by काळे मांजर

फूड कुठलेही असो...३० रु वाला असो वा ३०० रु वाला. रस्ते अडवुन आंदोलनाच्या नावाखाली पिझ्झा पार्टी करणारे शेतकरी नाहीत हेच म्हणणे आहे. बाकी, पिझ्झ्याचे पीक येण्यासाठी काय पेरावे लागते?

In reply to by सॅगी

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलन शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.

In reply to by काळे मांजर

इथे तर, पंख उडालेले आयडी पण परत येतात .... .बाय द वे, आपले नेहमीचेच प्रश्र्न.... मोगा कसे आहेत? सचीन उद्दाम पोटे, कसे आहेत? जागो मोहन प्यारे

पण कोणत्या देशांमधून शेतकरी आंदोलन पाठिंबा आहे. ज्यांनी पाठिंबा देण्यासाठी ट्विट केले आहे ते भारताचे शत्रू राष्ट्र नाहीत. मग त्यांना भारत किंवा भारत सरकार ला विरोध का आहे? संबंधित व्यक्ती ज्या देशातील आहे त्या देशातील सरकार कडे भारताने निषेध नोंदवला आहे का? की गुन्हा मुंबई मध्ये आणि fir बिहार मध्ये अशी अवस्था नाही ना. संबंधित देशाकडे रीतसर नाराजी व्यक्त केली नसेल तर इथे त्याचे भांडवल का केले जात आहे. असे काही प्रश्न मनात आहेत. उत्तर कोणाला m

In reply to by Rajesh188

तुम्हाला खरोखरच, हे कायदे नक्की कुणाच्या फायद्यासाठी आहेत? हे जाणून घ्यायची इच्छा आहे का? उत्तर, हो किंवा नाही ... इतकेच द्या ...

क्युबाने आपली अर्थव्यवस्था खाजगी उद्योगांसाठी काही प्रमाणावर खुली केली आहे. समाजवाद काम करू शकत नाही हे हळूहळू का होईना क्युबासारख्या देशांनाही समजायला लागले आहे असे म्हणायचे का? दुर्दैव हे की ज्या भांडवलशाहीवर युरोप-अमेरिकेची समृध्दी उभी राहिली त्यांना मात्र आता समाजवादाचे भिकेचे डोहाळे लागले आहेत :( https://www.bbc.com/news/world-latin-america-55967709

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेच लिहायला इथे आले होते पण आपण आधी लिहिले. आता अमेरिकेने क्युबा वरील बहुतेक निर्बंध काढले तर ह्या शतकांतील सर्वांत मोठी सक्सेस स्टोरी ठरेल.

रीयाना ची एवढी ताकत आहे की अमेरिकन जनमत फिरवू शकते असे वाचले आहे. त्या मुळेच धसका घेवून सरकार का तिच्या विरोधात ट्विट करायला लागले. आणि आपल्या chamkesh सेलिब्रिटी ना पण tweet करायला भाग पाडले. पण सचिन,लता आणि बाकीचे ह्यांची एवढी तकत नाही की ते भारतीय जनमत फिरवू शकतील.

In reply to by Rajesh188

एके काळी अशी क्षमता प्रशांत किशोर कडे आहे असे देखील म्हटले जायचे.. फक्त एक लक्षात ठेवायचे - आडात असेल तरच पोहर्यात येते.

In reply to by आनन्दा

संजय राऊत, यांनी जर ठरवले तर, उद्धव ठाकरे यांना पण पंतप्रधान करू शकतील ... तसा दावा पण त्यांनी केला आहे ...

In reply to by आनन्दा

संजय राऊत, यांनी जर ठरवले तर, उद्धव ठाकरे यांना पण पंतप्रधान करू शकतील ... तसा दावा पण त्यांनी केला आहे ...

In reply to by आनन्दा

संजय राऊत, यांनी जर ठरवले तर, उद्धव ठाकरे यांना पण पंतप्रधान करू शकतील ... तसा दावा पण त्यांनी केला आहे ...

In reply to by मुक्त विहारि

भारताच्या पंतप्रधानपदासाठी आधीच काका साहेब डोळे लाऊन बसले आहेत (भले त्यांना स्वतःच्या राज्यात एकहाती सत्ता नाही मिळाली तरीही).

In reply to by Rajesh188

स्वतः, किमान 100 शेतकर्यांना विचारा आणि मग ठरवा ... माध्यमांनी सांगीतले म्हणून विश्र्वास ठेवू नका ...

In reply to by Rajesh188

ना आडात...ना पोहर्‍यात....आणि म्हणे भारतीय जनमत फिरवणार...

