Skip to main content

१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/11/2020 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्‍या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट ! १. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे. इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्‍यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल. २. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत. मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे. दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्‍याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्‍याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच ! ३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा. आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते ! आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन ! ४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल. तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही ! हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे. ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल ! _________________________________________ हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्‍या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला. इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही. काही भाग संपादित - मिपा व्यवस्थापन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 74075
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

कपोलकल्पित घटना आहेत असे इथले कुणीही सदस्य मानत नाहीत हे आपल्या अजून लक्षात आले नाही काय ?
हो, खरंय. पण आणखी काही नवीन माहिती किंवा विधान अस्तित्वात नाही की ज्याने हे त्यांचे मत बदलेल. सो व्हाय बॉदर ? "मच्छिंद्रनाथांनी न्यूटनच्या नियमांच्या कक्षेत नसलेल्या बलांचा उपयोग केलेला असू शकतो" इथे तार्किक त्रूटी का गामांना दिसत नाही ? दिसत असावी, पण त्यांची श्रद्धा आहे. कोणत्याही युक्तिवादाने त्यात काही फरक पडणार नाही.
आज इथले सन्माननीय सदस्य, आमच्या एका सोप्या ध्यानपद्धतीची प्रचितीच न घेता ती परस्पर बाद ठरवून; आमच्याशी नाहक वाद घालून आम्हाला अहंकारी, अतींद्रीय शक्तींची माहिती नसलेले, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशी दूषणे देऊन त्या कथा प्राणपणाने का जपत असावेत बरे ? याचाही मागोसा घ्यावा असे सुचवेन.
त्यांची मर्जी.
मग त्यांनी त्या कथा जशाच्या तश्या पुढे सरकवाव्या आणि पुढच्यांनी त्या विचार न करता डायरेक्ट `हृदयस्थ कराव्या ' ! नाही तर या चित्त-चक्षू चमत्कारिक कथा हजारो वर्षानंतर आज २५ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या? याचा आपण विचार करावा.
ह्रद्यस्त करावे किंबहुना वाचावे कि नाही हा ज्याचा त्याचा चॉईस.इतर लोक्स कथा म्हणून न वाचता इतिहास म्हणून वाचतात, आपणही तसेच वाचले पाहिजे असे नाही.

In reply to by शा वि कु

ह्रद्यस्त करावे किंबहुना वाचावे कि नाही हा ज्याचा त्याचा चॉईस.इतर लोक्स कथा म्हणून न वाचता इतिहास म्हणून वाचतात, आपणही तसेच वाचले पाहिजे असे नाही.
लोक त्या कथा इतिहास म्हणून वाचत नाहीत तर चमत्कार मानतात ! आणि अशा चमत्कारांना अतींद्रिय शक्ती वगैरे म्हणून आणखी झोल करुन ठेवतात. मग असे हातचलाखीचे खेळ करणारे लोक त्यांना सिद्ध वाटायला लागतात. कोणत्याही अडाण्याला डोक्यावर घेऊन ते नाचायला कमी करत नाहीत. ओशो हे एकमेव सिद्ध होते की ज्यांनी युगानुयुगे चाललेल्या या अनिष्ट परंपरेला छेद देऊन, मी कोणताही चमत्कार करत नाही हा एकच चमत्कार करतो ! असं म्हणायचं साहस केलं. आणि सत्योपलबद्धीचा मार्ग सूज्ञपणे विचार करणार्‍या सुशिक्षित आणि बुद्धीमान लोकांना मोकळा करुन दिला.

In reply to by संजय क्षीरसागर

आमच्या अल्पमतीने आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन असे नम्रपणे नमूद करतो

बाप रे संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले? मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?

In reply to by सुबोध खरे

आमच्या अल्पमतीने

आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन

असे नम्रपणे नमूद करतो

बाप रे संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले? मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?

लेखकाने सुरुवातीला "ही लेखमाला उत्तरोत्तर रंगत जाणार" अशी बढाई मारली होती. मात्र लेखमाला दुसऱ्या भागातच फुस्स झाली. लेखकाच्या स्वयंघोषित सिद्धत्वाची मजा घेणारे चार प्रतिसाद सोडले तर तिकडे कुणी मिपाकर फिरकलेही नाहीत. दोन भागातच दी एंड झालेल्या या लेखमालेचा पहीला भाग लेखकाच्या सुदैवाने टीआरपी खेचतोय. त्यामुळे लेखक विनम्र झाला आहे . :)

In reply to by संगणकनंद

एकूण प्रतिसादावरुन आपला अध्यात्मिक अभ्यास लक्षणीय असावा असे दिसते शिवाय आपण अंतर्यामीही आहात असा नवाच उलगडा आज आम्हाला झाला आहे. आपल्याला तीन प्रश्न विचारले होते ते पुनरुधृत करतो. व्यक्तिगत प्रतिसादाच्या देण्याच्या आपल्या व्यस्त उपक्रमातून जरा वेळ काढून आपण याचा खुलासा कराल काय ? १. अष्टावक्राचा सांख्ययोग सत्याचा आविष्कार कसा करतो ? याविषयी आपले विचार इथे मांडावे त्यामुळे इतरांनाही आपल्या ज्ञानाचा लाभ घेता येईल. २. अष्टावक्रानं स्वरुपोलब्धीसाठी कोणती साधना सांगितली आहे ? याचा ही उलगडा तो श्लोक नेमका कोणत्या अध्यायात आहे ते सांगून करावा. ३. आपण केलेल्या आध्यात्मिक लेखनाच्या लिंक्स देता येतील का ? तसे केल्यास उत्तम कारण केवळ आपल्या प्रतिसादांवरुन आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेचा अंदाज बांधणे आम्हास तरी उचित वाटत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

ते उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या लेखमालेचे काय झालं? तुम्ही तर स्वतःच दुसऱ्या धाग्याकडेही फिरकेनासे झालात. याच धाग्यावर टीआरपी खेचत राहणार काय? की तिसरा भाग ही टाकणार? तुमच्या प्रश्नांचे म्हणाल तर अष्टवक्र वाचले/कळले म्हणजेच अध्यात्म कळले असे आहे काय? आणि तुम्हीही बोटं गुंफून आणि लोलक बनवून फार मोठा तीर मारलेला नाही. याच धाग्यावर अर्धवटराव आणि गांपै सारख्या अभ्यासू आयडीने तुमच्या अध्यात्मातली हवा काढली आहे.

