Skip to main content

कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/12/2020 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज ३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. पूरक विषय: पल्स ऑक्सीमीटरचे गमभन मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! ……………………………………….. करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा : डिसेंबर 2019 : चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते. * 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली. जानेवारी 2020 : * या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला. * हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले. * WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. फेब्रुवारी : बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू. मार्च : * 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर. * HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू. * संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर. * भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद. एप्रिल-मे : * Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता. * रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच. * अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली जुलै : हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन. ऑगस्ट : बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता. सप्टेंबर : जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला. ऑक्टोबर : * Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला). • भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला. नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता. डिसेंबर २०२० : • काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंडने ८ डिसेंबरला लसीकरण सुरु केले. • आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित. ............... ok समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे ! लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा. एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा ! .............................................................................

वाचने 83921
प्रतिक्रिया 183

प्रतिक्रिया

अमेरिकेत फायझरच्या मागोमाग आपात्कालीन मान्यता मिळालेली ही दुसरी लस : ok या लसीची वैशिष्ट्ये: * दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने द्यायचे आहेत • ही वय 18 वरील व्यक्तींसाठी मंजूर केलेली आहे • प्रयोगादरम्यान तिची उपयुक्तता 94% दिसली आहे • साध्या फ्रिजमध्ये साठवता येते

जगात आतापर्यंत तयार झालेल्या लसिंमध्ये कुठलीही लस 100% सुरक्षित नाही. गेली पन्नास वर्षे ज्या लसी बालकांना नियमित दिल्या जात आहेत, त्यांच्यापासूनही अल्पप्रमाणात कधी ना कधी धोके उद्भवलेले होतेच. आता सध्याच्या लसीला जी आपात्कालीन मान्यता दिली गेली यातील तत्त्व समजून घेऊ. पश्चिमी देशांमध्ये साथ फोफावतेच आहे आणि दिवसागणिक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आणि काही ठिकाणी तर भयावह आहे . आता जेव्हा समितीपुढे हा प्रश्न येतो तेव्हा तिला दोन बाजू तराजूत तोलाव्या लागतात. एका बाजूला दररोज डोळ्यासमोर दिसणारे खूप मृत्यू, तर दुसर्‍या बाजूला या लसीमुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांचे अत्यल्प प्रमाण ( उदाहरणार्थ, दहा हजारात दोघांना ऍलर्जिक प्रक्रिया झाली). कुठल्याही उत्पादकाने किंवा विज्ञानाने हा धोका नाकारलेला नाही. म्हणूनच इतर कुठलीही तीव्र अलर्जी असणाऱ्यांनी लस घेऊ नये, या सूचनांसह तिकडे लसीकरण चालू झालेले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/health-ministry-calls-urgent-… ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार सापडला आहे असे बातमीत म्हटले आहे. आता प्रश्न असा आहे की, ज्या लशी देण्याचे ठरले आहे त्या लशी ह्या प्रकारावर सुध्दा परीणामकारक असतील का ?

