Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 02/02/2021 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे. म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.

वाचने 62195
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by धर्मराजमुटके

हेच सरकार पुढील 4 वर्षे चालणार ... पुढच्या निवडणूकीत, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या बरोबर फरफटत जाणार ... ज्या ज्या ठिकाणी, भाजपचा उमेदवार येण्याची शक्यता आहे, त्या त्या ठिकाणी, शिवसेनेला आपला उमेदवार उभा करण्यासाठी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेवर दबाव आणणार... जी गत मनसेची, नाशिक मध्ये झाली, तशीच गत, शिवसानेची होण्याची शक्यता आहे... सध्या तरी, शिवसेनेचे हिंदूत्वही गेले आणि मराठी प्रेम पण गेले ... काका जिंदाबाद ...

In reply to by मुक्त विहारि

१०० दिवसांत पडणारे सरकार पडले नाही.. वर्षात हि पडले नाही... त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे.. पुढच्या निवडणुकीसाठी हे सरकार, आपण काय कामे केली, काय प्रगती केली, कोविड विरुद्ध कसे लढले.. आणि अशी असंख्य कामे पुढे घेऊन आले तर मतदार मते देतील.. पण प्रगती वर न बोलता २०१९ ला ज्या पद्धतीने त्यावेळेस चे सरकार सामोरं गेले तसेच हे समोर आले तर यांची पण जागा मतदारांनी दाखवावी... पक्ष कोणता यावर मते देऊ नयेत...

In reply to by गणेशा

नुसतीच अधोगती.... अर्थात, अजान स्पर्धा आणि केम छो वरली, म्हणत, मतांची भीक मागणार्या शिवसेने कडून अपेक्षा नाहीच ... मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थामुळे, हिंदुत्व पण गेले आणि मराठी प्रेम पण गेले ... जोपर्यंत, डोळ्यांवर कातडे ओढलेले, मतदार आहेत, तोपर्य॔त शिवसेना आहे... आमच्या सारख्या शिवसैनिकांनी, 1993 मध्येच शिवसेनेला, जय महाराष्ट्र म्हटले... मला आज देखील, शिवसेनेला सोडल्याचा पश्र्चात्ताप होत नाही ...

In reply to by मुक्त विहारि

बरोबर आहे.. प्रगती नाही तर मते नाहीत, यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस कोणीही सुटू शकत नाही.. पण एका पक्षाचे कातडे काढून टाकले तर दुसऱ्या पक्षाचे चढवले तर तेच भारी हे वाटू शकते, कदाचीत या कातडीचा पण उबग भविष्यात येऊ शकतो.. त्यामुळे जे योग्य ते योग्य.. जे चूक ते चूक... बाकी २०१९ विधान सभेला मी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना वोट देणार होतो, पण ज्या पद्धतीने भाजपा निवडणूकीला सामोरे गेली.. प्रगती च्या गोष्टी न करता, काँग्रेस, काश्मिर या मुद्द्यावर बोलत राहिली.. त्यामुळे मी भाजपा विरोधात मतदान केले...( ते हि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ला केले नव्हतेच ) ज्यांना २०१४ च्या कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा ह्या जाहिर२०१४२०१९ ला delete कराव्या लागल्या उत्तरा अभावी ऱत्यांना मी वोट का द्यावे? राहता राहिला पुढच्या निवडणूकीचा प्रश्न, जेंव्हा निवडणूक येईल तेंव्हा त्या ५ वर्षाचे कामकाज बघूच.. पण जे कुठल्या तरी पक्षाची, नेत्याची वेसण कायम नाकात घालून फिरतात आणि दुसऱ्याला व्यक्तिपूजा, नेत्यांची पूजा करता म्हणतात असे लोक कधीच आपली ओढलेली कातडी सोडण्यास तयार नसतात

In reply to by गणेशा

त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे.. सहमत आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडले तरच हे सरकार पडेल. नंतर त्यापैकी कोणी भाजपला पाठिंबा दिला तरच भाजपचे सरकार येईल. एकंदरीत दोन्ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पुढच्या पिढीला, राजकीय पटावर जिवंत ठेवायचे असेल तर, खेळाडू कमी करावे लागतील ...जेम्स बाॅन्डचा, कॅसिनो राॅयल, हा सिनेमा आठवा ... शिवसेनेचे दोन हुकमी पत्ते होते ... मराठी आणि हिंदूत्व .... काकांनी, हे दोन्ही पत्ते उघडे पाडले .... वंशपरापरागत, शिवसेनेला मत देणारा मतदार, हळूहळू बाहेर पडत आहे...डोंबिवलीत तरी हीच परिस्थिति आहे... आणि जे जे डोंबिवली येथे, ते ते जगात ... मुख्यमंत्रीपदाला, अपयशाची काळी किनार नेहमीच असते .... आता ही किनार कितपत झाकायची आणि कितपत उघडी ठेवायचे? हे काकाच ठरवणार .... मोदी उगाच, काकांना गुरूस्थानी मानत नाहीत .... मोदी ह्याच चाली, भारतच्या भल्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरतात. तैवान प्रश्र्न जिवंत ठेवण्यात, मोदींचा हात असणारच...चीन उगाच मोदींच्या मागे लागलेला नाही....

In reply to by मुक्त विहारि

शिवसेनेला हाताळणे हे भाजपला हाताळण्यापेक्षा खूप जास्त सोपे आहे, हे पवार जाणतात. त्यामुळे पवार सेनेला सोडून भाजपबरोबर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरे कारण म्हणजे भाजपबरोबर गेले तर सध्या मिळालेली अर्थ, गृह, रस्तेबांधणी अशी काही महत्त्वाची मंत्रीपदे सोडावी लागतील. पवार तोटा करून घेणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

काका आधी बोलणी करायला दिल्लीत गेले होते ... पण, वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या असाव्यात .... काकांनी, ह्या अक्षता आणि मुख्यमंत्री पद, शिवसेनेला देऊन, अर्थपूर्ण बोलणी केली असावीत, .... म्हणायला, मुख्यमंत्री शिवसेनेचा पण, महत्वाची बरीचशी खाती, शिवसेनेकडे नाहीत ....

In reply to by मुक्त विहारि

बरोबर. प्रमुख खाती हातात असताना व हाताळण्यास सोपा माणूस मुख्यमंत्री असताना काका हे सरकार पाडणार नाहीत.

