Skip to main content

शेतकरी आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 28/12/2020 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे. "कोणत्याही आंदोलनापथी काही तरी मूळ कारण असते/ दुख्ख असते " आणि ते तसेच या आंदोलनामागे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे धरले तरी यातून एक वेगळाच धोका आहे आणि हे मूळ आंदोलन "कोणीतरी " अपहृत केले आहे काय याबद्दल आता शंका नक्कीच येत आहे ... खालील आरोप खरंच दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत का ? आंदोलनावर केला गेलेला एक गंभीर आरोप म्हणजे यामागे कोण आहे? - दावे तर असणार : त्यात काही आश्चर्या वाटण्यासारखेच नाही आणि वावगं नाही, त्यांचे तत्वात कोणतेहि बाजाराचे खुलीकरने निषिद्ध आहे मग ते यात सहभागी असले तर नवल ते काय . - भारताचं सीमेपलिकडले देश? हा मात्र आरोप मला आता खरा वाटू लागलं आहे शत्रू चा शत्रू तो मित्र या न्यायाने पाकिस्तान ( सेना आणि धार्मिक पाकिस्तानी दोन्ही ) भारताविरुद्ध ( म्हणजे ८०% हिंदू असलेल्या देशाविरुद्ध) खलिस्तानवाद्यांसारख्याना पाठिंबा देता असणार हा आरोप काही नवीन नाही .. याची रूपे खास करून कानडा आणि युनाइटेड किंग्डम मधील शीख खलिस्तानवादी कसे आहेत हे हि नवीन नाही परंतु यावेळी मात्र हे एक "हिंदू आणि शिखांच्यात " फूट पाडण्याचे कारस्थान आहे हे खरे वाटू लागलाय कारण कि कानडा आणियुके पासून दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया सारखया छोटी देशात सुद्धा जे काही "आंदोलन" समर्थक आहेत त्याला एक प्रकारचे "शीख विरुद्ध हिंदू किंवा बाकी भारतीय " असे रूप दिसत आहे.. - बहुतेक आंदोलक शीख का? केरळ, बंगाली, मराठी आणि तामिळ लोक इथे आहेत कि? ते का नाही सहभागी ? - खालसा एड सारख्या संस्थांचा सहभाग ( पहा हा विडिओ हर्षल स्वकुळ या मूळ भारतीय पत्रकार जी आता मेलबर्न येथे राहते आहे तो विडिओ https://www.youtube.com/watch?v=-t7TbWn7V7M ) - पाठिंबा आंदोलन कि फक्त मोदी आणि भाजप हटाव हि मुख्य भूमिका कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते ... समस्त भाजपविरुद्ध मिपाकरांना एक आवाहन भाजपला धोरणांवर विरोध जरूर करा पण हे जे काही घडतंय त्याकडे कानाडोळा करू नका ...

वाचने 43832
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by चौकस२१२

८४ चा उल्लेख किरण खेर नी संसदेत केला होता, ती पण फुटीरतावादी आहे का ? शिखांच्यात आणि हिंदूनमध्ये फूट पाडणे हे आंदोलनाचे ध्येय आहे का ? का काही नालायक आंदोलकांचा धोशा ? कि सोयीस्करपणे एक धागा पकडून सर्व आंदोलकांच्या नावावर खपवण्याची नेहमीची ट्रिक ? पंजाबीत पाट्या का ? -lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच. इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय... - किती शिखांनी ? आंदोलकांच्या किती परदेशी समर्थकांनी ? सरळ सरळ या आंदोलनाचे निमित्त करून शिखांच्यात आणि इतर हिंदू च्यात ( मग ते भाजपावाले असोत कि नसोत) फूट पाडणे हा हेतू आहे हे दिसतंय पण ते जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हीच आंधळे आहात असे खेदाने म्हणावे लागते - तुम्हाला अतिंद्रिय चक्षू प्राप्त झालेत असं दिसतंय. शिखांनी निळी पगडी घालणे आणि गाड्यांवर धार्मिक चिन्हे लावणे यात तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटते. त्वाडा कुत्ता टॉम्मी, साड्डा कुत्ता कुत्ता ? आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करणे ह्यात तुम्हाला कट्टरपणाचा वास येतो ? शेतकरी आंदोलकांशी असहमत आहे, पण आयटी सेल चे नेहमीचे टेक्निक बघून वाईट वाटले.


In reply to by शा वि कु

@ शा. वि. कु. मला उद्या GST विरुद्ध आंदोलन करायचेय पण सर्व आंदोलन कर्ते भगवी लुंगी , कपाळावर भस्म, हातात कमंडलू , गळ्यात रुद्राक्ष माळ घालून आलेत. सोबत पाकिस्तान मुर्दाबाद, मुस्लिमांना हाकला आणि स्वतंत्र हिंदू देशाची मागणी करू लागले तर ते आंदोलन GST विरोधातले वाटेल का?? तिथेही तुम्ही तुमचे हेच लॉजिक वापरणार का??

