भारत एके काळी वस्त्र निर्माणातील आघाडीचा देश होता. सुती कपड्यांचा शोध भारतातूनच लागला असावा कारण ग्रीक लोक जेंव्हा भारतात आक्रमण करायला आले तेंव्हा सुती कपडे पाहून त्यांना विलक्षण नवल वाटले. झाडावर उगवणारी लोकर अश्या पद्धतीने त्यांनी कापसाचे वर्णन केले होते आणि चित्रे सुद्धा काढली होती. (कापसा प्रमाणे नारळाचे झाड भारतांत मार्को पोलोने पहिले आणि लिहिले कि ४ मजली घरापेक्षा उंच असे एक झाड आहे ज्याला अजिबात फांद्या नाहीत पण टोकाला फक्त पाने आहेत आणि ह्याची फळे माणसाच्या डोक्यापेक्षा मोठी आहेत. आणि ह्या फळांच्या आत थंडगार गोड पाणी आहे आणि चविष्ट गॉड पदार्थ. हे त्याचे वर्णन मानून घेण्यास इटली तील लोकांनी साफ नकार दिला आणि असे झाड
त्याच बाजूला जापान देशांत सुद्धा वस्त्रोद्योग महत्वाचा होता. मी इथे साधारण ५०० वर्षे मागची गोष्ट लिहत आहे. भारत आणि जपानचा महत्वाचा फरक म्हणजे व्यापार आणि विदेशी लोकांना स्वागत देणे ह्यांत भारत आघाडीवर होता. मान न मान में तेरा मेहमान म्हणून विविध इस्लामिक आक्रमक देशांत स्थायिक झाले होते आणि त्याच वेळी युरोप (समुद्र मार्गे) आणि अफगाणिस्तान मार्फत बऱ्यापैकी व्यापार चालला होता.
जपानी लोकांना विदेशी लोकांचा भयंकर तिटकारा होता आणि आपल्या बाहेर जे जग आहे त्याला ओळखून त्यांच्याशी व्यवहार करण्याचा त्यांचा इरादा नव्हता. पण मेजी काळांत हे सर्व बदलले. जपानी राजा ने टोकियो मध्ये आपले बस्तान बसवले पण राजकारणाची संपूर्ण सूत्रे जपानी सामुराई ह्यांच्या हातांत गेली. अर्थात नक्की हा बदल कसा घडला हे विस्तारांत मी इथे लिहू शकत नाही पण थोड्क्यात इंग्लंड हि जगातील सर्वांत मोठी शक्ती आहे आणि आम्हाला सुद्धा इंग्लंड च्या च बरोबरीने बनायचे आहेत हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे इंग्लंड जे करेल तेच आम्ही करू अश्या पद्धतीने त्यांनी इंग्लंड चा अभ्यास सुरु केला. काही काळांतच त्यांनी जपान मधील क्लास व्यवस्था पूर्ण पणे बंद केली सर्वाना सामान अधिकार दिले आणि एक नवीन प्रकारची कर पद्धती आणली. खाणकाम, वस्त्रोद्योग, शिक्षण व्यवस्था, जलसंसाधन, रेल्वे, टेलिग्राम आणि त्याच बरोबर विदेशी गुंतवणुकीला वाव दिला. (लास्ट सामुराई हा टॉम क्रूस ह्याचा चित्रपट जरूर पाहावा). स्त्रियांना जपान मध्ये दुय्यम वागणूक दिली जायची त्यांना शिकायला देत नसत आणि शिकलीच तर त्यांची लिहिण्याची स्क्रिप्ट वेगळी होती. ह्याच मुळे जपानी भाषेंत आज एकूण तीन वेगळ्या लिप्या शिकाव्या लागतात कांजी, कॅटाकाना आणि हिरंगाना. हिरंगाना बऱ्यापैकी संस्कृत वर आधारित आहे.
इंग्लंड ला जपानवर कब्जा करायचा होता पण इथे एक महत्वाची अडचण आली. १८५७ चे भारतीयांचे युद्ध आणि त्याआधी अमेरिकेचे स्वातंत्र्य ह्यामुळे इंग्लंड कडे मानवी बळाची चणचण होती आणि जपानी सामुराई मंडळींनी अमेरिकन लोकांना आणि सैनिकांना काम देण्यास सुरुवात केली. त्याशिवाय युद्धतंत्रांत जपानी लोक खूपच उजवे होते आणि भारताच्या तुलनेत जास्त संघटित होते. विदेशी लोकांबरोबर व्यापार सुरु होतांच अनेक जपानी लोकांनी आपले पारंपरिक धंदे सोडून नवीन धंद्यात प्रवेश केला आणि विदेशी व्यापाऱ्याकडून नवीन प्रकारचे व्यवसाय आत्मसात केले.