In reply to by संगणकनंद

अत्यंत विद्वत्तापूर्ण प्रतिसाद दिला होता याचे विस्मरण झाले काय ? की आपल्याला अष्टावक्र कोण आणि त्याची संहिता काय याची कल्पना नसतांना आपण असे केले ? किंवा एकूणात आपल्याला कशातच काही गम्य नाही ? ही पोस्ट आध्यात्मिक आहे हे आपल्यासारख्या विद्वान व्यक्तीला लक्षात आले नसेल असे आम्हास वाटत नाही. तरी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळून स्वतःचाच अवमान करुन घेऊ नये आणि आपण केवळ निर्बुद्ध प्रतिसाद देत नाही तर आपण ही आध्यात्मिक उंची गाठली आहे हे सर्वांना दाखवून द्यावे असे आम्हास वाटते. १. अष्टावक्राचा सांख्ययोग सत्याचा आविष्कार कसा करतो ? याविषयी आपले विचार इथे मांडावे त्यामुळे इतरांनाही आपल्या ज्ञानाचा लाभ घेता येईल. २. अष्टावक्रानं स्वरुपोलब्धीसाठी कोणती साधना सांगितली आहे ? याचा ही उलगडा तो श्लोक नेमका कोणत्या अध्यायात आहे ते सांगून करावा. ३. आपण केलेल्या आध्यात्मिक लेखनाच्या लिंक्स देता येतील का ? तसे केल्यास उत्तम कारण केवळ आपल्या प्रतिसादांवरुन आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेचा अंदाज बांधणे आम्हास तरी उचित वाटत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

अजून दोन चार भाग येऊ द्या, मग विचार करेन तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा. तुमची ज्ञानार्जन करण्याची कळकळ पुरेशी दिसत नाही मला. तुम्हाला याच धाग्यावर टिआरपी खेचायचा आहे कारण लेखमाला दोन भागातच फुस्स झाली आहे हे एव्हाना तुम्हाला कळले आहे.

In reply to by संगणकनंद

आम्ही पुरते हरखून गेलो आहोत. त्यात आपण म्हंटले आहे :
तुमच्या प्रश्नांचे म्हणाल तर अष्टवक्र वाचले/कळले म्हणजेच अध्यात्म कळले असे आहे काय?
याचा अर्थ अष्टावक्राबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही असा घ्यावा की आपण त्याही पलिकडची उंची गाठली आहे ? याची नेमकी कल्पना येत नाही. सध्या पुरता तरी तुम्हाला अष्टावक्राबद्दल काहीही माहिती नाही असा तर्कपूर्ण अर्थ निघतो. पण आपण त्याही पलिकडे आहात असे आपल्या एकूण अविर्भावावरुन वाटते. तरी आपण केवळ निर्बुद्ध प्रतिसादक नसून एक पोहोचलेली व्यक्ती आहोत याची प्रचिती इथे आपले अध्यात्मिक आकलन दाखवून देऊ शकाल काय ? आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी सत्योपलब्धीसाठी नक्की कोणता मार्ग निवडावा आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगा कारण आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही कितीही विदेहत्वाच्या आणि सिद्धत्वाच्या बाता मारल्यात तरी तुमचे मडके कच्चे आहे. जीवन कळले हे समजण्याची एक सोपी खूण आहे: जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो तुम्ही काळ परवा पासून प्रतिसादात नम्रपणा आणू पाहत आहात ही चांगली गोष्ट आहे. मात्र अजूनही इतरांप्रती असलेला तुच्छताभाव गेलेला नाही हेच हा प्रतिसाद दर्शवतो. आणि शेवटी, खरंच तुम्हाला अध्यात्म कळत असतं किंवा सत्याचे ज्ञान झालेले असते तर मी तुमच्या धाग्यावर काय लिहीतो याने तुम्हाला फरक पडला नसता. मात्र तुम्ही मला काहीच कळत नाही हे सिद्ध करायला कंबर कसली आहे. म्हणून म्हणतोय, मडके कच्चे आहे.

In reply to by संगणकनंद

१. मात्र तुम्ही मला काहीच कळत नाही हे सिद्ध करायला कंबर कसली आहे ?
छे, छे आपण कच्च्या मडक्याची तमा बाळगू नका. तुम्ही सर्वज्ञानी आणि अंतर्यामी आहात. अष्टावक्राची संहिता काय आहे याची सुतराम कल्पना नसतांना आपण डायरेक्ट `अनावधानस्य सर्वत्र' वर बिनदिक्कत प्रतिसाद देता हे खरे भयमुक्ततेचे लक्षण आहे हे इथे दाखवून द्याच असे सुचवेन. अर्थात, त्यासाठी तुम्हाला आपली अफाट ज्ञानक्षमता, किमान या बेसिक गोष्टींचे उत्तर देऊन करावी लागेल : आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी सत्योपलब्धीसाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण आमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.

In reply to by संजय क्षीरसागर

तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
अध्यात्मिक जाण ही तुमच्यासाठी दाखवण्याची गोष्ट आहे, आणि ती दाखवण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. तुम्ही ज्याला अध्यात्मिक जाण समजताय ते खरे तर पुस्तकी पांडित्य आहे. अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे, प्रदर्शन मांडण्याची नव्हे.

In reply to by संगणकनंद

आपण आपले गुह्य इथे फॉककन (एका क्षणात) विदेहत्व ! उघडे केले आहे. आपले अध्यात्मिक आकलन मांडायला आपल्याला धड चार ओळी सुद्धा लिहिता येत नाहीत त्या ही कुठून तरी कॉपी पेस्ट कराव्या लागतात असे मात्र आम्ही कदापि म्हणणार नाही कारण आपली नम्रताच इतकी अमाप आहे की त्याचे श्रेय आपण स्वतःकडे घेऊ इच्छित नाही. आपल्याला विदेहप्राप्ती कशी झाली याची नोंद आता मिपा इतिहासात कायमची राहिल. आमचे मडके कच्चे असल्याने आपण कृपया खालील खुलासे करावे असे सुचवतो : १. निदान सुरुवातीला तरी साधना दीर्घकाल करावी लागते असे म्हणतात. आपल्या साधनेमुळे इतरांची गैरसोय होते यावर साधकाने कशी मात करावी ? थोडक्यात, आम्हाला आपल्या भयमुक्त किंवा लोकलज्जा शून्य स्थितीची कल्पना आली आहे पण सतत वाजणार्‍या दाराने, साधनेत येणार्‍या विक्षेपाला आपण कसे तोंड दिले ? २. साधनेसाठी आपण शोधलेल्या दिव्य स्थानी व्यक्ती दीर्घकाल व्यतीत करत असेल तर घरातल्या लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी औषधोपचार करुन घेण्याचे दडपण आणले नाही का ? शिवाय लोक इतके अज्ञानी आहेत की त्या मार्गाने एखादा विदेहत्त्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो म्हटल्यावर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे समजून मानसोपचारतज्ञाकडे नेण्याचे सुद्धा कमी करणार नाहीत, अशा वेळी साधकाने संयम राखून साधनेच्या स्थानी कसे अढळ रहावे ? आपल्या दिव्य अध्यात्मिक आकलनाने संकेतस्थळावरच्या साहित्याचा दर्जा अचानक उंचावला आहे असे वाटून जे साधक आपल्या मार्गाने जाऊ इच्छितात त्यांना आपल्या खुलाश्याने फार मोठा दिलासा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे, असे नमूद करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