In reply to by बाप्पू

समाजकंटक आंदोलन आहे की आंदोलनात काही समाजकंटक हे नक्कीच पाहीन. (नाही, तुम्ही म्हणता अगदी तसंच नसलं तरी जवळपास अर्थाचे भाजपचे काही नेते म्हणतच असतात. त्याने ती भाजप पक्षाची ओळख होते का ?)

In reply to by शा वि कु

समाजकंटक आंदोलन आहे की आंदोलनात काही समाजकंटक हे नक्कीच पाहीन.
ओके. म्हणजे तुम्ही हे पाहता तर.. मग नेमके आत्ताच्या आंदोलनामध्ये तुम्ही काळा चष्मा घालून पाहताय का.. नाही म्हणजे तुम्हाला त्यात समाजकंटक असे काहीच कसे दिसत नाहीये?? आणि जे दिसतेय त्याला "धार्मिकतेचे प्रदर्शन " असे गोंडस नाव देतायेत.

In reply to by बाप्पू

मूळ आंदोलन आणि आंदोलकांच्या मागण्या खलिस्तान किंवा हिंदू शीख दिसत नाहीत. आंदोलकांची ऑफिशियल मागणी या बाबतीत नाही आहे. आंदोलकामध्ये शामिल असलेल्या खलिस्तानी समर्थक आणि हिंसक लोकांवर कायद्याप्रमाणे कारवाई व्हावीच. पण त्याचा व्यत्यास सर्व आंदोलक हे खलिस्तानी आहेत/हिंदू विरोधी आहेत हे मला पटत नाही.

In reply to by शा वि कु

"सर्व आंदोलक हे खलिस्तानी आहेत/हिंदू विरोधी आहेत हे मला पटत नाही." शा वि कु असे म्हणलेले नाहीये .. मुद्दा फक्त हाच मांडला आहे कि याला उगाचच "शिखांवरील अन्याय आणि म्हणून खालसा / शीख चिन्ह हे आणले जातंय " पण यात धर्म येतोच कुठे? सांगा? जर आंदोलन शेतीविषयी आहे तर तिथे शीख धर्माचे चिन्ह का दिसते? परत सान्गतो भारतात हे जाणवत नसेल पण जगभरचं शीख संघटना यात भारतांबेहर जी काही निदर्शने करीत आहेत त्यात हे सगळे दिसते! का? काय संबंध? जणू काही हा कायदा शीख धर्मचया विरुद्ध हिंदू भाजपने काढलाय असे अरे आहे ना कायद्या बद्दल प्रश्न आणि आहे ना याचा परिणाम पंजाबात तर काढा ना मोर्चे? जणू काही शीख धर्माचे धर्मयुद्ध असल्या सारखे का वागत? तुम्ही कानडा आणि यूके मधील माथेफिरू शीख समाजाचे ( सर्व नाही काही मोजके) एक एक विधान बघा, दरवर्षी १५ ऑगस्ट ला निदर्शने ...इत्यदि उद्या जर महाराष्ट्रातील शिक्षकांचा किंवा गवंड्यांचे आंदोलन असले तर त्यात "ओम" चिन्ह वापरयाला लागले तर तुम्ही म्हणाल ना कि "यात धर्माचा संबंध काय म्हणून?" किंवा गोव्यात कोकणीच पाहिजे असे जर आंदोलन असेल तर त्यात येशू चा क्रॉस दिसला म्हणाल ना कि प्र्शन धर्माचा नाहीये .. का घुसडता वैग्रे

In reply to by बाप्पू

+ १ हे आंदोलन कृषी कायदेविरोधात असण्याऐवजी मोदींंविरोधातच दिसत आहे.

In reply to by शा वि कु

पंजाबीत पाट्या का ? -lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच. अहो शविकूं. पंजाबी शिखांची मातृभाषा आणि त्याची लिपी पंजाबी आहे हे काय आम्हला माहित नाही का... मूळ धागा कशामुळे काढला ते परत एकदा समजावून सांगतो... - "भारतभरचं" शेतकऱ्यांचे आंदोलन असे ऐकले आणि त्यात काही मागे वाटले नाही परंतु हळू हळू पाहायला लागल्यावर यात काही तरी वेगळे आईच असे वाटू लागलं ( आता तुम्ही मला भाजपचा आय ती सेल मधील म्हणून म्हणणार असाल तर म्हणा खुशाल ) एक कोपऱ्यातल्या देशातील ३-४ त्या क्रमांकाचं गावात सुद्धा आंदोलनाचे समर्थन करणारी पाटी केवळ इंग्रजीत नसून त्यात पंजाबी लिपीत का? कोणाला कळणार आहे येथे पंजाबी ? + कृपाण वैगरे जे शिखांचे चिन्ह आहे ते कशाला? काय संबंध शीख धर्माशी याचा? म्हणजे अशी चिन्ह लावणे असे प्रयत्न ( आणि खास करून कॅनडा तील समजा तर याबद्दल प्रसिद्ध आहे ) हे जाणून बुजून केलं जात आहे असे वटयाला यात जागा आहे मेलबर्न क्रिकेट च्या वेळेला निदर्शनात पंजाबी शिखच का? तुम्हाला माहिती आहे का मेलबर्न सारखया शहरात शिखांपेक्षा कितीतरी अधिक इतर भारतीय आहेत .. सरासरी त्यांचे पण शेतकरी नातेविकं असतीलच कि हो ? मग ते का नाही आले रस्त्यावर का तुमचा आणि रजेश अनि प्रोफेश्वर साहेबांचं हे म्हणणं आहे कि सगळे प्रदेशातील भारतीय भाजपचं आय ती सेल साठीच काम करतात ? तसे असेल तर धन्य आहे

