खादी आणि हातमाग

भारत एके काळी वस्त्र निर्माणातील आघाडीचा देश होता. सुती कपड्यांचा शोध भारतातूनच लागला असावा कारण ग्रीक लोक जेंव्हा भारतात आक्रमण करायला आले तेंव्हा सुती कपडे पाहून त्यांना विलक्षण नवल वाटले. झाडावर उगवणारी लोकर अश्या पद्धतीने त्यांनी कापसाचे वर्णन केले होते आणि चित्रे सुद्धा काढली होती. (कापसा प्रमाणे नारळाचे झाड भारतांत मार्को पोलोने पहिले आणि लिहिले कि ४ मजली घरापेक्षा उंच असे एक झाड आहे ज्याला अजिबात फांद्या नाहीत पण टोकाला फक्त पाने आहेत आणि ह्याची फळे माणसाच्या डोक्यापेक्षा मोठी आहेत. आणि ह्या फळांच्या आत थंडगार गोड पाणी आहे आणि चविष्ट गॉड पदार्थ.
Subscribe to खादी