माझं वाक्य होतं: पोटाला तडस लागली असेल आणि काही कारणाने शौचास होत नसेल तर जेव्हा शौचास होते तेव्हाही मोकळं झाल्यानंतर विदेहत्व अवस्था प्राप्त होते. यात एक विदेहत्व हा शब्द सोडला तर तुम्ही वर लावलेल्या गुर्‍हाळाचा लवलेश तरी आहे का? तुंबलेला रेटा सुटला की मोकळे वाटते इतक्या सरळ अर्थी वापरला होता तो शब्द. तुम्ही उगाच त्यात अर्थ शोधत बसला आहात. आणि प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिलेच पाहीजे या तुमच्या स्वभावामुळे उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात. असलं कसलं तुमचं विदेहत्व आणि सिद्धत्व जे एका आयडीच्या प्रतिसादांनी अस्वस्थ होतंय?

In reply to by संगणकनंद

१. आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी विदेहत्त्व जाणण्यासाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण आमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.

In reply to by संगणकनंद

उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?
अरे, एवढ्यात आपल्या मनात दुभंग निर्माण झाला काय ? आपल्या मनात हा विचार आलाच कसा ? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. ज्याला तुम्ही कच्चे मडके ठरवले आहे त्याचे बेसिक प्रश्न आपल्यासारख्या सर्वज्ञ व्यक्तीला, अज्ञान उघडे पडण्याची भीती घालतात ? हे आम्हाला तरी शक्य वाटत नाही. किंबहुना लोकलज्जा आपल्यासारख्या पोहोचलेल्या माणसाला असायचे कारणच नाही हे आपण आपल्या प्रतिसादातून वेळोवेळी दाखवून दिले आहे. तरी आता माघार नाही असा ज्ञानी व्यक्तिसारखा निर्धार दाखवून, आपला शून्य वकूब आहे आणि पिंका टाकण्यापलिकडे आपल्याला काहीही जमत नाही असे समजणार्‍या लोकांना, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या ज्ञानाने दिपवून टाका.

In reply to by संजय क्षीरसागर

आपला शून्य वकूब आहे आणि पिंका टाकण्यापलिकडे आपल्याला काहीही जमत नाही असे समजणार्‍या लोकांना, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या ज्ञानाने दिपवून टाका.
हे लोक म्हणजे तुम्ही आणि तुमचा चेला/डुआयडी असलेला अजून एक आयडी असे दोघेच. बरोबर ना? तुम्हा दोघाव्यतिरीक्त अजून कुणी असतील तर सांगा. :) आणि ज्ञानाने दिपवून टाकण्याच्या गोष्टी ओशोंची चार पुस्तके वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पुस्तकी पंडीत करतात. असेच लोक नुसता खळखळाट करतात. आपण किती विद्वान आणि ज्ञानी आहोत हे दाखवण्यासाठी मिसळपाववरील धाग्यांची यादी देतात.

In reply to by संगणकनंद

आपण सूज्ञ आहात, वरील आयडीने वारंवार मिपा धोरण ४ आणि ५ यांचे उल्लंघन केलेले आहे. त्यांचा आयडी, एकंदर वाटचाल आणि या धाग्यावरचे प्रतिसाद आणि त्यामागचा उद्देश बघून वेळीच समज देऊन मिपाचे अधःपतन थांबवावे. ४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी. ५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल - उन्मेष दिक्षीत

In reply to by उन्मेष दिक्षीत

खरं तर तुम्ही संक्षी यांचेच डुआयडी आहात आणि त्यांची बाजू सावरायला इथे उगवता असा दाट संशय आहे. पण तरीही तुम्ही स्वतंत्र आयडी असण्याचीही शक्यता गृहीत धरुन तुम्हाला संशयाचा फायदा देऊन लिहीतो. सिद्ध महाराजांवर कुणी काही लिहू नये म्हणून तुमच्या जीवाचा आटापिटा चाललेला असतो. तुमची अपेक्षा आहे की तुमच्या गुरु महाराजांना मिपावर मोकळे रान मिळावे. त्यांनी येता जाता ज्ञानी पुरुषांना कमी लेखावे, इथल्या सदस्यांच्या मताची आणि विचारांची खिल्ली उडवावी, त्यांचा तुच्छतादर्शक शब्दात उल्लेख करावा. मात्र तुमच्या गुरु महाराजांना मात्र कुणी काहीच बोलू नये अशी तुमची अपेक्षा आहे. तुमचे गुरु महाराज करतात ते अध्यात्म आणि बाकीचे करतात ते वैयक्तीक प्रतिसाद. आता तुम्हाला गंमत सांगतो. तुम्ही हा जो मिपा धोरणाचा अभ्यास करुन जो प्रतिसाद लिहीला आहे त्याची वेळ आहे 26 Nov 2020 - 1:34 pm तुमच्या गुरु महाराजांनी त्यांच्या लेखाचे विडंबन असलेल्या धाग्याला एक प्रतिसाद दिला आहे त्याची वेळ आहे 27 Nov 2020 - 1:40 am म्हणजे बरोबर बारा तासांनी. काय म्हणतात तुमचे गुरु महाराज या प्रतिसादात? हे पहा:
सर्कस मधला ज्योकर हा कसबी कसरतकारांपेक्षाही उच्च दर्जाचा असतो. आधीच्या कसरतवीरांनी दाखवलेलं कमालीचं कौशल्य सुद्धा किती जुजबी होतं हे तो `विडंबनात्मक शैलीनं दाखवून' लोकांना हसवतो. असे आमचे निरिक्षण आहे पण विदुषकाकडे काहीही वकूब नसतांना त्यानं विडंबनाचा प्रयत्न केला तर ते निव्वळ माकडचाळे ठरतात असे आमच्या अल्पमतीला वाटते. अर्थात, अशा माकडचाळ्यांना सुद्धा दाद देणारे लोक असतात पण त्यांचाही आकलनाचा वकूब तितकाच असतो असे नमूद करावेसे वाटते.
केवळ आपल्या धाग्याचं विडंबन केले म्हणून ते माकडचाळे? आणि त्या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या वाचकांच्या आकलनाचा वकुबही तितकाच? जर संक्षीचा डुआयडी नसाल तर तुम्हीही विचार करा. आणि सांगा, कोण चुकतंय.