In reply to by चौकस२१२

तुम्हाला किंवा इतर कुठल्याही आयडीला आयटी सेल म्हणले नाही. पण आंदोलक केवळ मीसिंफॉर्मड, मिसगाईडेड नसून देश किंवा धर्म विरोधी आहेत हे दाखवण्याची जी भाजप आयटी सेल ची लगबग असते त्याबाबत बोललो होतो. बाकी पंजाबी लिपिला 'गुरमुखी' म्हणतात. दिलजीत दोसांज ने ट्विटर वर पडलेल्या पद्धतीमुळे परदेशात सुद्धा पंजाबात कायद्याविरुद्ध पाट्या लावत असावेत.

In reply to by शा वि कु

"दिलजीत दोसांज ने ट्विटर वर पडलेल्या पद्धतीमुळे परदेशात सुद्धा पंजाबात कायद्याविरुद्ध पाट्या लावत असावेत." हा संधर्भ काही काळाला नाही परदेशात पंजाब पाट्या? या आंदोलनाच्या संधर्भात लावण्याची काहीच गरज नवहती धार्मिक चिन्ह तर अजिबात नाही ८४ चा उल्लेख ?! संबंध काय? पण मूळ हेतूच जर वेगळं असले तर मग? हे सगळं नसत तर अशी हेतू बद्दल शंका घेतलीच गेली नसती ऑस्ट्रेल्यात इंग्रजीत, फ्रांस मध्ये फ्रेंच मध्ये लावा ना पाट्या ...येथील लोकशाहीचया सीमेत करा जरूर आंदोलन .. कोण नाही म्हणताय?

In reply to by शा वि कु

)शिखांनी निळी पगडी घालणे आणि गाड्यांवर धार्मिक चिन्हे लावणे यात तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटते. " संपूर्ण संदर्भ बघितला नाहीत आपण. मी म्हणले होते कि प्रत्येक भारतीय हिंदू परदेशात काही ओम लावून हिंडत नाही गाडीवर..kiwaa "मी मराठी" किंवा "मी गुजराथी" इत्यादी पण तेच बहुतेक शीख आपला धर्म असा दर्शवतात .. व्यापक दृष्टीने बघितले तर यात काही चुकीचे असे नसले तरी त्यातून आपण काही तरी वेगळे आहोत हे दाखवणे हे दूरदर्शी धोरण दिसते आणि अश्या लांबचं पल्ल्याच्या धोरणाचे दर्शन यात "शुद्ध शेतकरी" आंदोलनाला "शीख आंदोलन असे रूप देऊन उघडपणे दिसतंय .. येथील हिंदू काय आपल्या धर्माबद्दल जागरूक नाही? पण बहुधार्मिक ऑस्ट्रेलियात उगाच त्याला असा धर्म / धर्मचिन्ह फार पुढे पुढे करायची जरुरी वाटत नाही यात हिंदूंची समावेशक वृत्ती आहे ...एवढेच असो एकूण हा धागा काढून चूक केली असे वाटतंय कारण भारतात हे कदाचित एवढे तीवरतेने जाणवले नसेल... मिपावर अमेरिकेत आणि यूरोपात रहाणारे पण आहेत त्यांनी पण आपला अनुभव सांगावा हे माझे निरीक्षण कदाचित चुकीचे असू शकेल

In reply to by चौकस२१२

उद्या मुस्लिम शेतकरी कायद्या विरूद्ध आंदोलन करायला उतरला तर त्यांचा मुस्लिम पेहराव आणि उर्दू भाषेचा वापर करणारच. ती त्यांची ओळख आहे. तमिळ शेतकरी कायद्या विरूद्ध आंदोलनात उतरला तर लुंगी घालून आणि कपाळावर चंदन लावूनच उतरेल आणि तमिळ भाषेचा वापर करत असेल तर गैर काय. आपल्या देशात विविधता आहे प्रतेक भाषिक,धार्मिक वेगळा आहे त्यांचे अलगपण न स्वीकारणे हे समजण्याच्या पलीकडे आहे.

In reply to by Rajesh188

राजेश 188 अत्यंत सहमत. आता परत या वाक्यावरून u टर्न मारू नका. पण मग माझा प्रश्न आहे कि आंदोलनात तुमचे ते मुस्लिम, तामिळ आणि इतर भाषिक लोकं का दिसत नाहीयेत. कि शेतकरी म्हणजे फक्त शीख लोकं च का??