काल राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. मोदींनी आतापर्यंत संसदेत आणि बाहेरही कित्येक भाषणे केली आहेत त्यातील मी बघितलेल्या भाषणांमध्ये सगळ्यात उत्तम मुद्देसूद भाषण कालचे नसले तरी सर्वोत्तम भाषणांपैकी एक नक्कीच होते. त्यांनी मांडलेल्या इतर मुद्दयांवर भरपूर चर्वितचर्वण होत राहिल पण त्यांनी मांडलेला एक मुद्दा मला महत्वाचा वाटला. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी कृषीक्षेत्रात सुधारणा करायला सुरवात केली होती. अर्थात एपीएमसीची मक्तेदारी मोडणे वगैरे स्वरूपाच्या त्या सुधारणा नव्हत्या तर शेतीचे उत्पादन वाढविण्यासंबंधी होत्या. त्यावेळीही तत्कालीन 'आंदोलनजीवी' लोकांनी देशभरात निदर्शने केली होती आणि शास्त्रीजींच्या या निर्णयांना विरोध केला होता. तसेच त्यांना अमेरिकाधार्जिणे वगैरे पण म्हटले होते. म्हणजे एकूणच या आंदोलनजीवी लोकांना सतत कोणत्यातरी गोष्टीला किंवा व्यक्तीला विरोध केला नाही तर अन्न गोड लागत नाही असे दिसते. आणि विशेष म्हणजे या लोकांना कोणी शिव्या घालायला नवीन माणूस/गोष्ट सापडली की पूर्वी ज्याला शिव्या घालत होते तो कित्ती कित्ती चांगला होता असे वाटायला लागते. या आंदोलनजीवी लोकांमध्ये प्रत्यक्ष आंदोलनात उतरणारे लोक असतात तसेच योगेन्द्र यादवांसारखे स्वतः आंदोलनात न उतरता पुढेपुढे करणारे उपटसुंभही असतात. तसेच समाजवादी/डाव्या विचारांचे प्रोफेसर वगैरे ढुढ्ढाचार्य मंडळींपासून सामान्य फेसबुकींपर्यंत अनेक लोकांची सहानुभूती त्यांना असते. हेच लोक स्वतः किंवा आपले पूर्वसुरी इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरूध्द कसे प्राणपणाने लढले आणि त्यांनी लोकशाही कशी वाचवली याचे गोडवे अगदी २०१३ पर्यंत गात होते. पण २०१४ पासून तीच आणीबाणी कशी अनुशासनपर्व होते आणि सामान्य लोकांना कसा त्रास त्यात झाला नाही ही उलटी टेप त्यांनी वाजवायला सुरवात केली. मला वाटते ही पोपटपंची मिपावरही मागे झाली होती. नुकत्याच दिवंगत झालेल्या पुष्पा भावेंच्या पुस्तकातही अशा स्वरूपाचा उल्लेख सापडला. म्हणजे मोदी हा शिव्या घालायला नवीन बकरा मिळाल्यावर पूर्वी हे लोक शिव्या घालायचे त्याच इंदिरा गांधी यांना खूप चांगल्या वाटायला लागल्या. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना शिव्या घालायचे पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून वाजपेयी कित्ती कित्ती चांगले होते हे कौतुक त्यांनी सुरू केले. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्या आर्थिक सुधारणांच्या नावाने खडे फोडायचे (हे अगदी याच गोतावळ्यातील पी.साईनाथ यांच्या १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या Everyone loves a good drought या पुस्तकातही वाचायला मिळेल). पण आता तेच लोक मनमोहनसिंगांना १९९१ च्या आर्थिक सुधारणांचे श्रेय देतात. एकूणच सतत कोणाला तरी शिव्या घालत राहायचे आणि शिव्या घालायला नवीन माणूस सापडला की जुना कित्ती कित्ती चांगला होता याचा साक्षात्कार असल्या लोकांना होत असतो. मोदींनी कालच्या भाषणात असल्या लोकांना उघडे पाडले हे नक्कीच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पिक्चर अभी बाकी है.... अभी तो सिर्फ मोदी और शहा है, तो ये हालत है. कल, शहा और योगी आयेंगे तो, कुछ गाड़ियाँ जरूर पलटेगी ...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आंदोलनजीवी...म्हणने, मनमोहन सिंग यांच्या धोरणाचा उल्लेख करणे आणि ज्यांना देशद्रोही खलिस्तानवादी म्हटले आज त्याच शिख समुदायाबद्दल अभिमान वाटतो, हे म्हणने शेठचा उत्तम खोटारडेपणा कसा आहे त्यावरही लिहितो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

1984 शीख दंगल , शीख खलिस्तानी आहेत , वगैरे काँग्रेसविरुद्ध प्रचार करूनही पंजाब राज्य निवडणुकीत मागचे भाजप सरकार हाकलून 2018 ला काँग्रेसमित्र सरकार आले, भाजपला ऑपरेशन लोचट करायलाही स्कोप नाही , इतके जोरात हाकलले आहे. म्हणून भाजपे शिखांवर चिडून असावेत महाराष्ट्रात सत्ता गेल्यावर हे मुंबईलाही पीओके म्हणत होते