जपानी लोकांनी नक्की इंग्लंड ची कॉपी का केली ? तर बहुतेक जपानी विद्वानांनी इंग्लंड मध्ये प्रवास केला नव्हता पण त्यांना माहिती होती कि इंग्लंड जगातील सर्वांत मोठी शक्ती आणि श्रीमंत देश आहे. ह्यासाठी त्यांनी ऍडम स्मिथ ह्या स्कॉटिश विचारवंताचा अभ्यास केला. ऍडम स्मिथ हे आधुनिक अर्थशास्त्राचे जनक मानले जातात आणि मुक्त आर्थिक व्यवस्था आणि भांडवलशाही ह्यांचे सुद्धा जनक मानले जातात. (ऍडम स्मिथ ह्यांना ब्रिटिश राणीने भारताला आपण गुलाम बनवावे का ह्या विषयाचा अभ्यास करायला सांगितले होते. ऍडम स्मिथ ह्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा कडाडून विरोध आणि भारतात राजकीय हस्तक्षेप करणे एकूण ब्रिटिश समाजासाठी नुकसानीचे आहे असे सांगितले होते).
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ह्या काळांत भारतात अनेक उद्योग धंदे ब्रिटिशांनी निर्माण केले होते. रुपया हे चलन बऱ्यापैकी प्रचलीत होते. जहाज बांधणी, विमान उद्योग, औषध निर्मिती आणि वस्त्रोद्योग ह्यांत भारताचे स्थान बऱ्यापैकी होते.
स्वातंत्र्यानंतर भारतात आर्थिक सुधारणा घडवून आणण्याची क्षमता भारतीयांत होती. जपान ने ज्या पद्धतीने प्रगती केली होती त्याच पद्धतीने भारत प्रगत आकारू शकला असता. पण भारतीयांचे दुर्दैव होते कि दूरदृष्टी आणि बुद्धिमत्ता ह्यांत भारतीय नेतृत्व फारच कमी पडले. त्यांना सोवियत च्या केंद्रीकरणाचे जास्त प्रेम होते. दिल्लीत राहून आपण प्रत्येक भारतीयाने काय केले पाहिजे हे सर्व काही "प्लॅन" करू शकू अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्याच वेळी विदेश आणि व्यापार ह्यांच्या विषयी संशयास्पद वृत्ती भारतीय नेत्यांची होती.
सर्वांत विचित्र गोष्ट म्हणजे नेहरू, बोस, गांधी ते आंबेडकर पर्यंत सर्व भारतीय नेत्यांनी इंग्लंड मध्ये अभ्यास केला होता. त्यांनी इंग्लंड मध्ये अनेक वर्षे राहून इंग्लडच्या वैभवाचा अनुभव घेतला होता. पण तरी सुद्धा इंग्लंड चीच पद्धत आपण राबवावी असे त्यांना उलट वाटले नाही. ह्याला कारण कदाचित असे असू शकते कि युनिव्हर्सिटी सिस्टम हि कदाचित नेहमीच ज्ञानास अपायकारक असते. प्रत्यक्ष आयुष्यांत फेल झालेले लोक प्राध्यापक बनून हस्तिदंती मनोर्यातून आपली मते व्यक्त करतात आणि JNU प्रमाणे नेहमीच आपल्या देशाच्या विरुद्ध प्रचार करतात. त्याच प्रमाणे इंग्लंड मध्ये शिकलेले भारतीय नेते कदाचित इंग्लडच्या किती वाईट आहे किंवा भांडवलशाही किती वाईट आहे हेच ऐकत आले असावेत.