In reply to by संगणकनंद

आता मोकळे रान तर चक्क संपादकांनी दिलंय तुम्हाला. लगे रहो ! गवींनी सांगितल्याप्रमाणे खेळीमेळीचे वातावरण आणि एकमेकांच्या मतांचा आदर करु आता आपण. मी संक्षींचा डु-आयडी नाही, तुम्ही ट्रॅ़क करुन बघा माझे प्रोफाइल. आणि तुमचे आयडी नाव अगदी कसेही आणि काहीही असले, तरी काय फरक पडतो ? तुम्ही एकदम ओरिजिनल त्याचू आहात. पण तरीही तुम्ही स्वतंत्र आयडी असण्याचीही शक्यता गृहीत धरुन तुम्हाला संशयाचा फायदा देऊन लिहीतो. >> डोंट वरी तुमच्या सारख्या ओरिजिनल आयडी ना हे विश्वास ठेवणे जड जाऊ शकते. पण याच्यासाठी, माझा कांदा लिंबू यांना लिहिलेला प्रतिसाद बघावा. - उन्मेष दिक्षीत

In reply to by उन्मेष दिक्षीत

गुरुचे विदेहत्व एका विडंबनाने कसे फुस्स झाले आणि त्यांचा खरा चेहरा कसा दिसला हे लिहीलेला भाग सोयिस्कर दुर्लक्षीत केला आणि डुआयडीचा स्वतःला सोयिस्कर मुद्दा फक्त उचलून धरला. जसा गुरु तसा चेला. :)

In reply to by संगणकनंद

आय एम ऑनर्ड ! विडंबनाच्या धाग्यांचा कुणाला करमणुकीशिवाय काही उपयोग नसतो. आणि मी त्याचू सारखा संबंध नसताना तिथे जाऊन विडंबकाला नाही नाही ते बोलून गोंधळ घातलेला नाही. फरक समजून घ्या.

In reply to by उन्मेष दिक्षीत

आणि मी धाग्यावर गोंधळ घालतो हा गोड गैरसमज मनातून काढून टाका. गोंधळ घातला की आयडी ब्लॉक होतो, विचारा तुमच्या गुरुजींना. :)
विडंबनाच्या धाग्यांचा कुणाला करमणुकीशिवाय काही उपयोग नसतो.
तुमच्या गुरुजींच्या धाग्यांचाही कुणाला करमणुकीशिवाय काही उपयोग नसतो.

In reply to by संगणकनंद

१. आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी विदेहत्त्व जाणण्यासाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन. ३.
उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?
उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहे याची कल्पना अजून आपल्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला आली नसेल असे नाही. त्यामुळे उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते. आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.

In reply to by संजय क्षीरसागर

बाता अध्यात्माच्या मारता आणि एका विडंबनाने व्यथित होऊन त्या विडंबनाला माकडचाळे म्हणता आणि त्या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या सदस्यांच्या आकलनाचा वकुब काढता. खरे अध्यात्म आपके बस की बात नही. तुम्ही फक्त ओशोंची पुस्तकं वाचा आणि इथे येऊन त्यावर लेख लिहून आपले पांडीत्य प्रदर्शीत करा. कुणी काही शंका घेतली तर त्याला मुर्खात काढा, त्याच्या तोंडावर तुमच्या इथल्या लेखांची यादी फेका. त्यातच तुमचे सौख्य सामावलेले आहे.

In reply to by संगणकनंद

१. आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी विदेहत्त्व जाणण्यासाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
३. उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?
उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहे याची कल्पना अजून आपल्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला आली नसेल असे नाही. त्यामुळे उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते. आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.

In reply to by संजय क्षीरसागर

हे मात्र आता सांगाच कारण सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सर्वांची म्हणजे फक्त तुमची. झालंच तर तुमच्या चेल्याची. तुम्हा दोघांव्यतिरीक्त इतरांची नावे सांगा.
आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे
सर्वांना
दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
सर्वांना शब्दासाठी वरचेच स्पष्टीकरण. अध्यात्मिक जाण ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही हे मी याआधी दोन वेळा सांगितलं आहे. मात्र ओशोंची चार पुस्तक वाचून आपलं पुस्तकी पांडीत्य दाखवण्यालाच अध्यात्माची जाण समजणार्‍या आयडीला हे कदापी समजणार नाही. अशी संधी तुम्हालाच लखलाभ होवो.
उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहे
तुम्ही सोडले तर अजून कुण्णाकुण्णाचा गैरसमज होणार नाही त्यामुळे काळजी नसावी. आणि कुणाचा गैरसमज झालाच तर मला फरक पडणार नाही.
उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते.
पितळ उघडे पडण्याची भीती तुमच्या सारख्या बेगडी अध्यात्मवाल्याना असते. एक विडंबन सहन झाले नाही, लगेच त्याला माकडचाळे म्हणून मोकळे झालात आणि तिथे प्रतिसाद देणार्‍या लोकांचा वकुब काढलात. खरं तर त्या प्रतिसादाने तुमच्या बेगडी अध्यात्माचाच वकुब दिसला.
आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.
लोकांमध्ये कोण कोण येतं? फक्त तुम्हीच. तुमचं तुम्ही बघा. संभावनेची भीती तुमच्यासारख्या बेगडी अध्यात्मवाल्यांना असते. एक विडंबन सहन झाले नाही आणि गप्पा मारता सिद्धत्वाच्या आणि विदेहत्वाच्या.

In reply to by संगणकनंद

१.
सर्वांची म्हणजे फक्त तुमची. झालंच तर तुमच्या चेल्याची. तुम्हा दोघांव्यतिरीक्त इतरांची नावे सांगा.
तसे समजा. पण फॉक्कन यापलिकडे आपले अध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही हे आता सिद्ध झाले आहे. २.
अध्यात्मिक जाण ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही हे मी याआधी दोन वेळा सांगितलं आहे .
एकूणात आपल्याकडे काहीच नाही हे सुद्धा कळले. ३.
एक विडंबन सहन झाले नाही, लगेच त्याला माकडचाळे म्हणून मोकळे झालात आणि तिथे प्रतिसाद देणार्‍या लोकांचा वकुब काढलात
आपल्याही प्रतिसादांची त्यापरता वेगळी स्थिती नाही.

In reply to by संगणकनंद

आपण इथे जो त्याचू डान्स दाखवला तो पुरेसा आहे. इथून पुढे असा प्रकार करु नये इतकी समज यावी अशी अपेक्षा.

In reply to by संगणकनंद

स्वतःला सिद्ध आणि विदेही म्हणून घोषीत करणार्‍या धागाकर्त्यांनी माझे एक आठवड्यापूर्वीचे प्रतिसाद उकरुन काढून खाजवून खरुज काढली त्यामुळे तोल ढळला.