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदींच्या कालच्या भाषणात नक्की कुठे देशद्रोही खलिस्तानवादी हा उल्लेख होता?
मनमोहन सिंग यांच्या धोरणाचा उल्लेख करणे आणि ज्यांना देशद्रोही खलिस्तानवादी म्हटले आज त्याच शिख समुदायाबद्दल अभिमान वाटतो, हे म्हणने शेठचा उत्तम खोटारडेपणा कसा आहे त्यावरही लिहितो.
यातून तुम्ही सगळे शीख आणि खलिस्तानवादी एकाच पारड्यात तोलत आहात हे लक्षात येत आहे का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार, तुम्हाला उत्तर मिळणार नाही. लिहुन घ्या. ते फुसुकली सोडुन गायब होतात ...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आदरणीय पंतप्रधानांना गप्पा मारायची इतकी सवय लागलेली आहे की, दिवस रात्र कुठल्यान कुठल्या तरी वाहिन्यांवर त्यांचं भाषण उर्फ गप्पा चालू असतात त्यामुळे त्यांच्या विचारात आता नवीन काहीच नसते. तरीही आपल्याला कालचं राज्यसभेतील भाषण आवडलं, असेल तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा आदर आहेच. काल पंतप्रधानांनी राज्यसभेत केलेल्या भाषणांपेक्षा इतर सदस्यांनी केलेली भाषणं अगदी मुद्देसूद आणि देशाकडून असलेल्या नवनव अपेक्षा आणि विचार मांडणारा होता, तो खरं तर वेगळा विषय आहे. भाषणाच्या सुरुवातीच्या पासून स्वातंत्र्याच्या पर्व साजरे केले पाहिजे असे म्हणनारे पंतप्रधानांनी जगाच्या देशाकडून अपेक्षा वगैरेच्या पुड्या नेहमीप्रमाणे सोडल्या. करोनाच्या काळात केलेले काम, आम्ही केलेलं काम, आम्ही निर्माण केलेली व्हॅक्सीन, हे सांगतांना करोना काळात अनेकांचे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावर मात्र डोळेझाक केलेली दिसली. भारताचा राष्ट्रवाद कसा निस्वार्थी आहे, हे कालच्या भाषणात त्यांनी सांगितले. नेताजी सुभाष चंद्र बोस, त्यांच्या विचारांना आम्ही विसरुन गेलो. भारत लोकतंत्र की जननी है, असे ते म्हणत होते. पण, आपल्या पंतप्रधानांनाच लोकशाहीची जी मुल्य आहेत त्याचा त्यांना विसर पडत चाललेला आहे असे दिसते. भारत सर्वात मोठा इंटरनेट वापरणारा दुसरा देश आहे, असे ते कौतुकाने म्हणत होते. परंतू लोकांच्या विचारांची गळचेपी करायची असली तर इंटरनेट बंद कसे केले जाते तो भाग सर्वांनी शेतकरी आंदोलनात पाहिला आहे, जम्मू काश्मिरमधे टूजी सुविधा होती आता अमेरिकेने केलेल्या टीकेनंतर जम्मू काश्मिर मधे फोरजी सुरु झाले तो काही योगायोग नव्हता, नाही. माझं सरकार गरीबोकी समर्पीत आहे, असे म्हणत असतांना वाढत्या महागाईचा फटका फक्त गरिबांना बसतो. पूर्वी प्रयत्न केले गेले आहेत, आता त्यात वाढ केली पाहिजे, हे स्वत:च कबूल केले. शेतक-यांच्या घटत्या जमीनी, निवडणूका आल्या की योजना येतात, असे म्हणतांना या सरकारांनीही तेच केलं हे ते विसरुन जातात. शेतकरी बँक खाते, शेतकरी विमा, शेतकरी कर्ज, यात आम्ही सुधारणा केल्या. सिंचन सुविधा आम्ही दिल्या. देशात प्रत्येक सरकारांनी कृषी सुधारणांचा विचार मांडला होता हे सांगतांना, शास्त्री, शरद पवारांचा उल्लेख केला, या नेत्यांनी कृषीसुधार कायदे आवश्यक आहे, असे म्हटल्याचे त्यांनी म्हटले. शास्त्रींच्या काळात कृषीमंत्री व्हायला कोणी तयार होत नव्हतं, त्याची गोष्ट त्यांनी सांगितली. तरीही, देशाच्या भल्यासाठी त्यांनी पावले उचलली. आज मागील सरकारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचं कौतुक करावे लागले, हा मोठेपण त्यांच्या अंगी आलं याचं कौतुक केलं पाहिजे. आम्ही आणलेल्या कृषी कायद्यातही काळाप्रमाणे सुधार करु हे त्यांना सांगावे लागले. मा.पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विपणन व्यवस्थेच्या अडचणीमुळे आपला शेतमाल विकता येत नाही. देशाच्या मोठ्या बाजारातली व्यापक अडचणी दूर केल्या पाहिजे या त्यांच्या विचारांचे कोट वाचून दाखवले. प्रत्येक कायद्यात सुधारणा कराव्याच लागतात, हे त्यांना वारंवार म्हणावे लागले. शेतक-यांना समजावून सांगितलं पाहिजे. कृषीमंत्री शेतक-यांशी सतत चर्चा करीत आहेत, एकमेकांशी संवाद सुरु आहे. आंदोलन करणे हा आपला हक्क आहे, वयस्कर लोक आंदोलनात बसलेले आहेत, आपण आंदोलन संपवा. सदन के माध्यमसे निवेदेन करता हू चर्चा करते रहेंगे. किमान आधारभूत भाव होते, आहेत, आणि पुढेही राहतील. बाजारसमित्या अधिक आधूनिक झाल्या पाहिजेत. पंजाबने जे सहन केलं त्या बटवा-याची गोष्ट सांगावी लागली, दंगलीची गोष्ट सांगावी लागली. सर्वांनी पाहिलं आहे, असे म्हणत असतांना शीख समुदायाबद्दल बोलतांना अभिमान आहे, असे म्हणत असतांना शीख समुदायाबद्दल जी भाषा बोलली जात आहे, खलीस्तानी देशद्रोही याचा उल्लेख न करता, शीखांच्या मनात काही वाईट भरवल्या जात आहे,या समुदायाचं मोठं योगदान आहे, त्यांचा अभिमान आहे असे त्यांचा वाढता विरोध पाहता त्यांना म्हणावे लागले. आपल्या देशात श्रमजीवी आहेत, बुद्धीजीवी आहेत, आणि आंदोलनजीवीचा उल्लेख केला. आंदोलन करणा-यांवर टीका केली. या देशात स्वातंत्रसंग्रामापासून विविध आंदोलने झाली आहेत, हा आता ती गोष्ट वेगळी की ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलनात सहभागच नव्हता त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाची धग काय समजणार. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न याच सरकारांने केला. खिळे ठोकले, इंटरनेट बंद केले, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखले केले, त्यांना आंदोलन काय समजणार असे तरी कसे म्हणावे. पेट्रोल दरवाढ झाल्यावर भाजपाच्या इराणी यांनी केलेले आंदोलन, रथयात्रा, या आणि अशा विविध गोष्टीसांथी अनेक पक्षांनी आंदोलन केले आहे. आत्ताच एक जुना व्हीडीयो नितीन गडकरीचा पाहात होतो, ते म्हणतात आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे.देशात भ्रष्ट नेत्याच्या, सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे, संविधानात तो अधिकार आहे. असे असतांना आंदोलनजीवी म्हणून हेटाळणी करणे हा पंतप्रधानाच्या विचारांच्या सीमा दाखवत आहे. एकूणच आंदोलन मागे घ्या, चर्चेस या. करोना काळात देशाने मोठी आव्हाने पेलली. शुर जवानांनी सीमेवर जशास तसे उत्तर दिले, असे गोड गोड बोलुन भाषणाचा समारोप केला, त्यामुळे या भाषणात नवं काही नव्हतं. पण, सावध भूमिका होती, असे फार फार तर म्हणावे असे वाटते. जाता जाता, काल अमोल कोल्हेंचं छोटेखानी भाषण उत्तम वाटलं, ते लिहिलं असतं पण प्रतिसाद लांब होईल. परदेशातील लोकांनी भारताचं कसं कौतुक केलं त्यावर बोलतांना ते म्हणाले, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लस मिळाली म्हणून आम्हाला संजीवनी दिली म्हणतात आपण खूश होतो, पण एखाद्या परदेशी व्यक्तीने मानवतावादी दृष्तीकोनातून शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत टीपन्नी केली असेल तर तर ती फॉरेन रीष्टक्टीव्ह आयडॉलॉजी होते, हे बॅरीकेट्स लावणे, तटबंदी उभारणे, खोळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे, असे त्यांनी विचारले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"प्रत्येक कायद्यात सुधारणा कराव्याच लागतात, हे त्यांना वारंवार म्हणावे लागले. शेतक-यांना समजावून सांगितलं पाहिजे. कृषीमंत्री शेतक-यांशी सतत चर्चा करीत आहेत, एकमेकांशी संवाद सुरु आहे. आंदोलन करणे हा आपला हक्क आहे, वयस्कर लोक आंदोलनात बसलेले आहेत, आपण आंदोलन संपवा. सदन के माध्यमसे निवेदेन करता हू चर्चा करते रहेंगे. किमान आधारभूत भाव होते, आहेत, आणि पुढेही राहतील. बाजारसमित्या अधिक आधूनिक झाल्या पाहिजेत." यात प्रोब्लेम काम आहे ? जर प्रोब्लेम नाही तर आंदोलन कर्ते कायद्यात सुधारणा करायला का तयार नाहीत? एम एस पी पे कानुन बनाओ असे म्हनतात ... मला सांगा .. कानुन असे रस्त्यावर बनतात काय ? "खिळे ठोकले, इंटरनेट बंद केले, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखले केले, . . . " का करावे लागले हे ? २६ जानेवारी ला काय झाले ते विसरलात काय? जाउ दे .. डोक्यावर दगड आपट्ला काय किंवा डोके दगडावर आपट्ले काय ... त्रास डोक्याला होतो ...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. "अमुकढमुक" एका महविद्यालयात क्लिष्ट असा गणित विषय शिकवतात. दर वर्षी काही मुले पास होत काही नापास. काही नापास मुले प्राध्यापकांच्या केबिन मधे जाउन रडुन भेकुन स्वतः ला पास करुन घेत. प्रा. "अमुकढमुक" यांची बदली झाली आणी प्रा. "सुक्या" तो विषय शिकवायला लागले. मुलांनी आपल्या बळावर पास व्हावे हा प्रा. "सुक्या" यांचा नियम. त्यासाठी विना शुल्क शिकवनी वर्ग पण घ्यायची त्यांची तयारी होती. तरीही काही मुले नापास झाली. ह्या नापास मुलांनी प्रा. सुक्या शिकवत नाहीत, लक्ष देत नाहीत अशी तक्रार केली. झाले स्टुडेंट काउनसिल ने लगेच कालेज कँटीन वर धरने आंदोलन सुरु केले. प्राचार्य बोलनी करण्यासाठी गेले ... "आधी सगळ्या नापास मुलांना पास करा ... मगच बोलु" अशी मागणी पुढे आली. असे पास करता येत नाही असे प्राचार्य सांगत होते पण कुनीच ऐकले नाही. बघता बघता आंदोलन वाढले. बाकी कालेज मधीच विद्यार्थी पाठिंबा देउ लागले ... इतकेच काय हार्वर्ड मधील विद्यार्थी पण पाठिंबा देउ लागले. प्रकरण वाढले. "आधी सगळ्या नापास मुलांना पास करा ..प्रा. सुक्या यांची बदली करा . . . पुढचा पेपर सोपा काढा . . . . मगच बोलु" ह्या विद्यारथ्यांच्या मागण्या पुढे आल्या ... आता मला सांगा ... प्राचार्यांनी विद्यारथ्यांच्या मागण्या मान्य कराव्या ... की नाही ?