In reply to by बाप्पू

जे आंदोलनात दिसताहेत ते सुद्धा मुठभर आहेत. महाराष्ट्रातून बच्चू कडू ५०-६० फटफट्यांवर समर्थकांना घेऊन आंदोलनात भाग घेण्यासाठी मध्यप्रदेशपर्यंत पोहोचला होता म्हणे. पण नंतर पुढे गेले का सहल संपवून परत आले त्याची बातमी नाही. पण बच्चू मागील २-३ आठवडे महाराष्ट्रातच दिसतोय. ८-१० नाशिकमधून दिवसांपूर्वी ४०-५० मोटारीतून काही जण दिल्लीकडे रवाना झाल्याचे बातम्यात सांगितले. ते पुढे कोठे गेले याची बातमी नाही. इतर सर्व राज्यातून आंदोलनास नगण्य पाठिंबा दिसलाय. भारत बंदचा ही पूर्ण फज्जा उडाला. १ दिवस उपोषण करण्याच्या आवाहनालाही शून्य प्रतिसाद मिळाला. भारतातील पाठिंब्याच्या तुलनेत भारताबाहेरच जास्त पाठिंबा दिसतोय. जिओचे मनोरे तोडणे यातून आंदोलकांचे वैफल्य व निराशा दिसते. आंदोलनास अत्यंत नगण्य पाठिंबा आहे व आंदोलन पूर्ण अपयशी झाले आहे असेच दिसत आहे.

In reply to by Rajesh188

राजेश तुमच्या हट्टी पणा ची हद्द झाली... मूळ मुद्दा अजूनही कळलेला दिसत नाहीये चला तुमचा तर्क वापरू १) ठीक आधी आंदोलनास पंजाबात सुरवात झाली कारण भारतीय शेती प्रधान राज्यपैके एक खूप महत्वाचे राज्य,,,बरोबर? २) वरील कारणामुळे त्यात शीख समाज जास्त असणार? बरोबर आणि त्याअनुषंगाने पाट्या गुरुमुखीतून असणार .. बरोबर आता हे सांगा .. येथे शीख धर्माचा संबंध काय? ८४ ची शीखांविरुद्धची हिंसा याचा संबंध काय? ( माझे आधीचे वक्त्यव्य वाचा ...जर उद्या कर्नाटकातील गवंड्यांचा संप सुरु झाला तर त्यात "ओम" असण्याची गरज काय? किंवा उत्तर प्रदेशातील शिक्षकांचे आंदोलन असले तर लोकसंख्येप्रमाणे त्यात मुसलमान शिक्षक असणार पण त्यांनी जर त्यात ७८६ वैगरे आणले तर त्याचा संबंध धर्माशी जोडला जातो .. कारण नसताना .. आणि मग हे प्रश्न उपस्थित होतात आता जरा याचा भारताबाहेरील संदर्भ बघू ( मी ज्या कारणाने हा धागा काढला तो मूळ मुद्दा?) काही शिखांचा हे धोरण आहे कि भारतात आमच्यावर अन्याय होत आहे आणि जिथे जमेल तिथे भारताबाहेर याचा गाजावाजा करणे.. आपण आपला गाव, शहर , राज्य आणि देश हे सोडून बाहेर काय चाललंय या कडे जरा बघा मग तुम्हाला कळेल कि आझ्यासारखा भारतीय वंशाचा माणूस भारताबाहेर हे जेव्हा बघतो तेव्हा त्यात त्याला हे विनाकरण धर्म आणणे का खुपू लागते .. "आपल्या देशात विविधता आहे प्रतेक भाषिक,धार्मिक वेगळा आहे त्यांचे अलगपण न स्वीकारणे हे समजण्याच्या पलीकडे आहे." अहो कोण नाही समजावून घेत आहे .?.. याचा शेतकरी कायदयाचा संबंध काय ? आता तुम्हाला हे व्यापक पद्धतीने बघाय्चेहक नसले आणि नुसती भाजप विरुद्ध आरडाओरड करायची तर मग बोलयन्यात काही अर्थ नाही हा कायदा / बदल अन्याकाकारक आहे वैग्रे तुमचे मत कळले आहे सर्वांना ... त्यासाठी "हा कायदा कसा चुकीचा आहे" हा वेगळं धागा काढा हवे तर .. मी फक्त हे बघण्यासाठी हा धागा काढला होता कि हे इतर परदेशातील मिपाकरानं जाणवले आहे का? का मी अगदीच तर्कविसंगत बोलतोय ...