In reply to by गणेशा

हे सरकार पडणार नाही कारण सरकार पडले तर पुढची चार वर्षे विरोधी पक्षाच्या बाकांवरच बसावे लागेल हे सर्व आमदारांना माहिती आहे आणि मग मंत्रीपदे महामंडळांची अध्यक्षपदे ता दूरच कुठल्याही सरकारी कार्यालयात आपली कोणतीही

कामे

होणार नाहीत हे माहिती आहे. गुळाला चिकटलेला मुंगळा मरेपर्यंत आपली पकड सोडत नाही. त्यामुळे धुसफूस करत का होईना पण चार वर्षे सरकार चालणार आहे. बाकी तत्वनिष्ठा वगैरे शब्द केंव्हाच कालबाह्य झालेले आहेत.

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेची कवचकुंडले (मराठीप्रेम आणि हिंदूत्व) जर, आपोआप गळून पडत असतील तर, मुद्दाम शिवसेनेला वाचवायला कुणीही जाणार नाही... काकांनी योग्य गेम केली आहे .... तुम लढो, हम कपडे सम्हालते है... मराठी माणसांचा आता एकही पक्ष नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ... अजूनही कुणी, शिवसेना ही मराठी माणसांची तारणहार आहे, असे म्हणत असेल तर, त्याला, "केम छो वरली..."

In reply to by मुक्त विहारि

मराठी माणसांचा आता एकही पक्ष नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ... आता? म्हणजे यापूर्वी मराठी माणसांचा एखादा पक्ष होता का? मग कोणालाच तो पक्ष कसा माहिती नाही?

माझ्या मते सरकारने विनाकारण ग्रेटा आणि रियाना ला महत्व दिले. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मठ्ठ जावडेकर किंवा कुडबुडे रविशंकर प्रसाद ह्यांना पुढे काढायला पाहिजे होते. ग्रेटा आणि रिहाना ह्यांचा तो सर्वांत मोठा अपमान ठरला असता.

पण ती अत्यंत हुशार आहे तिचे कार्य खूप मोठे आहे. जग तिचा खूप आदर करते.भारत सरकार काय तिला जबाब देणार आणि दिल्ली चे अती शहाणे पोलिस काय तिच्यावर कारवाई करणार. दिल्ली मधील गुन्हेगार ह्यांना हातोहात फसवतात चालले ग्रेटा वर fir नोंदवायला.

In reply to by Rajesh188

इतकेच Qualification पुरेसे आहे, नाही का? आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, "गोरा बोला, वहीं सही....गोरा बोला नाचो, तो नाचेंगे, और, गोरा बोला, कपडे निकालो तो,निकालेंगे ....भगवान के बाद, कोई सच्चा है, तो वो गोरा है....फिर वही गोरा, तुम्हें नंगा छोड देता है....ब्रिटिश लोगोंने ऐसा ही किया था...." वरील वाक्ये सामान्य आहेत, हा इतिहास आहे .... भारताच्या अंतर्गत मामल्यात इतर कुठल्याही परदेशी व्यक्तीने किंवा देशाने, ढवळाढवळ करू नये....

In reply to by मुक्त विहारि

ही सांगायची एवढी हिम्मत भारताकडे आहे . आणि कोणत्याच परक्या देशाच्या दबावाखाली भारत येत नाही. मग पोखरण मध्ये लपतछपत का अणू परीक्षण केले. जाहीर करून बिन्धास्त का अणू परीक्षण केले नाही.

In reply to by आनन्दा

अहो, हे तर काहीच नाही .... आमचे काही स्नेही होते.... सचीन, उद्दाम, पोटे, इत्यादी .... त्यांच्या मौलिक ज्ञानाचे, मिपावर बरेच कण विखूरले आहेत ...

In reply to by पिनाक

ते राहुल गांधींप्रमाणे मल्टि धर्मीय होते. कधी देऊळ.. कधी टोपी.. कधी जनेयुधारी, कधी आजीकडे जाऊन पोप चे दर्शन.. कधी दलित.. हे सर्व उडालेले ID पण असेच.. कधी इकडे तर कधी तिकडे...

In reply to by आनन्दा

कशाला? काहीही लिहितो तो. माझ्या मते ग्रुप वर सर्वात मूर्ख कोण अशी स्पर्धा केली तर निवड करण्याची गरजच पडणार नाही.

In reply to by Rajesh188

तुमची आकलन शक्ती जबरदस्त आहे, सामनाचे संपादक बनण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. भारत हा विकसनशील देश आहे. अणूपरिक्षणसारखा स्फोटक मुद्दा थंड करून चघळायला पाहिजे हे शेंबडे पोर देखील सांगेल. शिवाय या ठिकाणी भारताने अनेक गुप्तहेरी करण्याऱ्या देशांचा पोपट बनवला होता हे विसरून चालणार नाही.

In reply to by भंकस बाबा

पुलावामा हत्याकांडाचा बदला पण, असाच सांगून सवरून करायला हवा होता.... चर्चिलने पण, नाॅर्मंडी वरील हल्ला, हिटलरला न सांगता केला, पण ब्रिटन मधल्या कुठल्याही विरोधी पक्ष नेत्याने, चर्चिलला युद्ध काळात, एकही प्रश्र्न विचारला नाही .... मॅनहटन प्रोजेक्ट बद्दल, फक्त अमेरिकेच्या अध्यक्षांनाच कल्पना दिली होती... इतर कुणालाही नाही....

In reply to by Rajesh188

मग पोखरण मध्ये लपतछपत का अणू परीक्षण केले. जाहीर करून बिन्धास्त का अणू परीक्षण केले नाही. राजेश बुवा तुम्ही इतके विनोदी लेखन कसे काय लिहू शकता? महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

अमेरिकेत एवढ्या अणू चाचण्या झाल्या अमेरिका गेला होता का कधी जगाची परवानगी घ्यायला. कोरिया च हुकूम शाह जगाला विचारात बसतो का की बाबांनो आम्हाला अणू परीक्षण करायचे आहे.

In reply to by Rajesh188

राजेश बुवा तुम्ही इतके विनोदी लेखन कसे काय लिहू शकता? महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या बंद आहे का?

In reply to by भंकस बाबा

तुम्ही उत्तर कोरियाचे नाव घेतले. तुम्ही ज्या सरकारविरोधी पोस्ट इथे कुंथता ना, तेवढ्या तिथे टाकल्यात तर किम तुम्हाला रॉकेटवर बसवून अंतराळात सोडेल. अमेरिका महाशक्ती आहे. कोरियावर इतके निर्बंध आहेत की बाजारात एक मेड इन नॉर्थ कोरियाची वस्तू आणून दाखवा व हजार रुपये मिळवा अशी जाहिरात करायला हरकत नाही. अहो चर्चेचा धागा आहे त्यांला विनाकारण कॉमेडी शो का बनवत आहात?