In reply to by श्रीगुरुजी

सुक्याने सहावी नंतर शाळा सोडली होती म्हणे तरीही 2018 मध्ये अचानक बी ए , एम ए ची सर्टीफिकेट उपजली म्हणे स्ट्रेंथ चे स्पेलिंग येत नाही , suck चा उच्चार येत नाही. मग बाकी 130 कोटींनी काय घोडे मारले ?

In reply to by काळे मांजर

नावाने फक्त सुक्या पण 6 वी मधून सरळ ba पास . करामती आहे सुक्या

In reply to by Rajesh188

काळे मांजर, हे तुमच्या कंपूत येऊ शकतात .... पण हा आयडी कधी गायब होईल किंवा किती दिवस राहील, ते सांगता येत नाही ...

In reply to by काळे मांजर

अजून किती येतील? ते माहिती नाही .... मिपाकर सहनशील आहेत .... जिन के घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.

In reply to by काळे मांजर

म्हणजे प्रत्यक्षात कंपांऊंंडर असणारा भोंदू जगाला आपण डॉक्टर आहोत जसं सांगतो तसंच का?

In reply to by काळे मांजर

सुक्याने सहावी नंतर शाळा सोडली होती म्हणे तरीही 2018 मध्ये अचानक बी ए , एम ए ची सर्टीफिकेट उपजली म्हणे
हे सगळे दावे एका अशा व्यक्तीने केले जी कधी बालवाडीही शिकली नव्हती म्हणे. कारण त्या व्यक्तीला प्रा.डॉ.सुक्यांच्या जागेवर आपला चेला बसवायचा होता म्हणे.