In reply to by शा वि कु

पंजाबीत पाट्या का ? -lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच. मी ऑस्ट्रेल्यात म्हणतोय .. येथे इंग्रजीत बसलाय पाहिजेत जेणे करून येथील लोकां हि काय भानगड आहे ते समजेल , येथे गुरुमुखी चा संबंध काय इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय... - किती शिखांनी ? आंदोलकांच्या किती परदेशी समर्थकांनी ? जगभर बघा जी लोक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला भारत विरोधी असतात ते बहुतेक शीख येथे दिवाळी कार्यक्रम ( तो सुद्धा सरकारचहय खर्चने केलं तेवहा त्या सांस्कृतिक कार्यक्रमात ( )बहुल हिंदू हि जमात कशाला ? जरी हे मान्य केले कि बहुसंख्यांक परदेशी शीख भारताचं बरोबर आणि फारच थोडे फुटीरतावादी आहेत तर हे जे "भारताचं बरोबर" असलेलं गप्प का होते ? आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करणे ह्यात तुम्हाला कट्टरपणाचा वास येतो ? एरवी करायला काहीच हरकत नाही पण या आंदोलनात धर्माचा काय संबंध ? आयटी सेल चे नेहमीचे टेक्निक बघून वाईट वाटले. प्रतेय्क जण काही आय टी सेल चा भाग नाही... दरवेळी काही लिहिले कि आय टी सेल! जे दिसल ( येथील दिवाळी कार्यक्रमात फक्त शिखानची विरोधी भूमिका ) अनेक भारतीय हिंदू प्रमाणे शिखांबद्दल प्रचंड आदर आहे पण हे सगळे बघून त्यांचा आंधळेपणा कळला

1) हे आंदोलन शेती विषयक कायद्या विरूद्ध नसून मोदी विरुद्ध आहे. कायदे सरकार नी केले आहेत तर त्या कायद्या विषयी भाष्य पण सरकारी प्रतिनिधी नीच करावे. त्याचे चांगले वाईट परिणाम सरकारी अधिकारी किंवा मंत्री ह्यांनीच करावे. पण की दिसत आहे. भारतीय जनता पक्ष ची यंत्रणा त्या कायद्याच्या समर्थनात उतरली आहे. भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे. सरकार गोड बोलत आहे तर पक्ष खालच्या पातळीवर उतरला आहे.

In reply to by Rajesh188

भारतीय जनता पार्टीनेच कायदे केल्याने त्यांचीच यंत्रणा उतरणार नाही तर ट्रम्प येऊन प्रचार करणार आहे काय ? > कायदे सरकार नी केले आहेत तर त्या कायद्या विषयी भाष्य पण सरकारी प्रतिनिधी नीच करावे. मूर्खपणाचा तर्क आहे. कायद्याचे पालन लोकांनी करायचे असल्याने ह्यावर भाष्य करण्याचा अधिकार १००% लोकांना आहे. त्याशिवाय APMC सारखा दळभद्री सोविएत प्रकारचा कायदा जावा म्हणून कित्येक लोकांनी मागील ३० वर्षांपासून कंठशोष केला आहे. सरकारी कायदा त्याचाच परिणाम आहे. > भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे. मिपावरील सदस्य जे इथे कायद्याच्या समर्थानात लिहीत आहेत ते IT सेल वाले आहेत का ? टीप: आंदोलनाचे मूळ मुद्दे पूर्णपणे निरर्थक आहेत, तर्कशून्य आहेत आणि आर्थिक तर्काच्या दृष्टीने निव्वळ थोतांड आहेत हे आधीच मी तसेच अनेक मिपा करानी विस्तृत पणे लिहून सिद्ध केले आहे. ह्या उलट तुम्ही एकही तर्कशून्य मुद्दा मांडलेला नाही. तुमचा खाजगी मालमत्ता आणि खाजगी व्यवसायांना असेलला विरोध हा तुमच्या डाव्या बुध्दीभ्रष्टतेचा परिणाम आहे असे वाटते, अर्थात त्याला काहीही उपाय नाही. त्यांत तर्क शून्य आहे. डावी बुद्धिभ्रष्टता ह्याने भारतीयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करून अक्षरशः कोट्यवधी लोकांना भुकेकंगाल करून ठेवले आहे. हि डावी विचारसरणी देशासाठी ब्रिटिश सरकारपेक्षा जास्त धोकादायी ठरली आहे त्यामुळे अश्या विचारसरणी विरुद्ध प्रत्येक भारतीयाने वाट्टेल त्या मार्गाने लढा हा पुकारलाच पाहिजे. दिल्ली मधील आंदोलन हे अश्याच डाव्या बुद्धिभ्रष्टतेचा परिणाम आहे आणि सरकारांत मोदी असो किंवा राहुल इतर भारतीय जनतेने बाह्या सरसावून ह्यांच्या पेकाटात जोरदार लत्ता प्रहार हा केलाच पाहिजे.

भारतीय जनता पक्ष ची यंत्रणा त्या कायद्याच्या समर्थनात उतरली आहे. भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे. आणि त्या कायद्याच्या विरोधात लिब्रान्डु, आपटार्ड आणि कम्युनिस्ट उतरले आहेत असे तुम्ही म्हणता आहात का? किंवा तुम्ही कायद्याच्या विरोधात बोलता आहात म्हणजेच तुम्ही या पैकीच एक आहात असा अर्थ निघतोय

