शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ट्रॅक्टर रॅली निघणे
सरकारने कायदा मुळीच रद्द करू
सरकार ने कोणत्याही परिस्थितीत
तेथील व्यवस्था बघून
पंजाबी शेतकऱ्यांचा आडमुठेपणा
उद्या
CPI(M) च्या लाल माकडांना
शेतकऱ्यांच्या हातात लाल झेंडे
अनवाणी शेतकऱ्यांचा मोर्चा
बरोअर आहे.
+ १
राजेशसाहेब
आंदोलन होणे हे समाज जागृत असल्याचे लक्षण आहे
नक्की सरकारने काय केल पाहिजे?
राज्य कर्त्यानी समस्या सोडवाय
राज्य कर्त्यानी समस्या सोडवाय च्या असतात दुर्लक्ष करून भिजत ठेवायच्या नसतात.-- ट्रिपल तलाक, राम मंदिर, कलम ३७० या व अश्या अनेक प्रश्नांचे घोंगडे कॉंग्रेसने अनेक वर्षे 'भिजत' ठेवले या बद्दल तुमचे मत काय आहे सर्वज्ञानी ? मुळात सध्या दिल्ली सिमेवर जे जमले आहेत त्यात एक ही शेतकरी नाही, ती आहे अडत्ये व दलालांची मनमानी करणारी एक गॅंग. या गॅंग पुढे अनेक पर्याय सरकारने ठेवले मात्र या अडेलतट्ट लोकांनी सरकारचे सर्व पर्याय फेटाळले. तेंव्हा या तथाकथित आंदोलनाकडे सरकारने आता दुर्लक्ष करणेच योग्य आहे.एक अतिशय साधी गोष्ट आहे ....
कारण
२६ जानेवारीची वेगळी परेड...!
नागालँड पासून कन्याकुमारीपर्यंचे
आपणही ते वेगळी रॅली पाहू असे
काँग्रेस नी भिजत घोंगडे ठेवले म्हणून तर
ट्रॅक्टर रॅली वगैरे सगळं ठीक आहे
एका ट्रॅक्टरने रस्त्याची
फायद्याचे आहे ना
डीजलसाठी अड़वणुक...
शेतकरी आंदोलकांची या मोठ्या
शेतकरी आंदोलकांची या मोठ्या ट्रक्टर रॅलीस डीजल देऊ नये अशा प्रकारची अड़वणुक सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनाकडून करण्यात येत आहे.एक अवगुंठीत व्यक्तीला माध्यमांसमोर आणून, तो बंदुकीने शेतकरी नेत्यांना मारणार होता, असेही हास्यास्पद आरोप शेतकरी संघटनांनी केले आहेत. अडानी आणि अंबानी भारतातील सर्व शेती ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना उद्धव करणार असाही हास्यास्पद आरोप सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या कोणत्याही आरोपाला गांभिर्याने घ्यायची गरज नाही.शेतकऱ्यांना उद्धव करणार =
टंकन चूक कसली? दोन्ही
हहपुवा
हाहाहा
आज महाराष्ट्रातही मोर्चा....
झेंडा कोणता घेणार ?
26जानेवारी
अगदी बरोबर राजेश सर!
“तुम्ही राज्यपालांना निवेदन
माझे एक साधे तर्कशास्त्र आहे .....
+१
खोटे बोलण्यात साहेब खुप पटाईत
काय अपेक्षा...?
सहमत.
सहमतच आहे.
कंगना ला भेटायला कोणता
याचे
शोभेचे पद आहे ते .. काय
उद्याच्या ट्रॅक्टर परेड नंतर
सरकारने नक्की काय करायला हवं?
सरकार नी काय करायला हवे
सहमत आहे ...
पण साहेब बहुसंख्य शेतकऱ्यांचा
दोन वेळा bjp सरकार का आले