(टीप : अमेरिका जगांतील सर्वांत प्रगत देश आणि प्रगत समाज असला तरी आपण अमेरिकन विद्यापीठांत गेलात तर तिथे तुम्हाला मार्क्स कसा बरोबर होता हे जास्त शिकवले जाते. )
१९४७ मध्ये भारतीयांनी आपल्या देशाचा पाया "बाबू वाक्यम प्रमाणं" ह्या तत्वावर घातला. ह्या बीजाने म्हणता म्हणता विषवल्लीचे रूप घेतले आणि एकदा विशालकाय झाल्यावर ह्या विषवल्लीला खत पाणी देणे सुद्धा आवश्यक होते. आता सुद्धा दर वर्षी गांधी च्या जन्मदिवसाला सर्व भारतीय राजकारणी मंडळी बसून शेकडो वर्षं मागे ज्या पद्धतीने माणूस सूत निर्माण करत होता तीच पद्धत वापरून (चरखा) सूत करतात.
अर्थांत प्रतीकात्मक दृष्ट्या त्यांत काहीच चुकीचे नाही पण दुर्दैवाने हे फक्त प्रतीकात्मक नसून वस्त्रनिर्मिती ह्यावरच्या भारतीय धोरणाचे सुद्धा ते प्रतीक आहे. १९४८ भारतीय बाबूंनी ठरविले कि भारतीय विणकर ह्यांना सरकारने औद्योगिकरणापासून वाचवले पाहिजे. त्यांनी हातमाग आणि विणकरी लोकांना प्रचंड सवलती तर दिल्याचं पण आधुनिक तंत्रज्ञानाला भारतात येण्याला बंदी सुद्धा घातली. १९४८ ते १९८० पर्यंत भारतातील हातमागांची संख्या वाढून दुप्पट झाली. अनेक गावांत १०-१२ लोक मिळून दिवसभर सूत कातून त्याला स्मूथ करण्याचे काम करत असत. हेच काम त्या काळाचे एक मशीन सुमारे १० मिनिटांत करू शकत होते.
अर्थांत हातमागाने कपडे करण्यात काहीही गैर नाही. समस्या हि होती कि हा संपूर्ण व्यवसाय अश्यासाठी अस्तित्वांत होता कि सरकारने जबरदस्तीने इतर मार्गबंद केले होते. आधुनिक यंत्रणा भारतांत वापरली जात नव्हती असेच नव्हे तर हि यंत्रणा कशी निर्माण करायची, त्यात सुधार कसे करायचे आणि ह्या विषयावर सुद्धा भारतीय लोक पूर्ण पणे अनभिद्न्य होते.
त्याशिवाय भारतातील इतर लोक सुद्धा प्रचंड गरीब होते त्यामुळे निकृष्ट पद्धतीने निर्माण केलेले महाग कपडे त्यांना विकत घ्यावे लागत होते आणि एक अर्था नेसंपूर्ण भारतीय जनता आणखीन गरीब होत होती.
त्याच वेळी आपण १९८० मधील जपान मध्ये जाऊन पाहुया. जपान ने फक्त इंग्लंडहून आधुनिक तंत्रन्यान आणले असे नाही तर त्याचा भरपूर अभ्यास सुद्धा केला. १९८० मध्ये जपानने एक असे मशीन विकसित केले होते कि आपण वाट्टेल ते चित्र कागदावर काढून दिले कि कॆमेराने ते चित्र स्कॅन होत होते नंतर ते चित्र कपड्यावर येण्यासाठी धागे कसे गुंतवावेत हे कम्प्युटर शोधत असे. मग त्या पद्धतीने यार्न विणून हे ह्या चित्राची नक्षी असलेली सिल्क ची वस्त्रे हे मशीन काही तासांतच निर्माण करत असे. आणि हे मशीन फक्त ३ लोक चालवत असत आणि वर्षाला लक्षावधी अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे कपडे निर्माण करत असत.
हे मशीन त्याकाळांतील जगांतील सर्वांत प्रगत असे मशीन होते. त्यातून निर्माण होणारे रेशमी कपडे सर्वांत चांगल्या दर्जाचे असून स्वस्त सुद्धा होते. पण त्याच वेळी रेशमी कपड्यावर जपानी इतिहास विणून दाखवायची जी जपानी परंपरा होती त्याचे रक्षण तर होत होतेच पण त्याशिवाय आता हे काम सोपे झाल्याने जास्त किचकट आणि चांगली कथा कपड्यावर विणून दाखवल्या जात होत्या. ह्या मशीन वर काम करणार्यांना भरपूर पगार तर मिळत होताच पण रेशमी कपडे जास्त प्रमाणात बनवले जात होते नि विकले जात होते.