In reply to by मराठी_माणूस

लंडनमध्ये लॉकडाउन...! ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी म्हटलंय, की कोरोना विषाणूचा नवा अवतार इंग्लंडमध्ये दिसतोय आणि हा अवतार पसरला, तर साथ 'हाताबाहेर' जाईल. विषाणूंच्या 1623 सॅम्पल्समध्ये 20 सप्टेंबर ते 15 डिसेंबर या काळात बदल आढळलेयत. ऑक्स्फर्ड, केंब्रिजसह नऊ विद्यापीठांनी एकत्रितपणे हा अभ्यास केलाय आणि तो नुकताच प्रसिद्ध झालाय. या अभ्यासानुसार, आतापर्यंतचा नोंद झालेल्या SARS-CoV-2 विषाणूमधला हा सर्वात अभूतपूर्व बदल आहे. कोव्हिड19 विषाणू शरीरातल्या पेशींवर जिथं घट्ट चिकटतो, तिथं बदल झाला असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे, असं सोप्या भाषेत सांगता येईल. विषाणूतल्या या बदलामुळं ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय आणि जगभरात तातडीनं याबद्दल सर्वेक्षण करावं लागेल, असंही संशोधकांनी सांगितलंय. विषाणूमध्ये झालेला हा बदल ब्रिटनसाठी धक्कादायक आहे. त्यामुळं, ख्रिसमस रद्द करण्याचा निर्णय ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी घेतलाय. विषाणूच्या नव्या अवतारामुळं लंडन आणि आसपासच्या भागात रुग्णांची संख्या दररोज सातशेनं वाढतेय आणि रुग्णालयांवर कमालीचा ताण येतोय, असं गार्डियन वर्तमानपत्रानं म्हटलंय. एकूण युरोपमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतोय, असं दिसतंय. त्याचे दोन तत्काळ परिणामही झालेयतः 1. लंडन आणि दक्षिणपूर्व इंग्लंडमध्ये आजपासून लॉकडाउन आहे. हा लॉकडाउन कित्येक आठवडे चालेल, असं म्हटलं जातंय. 2. बेल्जियम, इटली आणि नेदरलँडस् या देशांनी ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. फ्रान्स, जर्मनीदेखील ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालतील, असं वृत्त आहे. ही गडबड आपल्यासाठी महत्वाची आहे; कारण आपल्याकडं विकसित होत असलेल्या लशीमध्ये ऑक्स्फर्डचं संशोधन सहभागी आहे. एकीकडं लस विकसित करण्याची घाई आणि दुसरीकडं विषाणूनमध्ये होत असलेला बदल, असं दुहेरी आव्हान वैद्यकीय संशोधकांसमोर आता उभं राहिलंय. (रिसिव्ह as फॉरवर्ड) -दिलीप बिरुटे

लसी तयार करताना याचा अभ्यास झालेला आहे काही प्रथिने याच्या सर्व जातींत टिकून राहतात

In reply to by मराठी_माणूस

या संदर्भात बरेच उलटसुलट वाचनात आले. फायझर व मॉडर्न या उत्पादकांनी अधिक प्रयोग सुरू केले आहेत. RNA तंत्रावर आधारित या लसीमध्ये गरजेनुसार बदल करणे सोपे जाते. बघूयात काय होतंय

विषाणूच्या इंग्लंड मधील नव्या प्रजातीचे नाव VUI-202012/01 असे आहे. त्यात १७ जनुकीय बदल झाले असून त्याच्या टोकदार प्रथिनावरही परिणाम झालाय. त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य झालाय का, यावर अधिक अभ्यास चालू आहे .

सद्य विषाणूच्या जनुकबदलाबद्दल काही मते : १. मुळात हा RNA प्रकारचा असल्याने त्याचे बदल सातत्याने होतातच. २. विषाणू एखाद्या दुबळी प्र-शक्ती असलेल्या माणसाला संसर्ग करतो >>> त्याच्या शरीरात अर्धवट दाहप्रक्रिया होते >>> यातून विषाणूचा उत्क्रांत व्हायचा संदेश मिळतो >> नवा विचित्र प्रकार उदयास येतो.

आकडेवारी आणि माध्यमे हा भाग घोळदार आहे. तो एकवेळ सोडून देऊ. पण…. हे पहा मोठ्या चुकांचे गांभीर्य नसल्याचे उदा: "समितीने १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना मॉडर्ना लस देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता. करोना लसीमुळे होणारे फायदे आणि संभाव्य धोकेही यावेळी सांगण्यात आले होते. यासंबंधी मतदानही करण्यात आलं. यावेळी २०-२० मतं मिळाली. यानंतर १८ डिसेंबरला मंजुरी देण्यात आली." (https://www.loksatta.com/desh-videsh-news/us-doctor-suffers-severe-alle…) योग्य असे हवे: १५ वर्ष>>> १८ वर्षे २०-२० मतं मिळाली.>>> २०-० असे मतदान