In reply to by सुक्या

जनरेटा काय म्हणतो? अमेरिकन नागरिक काय म्हणतात? हे महत्वाचे, गुणवत्ता दुय्यम...असेच आजकाल समजल्या जाते... त्यामुळे, प्राचार्यांनी, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात... गुणवान विद्यार्थी, देश सोडून गेले तरी हरकत नाही ...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांच्या विचारांची गळचेपी करायची असली तर इंटरनेट बंद कसे केले जाते तो भाग सर्वांनी शेतकरी आंदोलनात पाहिला आहे, जम्मू काश्मिरमधे टूजी सुविधा होती आता अमेरिकेने केलेल्या टीकेनंतर जम्मू काश्मिर मधे फोरजी सुरु झाले तो काही योगायोग नव्हता, नाही.
काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नव्हती/नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारला नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारे निर्णय घ्यावेच लागतात. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये असा आदेश दिला गेला ती पण परिस्थिती सामान्य नव्हती आणि त्यावेळी जी माहिती उपलब्ध होती त्याप्रमाणे तसे करणे गरजेचे होते म्हणून. आणि कोरोनामुळे भारतात कशा कोट्यावधी केसेस होणार, कसे लाखो लोक मरणार आणि लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशी माहिती देण्यात प्रिन्सटन, जॉन हॉपकिन्स वगैरे विख्यात विद्यापीठातील प्रा.डॉ च होते. त्यामुळे ही असामान्य आणीबाणीची परिस्थिती म्हणून सरकारने लोकांच्या घराबाहेर पडायच्याच स्वातंत्र्यावर बंधन घातले. त्याप्रमाणेच काश्मीरमध्ये मोबाईल फोन सेवांवर अंशतः बंधन घातले गेले. आताही तथाकथित शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला, लाल किल्ल्यावर तिरंग्याची विटंबना झाली त्यामुळे तो प्रकार परत व्हायला नको म्हणून तिथेही अशी बंधने घालण्यात आली. तुमच्यासारख्यांचे सोडून द्या पण देशातील सद्सद्विवेकबुध्दी ताळ्यावर असलेल्या नागरिकांना तरी यात काही चुकीचे वाटायचे नाही.
माझं सरकार गरीबोकी समर्पीत आहे, असे म्हणत असतांना वाढत्या महागाईचा फटका फक्त गरिबांना बसतो. पूर्वी प्रयत्न केले गेले आहेत, आता त्यात वाढ केली पाहिजे, हे स्वत:च कबूल केले.
भारतात सगळ्या समस्यांवर कोणालाही रामबाण उपाय सापडलेला नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीत सुधारणा करता येऊ शकेलच. मग यात नक्की आक्षेपार्ह काय आहे?
शेतकरी बँक खाते, शेतकरी विमा, शेतकरी कर्ज, यात आम्ही सुधारणा केल्या. सिंचन सुविधा आम्ही दिल्या. देशात प्रत्येक सरकारांनी कृषी सुधारणांचा विचार मांडला होता हे सांगतांना, शास्त्री, शरद पवारांचा उल्लेख केला, या नेत्यांनी कृषीसुधार कायदे आवश्यक आहे, असे म्हटल्याचे त्यांनी म्हटले. शास्त्रींच्या काळात कृषीमंत्री व्हायला कोणी तयार होत नव्हतं, त्याची गोष्ट त्यांनी सांगितली. तरीही, देशाच्या भल्यासाठी त्यांनी पावले उचलली. आज मागील सरकारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचं कौतुक करावे लागले, हा मोठेपण त्यांच्या अंगी आलं याचं कौतुक केलं पाहिजे. आम्ही आणलेल्या कृषी कायद्यातही काळाप्रमाणे सुधार करु हे त्यांना सांगावे लागले. मा.पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विपणन व्यवस्थेच्या अडचणीमुळे आपला शेतमाल विकता येत नाही. देशाच्या मोठ्या बाजारातली व्यापक अडचणी दूर केल्या पाहिजे या त्यांच्या विचारांचे कोट वाचून दाखवले.
बरं मग?
आंदोलन करणा-यांवर टीका केली.
आंदोलन करणार्‍यांवर सरसकट टीका केली नाही. तर कुठेही घुसून आंदोलने भरकटवून त्यावर आपली पोळी भाजून घेणार्‍या प्रवृत्तींवर टीका केली आहे. मोदींनी कोणाचे नाव घेतले नाही पण ही टीका योगेंद्र यादव, मेधा पाटकर वगैरे मंडळींवर होती हे समजायला मला तरी कठीण गेले नाही.
आत्ताच एक जुना व्हीडीयो नितीन गडकरीचा पाहात होतो, ते म्हणतात आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे.
हे मोदींनी पण मान्य केलेच नाही का?
हे बॅरीकेट्स लावणे, तटबंदी उभारणे, खोळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे, असे त्यांनी विचारले.
आणि पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणे, राष्ट्रध्वजाची विटंबना करणे, भिंद्रनवालेसारख्या दहशतवाद्याची पोस्टर सर्रास फडकावणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे हे अमोल कोल्हेंनी विचारले नाहीच आणि तो प्रश्न तुम्हीही विचाराल ही अपेक्षा करणेही चुकीचे. मी तर म्हणतो की असले चाळे करणार्‍या लोकांविरूध्द अगदी कठोर कारवाई व्हायला हवी आणि तेव्हा अशा लोकांना लोकशाहीच्या नावाने बोंब मारायचा काडीमात्र अधिकार नाही. रथाचे चाक जमिनीत गाडले गेल्यावर कर्णाला बरोबर धर्म आठवत असेल तर ते चालायचे नाही. तरीही सरकार असल्या लोकांविरूध्द कडक कारवाई करत नाहीये हाच आक्षेप आहे. बरं अमोल कोल्हेंचा पक्ष ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये सामील आहे त्या पक्षाच्या नेता मंत्री आहे त्याच्या बंगल्यावर नेऊन सामान्य माणसाला मारहाण होते, व्हॉट्सअ‍ॅपवर एक चित्र फॉरवर्ड केले म्हणून निवृत्त नौदल अधिकार्‍याला मारहाण होते वगैरे गोष्टी अमोल कोल्हेंना कधी दिसल्या नसतीलच नाही का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