आत्ताच ब्रुस ली फाईट्स विडिओ बघत होतो. मिक्स्ड मार्शल आर्ट्स बघतो कायम. तर कंपेर्ड टु टुडेज मार्शल आर्ट्स, ब्रुस लीचे पंचेस, किक्स, टाईमिंग आणि स्पीड बघताना असं वाटतं कि त्याला विदेहत्व जाणवत असावं. मायकल जॅक्सन चा डान्स किंवा फेडरर ला जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं खेळताना, असं वाटत होतं कि हि इज जस्ट फ्लोटिंग अराउंड द कोर्ट, इतका एफर्ट-लेसनेस मला वाटतं तेव्हाच येऊ शकतो जेव्हा कळत नकळत विदेहत्व जाणवतं. मला वाटतं कोणत्याही अ‍ॅक्टिविटीमधे जेव्हा हे साधतं तेव्हाच निष्प्रयास आणि क्रिएटिविटी येते.

In reply to by उन्मेष दिक्षीत

मैफिल रंगते तेंव्हा गायकांना दुसराच कुणी तरी परफॉर्म करतोयं असं वाटतं कारण त्या क्षणी त्यांना विदेहत्त्व गवसलेलं असतं. पण मैफिल संपली की ते पुन्हा व्यक्तिमत्त्वाच्या दायर्‍यात घेरले जातात आणि देहबद्ध होतात. माझ्या ध्यानपद्धतीनं, कोणतंही कौशल्य आत्मसात न करता तुम्ही विदेही होता कारण आपल्याला देह नाही, तर फक्त देहाची जाणीव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा. आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील !

असं काहीही होत नाही.

इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे. जे होतं ते फक्त तुमचा मन विचलित झाल्यामुळे मनात चालू असलेले विचार हे सबकॉन्शस होतात (जाणिवेच्या पातळीपर्यंत पोचत नाहीत.) तुम्ही त्याकडे पाहणे सोडले कि विचार परत जाणिवेच्या पातळीवर येतातच. यामुळेच या साधनेचा सुरुवातीला ज्यांना फायदा होतो असे जाणवते त्यांना हा फायदा काही दिवसांनी अजिबात होत नाही असे लक्षात येईल. मनात विचार न येणे आणि मन विचलित झाल्याने विचाराची जाणीव न होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि हि गोष्ट लक्षात न घेता संक्षी यांनी एवढा मोठा जडजंबाल शब्दांचा डोलारा रचुन ठेवला आहे. बाकी त्यांच्या इतके हुशार साधक या दुनियेत कोणीही नाही. बाकी सगळे संत महंत ओशो वगैरे भंपक आहेत

असे त्यांचे मत आहे.


In reply to by सुबोध खरे

आपल्याला देह नाही, तर फक्त देहाची जाणीव आहे. कशाला फोका मारताय? देह नाही फक्त जाणीव आहे तर लांब तलवार शरीरातून आरपार जाईल त्याची तुम्हाला फक्त जाणीव होईल परिणाम काहीही होणार नाही?. मग येणारे रक्त आणि जाणारा प्राण काय फक्त जाणीव आहे ?

In reply to by सुबोध खरे

नैनं च्छिंदंती शस्राणी असं गीतेत म्हटलंय त्याचा अर्थ काय असेल ? याचा अभ्यास करा . आणि मग लेख वाचा म्हणजे लेखाचा आषय कळू शकेल.

In reply to by सुबोध खरे

इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे.
ह्या निमित्ताने तुम्हीही मारुतीच्या बेंबीत बोट घातले म्हणा कि डॉक्टरसाहेब! (ह.घ्या)

In reply to by कानडाऊ योगेशु

ती इतके दिवस `विविध मार्गानी केली ' याचा अत्यंत तर्कशुद्ध निष्कर्ष असा की त्यांनी सांगितलेली साधना केलीच नाही असा होतो. पण सध्या इतके स्पष्ट लिहिण्याला आम्ही आवर घातला आहे आणि अत्यंत नम्रपणे त्यांना सविस्तर प्रतिसाद दिला आहे हे आपल्याही लक्षात आले असेल.

In reply to by सुबोध खरे

आपण साधना केलीत याबद्दल प्रथम अभिनंदन !
१. इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे.
साधनेत विविध मार्ग नाहीत ती एकमार्गी आहे. एखाद्यानं स्वतःचा नवा मार्ग शोधला तर तो त्याचा मार्ग असेल, माझा नाही असे नमूद करतो. त्यामुळे निर्विचार स्थिती आली नाही तर तो दोष साधनेला देता येणार नाही असे वाटते. २.
जे होतं ते फक्त तुमचा मन विचलित झाल्यामुळे मनात चालू असलेले विचार हे सबकॉन्शस होतात (जाणिवेच्या पातळीपर्यंत पोचत नाहीत.)
हे आपले नवे स्वयंशोधित संशोधन आहे असे नम्रपणे नमूद करतो. मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबल्यावर मन विचलित होण्याचा प्रश्नच येत नाही. थोडक्यात, शांततेचा अर्थच नो-माईंड असा होतो, जे उरतच नाही ते विचलित होऊ शकत नाही.
३. तुम्ही त्याकडे पाहणे सोडले कि विचार परत जाणिवेच्या पातळीवर येतातच ?
तुम्ही कशाकडे पाहात होतात ? त्याच्याकडे म्हणजे नक्की कुठे ? कारण नजर समोर असल्यावर जे काही समोर आहे ते (मनानी दृष्य-प्रक्षेपण थांबवल्यामुळे) स्पष्ट दिसायला लागतं . नॉर्मली आपलं पाहणं हे मनातून होणार्‍या दृष्य-प्रक्षेपणामुळे अच्छादित झालेलं असतं. समोरचं क्रिस्टल क्लिअर दिसणं हा एक अपूर्व अनुभव आहे.
४. यामुळेच या साधनेचा सुरुवातीला ज्यांना फायदा होतो असे जाणवते त्यांना हा फायदा काही दिवसांनी अजिबात होत नाही असे लक्षात येईल.
एकदा तुम्ही म्हणता की सुरुवातीला सुद्धा विचार थांबले नाहीत आणि नंतर म्हणता की काही दिवसांनी अजिबात फायदा होणार नाही. या विधानात अंतर्विरोध आहे असे आपल्याला जाणवले नाही का ? एकदा निर्विचार स्थिती आली की ती कायम पुन्हा-पुन्हा येत जाणार आणि दिवसेंदिवस व्यक्ती जास्त सजग आणि बुद्धीमान होत जाणार कारण अविरत चाललेली मेंटल अ‍ॅक्टीविटीच मेंदूला विश्रांती मिळू देत नाही.
५. मनात विचार न येणे आणि मन विचलित झाल्याने विचाराची जाणीव न होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
मन विचलित न झाल्याने विचाराची जाणीव न होणे ? हा आपला कमालीचा स्वयंशोध आहे असे नम्रपणे नमूद करतो. जिथे विचारच नाहीत तिथे मन कसे येईल ? जर मनच नसेल तर विचलित काय होणार ? थोडक्यात, आपण स्वतःची काही तरी शक्कल लढवून वेगळाच प्रयोग केला आहे त्यामुळे आपल्याला ` मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं ' या तत्क्षणी येणार्‍या प्रचितीचा अनुभव आला नाही. जो इथे इतरांना आला आहे त्यामुळे ती ध्यानपद्धती पूर्णपणे वेरिफाय झाली आहे. ________________________________ असो, बाकी आपण सवयी प्रमाणे व्यक्तिगत शेरेबाजी केली आहे त्याकडे आम्ही नेहेमीप्रमाणे दुर्लक्ष करत आहोत.

