सूर्यस्वप्न...
मिहिराने पुसले हळूच निशेला, भेटशील का ग तु मावळतीला.... मोहरून गेली निशा त्या हाकेला, स्वप्नात रंगली दिनकराच्या ओढीला....
रंगूनी आभाळ, केशरी पूर्वसंध्येला लगबगली पाखरे, जाण्यास कोटराला.... किरणे आतुरली आता, शर्वरीच्या आगमनाला वाट पाहुनी अंधुकली, क्षण लागता ओसरायला.... तारकांचे पैंजण घालून, काजव्यांचे पदर ओढून साजिरी निशा अवतरली,रातराणीचे अत्तर लेवून.... निशेलाहीे ठाऊक नव्हते, अकल्पित असे काही होते तिच्या आगमनासमयी, तेज सारे लोपले होते.... काळोखाच्या गर्द गाभारी, हुरहूर लावून अंतरी प्रश्न अनंत टाकूनी, कुठेसी विरला तो शौरी.... घटका सरता पहाटवारे, वाहू लागले माथ्याला अरुणोदय होता पूर्वेला, किलबिल झाली क्षितिजाला.. नकळत यामिनीच्या लोचनांनी, टिपले राजस सूर्याला कर जुळता रजनीसूर्याचे, तम सर्वत्री लोपला.... एकरूपतेचा क्षण तो उज्वल,अवघ्या विश्वात रंगला विभावरी विलीन होऊन, मिहिर तेजस्वी प्रकटला....अमिता
वाचने
12034
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
रंगूनी आभाळ, केशरी
धन्यवाद
In reply to रंगूनी आभाळ, केशरी by गणेशा
छान आहे कविता. आवडली.
धन्यवाद
In reply to छान आहे कविता. आवडली. by सतिश गावडे
@Amita joshi
@Amita joshi
'सूर्यस्वप्न...'
ही कविता आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@Amita joshi
'सूर्यस्वप्न...'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
धन्यवाद
In reply to @Amita joshi by टर्मीनेटर
मस्त..
धन्यवाद
In reply to मस्त.. by गोंधळी
मस्त
धन्यवाद
In reply to मस्त by तुषार काळभोर
सुंदर !
धन्यवाद
In reply to सुंदर ! by बबन ताम्बे
छान आहे कविता.