२०२० मध्ये सुद्धा भारत अजून जपानची बरोबरी करू शकत नाही. कपड्यांच्या निर्माणात बांगलादेश आणि व्हिएतनाम भारतापेक्षा पुढे आहेत. चीन तर खूपच पुढे आहे.
दुर्दैव हे आहे कि १९८० मध्ये विणकरांची जी स्थिती होती तीच २०२० मध्ये आहे. भारतीय प्रधान मंत्री निकृष्ट दर्जाचे हातमागावर विणलेले कपडे भारतीय जनतेला घ्यायला सांगत आहेत. हातमागावर काम करणाऱ्या लोकांना टीचभर पैसे मिळतात महिनाभर काम करून निर्माण केलेली २० हजार रुपयांची साडी भारतीय महिला महाग म्हणून घेतात पण ती निर्माण करणाऱ्या माणसाला त्यातून आपल्या परिवाराला पोटभर खाऊ घालायला सुद्धा शक्य होत नाही.
१९८० च्या आधी भारतातील बहुतेक कपडे हे हातमागावर निर्माण होते होते. १९८० मध्ये नाईलाजाने भारत सरकारला पावरलूम ला परवानगी देणे भाग पडले पण त्यावर सुद्धा निर्बंध होते. तरीसुद्धा १९८५ पर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त कपडे पॉवरलूम्स वर निर्माण होऊ लागले होते. २०२० मध्ये बहुतेक कपडे भारतांत पवरलूम्स वर निर्माण होत आहेत.
सूत कसे निर्माण करावे, पावरलूम कुठल्या पद्धतीची असावी ह्यावर भारत सरकारने खूपच निर्बंध घातले आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रांत भारतीय लोकांना काहीही सुधारणा करून नवीन प्रकारचे लूम्स निर्माण करणे शक्य होत नाही. आपण १०० कोटींची र&ड करून केली नवीन मशीन आणि घातली सरकाने बंदी तर पैसे खड्यात जातील म्हणून विविध भारतीय कंपन्या बांगलादेश किंवा व्हिएतनाम मध्ये गुंतवणूक करणे पसंद करतात.
२०१५ मध्ये भारत सरकारने जागतिक हातमाग दिवस निर्माण केला. अनेक विद्वानांनी भारत सरकारने २०० वर्षांपूर्वीच्या हातमागानं प्रोत्साहन न देता आधुनिक तंत्रज्ञानाला चालना द्यायला पाहिजे असा सल्ला दिला आणि भाजप सरकारने सुद्धा तो गांभीर्याने घेतला होता. पण त्यांच्या ह्या खेळीला नेहमीच्या डाव्या मंडळींनी हाणून पाडले आणि पुन्हा भाजपा नेहमी प्रमाणे शेपूट घालून जैसे थे झाली आणि महान नेता पुन्हा खादी आणि हातमाग ह्या विषयावर "virtue सिग्नलिंग" करण्यात मग्न झाला. त्याची री ओढून अनेक भक्तमंडळी सध्या खादी कशी चांगली आणि हातमाग कसे चांगले हे लोकांना ऐकवत आहेत.
अनेक भारतीय लोक विनाकारण ह्या निकृष्ट दर्जाच्या व्यवसायांत अडकून पडले आहेत हीच एक वाईट गोष्ट नाही. हातमाग ह्या विषयावर मग काहीही रिसर्च होत नाही. नवीन मशीन्स शोधली जात नाहीत आणि कोणीही भांडवल द्यायला जात नाही. मग आपल्या शेतीप्रमाणेच हा व्यवसाय दिवसेंदिवस आणखीन खराब होत जातो. त्याशिवाय साड्यांची उपलब्धता कमी होते, नवीन डिसाईन्स येत नाहीत आणि साडी हा प्रकारच थोडा अनकूल होत जातो. २०-२५ हजाराची साडी आम्हा लोकांना महाग वाटते पण आधुनिक तंत्रज्ञानाने हीच साडी ३००० हजार रुपयांत निर्माण होऊ शकते. असे झाले तर जास्त महिला साडी घालू शकतात. मग जास्त नफा कसा करावा ह्या नादात नवीन प्रकारच्या साड्या निर्माण होतात आणि त्यामुळे साडी आधुनिक बनते नाहीतर साडी हा प्रकार काकूबाईचा पेहराव बनून राहतो.