In reply to by भंकस बाबा

यथा राजा तथा प्रजा ... ढाई हजार पाच सौ क्विंटल, देणारे राहुल गांधी आणि त्यांना पाठिंबा देणारे मतदार, ह्या आदरणीय व्यक्ती आहेत.... तसाही, आजकाल विनोद दुर्मिळ होत चालला आहे ....

In reply to by Ujjwal

ग्रेटाने आधी सगळा प्लॅन ट्विटरवर शेअर करणे आणि नंतर डिलीट करणे हा प्रकार धक्कादायक आहे. भारतात अस्थिरता माजवायचा (किंवा इतर कसलाही) प्लॅन असेल तर तो गुप्त ठेवावा- आपले अगदी विश्वासातले सहकारी सोडून बाहेर जाऊ नये आणि ट्विटरवर शेअर करून जगजाहीर तर अजिबात करू नये एवढे तिला कळत नसेल? की तिचा ट्विटर अकाऊंट बघणार्‍या मॅनेजर्सपैकी कोणालातरी आपल्या यंत्रणांनी फोडले आहे? की ती दोन्ही बाजूंनी खेळत आहे? म्हणजे हेरगिरीच्या विश्वात दोन्ही बाजूंनी खेळणारे डबल एजंट असतात तसे? की तिलाच आपल्या यंत्रणांनी दुसर्‍या बाजूला प्लॅन्ट केले आहे? तिचा पूर्वेतिहास लक्षात घेता तिला पुरोगामी लोक आपल्या कळपात या तथाकथित आंदोलनात अगदी हसत घ्यायला तयार होणार हे लक्षात घेता तिच्यावर काही जादूटोणा करून प्रभावित केले आहे आणि तो प्लॅन जगजाहीर करून पुरोगाम्यांना तोंडघशी पाडले आहे? कल्पना नाही. सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एवढे तिला कळत नसेल? ती आधीच मतिमंद आहे. उगाच लहान पोर म्हणून जगाची सहानुभूती मिळवायला आणि त्याआडून आपला खौट अजेन्डा पसरवायला सोपं हत्यार म्हणून हे समाजवादी प्लँनिंग करून आपले पित्ते सोडत असतात. याआधी पण ती पाकडी मलाला अशाच पद्धतीने प्रसिद्ध झाली. मग एकेका व्याख्यानाचे काही कोटी रुपये घेऊन भारताविषयी आणि त्यांच्या विचारधारेविधात असलेल्या राष्ट्रांविषयी गरळ ओकायला मोकळी.

In reply to by Ujjwal

वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, आता फक्त मलालाने ट्रॅक्टरबाजांसाठी ट्वीट करणे बाकी आहे. एकदा का तिचे ट्वीट आले, की लिब्बू पोपटांचा थवा/झुंड पुर्ण झाली असे समजायचे.

In reply to by सॅगी

आजकाल कुत्रं जरी श्री मोदींकडे तोंड करून भुंकायला लागलं कि सगळे फुरोगामी त्याला आपला नेता मानायला लागतात. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी, उमर खालिद, शर्जील असे किती आले दीड दिवस चमकून अस्ताला गेले. आता नवे गोऱ्या कातडीच्या दोन पोरींनी काय ट्विट केलं ते सगळे फुरोगामी त्याना आपलया नेता मानायला लागले. या पण जातील दोन दिवसात. मग नवीन कोण तरी दळभद्री लोक उगवतील.

In reply to by सुबोध खरे

मोदींसमोर तितकाच कणखर पर्यायी नेता त्यांच्याकडे उपलब्धच नाही, त्यामुळे कुत्रंच काय, उंदरालाही ते आपला नेता मानतील.

Greta विरूद्ध जे भारत सरकार मत मांडत आहे आणि भारतीय खेळाडू,नेते,अभिनेते ,अभिनेत्री मत मांडत आहेत त्याला जग गंभीर घेतच नाही . उलट असल्या हास्यास्पद विरोधाला जग हसत असेल . भारताची लाज घालवत आहेत वरील सर्व मंडळी

In reply to by Rajesh188

मी तर उलट समजत होतो ..... खरी लाज तर, घराणेशाहीच्या अपरिपक्व उमेदवाराला, डोक्यावर घेणार्या मतदारांनी आणली आहे ..... खूद गिरे तो भी टांग उपर

In reply to by श्रीगुरुजी

ह्या पेक्षा, हे आंदोलन शेतकरी वर्गाने काढलेले नाही, हेच सत्य आहे... इतका फावला वेळ, कुठल्याही शेतकरी वर्गाकडे नाही आणि हे कायदे नाकारून, स्वतःच्याच पायावर, धोंडा पाडून घेण्या इतका, शेतकरी मूर्ख नाही...

ग्रेटा कोण किंवा रिहाना कोण हे मला माहिती हि नव्हते आधी. म्हणुन त्यांनी काय म्हणालेय, ते का काय म्हणतात हया पेक्षा, आपल्या सेलिब्रितिज इतके आता का बोलतात,७० दिवसांत का गप्प होते..? रिहाना च्या एका ट्यूट वर कोणाला इतका घाव बसलाय कि सारे सेलिब्रिटीना कधी नव्हे ते यात उडी घ्यायला लागली आहे.. देश एकच होता.. एकच आहे, आणि एकच राहिल.. पण तुम्ही आंदोलन कसे हाताळता आहात हे न बघता internal मामला आहे हे बोलुन नक्की काय साधता आहात? निदान शेतकऱ्यांना सोडा, या कायद्याचे फायदे तोटे पत्रकार परिषद घेऊन सरळ लोकां पर्यंत पोहचवा... कायदे बनवता येतात, बदलावता येतात, पण देशाची प्रतिमा तुम्ही मालिन करता आहात आणि वरती अहम हि सोडवत नाहीये हे का कळत नाहीये? तुम्ही सरकार आहात.. असहकार, आंदोलणे कोणत्याही सरकार विरोधात होत असतात, होत राहतील पण एक देश म्हणुन तुम्ही त्याला कसे सामोरे जाताय हे बघायला नको का?

