होती गरीब कष्टमूर्ती ती
साधी निरागस कामवाली
पती मुले आयुष्यच सर्व
कष्टांचा ती डोंगर झेली!
नाही दिवाळी! नाही दसरा
हौस मौज ना ईच्छा काही
पती दारूडा! नरकयातना!
वीजवेदना! चमकून जाई
होती शहाणी! म्हणे हळूच ती
मुले माझी शिकतील ताई
मोठ्ठे होतील तुमच्यासारखे!
नको देवा! दुसरे काही!
मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून ती
कौतुक सांगे काय बाई!
वळ माराचे लपवून पदरी!
काम करी! सांगे ना काही!
स्वप्न्!नशीब!आयुष्यही फुटले!
लपवे ती अश्रूंचे पाट!
असीम कष्टा फळ मिळे ते
दारूचाच घमघमाट!
झोपड्पट्टीत गलका झाला!
खिडकीत वाकून! काय झाले?
कळले आता दारूड्याने
कामवालीला ठार मारीले!
काळीज चर्र! धावत गेली!
दृष्य पाहूनी ते थिजली!
वर्मी लागता घाव बिचारी!
माऊली ती श्रांत झाली!
पैशांसाठी राक्षस झाला!
मागाहूनी कथा समजली!
बाळाच्या दुधाचे पैसे!
घट्ट मूठ ती नाही उघडली!
पांढरपेशी चर्चा झाली
माणूसकीपण बोर झाली
चला मंडळी! जाऊ द्या हो!
मिळेल दुसरी कामवाली!!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5076
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय लिहु तेच कळेना..
खूप करूण
.............
कविता
लै भारी
कविता
+१
In reply to कविता by मदनबाण
अप्रतिम..डो
कविता
अप्रतिम
खुपच छान
ह्रुदयस्पर्शि