Skip to main content

कधीतरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 02/02/2021 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
उल्कापाताच्या आतषबाजीने दिपून जातोय मी आज पण कधीतरी चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात अंतर्बाह्य उजळायचंय मला शब्दांच्या समृद्ध अडगळीत हरवून जातोय मी आज पण कधीतरी शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात निरुद्देश पोहोचायचंय मला नीटनेटक्या रंगरेषा रेखाटतोय मी आज पण कधीतरी अमूर्ताचं असीम अवकाश अनवट रंगांनी भरायचंय मला त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात घुसमटतोय मी आज पण कधीतरी स्थलकालाचं वितान व्यापून थोडं थोडं उरायचंय मला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2481
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

स्थलकालाचं वितान व्यापून थोडं थोडं उरायचंय मला तथास्तु पैजारबुवा,

आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

छान

नीटनेटक्या रंगरेषा रेखाटतोय मी आज पण कधीतरी अमूर्ताचं असीम अवकाश अनवट रंगांनी भरायचंय मला
अतीव सुंदर!