In reply to by संजय क्षीरसागर

मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं

हे आपणच ठरवलेले कुभांड आहे. त्याचा आपल्याकडे काही तरी पुरावा आहे का? f MRI हे एक आधुनिक तंत्र आहे जे मेंदूची (मनाची) सक्रियता दाखवते. सिद्ध लोक जेंव्हा समाधी अवस्थेत जातात तेंव्हा त्यांच्या मेंदूची अवस्था काय असते ते या तंत्राने दिसू शकते. असलं काहीही न करता मेंटल ऍक्टिव्हिटी थांबवली असण्याच्या फुकटच्या थापा मारू नका

In reply to by सुबोध खरे

आयला हा विषय गुंतागुंतीचा आहे. भावातीत ध्यानाची स्थिती गॅमा वगैरे किरणांच्या मदतीने मोजता येते असे म्हणतात. तसा काही अभ्यास लेखकाने केला आहे का?

In reply to by गवि

सॉरी गॅमा नव्हे, काहीतरी बीटा थिटा वेव्ह अभ्यास करता येतो असे म्हणतात. निरंजन घाटे यांचे संभव असंभव या बाबतीत बरेच काही सांगते. त्यांनी भावातीत ध्यान करणाऱ्या अनेक लोकांच्या मेंदूचा अभ्यास केला गेला आहे असे लिहिले होते.

In reply to by आनन्दा

आमच्या अपूर्ण म्याग्नम ओपसची आठवण झाली.
सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे !

In reply to by सुबोध खरे

आपण शोधक नजरेने वाचले तर मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबल्याची ग्वाही इथे आठ जणांनी दिली आहे (गवि, शविकु, टर्मिनेटर, डिबी, चित्रगुप्त, स्त्री सदस्या व त्यांची आई आणि त्यांची अबोध कन्या). त्यामुळे आपली मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली नाही याचा अर्थ आपण सांगितलेली साधना केली न करता स्वयंशोधित साधना केली हा आमचा कयास आता खरा ठरला आहे असे म्हणायला हरकत नाही. अर्थात, आपल्याला ताप आला आहे हे पेशंटला डॉक्टरच्या आधी कळते, हा आमचा बाळबोध दावा आपल्यासारख्या सुबोध व्यक्तीला कळण्यात काही दुर्बोधता नसावी असे आम्हाला वाटते. तद्वत, मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली की नाही यासाठी आपण जी अत्याधुनिक तांत्रिक चाचणी नमूद केली आहे त्याची आमच्या मते तरी गरज नाही. भूक लागली आहे हे आपल्याला कळल्यावर जेवून घेणे श्रेयस आहे, अशा वेळी यंत्राने तपासणी करुन खातरजमा करुन घेणे या कामात एकतर निष्कारण खर्च वाढेल आणि `यंत्राने जेवू नका' असे सांगितले तर `जेवू की नको ' ? असा फुकटचा संभ्रम होईल , असे आमच्या अल्पमतीला वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

* आपली मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली नाही याचा अर्थ आपण सांगितलेली साधना न करता स्वयंशोधित साधना केली हा आमचा कयास आता खरा ठरला आहे असे म्हणायला हरकत नाही

In reply to by संजय क्षीरसागर

एफ एमआरआय मशिनद्वारे इतर कोणत्या ध्यानपद्धतीची टेस्ट झाली आहे काय ? त्यातून काय निष्पन्न झाले आहे ? नसेल झाली तर हा निकष सर्वठिकाणी लावायला हवा का ? (तुम्ही पण एकूणच अध्यात्म या विषयाबद्दलच साशंक आहात का (माझ्यासारखे) का फक्त संक्षिच्या अध्यात्माबाबत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.)

In reply to by शाम भागवत

ती झाली असल्यास, जग्गी वासुदेव या व्यक्तीची झाली का त्यांनी शिकवलेल्या ध्यान पद्धतीची इतरांवर झाली यावर स्पष्टीकरण गरजेचे आहे. अवांतर- जग्गी वासुदेवांचा ग्रहणातल्या खराब होणाऱ्या खाण्याचा "प्रयोग" (म्हणे. आम्हाला काय त्यात प्रयोगासदृश्य काहीही वाटले नाही.) पाहून त्यांच्या बद्दल असलेला साशंक भाव बळकट झाला.

In reply to by शा वि कु

मी फक्त माहिती टेबलावर आणली. ज्याला रस असेल तो शोधेल अशा अपेक्षेत. 😀 अवांतरांत तर मला बिलकूल रस नाही. परत एकदा 😀

In reply to by शाम भागवत

ते मिळाल्यास डॉक्टर साहेबांनी ते पेपर्स मिळाल्यास योग्य प्रकारे निष्कर्ष काढलेत का हे जमल्यास सांगावे.

In reply to by शा वि कु

जालावर भरपूर दुवे उपलब्ध आहेत. ज्यांना हवंय त्यांनी जरूर शोधावे. मी दुवे अजिबात देणार नाही. संक्षीनि सज्जड पुरावे दाखवावेत कि माणूस विचारशून्य होतो. फुकटची थापेबाजी फार झाली.