In reply to by गणेशा

निदान शेतकऱ्यांना सोडा, या कायद्याचे फायदे तोटे पत्रकार परिषद घेऊन सरळ लोकां पर्यंत पोहचवा...
आता फक्त प्रत्येकाच्या कानात जाऊन प्रत्येक कायदा समजावून सांगणे बाकी राहिले आहे. डिजिटल युगात प्रत्येकाला कायदे माहिती करून घेण्याची अक्कल आहे. बातम्यांमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये, संसदेमध्ये कित्येक वेळेला सरकाकरने यांची पूर्ण माहिती दिली आहे. ज्यांना ऐकूनच घ्यायचे नाही.. किंवा ज्यांना आपल्या बुद्धीपेक्षा दुसरा काय सांगतोय त्यावर जास्त विश्वास आहे.. किंवा ज्यांना अक्कलच नाही फक्त असे "शेतकरी " या आंदोलनात आहेत .. जो कि 2-3% आहे. बाकीचे 97 टक्के आंदोलनकर्ते शीख आणि दलाल आहेत.
कायदे बनवता येतात, बदलावता येतात, पण देशाची प्रतिमा तुम्ही मालिन करता आहात आणि वरती अहम हि सोडवत नाहीये हे का कळत नाहीये?
सरकार कायदे बदलण्यास तयार आहे. चर्चेच्या इतक्या फेऱ्या कश्यासाठी झाल्या मग?? सरकार चर्चा करून कायदे अँमेण्ड करण्यासाठी तयार आहे. पण शीख आणि दलाल लोकांना कायदे रद्दच करून पाहिजे आहेत. त्याशिवाय इतर काहीही करण्याची त्यांची तयारी नाही. आणि मागणी मान्य न झाल्यास ते कोणत्या लेवल ला जाऊ शकतात ते त्याचा ट्रेलर पण त्यांनी दाखवला आहे. त्यामुळे आडमुठे पणा कोण करतेय आणि देशाची प्रतिमा कोण मलीन करतेय ते पण समजतेय. इथे तुम्ही ज्यांची बाजू घेताय त्यांच्याबद्दल थोडा रिसर्च करत जा.. !! उगाच बळीराजा शेतकरी अन्नदाता असल्या भूलथापांना ( ज्या राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी केल्यात ) बळी पडून काहीही बरळू नका.

In reply to by गणेशा

1. तुम्हाला खरोखरच, शेतकरी वर्गाचे भले व्हावे असे वाटते का? 2. तुम्ही, फक्त 6 दिवस, दापोली कृषी विद्यापीठात, मुक्काम करू शकता का? ....... आपण 2-3 वेळा फोन वर बोललो आहोत. काही गोष्टीत आपल्या दोघांचे मतभेद आहेतच, पण, फोन वर बोलतांना एक जाणवले की, तुम्ही एक व्यक्ति म्हणून निश्र्चितच उत्तम आहात. तुमच्या मनांत पाप नाही.. जे मनांत, तेच लिहीता... पण, ह्या आंदोलनाचा तुम्हाला खरोखरच अभ्यास करायची इच्छा आहे का? माध्यमांवर खूप अवलंबून राहू नका... स्वतः माहिती गोळा केली तरच फायदा होतो ....

In reply to by मुक्त विहारि

धन्यवाद... मुवि, तुम्ही आम्ही समाजातील माणसे आहोत, विचार वेगळे असु शकतात पण माणुस म्हणुन योग्यच आहोत... मी न्यूज पण पाहत नाहीये मार्च -एप्रिल पासून.. त्यामुळे कसलेच कोणाच्या न्यूज पण पाहत नाही... मी आता हे शेवटचे लिहितो बाकी कोणाला काही पटो वा ना पटो.. हे शेतकरी या विचाराने नाही तर आपल्या सारख्या ग्राहक यांच्या नजरेतून बोलतोय.. समजा उद्या हे कायदे झाले, शेतकरी direct त्यांचा माल विकू लागतील.. पहिले काही वर्ष अंबानी, अडाणी सारखे लोक विकत घेतील.. आणि काही इतर.. नंतर मंडई type लोके हळू हळू कमी होतील आणि हे पुंजीवादी लोक पाहिजेल तसे माल खरेदी करतील.. आता आपल्याकडे, कायद्याने अतिरिक्त शेतामाल खरेदी करून तो साठवून ठेवण्यासाठी आणि बाजारात मुद्दाम तूटवडा करण्यास कायद्याने शिक्षा आहे.. उद्या ह्या कायद्याने ह्या शिक्षा बंद होतील, पुंजीवादी लोक कितीही साठा करतील.. आणि मग ते कितीला विकत घेतील सोडा, ते कितीलाही माल विकू शकतील... मग काय करायचे? याचे दुरागामी परिणाम दिसतीलच दिसतील.. उद्या आता सारखी परिस्थिती आली करोना सारखी, सरकार ला सामान्य लोकांना जर काही माल स्वस्त द्यायचा असेल तर तो ह्या कंपन्या कडून घेऊन तोटा सहन करून विकत घेऊन देईल.. हा तोटा हि सामान्य माणसाच्या tax मधूनच नसेल का मग? बाकी कायदा कसेही असो.. मोदी यांच्या नीती आणि अर्थनीती ह्या चुकीच्याच वाटतात... ह्या विषयावर हा माझा शेवटचा मेसेज.. मोदी आणि bjp या बाजूने बोलणारे कधीच त्यांच्या विरोधी बोलताना दिसत नाही.. पहिले असे नव्हते, सरकार विरोधात त्यांना मते दिलेले हि बोलायचे.. The end

