नुसतं हो म्हटलं म्हणून जुळत नसतं नातं..
आखून दिल्या वाटेवर रुळत नसतं नातं..
माती हवी मायेची, अन् थोडं खारं पाणी,
सुक्या कोरड्या मनामध्ये रुजत नसतं नातं..
जपलं नाही जीवापाड तर मुकं मुकं होतं..
शब्दाविना स्पर्शाविना फुलत नसतं नातं..
रागावून रुसून वरून गप्प बसलं तरी,
हाकेसाठी एका, आत झुरत नसतं नातं?
दिवस वर्षं सरतात, अगदी कोरडे होतात डोळे
व्रण जरी भरले तरी बुजत नसतं नातं..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4138
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
सुरेख
छान!
मस्त
छान मनोगत आवडले
तुमचं विडंबन येऊ द्या लगोलग..
In reply to छान मनोगत आवडले by ज्ञानोबाचे पैजार
+11
In reply to तुमचं विडंबन येऊ द्या लगोलग.. by आंद्रे वडापाव
सुरेख!
सर्वांना धन्यवाद!