कोव्हिशिल्डला जानेवारीत परवानगीची आशा अशी बातमी वाचनात आली. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाले म्हणाले की सीरमने कोव्हिशिल्ड या करोना प्रतिबंध्क लशीचे उत्पादन केले आहे त्याच्या दोन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. चाचण्यातील निष्कर्षाबाबतची माहिती केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे सादर करण्यात आली असून तातडीच्या परवानगीसाठी अर्जही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकदाच्या लशीला सुरुवात करावी असे वाटते. एक नवी सुरुवात पुन्हा एकदा व्हावी जगाची खळखळ पुन्हा पूर्ववत सुरु व्हावी असे आता वाटत आहे. घरातील वयस्कर मंडळी घरात बसून आता वैतागून गेली आहे. कुटुंबेही तशीच वैतागली आहेत. -दिलीप बिरुटे

ऑक्सफर्ड लसीला इंग्लंडची मान्यता. लस वैशिष्ट्य: व्हेक्टर प्रकार २ डोस; १-३ महिन्यांच्या अंतराने साठवण : साधा फ्रीज अन्नपदार्थ वा औषधांची ऍलर्जी असणाऱ्यांना बंदी नाही मात्र लसीतील पूरक रसायनांची ऍलर्जी असणाऱ्यांना बंदी

https://www.loksatta.com/desh-videsh-news/cdsco-expert-panel-set-to-rec… सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय. चला, आता रिलॅक्स राहू. आज नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्व बसूया सॉरी एकमेकांना भेटलं पाहिजे. :) -दिलीप बिरुटे

एकमेकांना भेटलं पाहिजे. :)
हे बाकी महत्वाचे. मान्यता काय 'अटींवर' दिली आहे ते बघूया आता. सर्वांना नववर्ष आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

भारतात तीन लशीना परवानगी मिळाली असे वृत्त आहे, आता या तीन पैकी कोणते व्हर्जन घ्यावे असा प्रश्न नागरिकांना राहील. सरकार त्यात काही ऑप्शन देणार नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे

च्यायला, लशीच्या परिणामकारकतेच्या बाबतीत 'सीरम आणि बायोटेक' मधे जुंपली. ''जगभरात करोनावरील फायझर मोडर्ना आणि ऑक्सफर्डच्या लशींंनी परिणामकारकता सिद्ध केली आहे, त्यामुळे बाकी लशी पाण्यासारख्या सुरक्षित आहेत - अदर पुनावाला मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इंस्ट्यूट.'' '' काही कंपन्यांनी भारत बायोटेकच्या लशीला पाण्याची उपमा दिली आहे, ही टीका अनाठायी असून, आमच्याकडे लशी विकसित करण्याचा मोठा अनुभव आहे, मला एक आठवडा द्या, मी तुम्हाला लस परिणामकारकतेची निश्चित आकड़ेवारी देतो'' - डॉ.कृष्णा इल्ला, भारत बायोटीक. फोकलीच्यांनो, आम्ही सगळे भारतीय जनता लशीच्या भरवशावर घरी कोंडून कांडुन दिवस काढले. आता लस टोचायची वेळ आली तर एकमेकांच्या लशीची परिणामकारकतेचे असे जाहीर वाभाडे काढले तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. वाय झेड साले. -दिलीप बिरुटे (भडकलेला मिपाकर)

