जमतारा पॅटर्न
नमस्कार मंडळी
नुकताच आलेला अनुभव तुम्हाला सावध करण्यासाठी मांडत आहे.
घराची आवरा आवरी करताना बर्याच वस्तु माळ्यावरुन निघाल्या, त्यातली एक वस्तू मी ओ एल एक्स वर विकायला टाकली होती. सहसा ओ एल एक्स वर जाहिरात टाकली की लोक चॅटवर चौकशी करु लागतात. बहुतेक वेळा स्थानिक लोकच असतात.बहुतेक जण जास्त फोटो वगैरे मागतात किवा किमतीत घासाघीस करतात. मग फोन नंबर मागतात आणि बोलणे होउन वेळ ठरवुन कधीतरी वस्तु घेउन जातात. पेमेंट सहसा कॅश किवा गूगल पे वर होते.
आता या केसमध्ये मला लगेच फोन येउ लागले सगळे लोक हिंदी बोलणारे होते.
पहिला फोन आला. समोरच्या माणसाने किमतीत फारशी घासाघीस न करता सरळ पेमेंट कसे करणार वगैरे मुद्द्याला हात घातला. कॅश घेणार म्हटल्यावर म्हणे आमचा जुने सामान घेण्याचा धंदा आहे आणि पेमेंट फक्त फोन पे किवा गुगल पे ने होईल. त्याला माझी हरकत नव्हती. मग म्हणाला मला कायप्पावर लाईव्ह लोकेशन पाठवा. ह्यात मला संशय आला (पण कारण समजले नाहि, कदाचित कायप्पा पे वर काहितरी फिचर असेल). म्हटले मी मीटींगमधे आहे थोड्या वेळात करेन. फोन ठेवल्या ठेवल्या ट्रु कॉलरवर नंबर चेक केला तर नाव बरोबर दाखवत होता पण नंबर आसामचा होता. मधेच अजुन वेगवेगळ्या हिंदी भाषिक लोकांचे फोन येउ लागले. तेही बिहार्,आसामचे होते.कदाचित आपल्या जाहिरातीला किती रिस्पॉन्स आहे अशी समजूत व्हावी हा हेतू असेल. मागे लहन मुलांचा बोलण्याचा आवाज वगैरे, म्हणजे कोणीतरी कुटूंबवत्सल माणुस फोन करतोय असा समज व्हावा किवा घरबसल्या टेलिकॉलिंग द्वारे पैसे कमवा वगैरे योजना असेल.
काही वेळात त्याचाच दुसरा फोन--पैसे ट्रान्स्फर करतोय अॅक्सेप्ट करा. मी म्हटले थोडा वेळ लागेल. कायप्पावर बघितले तर मेसेज तातडीने डिलीट केला होता. आता माझा संशय बळावला. तिसर्या फोनच्या वेळी त्याने गुगल पे वर मेसेज टाकला चेक केले तर पैसे देण्याचा नव्हे तर घेण्याचा मेसेज होता. कामाच्या गडबडीत ओके दाबले असते तर पैसे क्रेडिट नाही तर डेबिट झाले असते. म्हणजे वस्तू घरीच आणि वरती काही हजाराला बांबु लागला असता. त्यामुळे काही न करता रिक्वेस्ट एक्सपायर होउ दिलि आणि ताबडतोब सकाळपासुन चौकशीचे आलेले सगळे नंबर ब्लॉक केले. ओ एल क्स वरुन जाहिरातही काढुन टाकली. भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली.
तेव्हा कुठलाही ऑन लाईन व्यवहार करताना सावधगिरि बाळगा, घाईगडबडीत किवा हुरळुन जाउन काही करुन नका. कोणाला प्रत्यक्ष भेटल्यावाचुन पैसे वगैरे ट्रान्सफर करु नका. मुळात बचत खात्यात ३०-४० हजारपेक्षा जास्त रक्कम ठेवुच नका .एफ.डी. करुन टाका. असे अनाहूत सल्ले देउन लेख संपवतो.
वर्गीकरण
तुम्ही वाचलात हे तर आहेच.. पण
या बहुचर्चित पॅटर्नचे
थोडी जागरुकता
ह्या लोकांना पकडणे खुप अवघड
In reply to ह्या लोकांना पकडणे खुप अवघड by मराठी_माणूस
अवघड नसावे पण बरेच लोक आहेत.
In reply to अवघड नसावे पण बरेच लोक आहेत. by पिनाक
अवघड नसावे पण बरेच लोक आहेत.
In reply to अवघड नसावे पण बरेच लोक आहेत. by मराठी_माणूस
फडणवीस सरकार असताना याबाबतीत
>> कामाच्या गडबडीत ओके दाबले
In reply to >> कामाच्या गडबडीत ओके दाबले by सतिश गावडे
>>> खरं तर ही जिपेमधील सोयीची
In reply to >>> खरं तर ही जिपेमधील सोयीची by आनन्दा
पण तुमचे ओटीपी वाले सीम
In reply to >> कामाच्या गडबडीत ओके दाबले by सतिश गावडे
लिंक दाबली की स्क्रीन कॉपी कोड येत असेल.
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by राजेंद्र मेहेंदळे
कामाच्या गडबडीत किवा एकिकडे
कामाच्या गडबडीत किवा एकिकडे फोन सुरु असल्याने
असे असताना कोणताही आर्थिक व्यवहार करू नये हा नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. हीच स्थिती वाहन चालवत असताना कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. एकीकडे फोन वर बोलत असताना वाहन चालवणारे रस्तोरस्ती दिसतात. बहुतांश लोकांच्या फोन वर फालतू व्हाट्स ऍप्पची नोटिफिकेशन येत राहतात आणि त्यात महत्त्वाचे असे आर्थिक नोटिफिकेशन हरवून जाते असा अनेक वेळेस अनुभव येताना दिसतो.In reply to कामाच्या गडबडीत किवा एकिकडे by सुबोध खरे
हा नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे.
In reply to कामाच्या गडबडीत किवा एकिकडे by सुबोध खरे
+१०^१०
जिपे किंवा कोणतेही युपिआई
In reply to जिपे किंवा कोणतेही युपिआई by कंजूस
मी विंडोजवाला स्मार्टफोन ओटिपीसाठी ठेवला आहे
In reply to मी विंडोजवाला स्मार्टफोन ओटिपीसाठी ठेवला आहे by धर्मराजमुटके
आयसीआय आणि इतर काहि बँकांचे
In reply to आयसीआय आणि इतर काहि बँकांचे by सतिश गावडे
होय
In reply to होय by धर्मराजमुटके
प्रत्येक वेळी बँकिंग अॅप वापरण्या ऐवजी
In reply to प्रत्येक वेळी बँकिंग अॅप वापरण्या ऐवजी by राजेंद्र मेहेंदळे
या साठी मी 2 अकाउंट वापरतो.
In reply to आयसीआय आणि इतर काहि बँकांचे by सतिश गावडे
हो.
कधी कधी असे वाटते की,
ईंडीअन आर्मी
In reply to ईंडीअन आर्मी by नीळा
हा हा.
In reply to हा हा. by आनन्दा
मला पण असाच फोन आला होता.
In reply to मला पण असाच फोन आला होता. by सुबोध खरे
=))
In reply to मला पण असाच फोन आला होता. by सुबोध खरे
हाहाहा
एक गोष्ट जी मला इथे हायलाईट