In reply to by शा वि कु

The Meditative Mind: A Comprehensive Meta-Analysis of MRI Studies https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4471247/ 4 weeks of pranayama significantly reduce the levels of anxiety and negative affect, and that these changes are associated with the modulation of activity and connectivity in brain areas involved in emotion processing, attention, and awareness. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7253694/ हे घ्या आयते दुवे. जिज्ञासूंनी आत्मनिर्भर व्हावे अशी विनंती

In reply to by शा वि कु

१.
एफ एमआरआय मशिनद्वारे इतर कोणत्या ध्यानपद्धतीची टेस्ट झाली आहे काय ? त्यातून काय निष्पन्न झाले आहे ? नसेल झाली तर हा निकष सर्वठिकाणी लावायला हवा का ?
आपलं विदेहत्त्व समजणं म्हणजे सिद्धत्व आहे त्यामुळे देहाची किंवा त्याच्या कोणत्याही अवयवाची चाचणी करणारे आणि करवून घेणारे दोघेही निर्बुद्ध प्रयास करत आहेत ही उघड गोष्ट उपरोक्त लेख वाचून आपल्या लक्षात यायला काही हरकत, नाही असे आम्हास वाटते. २.
तुम्ही पण एकूणच अध्यात्म या विषयाबद्दलच साशंक आहात का (माझ्यासारखे) का फक्त संक्षिच्या अध्यात्माबाबत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय
`स्वतःचा स्वतःला बोध नसणे ' या दुर्बोध अवस्थेलाच अध्यात्मात मूढता म्हटले आहे असे आमचे अल्प आकलन सांगते. यावर ओशोंचे हे विधान आपल्याला पटेल असे वाटते : मूढ का वास्तविक अर्थ मूर्ख नही है | मूढ भी समझता तो है लेकिन तब तक वक्त हाथसे निकल गया होता है | थोडक्यात, आपण सत्य आहोत हे मूढाला समजत नाही असे नाही कारण सत्यच चराचर व्यापून आहे त्यामुळे तो ही सत्यच आहे, पण तो स्वतःला व्यक्ती समजतो आणि त्याच्या धरणा इतक्या मूर्खपणाच्या असतात की आपण सत्य आहोत की नाही हे तो मशीनला विचारतो ! आणि त्याला इतकी साधी गोष्ट समजेपर्यंत मृत्यू समीप येऊन ठेपलेला असतो. मृत्यूची दहशत मग त्याला मृत्यू देहाचा झाला तरी `देहात कुणीही नाही ' हा उलगडा होण्यापासून वंचित ठेवते, असे आमचे अवलोकन आहे. उपरोक्त लेख आपण नजरेखालून घातल्यास लेखाचा विषय आणि कंटेंट हाच संदेश देतो हे आपल्या चाणाक्ष बुद्धीला समजणे अवघड नाही, असे आम्हास वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

कशाला फुकट फोका मारताय परत परत . आपले मन विचारशून्य झाले आहे याचा

एकतरी पुरावा

आहे का आपल्याकडे ? तो पुरावा दाखवा नाही तर भंपक वाद घालणं थांबवा उगाच शब्दांचे डोंगर रचून लोकांना कायम शेंडी लावता येणार नाही लक्षात ठेवा.

In reply to by संजय क्षीरसागर

आपलं विदेहत्त्व समजणं म्हणजे सिद्धत्व आहे त्यामुळे देहाची किंवा त्याच्या कोणत्याही अवयवाची चाचणी करणारे आणि करवून घेणारे दोघेही निर्बुद्ध प्रयास करत आहेत ही उघड गोष्ट उपरोक्त लेख वाचून आपल्या लक्षात यायला काही हरकत, नाही असे आम्हास वाटते.
या लेखात तुम्ही एक प्रयोग दिला आहे, ज्याचे दोन परिणाम होतात असं तुमचं म्हणणं आहे- १) विचारांचा कोलाहल थांबतो. २) विदेहत्वाचा अनुभव येतो. यातील १) चा अनुभव मला आला. त्याबाबत आभारी आहे. २) चा अनुभव नाही आला. या प्रयोगपलीकडे अदेहत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न या लेखात मला नाही दिसला. त्यामुळे हा लेख वाचून अदेहत्व किंवा सिद्धत्व पटणे शक्य नाही, जर २) चा अनुभव नाही आला तर. अदेहत्व आहे, सिद्धत्व हे संपूर्ण सत्य आहे वैगेरे मला पटत नाही. केवळ तुम्हाला पटते म्हणून आणि वारंवार ते सत्यच आहे म्हणल्याने माझ्या मतात फरक पडणे शक्य नाही. अवयवांची चाचणी करणारे निर्बुद्ध, हे म्हणून तुम्ही कोणताही नवा युक्तिवाद करत नाही आहात. शरीराशिवाय अस्तित्व असते ह्या गोष्टीची स्क्रुटीनि "देव असतो की नाही" या पायावर करा, तर तुम्हाला माझा मुद्दा लक्षात येऊ शकतो. तिथे ज्या प्रकारच्या empirical पुराव्यांवर तुमचा जोर होता, तो इथे नावालाही दिसत नाही, उलटपक्षी धुडकावलेला दिसत आहे. केवळ देवतेची अनुभूती झाली, दत्तगुरु स्वप्नात आले, असल्या दृष्टांताने तुमचा जितका देवावर विश्वास बसणार नाही तसाच कोणत्याही अनुभवाने माझा विदेहत्वावर विश्वास बसणार नाही, जोवर देहाशिवाय कोणत्याही प्रकारचे अस्तित्व किंवा अनुभव शक्य आहेत हे पटत नाही तोवर.
आपण सत्य आहोत हे मूढाला समजत नाही असे नाही कारण सत्यच चराचर व्यापून आहे त्यामुळे तो ही सत्यच आहे, पण तो स्वतःला व्यक्ती समजतो आणि त्याच्या धरणा इतक्या मूर्खपणाच्या असतात की आपण सत्य आहोत की नाही हे तो मशीनला विचारतो ! आणि त्याला इतकी साधी गोष्ट समजेपर्यंत मृत्यू समीप येऊन ठेपलेला असतो. मृत्यूची दहशत मग त्याला मृत्यू देहाचा झाला तरी `देहात कुणीही नाही ' हा उलगडा होण्यापासून वंचित ठेवते, असे आमचे अवलोकन आहे.
कोणत्याही तर्कांशिवाय आणि पुराव्यांशीवाय कितीही रिपिटेशन केली तरी या मुढाला तरी काही पटणार नाही. उलटं या मूढाचा तिसराच विश्वास बळावत चाललाय, कि कोणत्याही कारणाशिवाय आणि अत्यंत सीमित काळामधल्या अस्तित्वाला उद्देश्य आणि अमरत्वाची झालरं लावून स्वतःला गंडवण्याचा प्रकार म्हणजे अध्यात्म होय.
उपरोक्त लेख आपण नजरेखालून घातल्यास लेखाचा विषय आणि कंटेंट हाच संदेश देतो हे आपल्या चाणाक्ष बुद्धीला समजणे अवघड नाही, असे आम्हास वाटते.
खरे आहे. पण स्वतःला आणि इतर काही सदस्यांना झालेल्या अतार्किक अनुभवांमुळे त्याहून अतार्किक निष्कर्ष काढला गेला आहे असे अस्मादिकांचे मत पडले.