कृषी कायद्यांना विरोध करणारे आणि या आंदोलनाला विरोध करणारे, दोन्ही कंपू दीडशहाण्या विद्वानांनी ओसंडून वाहात आहेत. बिजेपी ची आय टी सेल नेहेमीप्रमाणे 'विस्त्रुत' आणि 'तर्कशुद्ध' फेकाफेकी करायला लागली आहे, आणि आंदोलन समर्थकांच्या समाजमाध्यमातल्या पोस्ट वाचल्या तर सरदार लोकांवर निघणारे विनोद सत्यदर्शी असतात का अशी शंका वाटावी इतके 'लॉजीकल' सादरीकरण दिसतय. मग आम्हि, दोन्हि बाजुच्या, त्यातल्या त्यात बॅलेन्स्ड लोकांच्या प्रतिक्रीया वाचल्या, ऐकल्या. आणि आंदोलनामागे काहि तर्क नसुन सरकारप्रती अविश्वास आणि भविष्याची भिती हेच कारण दिसुन आलं. हे कारण दुर्लक्ष्य करावं असं क्षुल्लक अजीबात नाहि. या आंदोलनाबाबतीत म्हणुन नाहि, पण इन जनरल... लोकांना सरकार आणि न्याय व्यवस्थेबद्दल विश्वास, आपुलकी, आत्मियता न वाटणे हि बाब अत्यंत चिंताजनल आहे. सरकारचे काहि निर्णय चुकु शकतात, पण त्यांची नियत साफ आहे/होती हि भावना लोप पावली आहे का? :( न्याय व्यवस्था आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहि हा विश्वास उडाला आहे का? अशा परिस्थीतीत जनता स्वतःला अनाथ समजते... पुढे अनेक समस्या त्यातनं निर्माण होऊ शकतात.

In reply to by अर्धवटराव

> पण त्यांची नियत साफ आहे/होती हि भावना लोप पावली आहे का? :( न्याय व्यवस्था आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहि हा विश्वास उडाला आहे का? हे प्रश्न २०२०मध्ये कुणालाही पडत असेल तर त्यांनी आपले डोके तपासून घेण्याची गरज आहे. सरकारी नियत हि कधीच साफ नसते, नव्हती आणि भविष्यांत सुद्धा असणार नाही. "Eternal vigilance is the price of freedom" हे थॉमस जेफरसन चे वाक्य ह्याच संदर्भांत आहे. कोर्ट ह्या विषयावर तर बोलणे सुद्धा मूर्खपणाचे ठरेल, "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये" हि म्हण आता किमान ५० वर्षे तरी जुनी झाली आहे. पण त्याच बरोबर फक्त पंजाबी शेतकऱ्यांना का बरे सरकारवर इतका अविश्वास वाटत असेल ?

In reply to by साहना

२०२० मधे लोकशाही पद्धतीने चालणारी राज्यव्यवस्था लोकार्थीच असावी हि अपेक्षा म्हणजे डोकं खराब असायचे लक्षण असावे काय? सरकारी नियत कधिच साफ नसली तरी आधुनीक राज्यव्यवस्थेत लोक-कल्याणासाठी आवष्यक त्या प्रक्रिया अंतर्भूत असल्यामुळे लोकांचे जीवनमान आणि किमान हितसंबंधांची यांच्य सुरक्षेची हमी अपेक्षीत नाहि काय? नसल्यास आपण आणखी एका लाल क्रांती टाईप व्यवस्थेकडे लोटल्या जातोय, हे डोकं ठिकाणावर ठेऊन देखील कळात नाहि काय? कोर्ट कचेर्‍यांचे अनुभव कितीही वाईट असले तरी तिच व्यवस्था अधिकाधीक निर्दोष करण्याचे प्रयत्न करणे या पलिकडे काय केल्या जाऊ शकते? सरकार कडुन अपेक्षा करु नये, कोर्टाची पायरी चढु नये.. या व्यवस्था आहेत तशाच राहातील हे गुपचुप मान्य करुन फ्रस्टेशनमधे जगत राहायचं? पंजाबी शेतकर्‍यांना अविश्वास वाटायची कारणं मला तरी कळली नाहित. पण तो खरच फक्त अविश्वास असेल तर हे आंदोलन फार काहि चालणार नाहि. अन्य काहि कारण असतील तर एव्हाना गृहमंत्रालयाने योग्य ठिकाणी दट्ट्या लावणं सुरु केलच असेल.

In reply to by अर्धवटराव

जो इथे bjp चे paid samarthak active आहेत. त्यांना मानधन मिळणे हेच महत्वाचे आहे. आम्ही bjp चे paid पाठीराखे नाही असा भास निर्माण करायचा सरकारी चुकीच्या निर्णयाचा निषेध करायचा नाही . आणि सरकारी निर्णय कसे बरोबर आहेत ह्याचा प्रचार करायचा हेच ह्यांचे काम आहे. कंगना प्रकरणात हीच ट्रिक वापरत होती ही लोक कंगना मुंबई ला pok म्हणाली ह्याचा निषेध ह्यांनी केला नाही . आणि कंगना च्या मताशी सहमत नाही असे डबल ढोलकी मत व्यक्त केले. आणि कंगना साठी रस्तावर येवून बे अक्कल असल्याचा पुरावा पण दिला. ह्यांना वाटत आम्हीच हुशार आहोत पण हे किती डोळे मिटून दूध पीत असेल तरी दुनिया ह्यांना चोरून दूध पिताना बघत च असते.