प्रा डॉ तुमच्या भावनांशी सहमत आहे. हे असे व्हायला नको आहे. ...................... तिकडे अमेरिकेत एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला गेलाय. त्यांची रुग्णसंख्या अजूनही धो धो वाढतेच आहे. एकीकडे फायझर व मॉडरनाच्या लसी टोचणे सुरू झालेले आहे. या दोन्ही लसीचे दोन डोस ठराविक काळाने घेणे आवश्यक आहे. मात्र अद्याप या लसी सर्व जनतेला पुरतील इतक्या प्रमाणात नाहीत. म्हणून काही तज्ञांनी एक वेगळा पर्याय सुचवलेला आहे. ते म्हणतात की आधी शक्य तितक्या सर्व जनतेला फक्त एक डोस द्या; कालांतराने जेव्हा लसीचा पुरवठा अजून होईल तेव्हा दुसऱ्या डोसचा विचार करावा. मात्र लस-प्रतिकारशक्ती या विज्ञानानुसार असे करणे बरोबर नाही. यातून तिथ्ल्या तज्ञांमध्ये वाद उद्भवलेला आहे.

‘सिरम’ व ‘भारत बॉयोटेक’ या दोघांच्या लसीना ज्या प्रकारे ‘तातडीच्या वापराची मान्यता’ मिळाली त्या संदर्भात नामांकित लसतज्ञ डॉ. गगनदीप कांग यांची दीर्घ मुलाखत इथे आहे : ठळक मुद्दे : १. दोघांनाही दिलेली मान्यता ‘घाईगडबडीतली’च आहे. २. 'भारत बॉयोटेक’ने पुरेशा परिणामकारकतेचा विदा सादर केलेला नाही. ३. म्हणून ती लस (२)स्वतःसाठी डॉ. कांग ‘ट्रायल’ दरम्यानच घ्यायला तयार आहेत; थेट उपयुक्त लस म्हणून नाही.

कोविड होऊन बरा झालेल्या काही रुग्णांचा पुढे पाठपुरावा करून अभ्यास चालू आहेत. अशा एका अभ्यासात सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा सर्व प्रकारच्या आजाराचे रुग्ण अभ्यासले गेले. त्यांच्या रक्तातून अँटीबॉडीज आणि ‘टी’ व ‘बी’ स्मृतीपेशींचा अभ्यास केला गेला. हे तिन्ही घटक मूळ आजारानंतर सुमारे आठ महिने टिकतात, असा निष्कर्ष आहे. तीव्र आजाराच्या लोकांत या सर्व घटकांचे प्रमाण सर्वात जास्ती होते. अशा लोकांना भविष्यात पुन्हा संसर्ग झालाच तर तेव्हाचा आजार सौम्य किंवा लक्षणविरहित असू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. असे निष्कर्ष आपल्यासाठी उत्साहवर्धक ठरतील.

काल कोव्हीड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या

१ कोटीच्या वर

गेली आहे. यापैकी १ टक्का लोकांना जरी पुनः संसर्ग झाला असता तरी हि संख्या एक लाखाच्या वर जाते. याचाच अर्थ असा आहे कि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता( reinfection) फारच कमी आहे ( हा भयगंड आहे)असे तज्ज्ञांचे मत आहे.

"ओडिशा प्रशासनानं लसीकरणाची ही मोहिम रविवारच्या दिवसापुरती थांबवली असून, पहिल्या दिवशी लस घेतलेल्यांच्या निरिक्षणासाठी त्यांनी हा वेळ दिल्याचं कळत आहे." (https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/…) हा दृष्टीकोन अगदी योग्य वाटतो. दमादमानेच पुढे जावे.

कोविड २०२०, कोविड २०२१ ही सुरू झाला.

कोविड १९ हे त्याचे अधिकृत बारसे झालेले नाव आहे. तेच राहील . त्यातून इतिहास समजतो

२०१५ पासून WHO ने नव्या आजारांना नावे देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत. त्यानुसार ही नावे व्यक्ती, प्राणी वा भौगोलिक स्थाने यावरून देऊ नयेत अशी सूचना आहे.

नवा वाइरस सापडलाय?

करोना सार्स 2 हा २०१९ मध्ये नव्याने सापडला व त्याचा आजार कोविड१९ .