पण आधुनिक तंत्रज्ञान सोकाळले तर काय होईल ? बहुतेक कपडे स्वस्त आणि जास्त दर्जाचे होतील. पण त्याच वेळी श्रीमंत लोकांना आपली श्रीमंती दाखविण्याची जी हौस आहे ती राहिलच त्यामुळे "हॅण्डमेड" किंवा "आर्टिसन" ह्या प्रकाराला हि मंडळी वाट्टेल तो भाव देऊन विकत घ्यायला तयार होतील. एकूण हातमागांची संख्या देशांत कमी झाली तरी त्यातून येणारा रेव्हेन्यू हा कैक पटीने वाढेल आणि विणकराला खूप जास्त पैसे मिळतील. मुक्त आर्थिक व्यवस्थेने सर्वांचाच फायदा होतो. जनतेला तर फायदा होतोच पण त्या शिवाय विणकराला फायदा होतो. जगातील सर्वोकृष्ट कपडे पुन्हा एकदा भारत बनवू शकतो असा आत्मविश्वास देशाच्या जनतेत निर्माण होऊ शकतो. फक्त IT मागे न लागता एक दुसरे क्षेत्र भारतीय युवा लोकांसाठी उघडू शकते.
मिल्टन फ्रीडमन ह्यांनी हा खालील एपिसोड १९८० मध्ये केला होता. त्यांत भारतीय विणकर दाखवले आहेत. काही महिने आधी मोदी सरकारने हातमाग विषयी जाहिरात प्रकाशित केली होती ४० वर्षे उलटली तरी भारतीय विणकर बिचारा आहे तिथेच आहे असे त्या जाहिरातीतून मला दिसले म्हणून हा लेखन प्रपंच. माझ्या मते हा एपिसोड प्रत्येक शाळेंत मुलांना दाखवायला पाहिजे आणि त्यावर निबंध स्पर्धा घेतली पाहिजे.
https://youtu.be/CWgNe8v6KFc?t=378
टीप : एके काळी ब्रिटिश सरकारने भारतीय विणकरांचे हात कापले होते कारण ते जास्त चांगले कपडे निर्माण करत होते (म्हणे). आधुनिक तंत्रज्ञानाला बंदी घालून भारत सरकारने सुद्धा एक प्रकारे भारतीय विणकरांचे हात कापले आहेत.
वर्गीकरण
वाचने
28684
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे
1860 मध्ये मुंबई मध्ये
हातमाग
हातमाग
लेखात धडाधड माहीती दिलेली आहे.
> सरकार ठराविक धंद्यास
In reply to लेखात धडाधड माहीती दिलेली आहे. by कंजूस
हे चुकीचे आहे - कसं?
In reply to > सरकार ठराविक धंद्यास by साहना
सबसिडी
In reply to हे चुकीचे आहे - कसं? by कंजूस
> ते सब्सिडी घेणार हातमाग
In reply to हे चुकीचे आहे - कसं? by कंजूस
कुणाला सब्सिडी देणे बरोबर नाही
In reply to > ते सब्सिडी घेणार हातमाग by साहना
मुरिका, मेक्सिको काय म्हणते
In reply to कुणाला सब्सिडी देणे बरोबर नाही by कंजूस
त्यांचे तेच बाहेर येऊ शकतात--
In reply to मुरिका, मेक्सिको काय म्हणते by साहना
वाचत आहे....
हातमाग आता आहेत कुठे
बहुतेक कपडे स्वस्त आणि जास्त
सोलापूरला गिरण्या होत्या की.
In reply to बहुतेक कपडे स्वस्त आणि जास्त by आनन्दा
चीनविरोधी वातावरणाचा देशातील
In reply to सोलापूरला गिरण्या होत्या की. by शाम भागवत
मनपात जाताजाता हे आठवले.
In reply to चीनविरोधी वातावरणाचा देशातील by शाम भागवत
हो ह्या विषयावर नक्कीच
In reply to बहुतेक कपडे स्वस्त आणि जास्त by आनन्दा
http://documents1.worldbank
In reply to हो ह्या विषयावर नक्कीच by साहना
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to हो ह्या विषयावर नक्कीच by साहना
Jobless growth
Jobless growth
तर्क प्रतिभेचे लेंडे
In reply to Jobless growth by Rajesh188
सहमत.
नक्की काय सांगायचे आहे
कोओप्टेक्स तमिळनाडू हातमाग कॉटन्स आणि सिल्क
खासगी प्रयत्न म्हणजे
केवळ उदाहरण म्हणून देत आहे.
