हाय काय अन् नाय काय!
मला चांगलंच ठाऊकाये, की चित्रबित्र मला बिल्कुलच काढता येत नाही. पण तरीही..
एकदा मी तुझं चित्र काढणार आहे. बघंच तू.
सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय!
आधी दहाचा आकडा काढेन. हं पण त्यातला एक जरा पसरटच.
का म्हंजे काय? तुझ्या कपाळावरच्या इतक्या सगळ्या आठ्या मावायला नकोत का?
आणि त्यावरचा शुन्य थोडा चपटा, मला चिडवतानाचा तुझा मिश्किलपणा पुरेपूर भरलेला.
नाकाच्या जागी आठाची तिरकी रेषा काढताना हात जरा मी मोकळाच सोडेन. कित्ती कित्ती तिरकेपणा तो? कळायला नको? शिवाय याचा राग, त्याचा राग, अमका राग, तमका राग, एवढे सगळे रागराग फतकल घालून बसणार तिथं, तर जागा हवीच ना?
त्याच्याखालचा ओठांचा E एकदमच छोट्टासा नि सोप्पा. मिटलेलेच तर असतात कायम ओठ. काय बोलू हा तुझा कायमचा तर प्रश्न. बोलायचं काम माझं आणि तू "हं आणि ओके" करत फक्त ऐकणार.
त्यामुळे कानाच्या जागी उलटा एक C काढला की काम झालं!
मग डोकं आणि त्यावर थोडेस्से केस.
त्याखाली मान मात्र हवीच! ताठ, सरळ, अगदी तुझ्यासारखीच.
एवढं रेखेस्तोवर कागदच संपून जाईल.
बघ, झालं की नाही तुझं चित्र तयार?
सांगितलेलं ना, सोप्पं तर आहे.
हाय काय अन् नाय काय!
वाचने
3311
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
आम्ही लहान पणी एक गाणे म्हणायचो
टायट्यानिक आठवला =))
In reply to टायट्यानिक आठवला =)) by टवाळ कार्टा
टक्या, शिव शिव शिव शिव! ;))
In reply to टायट्यानिक आठवला =)) by टवाळ कार्टा
भारी आयडिया
In reply to भारी आयडिया by ज्ञानोबाचे पैजार
आकड्यांची अजिबात गरज नाही
@ सौंदाळा...देवा विठ्ठला उचल आता
मस्त :)