लस घेतल्यानंतरही मुखपट्टी का लावायची याची ५ कारणे : १. या लसीची उपयुक्तता १००% नाही २. लसीकरणानंतर दीड महिन्याने संरक्षण मिळेल ३. लसीमुळे 'आजारा'पासून संरक्षण मिळेल, पण नवा संसर्ग वा प्रसार यापासून मिळेल की नाही हे अजून अस्पष्ट. ४. ज्यांना कर्करोग/गंभीर आजार आहेत त्यांना तशीही मुखपट्टी उपयुक्तच असते. ५. जनुकबदल झालेल्या विषाणूपासून संरक्षणास उपयुक्त. चालू लस याबाबत किती उपयुक्त आहे हे संदिग्ध आहे.

Ivermectin या जंतावरील औषधाचा सौम्य कोविड रुग्णांवर एक शास्त्रशुद्ध प्रयोग स्पेनमध्ये पार पडला. रुग्णास लक्षणे जाणवल्यावर ७२ तासांत जर हे औषध एकदाच दिले तर बऱ्यापैकी फरक पडतो असे दिसले. भविष्यात अजून प्रयोग केले जावेत. संसर्ग झाल्यानंतरच्या रोगप्रतिबंधांसाठी याचा विचार होऊ शकतो .

कोविशिल्ड तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग: आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच रेडियोच्या बातम्यांमध्ये ऐकले . मृतांना आदरांजली. कोविशिल्ड लसीचा विभाग सुरक्षित आहे हे चांगले झाले

भारतीय लोकांच्या रक्तात च बेजबाबदार पण ठासून भरलेला आहे. इतकी महत्वाची संस्था असून आग लागते म्हणजे ज्यांच्या वर जी जबाबदारी दिली होती ती त्यांनी योग्य रित्या निभावली नाही. चोकशी होवून जो अधिकारी ह्या हलगर्जी पणाला जबाबदार आहे त्या वर मनुष्य वधाच्या गुन्ह्यापासून बाकी सर्व कलम लावून खटला चालला पाहिजे.

कोविड लसींच्या प्रकारांमध्ये फायझर व मॉडर्नच्या लसी या एम-आरएनए तंत्रज्ञानाने बनवलेल्या आहेत. यानिमित्ताने या नव्या तंत्राचे अन्य काही उपयोग दृष्टिक्षेपात आहेत. एम-आरएनए या नव्या तंत्रज्ञानाचे अन्य काही गंभीर आजारांमध्येही औषध (उपचार ) म्हणून उपयोग होऊ शकतील. त्या दृष्टीने गेली काही वर्षे संशोधन प्रगतिपथावर आहे. या संदर्भात एम-आरएनए हे एक प्रकारे “आयुष्याचे सॉफ्टवेअर’ म्हणून काम करते असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात या संशोधनाला बराच काळ जावा लागणार आहे. काही संशोधने प्रयोगावस्थेत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान खालील आजारांसाठी उपचार म्हणून प्रभावी ठरू शकते : • जनुकीय आजार • एचआयव्ही • काही प्रकारचे हृदयविकार आणि • बऱ्याच अवयवांचे कर्करोग

In reply to by हेमंतकुमार

थोडेसे अवांतर पण सूक्ष्मजीवाबद्दलच आहे. https://glacierhub.org/2020/02/06/ancient-viruses-awaken-as-the-tibetan… सध्या हिमालयाच्या वितळण्या मुळे Aceint सूक्ष्मजीव मुक्त होऊ शकतात.आणि मानवाच्या जीवनचक्रात येऊ शकतात. (चालू घडामोडी)

In reply to by Bhakti

बघायचे भविष्यात काय होतेय..