In reply to by Rajesh188

तुमच्या सारख्या अंधविरोधकांनी कोविड काळात कोणतेही पाडकाम करायला मनाई केली होती तो आदेश धाब्यावर बसवुन हे तोडकाम केले यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही, मुंबईतील इतर अवैध बांधकामे अजूनही ताठ मानेने उभी आहेत त्या बद्दल एक चकार शब्द तुमच्या तोंडातून निघत नाही, या सगळ्या दुतोंडीपणालाही "डबल ढोलकी"च म्हणतात बरं का...
ह्यांना वाटत आम्हीच हुशार आहोत पण हे किती डोळे मिटून दूध पीत असेल
असेच तुम्हालाही वाटते, पण तुम्हीही कितीही डोळे मिटून दूध पिलेत तरी दुनीयेला तुमची फसवेगिरी माहीत झाल्याशिवाय राहत नाही.

In reply to by अर्धवटराव

> २०२० मधे लोकशाही पद्धतीने चालणारी राज्यव्यवस्था लोकार्थीच असावी हि अपेक्षा म्हणजे डोकं खराब असायचे लक्षण असावे काय? लोकशाही हि लोकार्थी पद्धतीनेच चालायला पाहिजे ह्यांत काहीही तर्क नाही. ज्याच्या हातांत लाठी असेल तो म्हशी सुद्धा आपल्याच म्हणेल. आणि लाठी तुम्ही लोकशाही पद्धतीने देतात कि कुणी इमर्जन्सी लावून घेतील ह्यावर ते अवलंबून नाही. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे. "लाल क्रांती" असायला पाहिजे असेही नाही. उदाहरणार्थ नवीन कायदे अत्त्यंत चांगले आहेत. शेवटी सरकारच्या हातातील काठी जितकी छोटी तितक्या आपल्या म्हशी आमच्या गोठ्यांत आम्ही ठेवू शकतो. > तिच व्यवस्था अधिकाधीक निर्दोष करण्याचे प्रयत्न करणे या पलिकडे काय केल्या जाऊ शकते?

म्हणून तर लोक आंदोलन करतात. सरकार आणि न्यायालय न्याय देवू शकत नाहीत म्हणून तर लोकांना रस्त्यावर यावं लागते. आणि आंदोलन करणाऱ्या लोकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर त्या शांतता पूर्ण विरोध चे रूपांतर हिंसक आंदोलनात होते. बंदुकीच्या गोळीने सरकार ला जागं येते. तरी सुद्धा सरकार सशस्त्र फौजेचा वापर करून लोकांना दबावू लागले की फुटीरवादी वृत्ती वाढीस लागते. खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत. त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही. देश द्रोही तर सरकार आणि त्याला जबाबदार असलेली इतर लोक आहेत.

In reply to by Rajesh188

तरी सुद्धा सरकार सशस्त्र फौजेचा वापर करून लोकांना दबावू लागले की फुटीरवादी वृत्ती वाढीस लागते. खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत. त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही.
विदा तर तुमच्याकडे नसेलच. पण किमान आपण कसले (अप्रत्यक्ष) समर्थन करतोय ह्याचा सारासार विचार करावा.

In reply to by Rajesh188

खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत. त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही. देश द्रोही तर सरकार आणि त्याला जबाबदार असलेली इतर लोक आहेत. बरेच लोक मूर्ख असतात. पण काही जण ते ते अट्टाहासाने परत परत सिद्ध करत असतात

In reply to by Rajesh188

रजेश १८८ " खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत. त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही." धन्यवाद एकदा हे हि स्पष्ट केलात हे बरे झाले .. आपली तर आता बोलतीच बंद .. दि एन्ड

Naxall वाद संपवायचा असेल तर आदिवासी लोकांवर होणारे अन्याय धांबवा,त्यांच्या प्रदेशात होणारी खुस खोरी थांबवा. राज्यात जनतेत देश प्रेम निर्माण करायचे असेल तर. छ्त्रपती चा आदर्श घ्या. जनतेवर बिलकुल अन्याय झाला नाही पाहिजे . आणि अन्याय करणारा किती ही मोठा असेल तरी त्याला शिक्षा ही होणारच हा विश्वास ध्या. छत्रपती नी स्वतःच्या मुलाला पण दरबारात हजर करून न्याय निवडा केला होता.त्या वेळेस त्यांनी नात बाजूला ठेवले होते.शेतकऱ्यांच्या भाजी च्या देठला पण हात लावू नका असा सक्त आदेश त्यांच्या फौजेला होता. तेव्हा स्वराज वर संकट आली तेव्हा स्वतःच्या जीवाची पण पर्वा कोणी केली नाही. एक कोणी चुकीचं काम काम करत असेल तर त्या एका व्यक्ती साठी सर्व समाजाला दोष देवू नका. जो आरोपी आहे गुन्हेगार आहे त्याला मात्र सोडू नका. बाँबस्फोट,अतिरेकी हल्ले ह्या साठी पूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवण्याच्या वृत्ती मुळे एका मोठा समाजाचा भाग अलग पडतो. आणि आतासुद्धा शेतकरी आंदोलन शीख लोक करत आहेत आणि कोणी खलिस्तान ची घोषणा दिली असेल पण पूर्ण शीख कसे देशद्रोही आहेत असाच प्रचार सुरू आहे . ह्या असल्या वृत्ती मुळे शीख अजुन देशाच्या मुख्य प्रवाह पासून लांब जातील. ह्याची जाणीव ह्या मुर्खांना नाही. विरोध 1 व्यक्ती नी जरी केला तरी त्याच्या विरोधाचे कारण समजून घेणे सरकारी यंत्रणेचे काम आहे आणि त्याची शंका निरसन करणे हे कर्तव्यच आहे. पंजाबी आणि हरियानी लोक विरोध करत आहे बाकी देश शांत आहे असल्या युक्ती वादाला काडी ची किंमत नाही. त्या 2 राज्यातील लोकांना विश्वासात घेवून त्यांची मत जाणून सरकार नी घेतलीच पाहिजे. त. पण त्यांनाच बदनाम करण्याचे वेड चाळ हे सरकार आणि सत्ता धारी पक्ष करत आहे.