In reply to by गणेशा

शेतमालाचा धंदा मोबाईल सर्वीस किंवा पेट्रोलियमसारखा नाहि. तो उपहारगृहासारखा आहे. कोणिही कितीही प्रयत्न केला तरी त्यात मक्तेदारी अशक्य आहे. हल्दीराम किंवा तत्सम हॉटेल चेन ने कितीही प्रयत्न केला तरी रेस्टराँ बिझनेसवर मक्तेदारी शक्य आहे का? अमुल ला समजा उद्या कोणि अगणीत फायनान्स केले तरी दुग्ध व्यवसाय ते एकट्याने कब्जात घेऊ शकतील का? अशक्य आहे ते. अंबानी आणि अर्धवटरावाच्या सांपत्तीक स्थितीत प्रचंड तफावत आहे. पण त्यांच्या अन्न ग्रहण कॅपॅसीट ऑलमोस्ट सारख्या आहेत. अदानी ने सगळा तांदुळ आपल्या गोदामात साठवला आणि अत्यंत अवाजवी भावाने विकला तरी अंबानी तो तांदुळ त्याच्या भुकेपुरताच घेईल. उर्वरीत तांदुळ अदानीला फेकुन द्यावा लागेल किंवा अर्धवटरावाला परवडेल अशा किमतीत विकावा लागेल. संखेच्या बाबतीत अर्धवटरावाची मेजॉरिटी आहे. त्यामुळे धंद्याच्या दृष्टीने अर्धवटरावाला परवडण्यायोग्य विक्री केली नाहि तर अदानीला प्रचंड लॉस आहे. एक अदानी सर्व तांदुळ ब्लॉक करु शकेल हे केवळ अशक्य आहे. एकदाका मार्केट ओपन झालं कि अनेक लोक डिस्ट्रिब्युशन चेन मधे उतरतील.. स्वतः शेतकरीवर्गातलाच एक घटक त्यात असेल आणि त्याचा धंदा अदानीपेक्षा कैक पट सरस असेल. शेतकरी आणि अदानी मिळुन सामान्य जनतेची पिळवणुक करु शकतील.. पण त्यात शेतकरी तरी फायद्यात राहील :) आणि सरकार सामान्य माणसाची उपासमार करुन आपल्या पायावर धोंडा पाडुन घेणार नाहि.

In reply to by अर्धवटराव

आश्चर्य वाटतं कि शिकली सवरलेली माणसं असला भंपक युक्तिवाद करतात. एवढ्या भविष्यवाण्या करायला तुम्ही पोपट वगैरे पाळलाय कि टाइम मशीन तयार केलीय. नवीन कायद्यांना विरोध करणारे त्या गोष्टींवर विरोध करतायेत ज्या भविष्यात होतीलच याची खात्री नाही. वर्तमानातील कोणतीही गोष्ट किंवा सबळ पुरावा किंवा एखादी केस स्टडी त्यांच्याकडे नाही. हे म्हणजे म्हणजे पुरुष पूढे जाऊन बलात्कार करू शकतो म्हणून पुरुष अपत्य जन्मालाच घालायचे नाही.. असा काहीसा प्रकार आहे. अजूनही मी काय म्हणतोय ते पटत नाही?? तर मग आता या बुद्धिवंत माणसाचे मत पुन्हा वाचा.
उद्या ह्या कायद्याने ह्या शिक्षा बंद होतील, पुंजीवादी लोक कितीही साठा करतील.. आणि मग ते कितीला विकत घेतील सोडा, ते कितीलाही माल विकू शकतील... मग काय करायचे?
यामध्ये कुठेही वर्तमानकाळातील वाक्य आहे?? CAA NRC च्या वेळी सुद्धा अश्याच प्रकारची भविष्यकालीन भीती निर्माण करून मुस्लिम लोकं वळवळ करत होते. आंदोलनाच्या नावाखाली झुंडशाही चालू केली होती.. आताचे आंदोलन हा त्याचाच पार्ट 2 आहे. अजूनही तुम्ही या फालतू भूलथापांना बळी पडून या सो कोलॅड बुद्धिवंतांचं जे उद्या काय होईल याचा पाढा वाचून दाखवतेयत त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. आजून एक उदाहरण देतो ज्यामुळे कदाचित डोक्यात प्रकाश पडेल. जर कोणी ओला उबेर 1990 च्या दशकात सुरु केले असते तर या मूर्ख लोकांनी त्याला खालील अर्ग्युमेंट्स करून विरोध केला असता. आज आपल्याकडे कायद्याने रिक्षावाल्यांना भाडे नाकारल्यास शिक्षा आहे.. त्यामुळेच कोणीही कुठेही जायचे असेल तर फक्त रिक्षावालाच घेऊन जाऊ शकतो. पण ओला उबेर या प्रायव्हेट कंपन्या असतील, त्यांना जिकडे जायचे तिकडचेच भाडे ते घेणार. सुरवातीला लोकांना स्वस्त प्रवास देण्याच्या बहाण्याने त्यांना ओला उबेर ची सवय लावणार. पण यामुळे रिक्षावाले, टांगावाले, सायकल ओढणारे मजूर देशोधडीला लागणार त्यांचा व्यवसाय बंद होणार.. आणि एकदा का हि व्यवस्था संपली कि मग ते प्रवासाचा