In reply to by मराठी_माणूस

कठीण आहे. कोणत्या पानावर आहे बातमी ? -दिलीप बिरुटे

अमरावतीची बातमी. लस घेउन पॉझिटीव्ह ?
>>>>> लसी पासून मिळणारी प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते : १. Effective : म्हणजे या शक्तीमुळे संबंधित जंतूच्या संसर्गापासून मोठा आजार होत नाही, परंतु तो जंतुसंसर्ग पुन्हा होऊ शकतो. २. Sterilizing : यामुळे जंतुसंसर्गाचा परिणाम पूर्ण थांबवला जातो. अशामुळे लक्षणविरहित रुग्णही निर्माण होत नाहीत. वरील २ हे आदर्श व अंतिम ध्येय असले तरी क्वचित साध्य होते. अन्य काही मुद्दे माझ्या 19 Jan 2021 - 9:18 am प्रतिसादात आधीच आलेले आहेत

@ डॉ. कुमार , टाईम्स ऑफ ईंडियाने Kurnool Medical College, Kurnool, Institute of Genomics and Integrative Biology, Delhi, and Academy of Scientific and Innovative Research, Ghaziabad यांचा रिइन्फेक्शनबद्दलच्या संशोधनाचे वृत्त दिले आहे. मला वाटते या रिपोर्टचा परिपेक्ष आपण अधिक चांगला उलगडून सांगू शकाल. शिवाय रिइनफेकशनच्या शक्यतांना लसिकरण किती तोंड देऊ शकते आहे या बद्दल ही अधिक जाणून घेणे आवडेल.

मागा , त्या संशोधनाची मूळ पत्रिका वाचली. त्यांनी सुमारे ८६ बदललेल्या विषाणूंचा अभ्यास केलाय. १. विशिष्ट बदलांमुळे विषाणूंना जगायचा फायदा मिळतो. >>> नवे रुग्ण निर्माण. २. हे नवे प्रकार आपल्या अँटिबॉडीजना दाद देत नाहीत. ३. त्यांच्यावर मात करण्यासाठी लसीत काही सुधारणा कराव्या लागतील. mRNA तंत्राच्या लसीत त्या करणे शक्य व सुलभ असते.

Colchicine हे औषध गाऊटच्या उपचारांसाठी वापरले जाते. त्याचा उपयोग कोविडच्या सुरवातीच्या अवस्थेत होऊ शकेल असे गृहीतक आहे. त्या संदर्भात कॅनडातील प्रयोग आशादायी ठरलेत. आता इंग्लंडमध्येही त्याचे प्रयोग अभ्यास सुरू झालेत.

१) covid होवून गेलेल्या व्यस्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंड,आणि covid विरोधी प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारे प्रतीपींड आणि covid विरूद्ध निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे. २) reinfection झालेल्या लोकांची जगात निश्चित किती संख्या आहे.

१)
covid होवून गेलेल्या व्यक्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंड,आणि covid विरोधी प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारे प्रतीपींड आणि covid विरूद्ध निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक
आहे. >>>> covid होवून गेलेल्या व्यक्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंडे ही आजाराच्या तीव्रतेनुसार कमी अधिक असतील. त्यांचा अंदाज करणे अवघड असते. लसीची मात्रा प्रमाणित असल्याने प्रतिपिंडांचे प्रमाण सांगता येते तसेच ती टिकण्याचा कालावधी. अर्थात दोन्हीत काहीशी व्यक्तीसापेक्षता राहील.

रेमडेसि. बद्दल who आणि काही देशांतील तज्ञांत मतभेद आहेत. काही रुग्णालयांत त्याचा उपयोग दिसला आहे

संबंधित रुग्णास बरेच आजार होते व त्यावर औषधे चालू होती. तज्ञ समितीचा अहवाल येईपर्यंत आपण काही प्रतिक्रिया देऊ नये हे मा म.