विषय आभाराच्या शेठच्या जिलब्याचा होता....बाकी चालु द्या..! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राष्ट्रपतींचे अभिभाषण सरकारच लिहून देत असल्याने ते अभिभाषण म्हणजे सरकारचे धोरण असते. त्यामुळे त्यावरील धन्यवाद प्रस्तावात नेहमी व्यापक गोष्टींवर चर्चा होत असते कारण ती चर्चा सरकारी धोरणावर असते. राष्ट्रपतींना धन्यवाद द्यायचा प्रस्ताव आणि चर्चा म्हणजे 'राष्ट्रपतीजी, वा वा काय मस्त भाषण केलेत म्हणून तुमचे आभार' अशा स्वरूपाची नसते हे गेल्या कित्येक वर्षातील संसदीय चर्चेवरून कळेलच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

राष्ट्रपतींना धन्यवाद द्यायचा प्रस्ताव आणि चर्चा म्हणजे 'राष्ट्रपतीजी, वा वा काय मस्त भाषण केलेत म्हणून तुमचे आभार' अशा स्वरूपाची नसते
+१

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परदेशी व्यक्तीने मानवतावादी दृष्तीकोनातून अहो प्राध्यपक महाशय तुम्हाला पाहिजे त्या छोट्या आणि मोठ्या फुसकुल्या सोडून जाता .. आणि वर हि मखलाशी कि "चालुद्या" कधीतरी रोख ठोक उत्तर द्या! प्राध्यपक आहात ना !.. वर्गात काही विद्यार्थी "हे असे का किंवा पटत नाही "असे विचारात असतीलच ना तसं समजा यात आपण शीख समुदायाचाह उल्लेख केलं... यावर मी काही मुद्दे उपस्थित केले होते त्यावर तुम्हाला सरळ सरळ विचारतो... काहीच वाटत नाही? परत लिहतो - कळकळीचे शेतकरी आंदोलन आहे तर जगभर शीख धर्माचे आंदोलन सारखा प्रचार का चालू आहे ? निशाण साहेब आणि गुरुमुखी चा कानडा आणि ऑस्ट्रेलियातील समर्थक पाट्या शी काय संबंध ? आणि जाता जाता डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविधांबद्दल परदेशी व्यक्तीने मानवतावादी दृष्तीकोनातून .. वाह काय बात है.. मिया खलिफा चा भारतीय शेतकर्यांनशी संबंध काय तर हा असा - मी जेवणात भाजी खाते - शेतकरी भाजी पिकवतो - म्हणून मी यावर बोलणार हे म्हणजे "मी पाणी पितो म्हणून तुकरस्तानात धरणे बांधावी कि नाही यावर मी बोलण्यासारखेच आहे " अहो एकवेळ मेधा पाटकर आणि सर्व अवॉर्ड वापसी ग्यांग यावर काही बोलली तर ते निदान ऐकून तरी घेऊ शकतो पण ती रिहाना आणि मिया खलिफा ? आणि या डॉक्टर ना आणि बारामती / पिंपरी चिंचवड च्या दादांना रिहाना यावर बोलली चालते तर मग भारतातील तसेच "सेलेब्रिटी" सचिन आणि लताजी बोले तर ते खुपते? असालच संबंध भारतीय शेतकऱ्याशी तर लताजी आणि सचिन चा कि रिहाना चा? हे म्हणजे कसे चित्रपट सृष्टीतील लोक जर डाव्या विचारसरणी चाय बाजूने बोलले तर ते चालेल पण अनुपम खेर, कंगना , परेश रावळ काही सरकारच्या भाजपचं धोरणाच्या बाजूने बोलले तर मात्र ते नाही चालणार ... अरे काय मोगलाई आहे काय ( होय मोगलाई .. इस्लमोफोबिया मुळे लिहितोय हे आधीच जाहीर करतो )

