बिचारे होम डेपोवाले.. त्यांना वाटलं असेल या ख्रिस आणि संदीप शिवाय आपल्याला दुसरं कोणी गिर्हाईकच नाहीये.
खरंच ... चकरा मारता मारता तुलाही चक्कर यायला लागली असेल.
आता मला वाटतं पुढचे ६ महिने तरी होमडेपो मध्ये जाऊ नकोस. उगाच तिथल्या लोकांना भलतीच शंका यायची. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
नाव सुवर्णाक्षरात पत्त्यांचा वहीत लिहून ठेवा.
(चांगला मेकॅनिक, प्लंबर, मच्छीवाला,... एकदा मिळाले की सोडायचे नसतात!)
सहानुभूतीयुक्त मजा आली अनुभव वाचून.
>>गंगेत घोडे न्हायले
गंगेत? घोडे?? न्हायले???
=)) =)) =))
अरे, कमोड बसवला ना त्यांनी?????
संदीपदा, धन्य आहेस रे बाबा!
बाकी, पु.लं. म्हणतात तसं आपल्याच आयुष्यात हे असले 'जलशृंखला योग' वगैरे येतात हे बरीक खरंच हां.
नशीबानं चांगला हँडीमन मिळाला तुला. हाच अनुभव इकडं आला असता तर????
"घेतानाच नीट बघुन घेता येत नाय काय? आमी काय साला ते कमोड घरी बनवते काय? घाटी साले!!"
असं नाहीतर काऊंटरवरच्या खडूस म्हातार्यानं हातातल्या छडीनं भिंतीवरच्या बोर्डावर एकदोनदा टक्टक केलं असतं (एकदम बादशाहीत आल्यासारखं वाटलं नै???)....
"एकदा विकलेला माल कोणत्याही सबबीवर बदलुन दिला जाणार नाही, कृपया सहकार्य करावे.
- आज्ञेवरुन."
बाकी, बेसीन-कमोड बसवायला मुहुर्त पाहिला नव्हतास ना? आणि नविन घेतल्यावर त्यापुढे नारळही फोडला नव्हतास ना? मग असंच होणार. पुढच्या वेळी लिंबू-मिरच्या पण ओवाळून मगच ट्रंकमधून बॉक्स खाली उतरव बरं का! ;)
एक तो साधा प्लंबिंगचा अनुभव तो काय, पण काय फर्मास खुलवून लिहिलाय. हे असं कित्येकांना अनुभवायला येत असेल, पण इतकी साधी घटना अशी जबरा खुलवुन लिहिणं वगैरे आमच्या आवाक्यातच नाय बॉ :) मजा आली वाचायला!!!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
कसं नशीब असतं..
कमोडच्या हेलपाट्यांच्या नादात ’आर. डी. – गुलजार’ या बेफाट दुकलीवर आधारित कार्यक्रम
गमवावा लागतो...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
'होम डेपो' नाव सार्थ केलंस की दुकानाचं! ;) मस्तच खुलवलं आहेस! :)
प्लंबर खरंच नेकीचा मिळाला तुला, त्यानं हात झटकले असतेन तर काही खरं नव्हतं तुझं!
(पुढचे काही महिने त्याने कोणाकडेही कमोड बसवायचे काम केले नसेल! ;) )
चतुरंग
प्लंबर खरंच नेकीचा मिळाला तुला, त्यानं हात झटकले असतेन तर काही खरं नव्हतं आपल !!
हेच म्हणतो...
सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
स॑दिप, जर कमोड बसला नसता तर आलेल टे॑शन (....)कसे दुर करायचे याचा विचार त्या एवढ्या हेलपाट्यांच्या नादात केला होतात कि नव्हतात तेवढे लिहायचे विसरलास बघ.
शेवटी कमोड बसला तर!!!
(च्यायला, कधीपासून घाईची लागल्येय आणि याचा कमोडच बसेना!!:))
बाकी संदीपराव,
'वॅक्स रिंग' बरोबर नीट बसवली ना? नाहीतर काही दिवसांनी पिवळं पाणी लीक व्हायला लागायचं टॉयलेटमध्ये!!!:))
आपला (शुभ बोल रे नार्या पंथी),
पिडां
वाचतानाही दमछाक झाली बाबा!
पुन्हा म्हणून असे अनुभव तुझ्या वाट्याला येऊ नयेत,
नाहीतर तू ते लिहिणार आणि आम्हाला वाचायला लावून दमवणार.;)
(हलके घेतलेच पाहिजेस, नाहीतर....)
रेवती
प्रतिक्रिया
बापरे!!
चांगला प्लंबर भेटला
सही आहे किस्सा!
चला तर
+१
पर्या, येड्या....
बाप रे......
चक्कर कसली
कसं नशीब
हे हे हे!!
"कमोडकरी" मस्त जमली आहे...
हुश्श्य.. क
धन्यवाद
विचार करुन सा॑ग
हुश्य!!!
वाचतानाही