दर भरमसाठ वाढवणार आणि सर्वसामान्यांची लूट करणार. नाक्यापर्यंत जायचे म्हणलं तरी 100 रुपये द्यावे लागणार. यांना काय आहे.. यांचे मालक अरबोपती आहेत. यांनी मोदींना पैसे देऊन हा ओला उबर नावाचा प्रकार आणलाय.. पण सरकारला रिक्षावाल्याचा आणि प्रवाश्यांचा विचार केला पाहिजे. ओला उबर या चारचाकी गाड्या असणार, कोण कुठला ड्राइवर त्याचा बिल्ला नंबर नाही.. त्याचा काहीही रेकॉर्ड नाही.. फसवणूक आणि लुटमारीच्या घटना वाढणार.. स्त्रियांना तर हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. सरकारला माहिती आहे कि हे सामान्य रिक्षावाले काय उखाडणार पण सामान्य प्रवासी जो आजतागायत रिक्षातून प्रवास करत आलाय तो हे सहन करणार नही. यांना सांगितलेच कोणी आम्हाला हे पाहिजे म्हणून.. प्रवाश्यांशी कोणतीही चर्चा न करता सरकार घाई गडबडीत ओला उबेर चालवायला परवानगी देतेय.. नक्कीच काहीतरी भ्रष्टाचार आहे. प्रवाश्यांनी या नवीन सिस्टीम ला विरोध करायला हवा.. कारण भविष्यात हे सरकार आणि कंपन्या आम्हाला ओला उबर च्या नावाखाली लुटणार. वाटेल तितके पैसे आकारणार.. RTO ने जे काही दर निश्चित केलेत ते ओला उबर वाल्यांना लागू नाहीत त्यामुळे भविष्यात प्रवासाचे दर कित्येक पटीने वाढणार.. आणि तेव्हा रिक्षा किंवा टांग्याने जायचे म्हणले तर ते सुधा नसणार कारण रिक्षावाले कधीच बंद पडले असणार. हि सगळी रिक्षावाले आणि टांगावाले यांचा व्यवसाय बंद करून सर्व प्रवाश्यांना ओला उबर च्या आणि पर्यायाने उद्योगपतींच्या दावणीला बांधायचा प्रकार आहे. मला खात्री आहे असाच काहीसा युक्तिवाद करून त्यांनी भारतात ओला उबर येऊच दिले नसते... हे जस्ट एक उदाहरणं आहे..पण तुम्ही आशय समजून घ्या.. कि विरोध करणाऱ्यांचा विरोध हा किती तकलादू मुद्यांवर आधारित आहे. असे अर्ग्युमेंट्स 1990 मध्ये प्रोफेसर, 188, गणेशा यांच्यासारख्या लोकांना भावले असते.. त्यांनी प्रतिसादाचा किस पाडून या मुद्यांवर मोदींना शिव्या घातल्या असत्या.. पण आज 2020 मध्ये काय परिस्थती आहे ते तुम्ही सर्व जाणता.. विरोध हा सोल्युशन काढण्यासाठी केला जात नसून तो आपले उपद्रवमूल्य दाखवण्यासाठी केला जातोय. सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी केला जातोय. त्यांना सोल्युशन नकोय तर आपला आडमुठा हट्ट पूर्ण करून हवाय आणि त्यासाठी ते देश जाळायला पण तयार आहेत.. असणारच म्हणा.. कारण पैसा जो भेटतोय. मी पुन्हा सांगतोय कि हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून शीख आणि दलाल लोकांचे आहे. कायदा नीट वाचल्यास समजून जाल कि कोणत्याही शेतकऱ्याला तोटा होणार नाही.. पण हे शीख, दलाल, लेफ्ट, लिबरानडू, NDTV इ अस्तित्वात नसलेला राक्षस उभा करून भीती दाखवतायेत.. भविष्यात हे होईल ते होईल.. ते होईल तेव्हा होईल.. जर झालेच तर 65% जनता जी शेतीवर डायरेक्ट अवलंबून आहे त्यानां सांगा कि पुढच्या निवडणुकीत मोदीला हरवायला.. जे नवीन सरकार येईल ते हे सर्व कायदे रद्द करेल.. पण अजुन जो कायदा अजुन अंमलात देखील आला नाही तोवर त्याला विरोध करायचा आणि तो देखील प्रॅक्टिकल मुद्यांवर नाही तर भविष्यातील रंजक कल्पनेवर.. इतकं रामायण मी पहाटे 4:48 मिनिटे IST या वेळेला जागे राहून लिहितोय.. राजेश, प्राध्यापक यांच्यासाठी नाही तर इतर कोणीही जो अजूनही कन्फयुज आहे मग तो मिपाकर असो किंवा जालावरचा असाच एखादा नॉन मिपाकर असो.. त्यासाठी आहे. एक जरी शहाणा झाला आणि कायदे व्यवस्थित वाचून लिबरानडुनी डोकयात बसवून दिलेले सोडून स्वतःचे मत बनवले तरी मी यशस्वी झालो.