In reply to by चौकस२१२

प्राध्यापक महाशयांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले की ते मौनव्रत धारण करतात. त्याच धाग्यावर मग फटकेबाजी करायला येतील पण त्यावर आधी उपस्थित केलेले प्रश्न, मी त्या गावचाच नाही या पद्धतीने सोडून देतील. उत्तम प्रतिसाद आहे साहेब, पण उत्तर मिळणार नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदींना बाजूला ठेवा... तुम्ही आम्ही सामान्य माणसांबद्दल बोलूयात का? तुम्हाला आहे कि नाही ते माहित नाही पण एक सर्वसामान्य हिंदू म्हणून मला तरी शिखांबद्दल आदर आहेच .. दुर्दैवाने या शेतकरी आंदोलनाचा गैरवापर करून याला विनाकारण जणूकाही हे शिखांचे धर्मयुद्ध आहे असे स्वरूप दिलेले दिसते ...ते तुम्हाला दिसत नाही??? काय झापड बांधलाय राव ? आहे ना कायदा शेतकऱ्यांचं विरुद्ध ... करा ना आंदोलन .. त्यात शीख धर्म का आणता ? जगभर ह्याला शीख विरुद्ध इतर असा स्वरूप दिला जातंय जरा उघड्या डोळ्याने पाहत जा , पुढल्या निवडणुकीत भाजप आणि मोदींना घरी बसवा जरूर .. हकक आहे तुमचा तो, पण त्या द्वेषामुळे सगळंच तुमहाला काळं दिसायला लागलाय ...

न्याय देण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे देशात.आणि ह्या योगी चा उत्तर प्रदेश देशात सर्वात खालच्या स्तरावर आहे. तिथे जनतेला न्याय मिळणे मुश्कील आहे. असे योगी चे कर्तृत्व. आणि ह्यांना भारी त्या योगी चे कौतुक.

In reply to by Rajesh188

आता कालचीच घटना पहा...नागपुरात एका गुंडाला लोकांनीच दगडांनी ठेचून ठार केले...महाराष्ट्र पोलिसांना कामाचा जास्त त्रास होऊ नये म्हणुन... खरोखरंच न्याय देण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर...मानले पाहिजे!!!

In reply to by सॅगी

पुण्यात .. अजुन एक गोल्ड्मन ढगात गेले काल ... रेकार्ड वर गुन्हेगार होते ... पोलिसांना त्रास होउ नये .. म्हणुन परस्पर काम केले ...

In reply to by सुक्या

2014 नंतर गाय गोमांस ह्यावरून लिंचिंगे फार होत होती हल्ली ती सुरू आहेत की बंद पडली ? गोव्यात होत नाहीत नै ?

In reply to by काळे मांजर

बाटली बदलली तरी दारू तीच राहते ... मिपाकर सहनशील आहेत ....

-सांस्कृतिक दहशदवाद , वारसा हक्क , अदानी अंबानी दलाल ...पातळ रुपी वामन .. करंट्या सचिन... गेलस आता तू आली री आली ब्रिगेड - आता लता मंगेशकरांबद्दल काय तारे तोडले जातील याची आतुरतेने वाट पहातो आहे

आंदोलनजीवी होते म्हणून स्वातंत्र्य मिळाले

In reply to by काळे मांजर

मोगा कसे आहेत?

In reply to by काळे मांजर

काही जणं म्हणतात की चरखा चालवून आणि मीठ उचलुन स्वातंत्र्य मिळाले...

In reply to by सॅगी

सगळेच म्हणतात मोदीही बोलतात गांधींचा देश म्हणून

In reply to by काळे मांजर

मोदी फक्त गांधींचा देश म्हणून बोलत नाहीत. ते सर्वसमावेशक आहेत. काही जण म्हणतात देशाला स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळाले...

In reply to by सॅगी

आम्हाला 4 कारण बोलले होते मवाळ आंदोलन जहाल आंदोलन लष्करी बंड दुसऱ्या महायुद्धाने इंग्लडचे कम्बरडे मोडले तुमि कुठे शिकले ?

In reply to by काळे मांजर

शिकलेले आठवते तुम्हाला...चांगले आहे... नाही, मागे बोलला होतात, घरी येणार्‍या पाण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असते... म्हणून आपले विचारले हो... बाकी...
मवाळ आंदोलन जहाल आंदोलन लष्करी बंड दुसऱ्या महायुद्धाने इंग्लडचे कम्बरडे मोडले
आम्हीही हेच शिकलो...

In reply to by मुक्त विहारि

दुसर्याच्या आयडीचा जप करून काय होणार ? भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते। संप्राप्ते सन्निहिते काले, न हि न हि रक्षति डुकृञ् करणे ॥१॥

In reply to by काळे मांजर

दारू तीच असते.... कडू कार्ले काहीही केले तरी कडूच .... आणि मध काहीही केलेले तरी गोडच ... जागो मोहन प्यारे