दुष्काळ कायदा जाहीर झाला तरच आपल्याला अनुदान किंवा धान्य मिळेल. बाकी आपले कुटुंब उपासमारीने मेले तरी फ्यामिन ऍक्ट पास झालेला नाही तोवर आप्ल्याला काहीही मिळणार नाही. बेस्ट च्या कर्मचाऱ्यांना कोव्हीड मुळे मृत्यु झाला तर ५० लाख रुपये भरपाई मिळेल पण डॉक्टरना आपले रजिस्ट्रेशन रद्द करण्याची धमकी देऊन बंद दवाखाना उघडायला लावून रुग्ण तपासायला लावून त्यातून करोना झाला तर ते केवळ करोना रुग्णालयात काम करत नव्हते म्हणून पैसे मिळणार नाहीत. उद्धवा अजब तुझे सरकार

In reply to by सुबोध खरे

डाॅक्टरांची सेना, साॅरी संघटना नसते, हे एक कारण शिवाय, डाॅक्टरांना काय समजते? कंपाउंडरला जास्त अक्कल असते, ही विचारसरणी.... बेस्टच्या कामगारांची संघटना असल्याने, ते जास्त महत्वाचे आहेत, ही पण एक भावना, असू शकते.... एकट्या दुकट्या माणसासाठी, शिवसेना कधीच निर्णय घेत नाही..हे माझे निरीक्षण आहे... रमेश किणी, हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहे...

In reply to by मुक्त विहारि

एकट्या दुकट्या माणसासाठी............
एकट्या दुकट्या माणसासाठी कोणीच निर्णय घेणार नाहीत , अशांसाठी समाजाने उभे रहावे लागते. ते आपल्याकडे होत नाही , म्हणुनच राजकारण्यांचे फावते.

+१ यावरून कायदा हा गाढव आहे ही म्हण आठवली.

सध्या कोविडवरील उपचारांसाठी ज्या अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत त्या इंजेक्शनद्वारे द्याव्या लागतात आणि त्यांचे उत्पादन खूप खर्चिक आहे. त्याला पर्याय म्हणून नाकातून फवाऱ्याद्वारा द्यायच्या सूक्ष्म अँटीबॉडीज(nanobodies) आता विकसित होत आहेत. त्यांचे काही फायदे : १. त्या जिवाणू वा यीस्टमध्ये तयार करतात. २. त्या टिकाऊ असतात व साध्या तापमानातही त्यांची साठवण चांगली होते ३. हे औषध रुग्ण स्वतः घरच्या घरी घेऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती चाचणीद्वारा कोविड-पॉझिटिव्ह निघते तेव्हा लगेचच हा फवारा चालू केल्यास आजार फोफावत नाही. सदर संशोधनाचे प्रमुख अमेरिकास्थित डॉ. आशिश मंगलिक आहेत. त्यांच्या संशोधनास शुभेच्छा !

कोविड रुग्णांच्या रक्तचाचण्यापैकी एका चाचणीसंबंधी व्यक्तिगत संपर्कातून विचारणा झाल्याने त्याबद्दल लिहितो. या चाचणीचे नाव सीआरपी असे आहे. हे एक प्रथिन असून ते आपल्या यकृत व रक्तवाहिन्यांच्या आवरणात तयार होते. जेव्हा शरीरात कोणत्याही कारणाने दाहप्रक्रिया होते तेव्हा त्याच्या रक्त पातळीत बऱ्यापैकी वाढ होते ( अगदी शंभर किंवा त्याहून अधिक पटीपर्यंत देखील). समजा एखाद्याला जंतुसंसर्ग झाला आणि त्याचे सीआरपी वाढलेले दिसले. आता त्या रुग्णावर उपचार सुरू केले जातात. पुढे काही दिवसांनी सीआरपीची पुन्हा मोजणी केली जाते. जर शरीरातील दाह कमी होत असेल तर ही पातळी सुद्धा कमी झालेली दिसते. अशा तऱ्हेने नियमित अंतराने ही पातळी मोजल्यास त्याचा रूग्णाच्या उपचारांसाठी चांगला उपयोग होतो.