In reply to by गणेशा

आश्चर्य वाटतं कि शिकली सवरलेली माणसं असला भंपक युक्तिवाद करतात. एवढ्या भविष्यवाण्या करायला तुम्ही पोपट वगैरे पाळलाय कि टाइम मशीन तयार केलीय. नवीन कायद्यांना विरोध करणारे त्या गोष्टींवर विरोध करतायेत ज्या भविष्यात होतीलच याची खात्री नाही. वर्तमानातील कोणतीही गोष्ट किंवा सबळ पुरावा किंवा एखादी केस स्टडी त्यांच्याकडे नाही. हे म्हणजे म्हणजे पुरुष पूढे जाऊन बलात्कार करू शकतो म्हणून पुरुष अपत्य जन्मालाच घालायचे नाही.. असा काहीसा प्रकार आहे. अजूनही मी काय म्हणतोय ते पटत नाही?? तर मग आता या बुद्धिवंत माणसाचे मत पुन्हा वाचा.
उद्या ह्या कायद्याने ह्या शिक्षा बंद होतील, पुंजीवादी लोक कितीही साठा करतील.. आणि मग ते कितीला विकत घेतील सोडा, ते कितीलाही माल विकू शकतील... मग काय करायचे?
यामध्ये कुठेही वर्तमानकाळातील वाक्य आहे?? CAA NRC च्या वेळी सुद्धा अश्याच प्रकारची भविष्यकालीन भीती निर्माण करून मुस्लिम लोकं वळवळ करत होते. आंदोलनाच्या नावाखाली झुंडशाही चालू केली होती.. आताचे आंदोलन हा त्याचाच पार्ट 2 आहे. अजूनही तुम्ही या फालतू भूलथापांना बळी पडून या सो कोलॅड बुद्धिवंतांचं जे उद्या काय होईल याचा पाढा वाचून दाखवतेयत त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. आजून एक उदाहरण देतो ज्यामुळे कदाचित डोक्यात प्रकाश पडेल. जर कोणी ओला उबेर 1990 च्या दशकात सुरु केले असते तर या मूर्ख लोकांनी त्याला खालील अर्ग्युमेंट्स करून विरोध केला असता. "" आज आपल्याकडे कायद्याने रिक्षावाल्यांना भाडे नाकारणे हि शिक्षा आहे.. त्यामुळेच कोणीही कुठेही जायचे असेल तर फक्त रिक्षावालाच घेऊन जाऊ शकतो. पण ओला उबेर या प्रायव्हेट कंपन्या असतील, त्यांना जिकडे जायचे तिकडचेच भाडे ते घेणार. सुरवातीला लोकांना स्वस्त प्रवास देण्याच्या बहाण्याने त्यांना ओला उबेर ची सवय लावणार. पण यामुळे रिक्षावाले, टांगावाले, सायकल ओढणारे मजूर देशोधडीला लागणार त्यांचा व्यवसाय बंद होणार.. आणि एकदा का हि व्यवस्था संपली कि मग ते प्रवासाचा दर भरमसाठ वाढवणार आणि सर्वसामान्यांची लूट करणार. नाक्यापर्यंत जायचे म्हणलं तरी 100 रुपये द्यावे लागणार. यांना काय आहे.. यांचे मालक अरबोपती आहेत. यांनी मोदींना पैसे देऊन हा ओला उबर नावाचा प्रकार आणलाय.. पण सरकारला रिक्षावाल्याचा आणि प्रवाश्यांचा विचार केला पाहिजे. ओला उबर या चारचाकी गाड्या असणार, कोण कुठला ड्राइवर त्याचा बिल्ला नंबर नाही.. त्याचा काहीही रेकॉर्ड नाही.. फसवणूक आणि लुटमारीच्या घटना वाढणार.. स्त्रियांना तर हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. सरकारला माहिती आहे कि हे सामान्य रिक्षावाले काय उखाडणार पण सामान्य प्रवासी जो आजतागायत रिक्षातून प्रवास करत आलाय तो हे सहन करणार नही. यांना सांगितलेच कोणी आम्हाला हे पाहिजे म्हणून.. प्रवाश्यांशी कोणतीही चर्चा न करता सरकार घाई गडबडीत ओला उबेर चालवायला परवानगी देतेय.. नक्कीच काहीतरी भ्रष्टाचार आहे. प्रवाश्यांनी या नवीन सिस्टीम ला विरोध करायला हवा.. कारण भविष्यात हे सरकार आणि कंपन्या आम्हाला ओला उबर च्या नावाखाली लुटणार. वाटेल तितके पैसे आकारणार.. RTO ने जे काही दर निश्चित केलेत ते ओला उबर वाल्यांना लागू नाहीत त्यामुळे भविष्यात प्रवासाचे दर कित्येक पटीने वाढणार.. आणि तेव्हा रिक्षा किंवा टांग्याने जायचे म्हणले तर ते सुधा नसणार कारण रिक्षावाले कधीच बंद पडले असणार. हि सगळी रिक्षावाले आणि टांगावाले यांचा व्यवसाय बंद करून सर्व प्रवाश्यांना ओला उबर च्या आणि पर्यायाने उद्योगपतींच्या दावणीला बांधायचा प्रकार आहे. """ मला खात्री आहे असाच काहीसा युक्तिवाद करून त्यांनी भारतात ओला उबर येऊच दिले नसते... हे जस्ट एक उदाहरणं आहे..पण तुम्ही आशय समजून घ्या.. कि विरोध करणाऱ्यांचा विरोध हा किती तकलादू मुद्यांवर आधारित आहे. असे अर्ग्युमेंट्स 1990 मध्ये प्रोफेसर, 188, गणेशा यांच्यासारख्या लोकांना भावले असते.. त्यांनी प्रतिसादाचा किस पाडून या मुद्यांवर मोदींना शिव्या घातल्या असत्या.. पण आज 2020 मध्ये काय परिस्थती आहे ते तुम्ही सर्व जाणता.. विरोध हा सोल्युशन काढण्यासाठी केला जात नसून तो आपले उपद्रवमूल्य दाखवण्यासाठी केला जातोय. सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी केला जातोय. त्यांना सोल्युशन नकोय तर आपला आडमुठा हट्ट पूर्ण करून हवाय आणि त्यासाठी ते देश जाळायला पण तयार आहेत.. असणारच म्हणा.. कारण पैसा जो भेटतोय. मी पुन्हा सांगतोय कि हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून शीख आणि दलाल लोकांचे आहे. कायदा नीट वाचल्यास समजून जाल कि कोणत्याही शेतकऱ्याला तोटा होणार नाही.. पण हे शीख, दलाल, लेफ्ट, लिबरानडू, NDTV इ अस्तित्वात नसलेला राक्षस उभा करून भीती दाखवतायेत.. भविष्यात हे होईल ते होईल.. ते होईल तेव्हा होईल.. जर झालेच तर 65% जनता जी शेतीवर डायरेक्ट अवलंबून आहे त्यानां सांगा कि पुढच्या निवडणुकीत मोदीला हरवायला.. जे नवीन सरकार येईल ते हे सर्व कायदे रद्द करेल.. पण अजुन जो कायदा अजुन अंमलात देखील आला नाही तोवर त्याला विरोध करायचा आणि तो देखील प्रॅक्टिकल मुद्यांवर नाही तर भविष्यातील रंजक कल्पनेवर.. इतकं रामायण मी पहाटे 4:48 मिनिटे IST या वेळेला जागे राहून लिहितोय.. राजेश, प्राध्यापक यांच्यासाठी नाही तर इतर कोणीही जो अजूनही कन्फयुज आहे मग तो मिपाकर असो किंवा जालावरचा असाच एखादा नॉन मिपाकर असो.. त्यासाठी आहे. एक जरी शहाणा झाला आणि कायदे व्यवस्थित वाचून लिबरानडुनी डोकयात बसवून दिलेले सोडून स्वतःचे मत बनवले तरी मी यशस्वी झालो.

In reply to by बाप्पू

संगणक क्रांतीला पण विरोध केला होता ... राज्य, कॉंग्रेसचे होते, तरीही, मी संगणक हवाच, ह्या मताचा होतो ... कोण सांगत आहे? हे न बघता, काय सांगत आहे? ह्या मुद्द्या कडे लक्ष दिले की, गोष्टी, साध्या सरळ होतात...

In reply to by बाप्पू

छान कळकळीचा प्रतिसाद. हे सगळे प्रतिसाद एकत्र करून एक अतिशय लॉजिकल आर्ग्युमेंट तयार होऊ शकते.

