Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राची अश्विनी on Mon, 01/18/2021 - 13:13
मला चांगलंच ठाऊकाये, की चित्रबित्र मला बिल्कुलच काढता येत नाही. पण तरीही.. एकदा मी तुझं चित्र काढणार आहे. बघंच तू. सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय! आधी दहाचा आकडा काढेन. हं पण त्यातला एक जरा पसरटच. का म्हंजे काय? तुझ्या कपाळावरच्या इतक्या सगळ्या आठ्या मावायला नकोत का? आणि त्यावरचा शुन्य थोडा चपटा, मला चिडवतानाचा तुझा मिश्किलपणा पुरेपूर भरलेला. नाकाच्या जागी आठाची तिरकी रेषा काढताना हात जरा मी मोकळाच सोडेन. कित्ती कित्ती तिरकेपणा तो? कळायला नको? शिवाय याचा राग, त्याचा राग, अमका राग, तमका राग, एवढे सगळे रागराग फतकल घालून बसणार तिथं, तर जागा हवीच ना? त्याच्याखालचा ओठांचा E एकदमच छोट्टासा नि सोप्पा. मिटलेलेच तर असतात कायम ओठ. काय बोलू हा तुझा कायमचा तर प्रश्न. बोलायचं काम माझं आणि तू "हं आणि ओके" करत फक्त ऐकणार. त्यामुळे कानाच्या जागी उलटा एक C काढला की काम झालं! मग डोकं आणि त्यावर थोडेस्से केस. त्याखाली मान मात्र हवीच! ताठ, सरळ, अगदी तुझ्यासारखीच. एवढं रेखेस्तोवर कागदच संपून जाईल. बघ, झालं की नाही तुझं चित्र तयार? सांगितलेलं ना, सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय!

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 01/18/2021 - 13:30

Permalink

आम्ही लहान पणी एक गाणे म्हणायचो

गुरुजींनी सांगितले १०, मुलांनी काढले ८ मुलिंनी काढले ६ आणि गुरुजिंचे तोंड पहा हा का ना का पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 01/18/2021 - 15:18

Permalink

टायट्यानिक आठवला =))

टायट्यानिक आठवला =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Mon, 01/18/2021 - 15:34

In reply to टायट्यानिक आठवला =)) by टवाळ कार्टा

Permalink

टक्या, शिव शिव शिव शिव! ;))

टक्या, शिव शिव शिव शिव! ;))
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 01/18/2021 - 15:48

In reply to टायट्यानिक आठवला =)) by टवाळ कार्टा

Permalink

भारी आयडिया

टायट्यानिक सारखे चित्र काढायचे असेल तर अजून कोणते कोणते आकडे वाढवले पाहिजेत? पूर्ण तसेच्या तसे चित्र काढायला काही इंग्रजी आकड्यांची पण मदत घ्यावी लागेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Tue, 01/19/2021 - 16:20

In reply to भारी आयडिया by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

आकड्यांची अजिबात गरज नाही

आकड्यांची अजिबात गरज नाही W X Y असले की झाले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बाजीगर on Wed, 01/20/2021 - 06:07

Permalink

@ सौंदाळा...देवा विठ्ठला उचल आता

@ सौंदाळा...देवा विठ्ठला उचल आता .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 01/20/2021 - 09:18

Permalink

मस्त :)

मस्त :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3305 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com