Skip to main content

कामवाली!

लेखक उमेश कोठीकर यांनी बुधवार, 08/04/2009 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
होती गरीब कष्टमूर्ती ती साधी निरागस कामवाली पती मुले आयुष्यच सर्व कष्टांचा ती डोंगर झेली! नाही दिवाळी! नाही दसरा हौस मौज ना ईच्छा काही पती दारूडा! नरकयातना! वीजवेदना! चमकून जाई होती शहाणी! म्हणे हळूच ती मुले माझी शिकतील ताई मोठ्ठे होतील तुमच्यासारखे! नको देवा! दुसरे काही! मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून ती कौतुक सांगे काय बाई! वळ माराचे लपवून पदरी! काम करी! सांगे ना काही! स्वप्न्!नशीब!आयुष्यही फुटले! लपवे ती अश्रूंचे पाट! असीम कष्टा फळ मिळे ते दारूचाच घमघमाट! झोपड्पट्टीत गलका झाला! खिडकीत वाकून! काय झाले? कळले आता दारूड्याने कामवालीला ठार मारीले! काळीज चर्र! धावत गेली! दृष्य पाहूनी ते थिजली! वर्मी लागता घाव बिचारी! माऊली ती श्रांत झाली! पैशांसाठी राक्षस झाला! मागाहूनी कथा समजली! बाळाच्या दुधाचे पैसे! घट्ट मूठ ती नाही उघडली! पांढरपेशी चर्चा झाली माणूसकीपण बोर झाली चला मंडळी! जाऊ द्या हो! मिळेल दुसरी कामवाली!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5084
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

उमेश, खरंच या काव्यात मांडलेल्या कथा आणि व्यथा खूप करूण आहेत. मोजक्या शब्दांत ते दु:ख अगदी तंतोतंत व्यक्त केलंय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

कविता वाचून वाईट वाटते. खरं सांगायचं तर मला सुदैवानं बर्‍या कामवाल्या मिळाल्यात. हैदराबादची कामवाली तर साडीला मॅच होणारे लिपस्टीक, बांगड्या घालून यायची. आपल्यालाही बरं वाटतं त्यांना बघून. पुण्यातली कामवाली तर व्यवस्थीत खात्या पित्या ;) घरातली होती. माझ्या सासूबाईंच्या कामवालीनं तिच्या नवर्‍याला ठोकून काढले होते, दारू पिऊन आला म्हणून्.......तर अश्याही धाडसी कामवाल्या असतात बरं का! रेवती

In reply to by मदनबाण

आवडली कविता !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अप्रतिम कविता. पांढरपेशी चर्चा झाली माणूसकीपण बोर झाली चला मंडळी! जाऊ द्या हो! मिळेल दुसरी कामवाली!! हे फारच खास. खराटा (रंग माझा वेगळा)