In reply to by बाप्पू

त्यामुळे प्रतिसाद नाही दिला तरी चालेल... @ बाप्पू, तुमच्या मागील मला लिहिलेल्या १..२ प्रतिसादा वरून बोलतोय.. तुमची मते योग्य असतील हि, किंवा पुढच्या ची मते चुकीची हि असतील.., त्याचे विचार वेगळे असतील. पण दूसरा म्हणजे मूर्ख, बरळणारा वगैरे हे जे तुम्ही बोलताय ते जरा आवरा. आपण सोशल साईट वर बोलतोय, दुसऱ्याच्या मतांचा respect करा आणि लिहिताना भाषा नीट वापरा... कोणी परिपूर्ण नाही, आणि प्रत्येक जण कायम बरोबर किंवा चूक नसतो. मी कुठल्याही पक्षाची किंवा नेत्यांची बाजू घेऊन हे लिहीत नाही किंवा तस्सा ढब्बा घेऊन येथे वावरत नाही.. त्यामुळे तुम्ही अक्कल वगैरे शिकवणारे बोलणे बंद करा...तुमचे म्हणणे तुम्ही नीट बोलुन पण मांडू शकता.. आपण दुसऱ्याला कोणाच्या तरी मतांचा प्रभाव वगैरे बोलता.. मग बरेच जन चीन, खलिस्तान पाठींबा बोलतात ते कोणी तरी सांगितल्यानेच, कोणी प्रत्यक्ष पुरावा देऊ शकते का? म्हणजे ते पण ऐकून किंवा कोणावर विश्वास ठेवून बोलतात, कोण कोणाच्या विचाराची कीव करते हे ज्याच्या त्याच्यावर असते, पण आपण जाहीर कोणावर बोलताना जरा तारतम्य बाळागावे असे वाटते.. तुम्ही कोणाला येथे शिकवू शकत नाही.. त्यामुळे आपली मते मांडा, दुसऱ्यांना विरोध करा पण भाषा योग्य असु द्या.. बाकी मुद्द्यावर... माझी मते मी आधीच स्पष्ट लिहिलेली आहेत, त्यातील हे ठळक देतोय. येथे जे लिहिले आहे ती शक्यता आहे, बेसिक चूक असेल असे तुम्हाला वाट्टेल.. असो.. तो माझा विचार आहे. मला वाटते, जसे १ वर्ष free data दिल्यावर आता relaince, airtel आणि vi मिळून कितीही रुपयाला त्यांचे data plan देत असतील तरी मला ते घ्यावे लागतील, आता bsnl वगैरे मोडीत निघालेलेच आहेत.. माझे या धाग्यावरील मुळ मत पुन्हा देतो ते कायम हेच आहे, आणि राहिल.. बाकी इतर सर्वांचे आभार.. मागे बोललेलो.. बाकी कायदे बरोबर असतील हि.. त्यांचा परिणाम पाहिल्या शिवाय ते चूक कि बरोबर हे म्हणणे मला योग्य वाटत नाही.. मग ते काँग्रेस ने केले असते तरी किंवा आता bjp ने केले आहेत तरी.. पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते निंदनीय आहे.. मग येथे कोणतेही सरकार असते तरी तेच मत माझे कायम असते...

In reply to by गणेशा

कायदा वाचा खाली "नव्या कृषिकायद्यातील कोणकोणती कलमं तुम्हाला योग्य वाटत नाहीत ते सांगा,आपण त्यावर पुनर्विचार करू" असं आश्वासन कृषिमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा देऊन सुद्धा शेतकरी नेते हे कायदे रद्द झालेच पाहिजेत या एकाच मुद्द्यावर का ठामपणे अडून राहिले आहेत? या प्रश्नाचे एक आणि केवळ एकच उत्तर आहे.ते म्हणजे या कायद्यांखाली शेतकरी त्याने उत्पादन केलेला शेतमाल विकून जे उत्पन्न मिळवील ते पूर्वीप्रमाणेच टॅक्स फ्री असेल मात्र त्याला त्याने ज्या अडत्याला शेतमाल विकला असेल त्या अडत्याचा PAN द्यावा लागेल जे आंदोलकांना अजिबात नको आहे,पण ते तसे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. अशाप्रकारे पॅन नंबर देण्यात खऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच अडचण नाही. जी काही अडचण होणार आहे ती खोट्या शेतकऱ्यांना व अडत्यांना होणार आहे.खोटे शेतकरी म्हणजे कोण?तर जे त्यांचे शेतीव्यतिरिक्त इतर मार्गांनी मिळवलेले उत्पन्न (यांत विविध मार्गांनी मिळवलेला काळा पैसाही आला)हे शेतीतून मिळालेले उत्पन्न आहे असे दाखवतात व त्यावर एरवी जो इन्कम टॅक्स भरावा लागला असता तो वाचवतात.ही सरळसरळ टॅक्स चोरीच आहे. उदाहरण द्यायचे झाले तर समजा अ नावाचा एक राजकारणी आहे.त्याने 2018 -19 या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपये अवैध मार्गाने मिळवले आहेत.2018 -19 पर्यंत हा काळा पैसा एक रुपया ही इन्कम टॅक्स न देता पांढरा करण्याचा एक सोपा मार्ग त्याच्या कडे होता.तो म्हणजे शेतमाल विकून 5 कोटी रुपये मिळाले असे दाखविणे.आता हा कायदा 2019-20 या आर्थिक वर्षा पासून लागू झाला आहे.समजा या वर्षी अ ने सात कोटी रुपये अवैध मार्गाने मिळवले.आता या वर्षी ही इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याने हे 7 कोटी रुपये शेतमाल विकून मिळाले असे दाखवले तर त्याला त्याने ज्या अडत्याला हा शेतमाल विकला त्याचा पॅन नंबर द्यावा लागेल.खोटा पॅन नंबर दिल्यास स्वतःला शेतकरी म्हणवणारा अ अडचणीत येईल.ते टाळण्यासाठी त्याला अडत्याचा खरा पॅन नंबर द्यावा लागेल.मग आता त्या अडत्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला ही माहिती द्यावी लागेल की अ कडून विकत घेतलेला शेतमाल त्याने पुढे कोणाला विकला.पण ही माहिती तो अडत्या देऊच शकणार नाही कारण अ बरोबर त्या अडत्याचा जो काही व्यवहार झाला असेल तो फक्त हिशोबातील खोटी बुक एन्ट्री अशा स्वरुपाचा आहे.प्रत्यक्षात त्याच्या हाती कोणताही शेतमाल आलेलाच नाही,मग तो विकल्याची एन्ट्री तो कशी दाखवणार?म्हणजे यापुढे अ नसलेला शेतमाल विकला असे दाखवून अवैध उत्पन्नावर टॅक्स चोरी करू शकणार नाही आणि अडत्या खोट्या रकमेवर कमिशन खाऊन अ ला अशा खोट्या व्यवहारात मदत करू शकणार नाही.म्हणजे हे असे खोटे व्यवहार बंद झाले की अ सारख्या लाचखोरांची टॅक्स चोरी थांबेल व अशा टॅक्स चोरांना मदत केल्यावर मिळणारे अडत्यांचे कमिशन ही थांबेल. तर ही खरी अडचण आहे.म्हणून आणि म्हणूनच हे कायदे रद्द करा हीच मागणी लावून धरली आहे या आंदोलकांनी. या वरून एक गोष्ट स्पष्ट होते.हे 3 कायदे रद्द करा या आंदोलकांच्या मागणी मागे प्रचंड मोठ्या प्रमाणावर टॅक्स चोरी चालू ठेवणे हा एकच उद्देश आहे.आणि जे जे लोक आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देत आहेत ते एक तर स्वतः करप्ट ,भ्रष्ट आहेत किंवा भोळसट आहेत.

In reply to by मुक्त विहारि

आता वरील माहिती वाचूनही, तुम्हाला असे वाटत असेल की, शेतकरी आंदोलन करत आहेत, तर, तुमच्या तारतम्येला सलाम ....