In reply to by शा वि कु

धागालेखक इतर लोकांना त्यांच्या देवविषयक, अतिंद्रीय शक्तीविषयक श्रद्धा बाळगण्यासाठी मुर्खात काढतात. या लोकांच्या श्रद्धा त्यांना "अनुभव आला" याच मतावर आधारीत असतात. तिथे लेखक रिचर्ड डॉकिन्सचे काका असल्याच्या अविर्भावात तुटून पडतात. आणि स्वतः मात्र त्यांनी जे सांगितले त्याचा चार लोकांना "अनुभव आला" तर वैज्ञानिक सत्य पुढे आणल्याची बोंब ठोकतात. नियंत्रीत चाचणी हा प्रकार या विज्ञानवादी लेखकाच्या गावीच नाही. त्यामुळे चार मिपाकरांना "अनुभव आला" हे इतकेच त्यांच्या दाव्याच्या वैज्ञानिक सत्य असण्यासाठी पुरेसे आहे. अतिशय हास्यास्पद प्रकार आहे हा. लोकांच्या श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणून हीणवताना आपण स्वतःच एक श्रद्धा पसरवून तिची कसलीही चाचणी न करता केवळ "लोकांना अनुभव आला" म्हणून ती वैज्ञानिक सत्याचे निकष पुर्ण करते म्हणून बोंब ठोकत आहेत. भोंदू बाबांबद्दल ऐकले होते, आता भोंदू विज्ञाननिष्ठ व्यक्तीबद्दलही वाचायला मिळत आहे. आनंद आहे.

In reply to by शा वि कु

१.
अदेहत्व आहे, सिद्धत्व हे संपूर्ण सत्य आहे वैगेरे मला पटत नाही. ....तुमचा जितका देवावर विश्वास बसणार नाही तसाच कोणत्याही अनुभवाने माझा विदेहत्वावर विश्वास बसणार नाही, जोवर देहाशिवाय कोणत्याही प्रकारचे अस्तित्व किंवा अनुभव शक्य आहेत हे पटत नाही तोवर.
ज्यात देह वावरतो आहे, ज्यात करोडो ग्रहमाला, चंद्र-सूर्य-तारे फिरतायंत ते काय आहे ? हा प्रश्न स्वतःला शांतवेळी विचारुन पाहा. त्या अथांग आणि अंतर्बाह्य व्यापणार्‍या पोकळी शिवाय अस्तित्त्वाची निर्मिती-चलन-आणि लय शक्य आहे काय ? या साध्या गोष्टीचं उत्तर शोधा. म्हणजे देहापलिकडे अस्तित्त्व आहे हे तुम्हाला कळेल . वास्तविकात सत्य आता, या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर आहे पण तुम्हाला ते मान्य नाही कारण विचारांचं प्रोजेक्शन त्यावर झाल्यामुळे इतकी उघड गोष्ट दिसत नाही हा खरा प्रश्न आहे. माझी साधनापद्धती फक्त एकच काम करते, मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवणं ! त्यामुळे तुमची नजर समोरचं सत्य पाहते आणि तुम्हाला विदेहत्त्वाचाही अनुभव येतो. २.
कोणत्याही तर्कांशिवाय आणि पुराव्यांशीवाय कितीही रिपिटेशन केली तरी या मुढाला तरी काही पटणार नाही. उलटं या मूढाचा तिसराच विश्वास बळावत चाललाय, कि कोणत्याही कारणाशिवाय आणि अत्यंत सीमित काळामधल्या अस्तित्वाला उद्देश्य आणि अमरत्वाची झालरं लावून स्वतःला गंडवण्याचा प्रकार म्हणजे अध्यात्म होय.
नेमका हाच इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स आहे ! लेखमालेतला दुसरा लेख वाचलात तर ते तुमच्या सहज लक्षात येईल. ३.
खरे आहे. पण स्वतःला आणि इतर काही सदस्यांना झालेल्या अतार्किक अनुभवांमुळे त्याहून अतार्किक निष्कर्ष काढला गेला आहे असे अस्मादिकांचे मत पडले.
मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली हा तुमचा अनुभव आहे, तर्क नाही ! काही काळ साधना केलीत तर 'आपण मूढ नसून सत्य आहोत ' हा उलगडा होणं अवघड नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं ' या तत्क्षणी येणार्‍या प्रचितीचा अनुभव आला नाही. जो इथे इतरांना आला आहे त्यामुळे ती ध्यानपद्धती पूर्णपणे वेरिफाय झाली आहे.
माझ्यामते इथे अनुमान काढायला घाई होते आहे असे वाटते. मिपाकरांनी कुतुहल म्हणुन प्रयोग केला असावा. हे म्हणजे जिम लावल्यानंतर काही दिवस वाटणार्या उत्साहासारखे आहे. ह्याचे सातत्य किती दिवस राहते हे पाहणे योग्य ठरेल. योगायोगाने आपल्या मातोश्रीच आपल्या पध्दतीचे अनुकरण करताहेत तेव्हा त्यांचा अनुभवसातत्यच योग्य ते अनुमान काढायला उचित ठरेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

`पेशंटने औषध घेतले की नाही ? ' याची तो रोज सकाळी उठून चवकशी करतांना आमच्या तरी पाहण्यात नाही. आपलाही तसा अनुभव नसावा, असे आम्हास वाटते. याच रितीने औषध न घेतल्याने जर पेशंट दगावला तर डॉक्टरच्या नांवाने शंख करता येईल का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारुन पाहावा, असे आपणास सुचवेन. ध्यानपद्धती निर्विचारतेकडे नेते हे सिद्ध झाले आहे आता लोकांनी रोज ध्यान करुन `देहात कुणीही नाही ' याची प्रचिती घेतली का ? हे पाहणे म्हणजे त्यांच्या सारासार बुद्धीवर संशय घेणे होईल असे आम्हास वाटते आणि आमच्या भिडस्त स्वभावामुळे आम्हास तसे करण्यात स्वतःचे आयुष्य खर्ची घालावे असे वाटत नाही हे सुद्धा तितक्याच नम्रपणे सांगावेसे वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

ध्यानपद्धती निर्विचारतेकडे नेते हे सिद्ध झाले आहे कुठे झालंय? कुणी केलंय? काही दुवा पुरावा ? एकीकडे अशी विधाने करायची आणि मग पुरावा द्या सांगितलंय तर भंपक वाद घालत राहायचं. इतका दांभिकपणा पुरे झाला साधं सरळ आहे-- नुसतं बोटाला बोट लावून

आपले मन विचाररहित होते याचा सज्जड पुरावा द्या

नाही तर थापा मारताय म्हणून मान्य करा.