In reply to by टवाळ कार्टा

अशी मराठी लिहून मराठीचे बारा वाजवणे काही खायचे काम नाही. त्यासाठी व्यासंग लागतो.

In reply to by Rajesh188

" बाँबस्फोट,अतिरेकी हल्ले ह्या साठी पूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवण्याच्या वृत्ती मुळे एका मोठा समाजाचा भाग अलग पडतो." हो बरोअबर असे करू नये हि वृत्ती अन्यायकारक ठरेल....१०० % - ८४ साली दिल्ली काँग्रेस ती विसरली होती! - ४८ साली महाराष्ट्रात ती गांधींच्या खुणांनंतर विसरली गेली होती! आता मुस्लमानबद्दल बद्दल बोलाल तर .. हो अगदी त्यांच्यावर मुद्दामून अन्याय करण्याचा कोणाचा हेतू नाहीये परंतु सर्व जगभर त्यांचे वागणे ख्रिश्चनांशी ( श्रीलंकेतील ) मियांमार मधील बुद्धांशी ( अफगाणिस्तानातील बामियान चे बुद्ध आठवा) , , इराणमधील झोरॅष्ट्रियन लोकांशी कसे राहिले आहे ते जरा डोळे उघडे करून पहा आणि ते सुद्धा शतानुशतके आणि मग लोकांना या जमातीचा उबग आणि राग का आला आहे ते पहा ( मी मुद्डमून येथे हिंदूंशी आणि जु लोकांशी त्यांचे संबंध काय आहेत हे लिहिले नाही कारण हिंदू आणि जु दोघेही नालायक आहेतच त्यांनी पिढ्यान्पिढया मुस्लमानवर अन्याय केलं आहे हे गृहीतच धरू) "....आणि कोणी खलिस्तान ची घोषणा दिली असेल पण पूर्ण शीख कसे देशद्रोही आहेत असाच प्रचार सुरू आहे ." पूर्ण शीख जमातीला कोणीही एक माळेचे ठरवत नाहोये , त्यांचे प्रति असलेलं आदर हा सहजासहजी दूर होईल असे वाटत नाही...परंतु त्यात मूठभर असलेल्या शिखांचा ( कॅनडा वगरे स्थित) जो अप्रचार चालू आहे त्याचे कडे हिंदू म्हणून नाही एक भारतीय म्हणून तरी पहा पण तुमचं सारखया अति टोकाच्या डाव्यान्न ते कधीच दिसणार नाही आणि दिसत असले तरी सोयीस्कर रित्या कानाडोळा कार्याचा आहे तुम्हाला. झापड आपण लावली आहेत ... .

In reply to by चौकस२१२

ते डावे नाहीयेत हो. शांतताप्रिय समाजाचे आहेत. तिथे दिल्लीत कसं काही जण नमाज पढून मग शिखांचा फोटो धारण करतात, तीच यांची युक्ति इथे. या सारख्या लोकांसाठी तर लव्ह जिहाद चा कायदा आणावा लागला..

In reply to by चौकस२१२

हे बघा, राजेश हा आयडी "सध्या बाटलेला" चिऊसैनिक आहे. त्यामुळे चिऊसेनेचा अजेंडा तो पुढे रेटत आहे. त्याचे मिपावरचेच लेखन वाचलेत तर त्याच्या भूमिकेतील यु टर्न तुम्हाला कळेल.

बरेच लोक मूर्ख असतात. पण काही जण ते ते अट्टाहासाने परत परत सिद्ध करत असतात

Rajesh188 हा आयडी या आणि अन्य धाग्यांवर चिथावणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्ये करत आहे १. खलिस्तान, काश्मिरी फुटीरवाद्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही. २. जमिनीसाठी शेतकऱ्यांनी रक्तपाताची तयारी ठेवावी. वगैरे वगैरे त्यामुळे या आयडीला तत्काळ योग्य ती समज द्यावी अथवा योग्य ती कारवाई करावी अशी संपादक मंडळाला विनंती.