ब्रिटन
In reply to केवळ उदाहरण म्हणून देत आहे. by सुबोध खरे
uAE ची कंपनी सौदी Aramco ?क्ष@ ??? नेस्ले ची कॅडबरी द्या हो !
In reply to ब्रिटन by Rajesh188
valu addition
In reply to uAE ची कंपनी सौदी Aramco ?क्ष@ ??? नेस्ले ची कॅडबरी द्या हो ! by चौकस२१२
आज कुठल्या देशाच्या
In reply to ब्रिटन by Rajesh188
ब्रिटन चे नाव नाही
In reply to ब्रिटन by Rajesh188
खरं आहे ...
In reply to केवळ उदाहरण म्हणून देत आहे. by सुबोध खरे
आगामी तीन वर्षांत ७ महा
सरकारी प्लॅनिंग ने घंटा
In reply to आगामी तीन वर्षांत ७ महा by चौथा कोनाडा
सरकारी प्लॅनिंगमध्ये आणि
In reply to सरकारी प्लॅनिंग ने घंटा by साहना
बजेट मधील तरतुद हा प्रकार
In reply to सरकारी प्लॅनिंग ने घंटा by साहना
सरकारी प्लॅनिंग ने घंटा
In reply to सरकारी प्लॅनिंग ने घंटा by साहना
अवांतर...
व्हिडीओ कुणाचा होता हे ठाऊक
In reply to अवांतर... by अर्धवटराव
> त्याचा प्रतिवाद करणारे
In reply to अवांतर... by अर्धवटराव
खरच लाल धोरणं इतकी वाईट आहेत ???
In reply to अवांतर... by अर्धवटराव
> कारण सुरवातीला जर अशी काही
In reply to खरच लाल धोरणं इतकी वाईट आहेत ??? by चौकस२१२
यासाठीच स्वातंत्र्य
In reply to > कारण सुरवातीला जर अशी काही by साहना
याबाबतीत त्यावेळच्या सरकारचे
In reply to > कारण सुरवातीला जर अशी काही by साहना
आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण
In reply to > कारण सुरवातीला जर अशी काही by साहना
> आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण
In reply to आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by पिनाक
भारताशी व्यवहार करायला इतर राष्ट्रे उत्सुक होती.
In reply to > आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by साहना
नेहरूंना सगळे समजते, ह्या पासून...
In reply to > आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by साहना
??
In reply to आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by पिनाक
खनिज संपत्ती आणि बॅन्कांचे राष्ट्रीयकरण,
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
नाही
In reply to खनिज संपत्ती आणि बॅन्कांचे राष्ट्रीयकरण, by मुक्त विहारि
मी होतच नाही, असे म्हणत नाही ...
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
> बॅन्का खाजगी असतील तर,
In reply to खनिज संपत्ती आणि बॅन्कांचे राष्ट्रीयकरण, by मुक्त विहारि
डी आर डी ओ या सरकारी संस्थेने
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to डी आर डी ओ या सरकारी संस्थेने by सुबोध खरे
ती माणसे पाहिजेतच.
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
सहमत आहे
In reply to ती माणसे पाहिजेतच. by शाम भागवत
मोदी द्वेष संपला की मोदी
In reply to ती माणसे पाहिजेतच. by शाम भागवत
बरोबर आहे. त्याशिवाय आपल्या
In reply to ती माणसे पाहिजेतच. by शाम भागवत
.
In reply to बरोबर आहे. त्याशिवाय आपल्या by साहना
🎯
फक्त गेली २० वर्षे या गोष्टीचा मोदी वापर करून घेत आहेत हे मोदींचे वैशिष्ट्य. आपला वापर करून घेतला जात आहे याचा संशय येऊ न देणे हे मोदींचे कतृत्व. 😀विद्यार्थी दशेंत असताना मी
In reply to डी आर डी ओ या सरकारी संस्थेने by सुबोध खरे
भारतीय क्षेपणास्त्रांतील
In reply to विद्यार्थी दशेंत असताना मी by साहना
Dr खरे च्या मताशी पूर्ण सहमत
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
संतुलित प्रतिसाद...
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
> इसरो किंवा अणुऊर्जा आयोगात
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
डॉ.. प्रदिप कुरूलकर, DRDO मधे
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
उत्तम आणि माहितीपुर्ण
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे